Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55
सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..
मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.
ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मॅन विथ द प्लॅन लाइट करमणूक
मॅन विथ द प्लॅन लाइट करमणूक आहे. कधीही कोणताही एपिसोड बघता येतो. मला विशेषतः त्यातले पॅरेन्टिंग वरचे एपिसोड्स फार आवडतात.
मला त्याची बायको जी दाखवलीय ती का कुणास ठाऊक अजिबात आवडत नाही. रागच येतो तिचा. जोई साठी पहाते.
आजच थोडे एपिसोडस पाहिले.जॉई
आजच थोडे एपिसोडस पाहिले.जॉई मस्तच.
मुलं पण भन्नाट आहेत.
मेट्रो पार्क - Eros Now वर
मेट्रो पार्क - Eros Now वर आहे
स्टीफन किंगच्या बॅग ऑफ बोन्स
स्टीफन किंगच्या बॅग ऑफ बोन्स वर दोन एपिसोडची मिनिसिरीज आली आहे. ओकेईश टाईप वाटली. पिअर्स ब्रॉस्नन आहे हिरो.
ब्लॅक समर बघत आहे नेफ्लिवर ,
ब्लॅक समर बघत आहे नेफ्लिवर , मस्त चालू आहे अजूनतरी. 4 भाग पाहिलेत ,झॉम्बी थ्रिलर आहे.
वंडर पहा... ज्युलिया
वंडर पहा... ज्युलिया रॉबर्ट्स ...
वंडर पहा... ज्युलिया रॉबर्ट्स
वंडर पहा... ज्युलिया रॉबर्ट्स ... >>> कुठे आहे हा. ज्युलिया फार आवडते मला.
गुड डॉक्टर माझ्याही खुप
गुड डॉक्टर माझ्याही खुप आवडीची सिरियल आहे. त्यातला डॉ. मर्फी खुप छान आहे. अगदी होपफुल सिरियल वाटते ती.
इकडे वाचून एमिल इन पॅरिस
इकडे वाचून एमिल इन पॅरिस पाहिली , सुंदर आहे , डोक्याला शॉट नाही , कॉमेडी type .
पॅरिस चे खूप सुंदर ... आणि एमिली सुद्धा .
मी काल सिमोन बेकर साठी
मी काल सिमोन बेकर साठी डेव्हील वेअर्स अ प्राडा पाहिला(त्याचा रोल फारच चिमुकला होता अर्थात.)
डेव्हील वेअर्स प्राडा, एमिली इन पॅरिस आणि गर्ल इन द सिटी च्या कथा बऱ्याच सारख्या वाटतात.(हल्ली स्पोर्ट्स वरच्या सिनेमांचं होतं तसं.)
एमिली इन पॅरिस चांगली आहे.हलकी फुलकी.
ऍमेझॉन prime वर The Great
ऍमेझॉन prime वर The Great Escapists नावाची एक सिरीज आलीये . दोन माणसे एका निर्जन बेटावर विमान अपघाता मुळे अडकतात . त्यांच्या इंजिनीरिंग कौशल्य आणि सायंटिफिक कन्सेप्ट वापरून ते काय काय धमाल गोष्टी बनवतात आणि तिथून सुटायचा प्रयत्न करतात . विनोदी अंगाने जाणारी ही सिरीज मुलांबरोबर बघायला खूप मस्त आहे.
ओके, मजेशीर वाटतेय. नक्की
ओके, मजेशीर वाटतेय. नक्की बघते.
मॅन विथ द प्लॅन एकदा बघायला घेतलं होतं आणि म्हातारा जोई बघायचा नाही म्हणून सोडलं होतं.
इथे वाचून परत बघायला घेतलं. खूप मजेशीर सिरीयल आहे. आपला जोई मुलाबाळांसह असेल तर काय काय गंमती जंमती होतील त्याच्या स्वभावाने, याची कल्पना करा.
सगळे कलाकार आवडले.एक मजेशीर वाटते ते म्हणजे 'परदेशात जास्तीत जास्त विभक्त्त कुटुंबं असतात' असं आपल्याला वाटतं पण या मालिकांत जनरली आजी आजोबा, मुलं, भाऊ भाऊ सगळे एकत्र शेजारी शेजारी राहताना आणी एकत्र गोष्टी करताना दाखवतात. जेन द व्हर्जिन मध्ये पण तसंच होतं.
इथे वाचून व्हर्जिन रिव्हर
इथे वाचून व्हर्जिन रिव्हर पाहिली...... खुप आवड्ली....मस्त...
हो , जोई म्हातारा असला तरी
हो , जोई म्हातारा असला तरी चार्म नाही गेला त्याचा. फक्त केस पांढरे झालेत. कलप करत नाही हे आवडले.
ब्लॅकलिस्ट (नेटफ्लिक्स) च्या
ब्लॅकलिस्ट (नेटफ्लिक्स) च्या एका एपिसोडमध्ये dembe मारला जातो, तो एपिसोड नंबर माहिती आहे का कुणाला?
ते family man ११ तारखेला
ते family man ११ तारखेला येणार होतं, कुटं र्हायलं?
फॅमिली मॅन 12 फेब्रुवारी ला
फॅमिली मॅन 12 फेब्रुवारी ला येणार होतं पण आता रिलीज समर पर्यंत पुढे ढकलला आहे. बहुधा सुट्ट्यात जास्त वेळ लोकांना, जास्त टी आर पी मिळवणं किंवा अजून सर्व एपिसोड तयार नसणं अशी कारणं असतील.
Prime वर Deception बघितली का
Prime वर Deception बघितली का कोणी ?
एक magician and illusionist आपल्या फायद्यासाठी FBI ला cases solve करायला मदत करायची ठरवतो. त्याची टीम सोबत येते.
Mentalist मध्ये रेड जॉन होता , इथे MW (Mystery woman) आहे.
ही mw मुळात कोण असते, तिचे या magician सोबत नक्की काय connection असतं ?
हातचलाखी , वेषांतर अशा गोष्टी आवडत असतील तर नक्कीच बघणेबल आहे. टाईमपास झाला माझा.
अजिंक्यराव पाटील ,
अजिंक्यराव पाटील , ब्लॅकलिस्टमध्ये dembe मारला गेलेला नाही अजूनही. सीझन ८ मध्येही तो आहे आणि सीझन ९ मध्ये पण तो असणार आहे
कोणी "You" ही वेब series
कोणी "You" ही वेब series पहिली आहे का?
Your Honor बघतोय...
Your Honor बघतोय...
Dembe नाही, Kaplan! सापडला
Dembe नाही, Kaplan! सापडला एपिसोड आणि आता परत सुरू केलं बघायला
तुम्ही dembe लिहिलेय म्हणून
तुम्ही dembe लिहिलेय म्हणून तस लिहिलेय.
Mrs Kaplan ची स्टोरी भन्नाट आहे
अभिषेक सावंत , मी पहिला सीझन
अभिषेक सावंत , मी पहिला सीझन बघितलेला आहे you चा .
सोशल मिडिया वापराच्या नवीन
सोशल मिडिया वापराच्या नवीन गाईडलाईन्स जारी. आत्ता live दाखवतायेत.
ओटीटीवर अश्लील, आक्षेपार्ह गोष्टी दाखवता येणार नाही. मला आवडलं हे. वेबसिरीज वगैरे ह्या गोष्टींसाठी बघत नव्हते फार. बंधन नसल्याचा अति गैरफायदा घेत होते बरेच जण ओटीटीवर.
यात बर्याच पळवाटा काढता येत
यात बर्याच पळवाटा काढता येत असतील.
म्हणजे एखादी इंडीयन पार्शव्भूमी ची वेब सिरीज अमेरिकेत बनली तर त्याला अमेरिकेतले वेब सिरीज चे सेन्सरशिप कायदे लागू, वगैरे अश्या.
ओटीटी वरच्या सिरीयल्स सध्या लोक बघतात ते सगळं बिनधास्त दिसतं म्हणून. (म्हणजे काहीसं आपल्याला आवडणार्या वेस्टर्न सिरीयल्स मधल्या संस्कृती किंवा दृष्याशी समांतर काही भारतीय तडका घालून बघायला मिळते म्हणून.मला हा मुद्दा नीट मांडता येत नाहीये. म्हणजे काहीसं ओरिजिनल हिरो शाईपेन सारखा पण थोडा वेगळा भारतीय हिरो शाईपेन मिळायचा तसे काहीतरी.)
वेब सिरीज पूर्णपणे सगळं काढून वरणभात केल्या तर भारतीय वेब सिरीज चा मुख्य ऑडीयन्स असलेले लोक्स परत इतर सहज बघता येणार्या पाश्चिमात्त्य बोल्ड कंटेंट कडे वळतील.
ओरिजिनल हिरो शाईपेन सारखा पण
ओरिजिनल हिरो शाईपेन सारखा पण थोडा वेगळा भारतीय हिरो
तो एकच प्रॉडक्ट असा होता की जो चायनीज मिळाला तर फार भारी आणि इंडियन मिळाला तर कमीपणाचं वाटायचं.
हुकुमशाहमोदि
हुकुमशाहमोदि
वेब सिरीज पूर्णपणे सगळं काढून
वेब सिरीज पूर्णपणे सगळं काढून वरणभात केल्या तर भारतीय वेब सिरीज चा मुख्य ऑडीयन्स असलेले लोक्स परत इतर सहज बघता येणार्या पाश्चिमात्त्य बोल्ड कंटेंट कडे वळतील. >>> अगदी वरणभात type असेल असं वाटत नाही. सेन्सॉर सर्टिफिकेट असलेले चित्रपट कुठे असतात अगदीच असे. माझ्यासारखे काहीजण बोल्ड कन्टेट, शिव्यांचा भडीमार यामुळे वळत नाहीत जास्त, ते वळतील आता.
सेन्सॉर बोर्डाने सर्टिफिकेट
सेन्सॉर बोर्डाने सर्टिफिकेट द्यावे फक्त. जे आजपर्यंत वेबसिरिजना आवश्यक नव्हते आणि काही नियमावली नसल्याने ते मिळतही नव्हते. आता ते मिळवावे लागेल. Nothing else should change.
Pages