वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Prime - Bang Baja Barat सुरू केली. सुरुवात छान वाटतेय. बाकी पूर्ण बघितल्यावर कळेल...

नेटफ्लिक्स वर नविन सेरीज- २३ एप्रिल ला येतेय - सुपरहिरो टाइप जानरामधली दिसतेय
Shadow and Bone | Official Trailer | Netflix
https://youtu.be/b1WHQTbJ7vE
Dark forces conspire against orphan mapmaker Alina Starkov when she unleashes an extraordinary power that could change the fate of her war-torn world.

फा, मी पाचवा एपिसोड संपवला बॉ. बे. चा.
आपल्यासारख्या (सामान्य!) आचार विचारांचं एकही पात्र नाही म्हणून मन खिन्न झाले!
Happy एकजात सगळेच बाहेरख्याली!!!
पूजा भट तोंडातल्या तोंडात बोलते, अर्ध्याहून जास्त..ऑलमोस्ट 80 टक्के संवाद इंग्लिश मधून आहेत, फातिमा च्या नवर्‍याची कीव येते...ही का म्हणे त्याच्याशी अशी वागत असते? .....
रानी चा नवरा तर अगदीच कणा नसलेला....
एकुणात.......

ती देवयानीचे काम केलेली कोण आहे माहीत नाही. ती ग्रेसफुल आहे एकदम. यातली आयेशा बोलली की कायम जेवताना तोंडात मोठा घास घेतल्यावर बोलायला लागते तेव्हा जसा चेहरा होतो तसा वाटतो तिचा. किंवा तंबाखूचा मोठा बार लावल्यावर लोक बोलतात तसे.

एक सीन मला मजेदार वाटला. राहुल बोस शी अफेअर असल्याचे जाहीर झाल्यावर त्याच्या बायकोला पूजा भट भेटते ते एका पेण्टिंगसमोर. त्या पेण्टिंगचे नाव Fury - चित्रात लाल रंग, राग वगैरे. साहजिकच त्याची बायको त्यावर काही रिमार्क्स करते.

पण मला हसू आले ते याकरता की तिच्याशी जाउन बोलायचेच होते तर हिला अजून एखादे नॉर्मल पेण्टिंग नाही दिसले का त्यांच्या सिच्युएशनशी अजिबात संबंध जोडता न येणारे Happy

बाकी ते अ‍ॅक्विझिशन "इल्लिगल" का आहे याबद्दल काही वर्णन होते का? आठवत नाही. तो इल्लिगल म्हणतो. ही रडते. इतकेच लक्षात आहे. आणि एकदम इल्लिगल कशाला असेल. असे मर्जर्स रेग्युलेट करणार्‍या संस्था असतात त्यांच्या नियमात बसत नाही म्हणून किंवा मोनोपॉली होउ नये म्हणून अनेकदा मर्जर होउ देत नाहीत. पण तसे काही इथे दिसले नाही. यात एकदम इल्लिगल वगैरे म्हणत नाहीत. आणि मुळात अशी मर्जर वकिलांच्या ताफ्यात होत असतात. एखादे मुख्य निगोशिएशन यांचा सीईओ त्यांचा सीईओ समोर बसून करतील पण ती पूर्णत्वाला न्यायचे काम लीगल विभाग करतात. आता त्यांचे कामकाज दाखवू नका ठीक आहे. पण ढोबळपणे जे नियमांत बसत नाही अशा चर्चा सीईओ व तिची सहकारी त्या निगोशिएशनमधे एकमेकांशी वाद घालत करतायत, लीगल विभागाचा एकही माणूस तेथे नाही. हे सगळे म्हणजे झी मराठी च्या फक्त थोडी वरची लेव्हल आहे. केवळ आजूबाजूचे नेपथ्य "एकदम सो हाय क्लास" वाटते, इतकेच Happy

हे सगळे म्हणजे झी मराठी च्या फक्त थोडी वरची लेव्हल आहे. केवळ आजूबाजूचे नेपथ्य "एकदम सो हाय क्लास" वाटते, इतकेच Happy>>>>>>>>>>> Lol अजून झी मराठी मेल आणि प्रेझेंटेशन मधेच अडकले आहे.

Happy हो आणि "ती या कंपनीची फाइल आणा", "मीटिंग छान झाली", कॉरिडॉर मधल्या चर्चेत "एक काम करा. ती फॅक्टरी बंद करा", "सर तुमची कॉफी"

हो आणि "ती या कंपनीची फाइल आणा", "मीटिंग छान झाली", कॉरिडॉर मधल्या चर्चेत "एक काम करा. ती फॅक्टरी बंद करा", "सर तुमची कॉफी">>> Lol मिटींग-मिटींग खेळतात ते.

हो आणि "ती या कंपनीची फाइल आणा", "मीटिंग छान झाली", कॉरिडॉर मधल्या चर्चेत "एक काम करा. ती फॅक्टरी बंद करा", "सर तुमची कॉफी">>> Lol तो का रे दुरावा वाला हीरो तर ppt master च होता. Lol फारच मेहनत करायचा रात्रभर जागून.

तिथे फार मेहनत केली म्हणून आता नवीन मालिकेत त्याने ऑनलाईन लग्न करून आणलेल्या बायकोवर सगळे सोपवून दिले आहे. हा फक्त तोंड पाडून बसतो.

#### स्पॉयलर अलर्ट ####

>>बाकी ते अ‍ॅक्विझिशन "इल्लिगल" का आहे याबद्दल काही वर्णन होते का? <<
बरेच दिवस झाले बघुन, संदर्भ चूकण्याची शक्यता आहे. ते अ‍ॅक्विझिशन इल्लिगल पेक्षा अनएथिकल ठरण्याची भिती बॅकेच्या टीमला होती. कारण त्या मुलीच्या बापाने त्याच बँकेतुन भरमसाठ कर्ज घेउन आता तो डिफॉल्टर झाला होता. मुलीच्या किलर प्रॉडक्ट (किंवा जे काहि असेल ते) कंपनी मधे स्टेक घेउन बॅंकेला आपली पत वाचवायची असते; बापाचा लेवरेज घेउन. परंतु पुढे, सेबी अडथळे निर्माण करु शकेल हि भिती (ऑन अनएथिकल ग्राउंड्स?) सुद्धा होती...

यस अनएथिकल भाग क्लिअर आहे. तो महेश राव (राहुल बोस) बहुधा सेबीसारख्या रेग्युलेटरी एजन्सीकरता काम करत असतो. त्यांचे स्टेटमेण्ट पेपर मधे आलेले दाखवले आहे त्यात ते स्पेसिफिकली "इल्लिगल" म्हंटलेले दाखवले आहे - ते अशा बातम्यांमधे unusual आहे.

फारएंड... Biggrin
एखादे मुख्य निगोशिएशन यांचा सीईओ त्यांचा सीईओ समोर बसून करतील पण ती पूर्णत्वाला न्यायचे काम लीगल विभाग करतात. आता त्यांचे कामकाज दाखवू नका ठीक आहे. पण ढोबळपणे जे नियमांत बसत नाही अशा चर्चा सीईओ व तिची सहकारी त्या निगोशिएशनमधे एकमेकांशी वाद घालत करतायत, लीगल विभागाचा एकही माणूस तेथे नाही ++++

बँग बाजा बरात (प्राईम).. वर पाहिली .. छोटीशी आहे पण मस्त..
अ‍ॅपल टिवी वर एक फुटबॉल (सॉकर) वर एक सिरीज आहे... लिखाण मस्त वाटले... (टेड लास्सो)...

इल्लिगल इंग्रजी शब्द आहे म्हणून अवतरणात आहे कि अमेरिकन उच्चार नाही म्हणून ? >>> नाही तसे काही नाही. ज्या टेक ओव्हरवर त्या रानी ने तिचे करीयर व कंपनीतील पोझिशन पणाला लावलेली असते, त्याचे यातील एकूणच चित्रण फारसा रिसर्च न करता केलेले आहे अशा अर्थाने ती पोस्ट होती.

काल JL50 पाहिली. ओके आहे. टाइम ट्रॅवल. शेवट मला कळला नाही. पटला नाही.
अभय देओल मस्त. नेहमीप्रमाणे. हा माणुस जास्त का दिसत नाही Happy बाकी पंकज कपूर आणि इतरांनी पण चांगलं काम केलंय.
पायलट झालेली नटी सारीका-शृती हसन सारखी दिसते.

TVF ची aspirants बघितली का?
बेस्ट आहे. !
UPSC च्या परीक्षेचं स्वप्न आणि मुलांच्या आयुष्याचं होणारं नुकसान खूप जवळून अनुभवलं आहे..त्यामुळे खूपच relate करता आलं.
उत्तम scrpt, अभिनय, कलाकार.
एक फार मोठा विषय हाताळला आहे.....

बेकर अँड ब्युटी बघायला सुरुवात केली काल. रोमँटिक कॉमेडी आहे.
मायामी मधली क्युबन-अमेरिकन बेकर फॅमीली आहे. टीन मुलगी आणि दोन मोठी मुलं मॉम अ‍ॅड पॉप बरोबर बेकरी स्टोअर चालवतात. डॅनिअलला सुपर मॉडेल भेटते आणि काय काय अतर्क्य घडते याची गोष्ट.
क्युबन - लॅटिनो अ‍ॅक्सेंट, ओपन माईंडेड लॅटिनो कल्चर (आणि स्टिरोओटाईप्स), हिलेरिअस संवाद आणि बरोबर यंग टीन - यंग अ‍ॅडल्ट आणि होपलेसली रोमँटिक आणि त्याच बरोबरीने थोडीफार हेलिकॉप्टर मॉम पर्स्पेक्टिव्ह.
पायलट बघितला आणि भयंकर हसलो. मजा आली. आठ एपिसोडच आहेत आणि आता वाचलं तर एबीसीने बंद केली आहे.
मॉडर्न फॅमिली मधल्या सोफिया आणि जेन द वर्जिन मधल्या अतर्क्य लॅटिनो गोष्टी आठवल्या.

बेकर अँड ब्युटी ही मूळ हिब्रू सिरीज आहे. हिच कथा इस्राएलमध्ये घडलेली दाखवली आहे. प्राईमवर आहे. मी पहिला सिझन पाहिला होता मागे. छान आहे.

बेकर ब्युटी लायनीत आहे. ट्रेलर आवडला होता.
मधे ५ वर्षे एकही मालिका पाहिली नव्हती. इथे वाचून पण नव्हती. शेवटी इथे वाचून वाचून वाचून मागच्या वर्षी प्रिणाम झालाच व पुन्हा सुरु केले मालिका पहाणे Happy

अमितव,
मला आवडली बेकर अँड ब्युटी , क्युट आहेत कॅरॅक्टर्स.. पण सिझन २ येणार नाहीये Sad

इथे the walking dead चे फॅन आहेत का कोणी? मी 7 व्या सिजन पर्यंत पोचलो आहे. मस्त आहे एकदम. 10 सिजन आहेत आणि 11 वा फायनल सिजन येणार आहे म्हणे.

इथे the walking dead चे फॅन आहेत का कोणी?>>>८ व्या सिजन पर्यंत पाहिली. नंतर तेचतेच पाहते आहे असे वाटून सोडून दिली.

Pages