वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Netflix वरचा नवा स्टँड अप ना? मला पण आवडला. हसन मिन्हाज फारच आवडतो. स्मार्ट आणि लेव्हल हेडेड ब्ला ब्ला ... आहे तो. ट्रेवर मध्ये आला तेव्हा पासून कसला नॉन स्टॉप चमकतोय तो.
त्याचा कालच TikTok वर बीनाचा फेस रिव्हील / बीना काँटेंट व्हीड्यू पण आलाय. बीना पण आवडलीच. तिच्या समोर तर हसन फारच क्यूट वगैरे दिसतोय.
रच्याकने, डेली शो ला ट्रेवर नंतर कोण येतंय केलं का जाहीर?

The watcher पाहिली नेटफ्लिक्सवर.
चांगली आहे. सस्पेन्स चांगला ठेवला आहे. दुसऱ्या सीझनची वाट बघणं आलं आता.

हसन मिन्हाज फारच आवडतो. स्मार्ट आणि लेव्हल हेडेड ब्ला ब्ला ... आहे तो.
+1
शेवटाचं Adrenaline+dopamine high+ खाली पडून ---Malala follows me on Instagram and I don't follow her back , कुमैलचे "सायबर बुलिंग" वगैरे,
करिबियनचा DO -MD , हेजफन्ड डॅड, स्कॉलॅस्टिक बुक फेअर, पहिला लॅन्डेड जोक, स्टारबक्स सौदी प्रिन्स मीट अप तर अफाट होते. Lol
It was so messed up that it ended up being real. असं काहीसं वाटलं

डेली शो ला ट्रेवर नंतर कोण येतंय केलं का जाहीर? >> माहिती नाही पण ट्रेव्हरची जागा कोण घेणार, आणि खळ्यांचं काय Wink Happy

रमड Lol तुमाखमै.

Watcher मलापण आवडली, शेवट एकदम अधांतरी ठेवलाय. पुढचा सिजन नसावा, कारण लिमिटेड एपी सिरीज होती आणि शेवटी ते वाक्य पण होतं ना की ही मिस्ट्री अजून सुटली नाहीये. आता cabinet of curiosities बघत आहे, मस्त आहे, एक एपी एक भाग असा फॉरमॅट आहे. हॉरर आहे.

वॉव! राणी कोण आहे? ऑलिव्हिआ कोलमनच आहे का? आणि प्रेझेंट डे पर्यंत आले असतील ना यात?
एमिली इन पॅरिस?? बेस्ट! हॉलिडेजची सोय झाली. Happy

प्लॅनेट मराठी
सिरीज रानबाजार
मराठीतील ott वरील पहिली असं ऐकलेलं.
बोल्ड फक्त टीजर आहेत.
ते सीन्स कथेच्या ओघात येत नाहीत. अर्थात त्या दोन व्यक्तिरेखा ठसवण्यासाठी ते टीजर कदाचित.

तर बोल्ड काय आहे. कथा आणि संदर्भ.
कथेत घेतलेले राजकारणी, पक्षाची नावं, हे आपण कुठून बेतलंय हे लक्षात येत सहजच. त्यावर वादविवाद झाले नाहीत हे आता तसे थोडंस आश्चर्यकारक.
स्टोरी पूर्ण काल्पनिक. कारण अशी घटना घडलीच नाहीये.
स्टोरी ग्रिपिंग आहे.
पुढे बघावी वाटते.
बोअर होत नाही.
कलाकार चांगले, अभिनय चांगला.
काही भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा वापर केलाय.
पण ते फार fetched वाटलं मला. विशेषतः आयेशा आणि तिच्या बहिणीबाबत. पानसेचा इन्स्पेक्टर चांगला झालाय.
राजकारण, एकमेकांवर कुरघोडी, प्रत्येकाचे सुप्त मनसुबे, त्यासाठी पोलीस दलाचा वापर असं चांगलं दाखवलंय.
आयेशा हे कॅरॅक्टर जरा पटलं नाही. इतकी दुनिया आणि माणसं पाहिलेली व्यक्ती अशी भेदरलेली पटत नाही.
शेवटी काही एपिसोड मध्ये इन्स्पेक्टर कोसळतो ते ही खरं नाही वाटलं. थोडंस streched वाटलं.
शिव्या काही वेळा सहज वाटल्या.
उदा मांगले तपासकामात वैतागून देतो त्या सहज आल्यात वाटतं. पण माधुरी पवार देते ते कृत्रिम वाटलं.
प्राजक्ता माळी surprisingly चांगला अभिनय.
अर्थात ती वस्ती देखील फार अंगावर येईल अशाप्रकारे नाही दिसली. फार casual वाटलं.
मोहन आगाशे बाप माणूस.
काय लकबी उचलल्या आहेत character च्या.

म्हंटल तर सिजन 1 मध्ये संपली.
म्हंटल तर पुढच्या सिजन येईल असा एन्ड ठेवलाय.

Watcher बघायला घेतलेली पण दोनच एपिसोड बघितले .. एपिसोड जरा मोठे आणि स्लो वाटले .. शेवट अधांतरी सोडला असेल तर बरं झाल पुढे नाही बघितली ते.

Watcher बघायला घेतलेली पण दोनच एपिसोड बघितले .. एपिसोड जरा मोठे आणि स्लो वाटले .. शेवट अधांतरी सोडला असेल तर बरं झाल पुढे नाही बघितली ते.

शेवटी ते वाक्य पण होतं ना की ही मिस्ट्री अजून सुटली नाहीये>>>
हो. मला आपलं उगाच वाटतंय दुसरा सीझन येईल.
एका सत्य घटनेवर आधारित आहे कथा आणि रिअल लाईफ मध्ये पण हे कोडे सुटलेच नाहीये. त्यामुळे, कदाचित एकच सीझन असेल.

म्हाळसा, बघ गं पुढचे भाग पण. चांगली गुंतवून ठेवते सीरीज.

The midnight club पहायचा प्रयत्न करत आहे गेले दोन दिवस. हळूहळू बघतेय.
एका पॉइंट नंतर अंधार अंधार बघायचा कंटाळा आला म्हणून बंद केली मध्यातच. आज बघेन बहुतेक पुढचे काही भाग.
हॉरर सीरिज आवडत असतील तर बघा.

BBC वरची cunk on earth ही धमाल मॉक्युमेंटरी पाहिली. जबरदस्त ह्युमर!!

BBC वरची cunk on earth ही धमाल मॉक्युमेंटरी पाहिली. जबरदस्त ह्युमर!!
>> ट्रेलर पाहिला फक्त.. जबरी आहे Lol

हसन मिन्हाज फारच आवडतो. स्मार्ट आणि लेव्हल हेडेड ब्ला ब्ला ... आहे तो. > +१११११
The patriot act पासूनच आवडतो. ट्रेवर बरोबर मात्र नाही पहिला त्याला.
The king's Jester ही खूप आवडले. काय स्टेज प्रेझेन्स आणि टाईमिंग आहे त्याचे. हसवता हसवता क्षणात गंभीर करवतो.

Pages