Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55
सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..
मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.
ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कमोड मध्ये उलटी करताना
कमोड मध्ये उलटी करताना दाखविली आहे >>> हॉलीवूड मूव्हीज मधेही अनेकदा दाखवतात. आणि त्या आधी अगदी बार मधले पब्लिक टॉयलेट असेल तरी हाताने ती रिंग उचलताना दाखवतात. इतके स्वच्छ टॉयलेट फक्त चित्रपटातच असावे.
हे काही स्टीरीओटिपिकल सीन्स आहेत. जसे हीरो व हीरॉइन जर घरी स्वयंपाक करून खाणार टाइप रोमॅण्टिक सीन असेल तर नेहमी वाइन पित पित पास्ता करताना किंवा एका मोठ्या बाउल मधे लाकडी लेडल्स वापरून सॅलड करताना दाखवतात तसे.
तिला bulimia असतो ना म्हणून
तिला bulimia असतो ना म्हणून अशी उलट्या करताना दाखवली आहे. सुरुवातीला वैधानिक इशारा पण आहे प्रत्येकवेळी.
तांडव पूर्ण पाहिला पहिला सीझन
तांडव पूर्ण पाहिला पहिला सीझन. काय पुचाट सिरीज आहे.
सैफच्या बायकोचा काय रोल आहे नक्की कथानकात? अगदी पीएम लेव्हलच्या मीटिंग मधे खुर्च्या भरवायला तिला बसवलेले असते का? ती तर काय मंत्री किंवा पार्टी मधे काही सिनीयर रोल मधे दाखवलेली आठवत नाही. सैफची बायको आहे म्हणून अधिकृत कामकाजात तीही बसत असावी येउन. मी दिल्लीला एकदाच गेलो आहे पण तो दाखवलेला परिसर (ती मैथिली जेथे कचर्याच्या बिन मधे चिठ्ठी शोधायला येते) भर दुपारी इतका निर्मनुष्य असतो का? कुमुद मिश्राला तर वाया घालवले आहे.
मला अजूनही त्या कॉलेजच्या निवडणुकीत सैफ व त्याच्या हस्तकांचा अनावश्यक हस्तक्षेप का चालू राहतो ते झेपलेले नाही. तो शिवा शेखर सैफला अनुकूल दिसू लागल्यावर मग पुढे याला मार त्याला मार करण्यात काय इण्टरेस्ट आहे यांना.
अनंतकाळापासून pending असलेली
अनंतकाळापासून pending असलेली ,inside edge पाहिली.
मजा आली.फायनल तर जबरदस्त जमली आहे. .
वायूची body language बघून खरोखरच कोणी cricketer आहे असं वाटतं.
आता सीझन 2 सुरू केलाय. Auction चा खेळ खतरनाक.
ok.रोमॅण्टिक सीन असेल तर
रोमॅण्टिक सीन असेल तर नेहमी वाइन पित पित पास्ता करताना किंवा एका मोठ्या बाउल मधे लाकडी लेडल्स वापरून सॅलड करताना दाखवतात तसे.....
आणि आपल्याकडे कपाळाला- चेहर्याला कणीक लागलेली दाखवितात तसे....
लंपन मीही तो इशारा वाचलेला..पण मला या सीन्स साठी आहे हे लक्षातच आलं नाही.....
Marvel ची WandaVision छान आहे
Marvel ची WandaVision छान आहे . अतिशय वेगळी ट्रीटमेंट दिलेली आहे. पाहिले तीन भाग पाहिले . सर्वांचा अभिनय उत्तम . पुढच्या भागांची प्रतीक्षा करतोय .
क्रlऊन सिरीज एकत्र फॅमिलीने
क्रlऊन सिरीज एकत्र फॅमिलीने बसुन पहाण्यासारखी आहे का? दोन सिनिअर सिटीझन्स आणि त्यांची 2 NRI नातवंड विकेंडसाठी आली आहेत. मुलं UK मध्ये मोठी झाल्यामुळे त्यांना ब्रिटिश ड्रlमा पहाण्याची उत्सुकता आहे. आम्ही दोघे आणि दोन्ही मुले ठीक आहे, पण आजीआजोबा ओकवॉर्ड होतील असे सीन्स आहेत का काही? बेडसीन्स, न्यूडीटी, स्वेअर वर्ड्स ?
मीरा पहिले दोन सिजन आहेत तसे
मीरा पहिले दोन सिजन आहेत तसे सीन्स खासकरून मार्गारेटचे.
आभारी आहे, लंपन.
आभारी आहे, लंपन.
सप्रॅनोज (मदर ऑफ ऑल क्राईम
सप्रॅनोज (मदर ऑफ ऑल क्राईम ड्रामाज) चा प्रिक्वेल (मुवि) येतोय - द मेनी सेंट्स ऑफ नुअर्क (नोप, इट्स नॉट नेवार्क) जेम्स गँडलफिनिचा मुल्गा मायकेल, टोनी सप्रॅनोजची तरुणपणातली भूमिका वठवणार आहे. एचबिओवर, स्टे ट्युन्ड...
Post in English only no bro.
Post in English only no bro.
फॅमिली मॅन आला का?
फॅमिली मॅन आला का?
black widow नावाची भयानक
black widow नावाची भयानक वेबसिरीज पहायला सुरुवात केली..
एक एपिसोड पाहीला कसा तरी.. एवढे कलाकार आहेत तर नक्की काही तरी चांगली असेल असं वाटलं होतं. म्हणून मग दुसरा एपिसोड पहायला घेतला, पण.. बापरे.. इत्कं डोकं गरगरायला लागलं की बस्स..! मग सोडून दिला..
किती ते कल्पना दारिद्य्र..!
ज्याने कुणी पुर्ण पाहिली असेल, त्याला सलाम.. त्यांनी क्रुपया लिहिण्याचे करावे की त्यांचा अनुभव कसा होता. खरच वेबसिरीज चांगली आहे की माबुदो?
तांडव पाहीली. कथानकात काही
तांडव पाहीली. कथानकात काही नाविन्य नाही. पण विद्यार्थी युनियनला राजकारणी कसे उल्लू बनवतात व त्यांचा वापर कसा करून घेतात हे बर्यापैकी मांडले आहे.
सैफ सोडून सगळ्यांचा अभिनय चांगला आहे. म्हणजे सैफ वाईट नाही पण कायम रागावलेले तोंड बघवत नाही. सैफच्या बायकोचा नक्की काय रोल तो कळला नाही. कदाचित दुसर्या सिझन मध्ये काहीतरी पोल खोल असेल. सुनिल ग्रोवरला बर्यापैकी सिरीयस रोल मिळाला आहे. त्याचे ते कॉमेडी शो बघवत नसायचे. पण इथे चांगले फुटेज मिळाले आहे. पुढे काय ह्याची उत्स्मुकता नक्कीच ठेवली आहे. आता दुसरा सिझन आला की बघणे आलेच.
स्वरा भास्कर आणि सुमित
स्वरा भास्कर आणि सुमित व्यासची आपके कमरे में कोई रहता है ही वेबसिरीज ट्रेलर्स आणि कास्ट पाहून मोठ्या अपेक्षेने पाहायला घेतली पण फक्त निराशा हाती पडली. एमक्स प्लेयर वर आहे आणि १६ मिनिटांचे ५ भाग केलेत त्यामुळे फार वेळ नाही गेला वाया.
सुमित व्यास , वेब सिरीज मध्ये
सुमित व्यास , वेब सिरीज मध्ये over exposed झालायं .
सगळीकडे दिसतो.
बिच्छू का खेल नाही आवडली.
बिच्छू का खेल नाही आवडली. अखिल ज्या पद्धतीने पोलिसांशी सुरुवातीपासून बोलताना दाखविला आहे ते अगदीच अतर्क्य वाटते. ल्यूडोप्रमाणेच यात विनाकारण जुन्या सिनेमांची गाणी आणि संगीत वाजविली आहेत.
व्हर्जिन भास्कर, मिर्झापूर आणि बिच्छू का खेल पाहिल्यावर यूपीची चांगली प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहत नाही.
यूपीची चांगली प्रतिमा>> विन
यूपीची चांगली प्रतिमा>> विन डिझेलचे पिक्चर बघ, अपेक्षाभंग होणार नाही
Mind the Malhotras (Prime)
Mind the Malhotras (Prime) बघुन संपवली... वेळ घालवायला हलकी - फुल़की छान आहे.....
तांडव बद्दल लिहीताना एक
तांडव बद्दल लिहीताना एक लिहायचे राहून गेले - त्याच्या टायटल्स बरोबर येतात ती रेखाचित्रे सुंदर आहेत व त्यावेळचे पार्श्वसंगीत सुद्धा छान आहे.
इथे कुणी अल पचिनोची Hunters
इथे कुणी अल पचिनोची Hunters पाहिली का? ऍमेझॉन प्राईमवर आहे. सिरीज तर ग्रिपिंग आहेच, पण ओपनिंग स्कोअर बेस्ट... मी प्रत्येक एपिसोडला बघतोय तो, binge करतानासुद्धा! आजवर पाहिलेला बेस्ट ओपनिंग स्कोअर
रणवीर शौरी, पुर्बी जोशी, ओमी
रणवीर शौरी, पुर्बी जोशी, ओमी वैद्य ह्यांची मेट्रो पार्क पहिली.
अगदी ह. ह. पु. वा.
अगदी हलकी फुलकी
खूप मस्त.
खूप मस्त वाटलं पाहून.
मी २ रा सिझन पहिला.
पाहिलंही खूप छान आहे इति नवरा.
रुचा, कुठे पाहिली?
रुचा, कुठे पाहिली?
The good doctor पाहतोय.
The good doctor पाहतोय. इंटरेस्टिंग आहे.
पूंबा दुरदर्शनवर आहे का गुड
पूंबा दुरदर्शनवर आहे का गुड डॉक्टर?
पूंबा दुरदर्शनवर आहे का गुड
पूंबा दुरदर्शनवर आहे का गुड डॉक्टर? <<< प्राईमवर. मलाही आवडते. प्राईमवर तीन आलेत. चौथ्या सीजनच्या प्रतिक्षेत आहे.
'प्रॉडिगल सन ' पाहतोय. चांगली
'प्रॉडिगल सन ' पाहतोय. चांगली आहे.
https://www.imdb.com/title/tt10327354/
गुड डॉक्टर हिंदी का इंग्रजी.
रुचा, कुठे पाहिली? >>> माझाही हाच प्रश्न.
गुड डॉक्टर हिंदी का इंग्रजी. कोण कोण आहेत. प्राईम आहे आमच्याकडे.
धनश्री थँक्स.
धनश्री थँक्स.
मी नेट्फिल्क्सवर फ्रेंड्सच्या जोईची ‘एपिसोड्स’ ही मालिका पाहिली. जोई माझा फार्फार लाडका आहे. त्यात प्रौढ शिव्या, सुचकता, संबंध सगळे भरभरून आहे. ते जमेल तसं पुढे करत पाहिली तरीही ती मालिका मला फार आवडली. सगळ्यांनी मस्त कामं केली आहेत. जोईबद्दल तर लिहायची गरजच नाही. कथा म्हणाल तर साधी पण वेगळी आहे.
तिथेच जोईचीच ‘मॅन वीथ द प्लॅन‘ पण गोड मालिका आहे. ती पण आवडली.
जॉई गोडच आहे.तो कधीकधी टोनी
जॉई गोडच आहे.तो कधीकधी टोनी डांझा स्टाईल ची नक्कल करतो.मॅन विथ द प्लॅन थोडी पाहून सोडली.पण पूर्ण बघायची आहे.
रिव्हरडेल चे नवे एपिसोड आलेत.पण ते आता काहीही करतायत.ही मुलं कॉलेज शिकताना कमी आणि खून रहस्य सोडवताना जास्त दिसतात.
Pages