वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेटफ्लीक्सवर इस्ट सुशी किंवा अशाच काहीतरी नावाचा ड्रामा आहे >>> धन्यवाद रेको बद्दल. नेफिवर ब्राउज करताना त्याचे नाव बघितले होते पण बघितला नाही. आता बघेन.

हॉटस्टारची मेम्बरशिप संपत आली आहे आणि वर्षभरात एकच सिरीज बघितली म्हणून आता थोडे पैसे वसुल करण्यासाठी बघत आहे.
१) क्रिमिनल जस्टीस एक
पहिल्याच भागात आदीच्या बहिणीचा घोगरा आवाज ऐकून अरेच्या ही त्या वेडिंगचा शिनेमाची नायिका असे झाले. जेलमधले भयानक राजकारण अंगावर आले. जॅकीला खूप वर्षांनी बघितले आणि तो आवडला मुस्तफा म्हणून. लायक भयानक वाटला. नंतर आलेला जेल इन्चार्ज आता झी वरच्या त्या रात्री काय झाले मध्ये आहे का. पोलीस तपास खरंच इतका ढिसाळ असतो का आणि जेलमध्ये अजिबात साफसफाई नसते हे बघून आश्चर्य वाटले. मिश्राच्या पायाची अवस्था आणि सारखे खाजवणे बघून कसेसेच झाले. आश्रम मधल्या उजागरची डॉक्टर मैत्रीण इथे वकील झाली आहे. व्यवसाय बदलला पण भूमिका सारखीच वाटली, अन्यायाशी लढा.
२) क्रिमिनल जस्टीस दोन
फार संथ आणि कंटाळवाणी वाटली. डोंगर पोखरून उंदीर काढला असे वाटले. कीर्ती कुल्हारीचा पडलेला चेहरा आणि काहीच न बोलणे बघून वैताग आला. बोल बाई एकदाची असे झाले शेवटी. तिच्यापेक्षा तिच्या वकिलांनाच तिची चिंता. ही बाई काही तोंड उघडायला तयार नाही. विषय तसा गंभीर होता पण चार पाच भागात मालिका संपवता आली असती. अनु शिकलेली असताना हे सगळं का सहन करते, घटस्फोट का घेत नाही, वडिलांना किंवा सासूला का संपर्क करत नाही असे प्रश्न पडले. डॉक्टरला एकदाच भेटते, त्यातही त्याच्याशी संबंध ठेवते आणि त्यातून तिला दिवसही जातात हे अचाट वाटले. वर्षा दांदळे, विभावरी देशपांडे, सुहिता थत्ते, पोलीस जोडपे एवढे मराठी कलाकार आहेत. पोलीस जोडप्यातली बाई ओळखीची वाटली. आशिष विद्यार्थी वाया घालवलाय. शेवटचा भाग परत बघणार आहे कोर्ट सीनसाठी.
३) आर्या
फारच गोळीबार आहे. बंदुकीचा परवाना असला की खून करायची पण परवानगी मिळत असल्यासारखे सगळे बंदूक चालवतात. सुश्मिता नेहमीच आवडते, इथेही मस्त दिसली आहे. संग्राम शेफ रणवीर सारखा दिसतो. जवाहर तनु वेड्स मनू मध्ये होता का. शेवटी आर्याने सांगितलं की याने याला मारलंय तर लगेच त्याला अटक करतात पण एवढे काळे धंदे पूर्ण सिरीज मध्ये दाखवले त्याला कोणीच वाली नाही. संग्रामला शेवटी का अटक होते, शेखवतच्या कोणत्या माणसाला तो कधी मारतो. शेखावातला मारणे ईतके सोपे असते तर या आधीच का नाही मारत. त्या तिन बॅगा ज्यात ड्रग असते त्या कुठे जातात मग शेवटी. ड्रग ठेवलेल्या बॅगा पाण्याखाली ठेवल्यावर त्यातले ड्रग ओले नाही का होणार. तेज गेल्यावर संग्राम आर्याला खोटे बोलतो की ही तेजची आयडिया होती. संग्राम खोटं बोलत होता हे कळल्यावर आर्याला इतका धक्का का बसतो, तिने जे केलं ते तर तिला करावंच लागणार होतं. तेजला त्या ड्रग मध्ये काही रस नसतो पण शेवटी ड्रग तर त्यानेच लपवलेले असते त्याच्या झीलवाल्या घरात कोणाला न सांगता, ते का.

कोणी बाँबे बेगम्स बघतेय का नेटफ्लिक्स वरची? पुजा भट, अमृता सुभाष आणि अजून १-२ जणी आहेत (नावं माहित नाहीत) ट्रेलर वरून तरी टीपिकल वूमन एंपॉवर्मेंट वरच असेल वाटतेय.

कोणी बाँबे बेगम्स बघतेय का नेटफ्लिक्स वरची? <<< सुरू केली होती, पण संपवेन असं वाटत नाही. १/२ एपिसोड बघितला..

मी काल पहिला एपिसोड पाहिला. पूजा भट भयंकर दिसते/ बोलते. मेन्टली अनस्टेबल असावी असेच वाटते. ती केपेबल सीईओ वगैरे कुठेच वाटत नाही. त्यामुळे इतर पुरुष कलीग्ज्चा जेन्डर बायस त्यांना दाखवायचा आहे ती त्यांची जस्टिफाइड कन्सर्न वाटते Happy
बाकी पण कॅरेक्टर आणि एकूण स्टोरीलाइन काहीच खास नाही वाटली.

बाँबे बेगम्स : सुरवातीला चांगली वाटली पण दुसर्या एपिसोड नंतर बघताना फक्त वेब सिरीजचे सगळे टिकमार्क्स चेक केलेत इतकच दिसतय ( एक्स्ट्रॉ मॅरिटल अफेअर्स, अ‍ॅडक्ट कन्टेन्ट, बायकांच्या नशा, लेस्बियन सेक्स, कॉर्पोरेट कल्चर मधले अनएथिकल लोक, पैशाचा गैरवापर, पॉलिटिशन्सने केलेले शोषण, टिनेज मुलामुलीत सेक्सचे आकर्षण, बॉडी शेमिंग इ सगळे असायलाच हवे या हट्टाने बनवलेली)
एका एपिसोड मधे करवा चौथ सर्वकल्चरसमभाव दाखवलाय ! पारसी , मुस्लिम, चन्द्रकोर नौवारी मधली मराठी बाई सगळ्या करवा चौथ सेलिब्रेशनमधे Proud
पूजा भट्ट नको होती त्या लिड रोल मधे Uhoh
शहाना गोस्वामी, अमृता सुभाष चांगल्या वाटल्या .

married women झी ५.. ही सिरीज बघायला सुरवात केली.. २-३ भाग पाहिले..
पण काही झेपत नाही.. नेमकं काय दाखवायचं आहे हेच कळत नाही..
कुणी बघितली असल्यास सांगा..नेमकं काय आहे..!

छान आहे इस्ट साइड सुशी!

इथल्या रेको वरून "द मेण्टॅलिस्ट" बघायला सुरूवात केली. मस्त आहे. The Psych ची थोडी मॅच्युअर व्हर्जन वाटते.

जिंदगी इन शॉर्टस् मधल्या दोन गोष्टी पाहिल्या दोन्ही आवडल्या. स्वाहा आणि स्लिपिंग पार्टनर... मस्त आहेत. नेटफ्लिक्स.

एचबीओ वरची तीन सीझन्सची 'ट्रू डिटेक्टिव' (२०१४) सिरीज संपवली एवढ्यात.

मॅथ्यू मॅकॉनाहे आणि वुडी हॅरलसनचा पहिला सीझन अमेझिंग आहे. मिस्ट्री, थ्रिल, सिरिअल किलिंग्ज, तपास, कंट्रीसाईड सेटिंग, सोशिओपाथ, रिच्युअल्स असे बर्‍याच क्राईम ड्रामा मध्ये दिसणार्‍या थीम्सचे सगळे चेक- बॉक्सेस टीक करत ही सिरीज चालू होते. पण हिचा स्लो बर्न आपल्याला असे काही पकडून ठेवतो की बस्स. अर्थात कसलेले मेनस्ट्रीम अ‍ॅक्टर्स आणि गोळीबंद डिरेक्शन हे ह्या सीझनच्या यशाचे मर्म म्हणावे लागेल. हा सीझन बघतांना बरेचदा 'द सायलेंस ऑफ द लँब्जची' आठवण होते

दुसर्‍या सीझनची कथा वेगळी आहे ज्यात पुन्हा कॉलीन फॅरेल, रेचेल मॅकअ‍ॅडम्स, विन्स वॉन वगैरे आघाडीचे कलाकार आहेत. हा सीझन पहिल्या सीझनपेक्षा जरा फास्ट पेस्ड आहे. पण एकंदर मर्डर मिस्ट्री संदर्भातला स्लो बर्न न बघता सत्यान्वेषी डिटेक्टिव्ज्स, कसिनो लॉर्ड, विरूद्ध गँग्स, हॉलिवूड, करप्ट पोलिस आणि गवर्नमेंंट ऑफिशिल्स असा एखादा लांबलचक फिल्मी पॉलिटिकल/क्राईम ड्रामा बघितल्याचा फील येतो.
ज्यांना खूप स्लो बर्न मिस्ट्र्री आवडत नाहीत त्यांना हा सीझन नक्की आवडेल. आवर्जून ऊल्लेख करावा ईतके ह्यातले 'This is my least favorite life' हे गाणे एकदम सोल टचिंग आहे.

तिसरा सीझन जरा वेगळ्या धाटणीचा आहे ... ज्यात पुन्हा माहर्शला अली सारखे कसलेले कलाकार आहेत. माझ्या मते पहिल्या दोन्ही सीझनपेक्षा ह्या सीझनमध्ये खूप जास्त पोटेंशिअल होते. पण एका किडनॅपिंग आणि मर्डर केस संदर्भातल्या तपासकार्याच्या लीड डिटेक्टिवच्या आयुष्याच्या तीन वेगळ्या टप्प्यांवर ही कथा घडत असल्याने...कथानक ते टप्पे आळीपाळीने दाखवतांना जरा भरकटल्याने केस मधला आपला ईंट्रेस्ट कमी होत राहतो आणि हे आता संपावे असे वाटत राहते.

पण एकंदर नुसती एक केस, तिचा तपास, एक प्रचंड हुषार पण काही कौटुंबिक कारणाने अल्कोहोलिक झालेला डिटेक्टिव, त्याच्या विरूद्ध काम करणारे पोलिस असा घिसापिटा फॉर्म्युला दाखवणार्‍या सिरीजपेक्षा ट्रू डिटेक्टिव चे तीनही सीझन्स फार सॅटिसफायिंग आहेत.
ह्या सिरीजचे ओवरऑल आयएमडीबी रेटिंग ९.० आहे.

खर्‍या सोशिओपाथ लोकांच्या केसेसवर आधारित आणि त्यातून एका एफबीआय डिटेक्टिवने क्रिमिनल प्रोफाईलिंगचे सायन्स कसे विकसित केले त्यावर बेतलेली 'माईंडहंटर' ही अशीच एक अफलातून स्लो बर्न सिरीज आहे. वर्षभरापूर्वी दोन सीझन्स येऊन गेले आता तिसर्‍याची आतुरतेने वाट बघत आहे.

The No 1 Ladies Detective Agency S01 E01 : https://www.youtube.com/watch?v=gPN_XJ_CDsA

ही सिरीज युट्युबवर आहे.

Alexander McCall Smith या लेखकाच्या The No. 1 Ladies' Detective Agency या पुस्तकांच्या मालिकेवर आधारीत ही टिव्ही मालिका आहे. खूप मागे मी यातली काही पुस्तकं वाचली होती. त्या पुस्तकांना अगदी पुरेपूर न्याय दिला गेला आहे. किंबहुना ही टिव्ही मालिका कांकणभर सरसच म्हणायला हवी.

बोट्सवाना मध्ये या गोष्टी घडतात. अतिशय खुसखुशीत, नर्म विनोदी डिटेक्टिव गोष्टी आहेत. म्हणजे डिटेक्टिवगिरी नावाला पण या अनुषंगानं बोट्सवाना चा निसर्ग, तेथिल सामान्य लोकांचं साधंसुधं जीवन यांचं फार सुरेख दर्शन घडवलंय. यात साध्याच घटना सोडवणारी ही प्रॅक्टिकल आणि प्रसंगी चुकलेल्या व्यक्तीला एक संधी देण्यासाठी नियम धाब्यावर बसवणारी डिटेक्टिव (मा प्रेशियस रामोत्स्वे), तिची स्मार्ट, बाहेरून कडक पण आतून मायाळू असलेली सेक्रेटरी (मा ग्रेस माकुत्सी), गावातील कार मेकॅनिक (जो मनोमन रामोत्सेवर प्रेम करत असतो आणि तिला हिंट्स देत असतो) आणि त्याचे दोन मदतनीस, हेअर ड्रेसर .. अशी अतिशय मस्त पात्रं आहेत. मानवी स्वभावाचे नमुने आणि त्यांची अर्कचित्रे अधोरेखित होतात.

या सिरीजमध्ये स्त्रिया मध्यवर्ती आहेत आणि त्यामुळे एक सहज पण ठळक स्त्रीवादी दृष्टीकोन समोर येत राहतो. सिरीजही आपल्याला स्रियांच्या दृष्टीकोनातून दिसते. एकमेकींना समजून घेणार्‍या स्त्रीया, दुसर्‍यांचा विचार करणार्‍या स्त्रिया, वाईट नवर्‍याबद्दल वाईट विचार आणि त्या विचारांचा उच्चार करू शकणार्‍या स्त्रिया, डोमिनेटिंग, आपल्याला नेमकं काय हवंय हे माहित असलेल्या स्त्रिया, पुरुषांशी सहज थट्टामस्करी करणार्‍या मनमोकळ्या स्त्रिया दिसतात. तसंच पुरुषावर आपलं वर्चस्व असावं म्हणून दुसर्‍या स्त्रीवर जळणार्‍या स्त्रिया ही आहेत.

सगळीच पात्ररचना अतिशय चपखल आहे. पहिल्या दोन भागात येणारा वेलिंग्डन हा अतिशय गोड पोरगा तर फारच आवडून जाईल.

या गोष्टींचा काळ नक्की कोणता ते माहित नाही. पण प्रथम पुस्तक १९९८ साली प्रकाशित झालं म्हणजे तेव्हाचा काळ असणार. केवळ ६ एपिसोड्स आहेत. बघायला सुरूवात केली, दोन एपिसोड्स बघितले आणि इथे लगेच लिहायला आले. तुम्ही नक्की नक्की बघा.

विकीपिडियावर याबाबत लिहिलेली थोडी माहिती खाली देत आहे.

The No. 1 Ladies' Detective Agency is a series of novels by Alexander McCall Smith set in Botswana and featuring the character Mma Precious Ramotswe. The series is named after the first novel, published in 1998. Twenty-one novels have been published in the series between 1998 and 2020.

Mma Precious Ramotswe is the main character in this series. The country of Botswana is in a sense a character as well, as it figures prominently in the stories. Mma Ramotswe starts up her detective agency using the inheritance from her father to move to the capital city, Gaborone, to buy a house for herself and an office for her new business. She feels a detective needs to know about people more than anything to solve problems for them. The novels are as much about the adventures and foibles of different characters as they are about solving mysteries. Each book in the series follows from the previous book.

नार्कोस चा तिसरा सिझन पहिला.
खूप आवडला. कॅली कार्टेलची कथा पाब्लो एस्कोबार पेक्षा अगदी वेगळी आहे.

"रॅट"ड्रामा भारी जमला आहे.

मामी , पहायला सुरुवात केली आहे .
अमेरिकन आणि ब्रिटिश ईन्ग्लिश पेक्शा ऐकायला वेगळी वाटतेय Happy
पहिल्या दोन भागात येणारा वेलिंग्डन हा अतिशय गोड पोरगा तर फारच आवडून जाईल. >>>> कित्त्ती गोडाये तो Happy
बघेन . पूर्ण सिरिज .

द मेंटॅलिस्ट आवडत आहे. १२-१३ एपिसोड्स झाले बघून. सगळी कास्ट मस्त आहे. सायमन बेकरची "गार्डियन" आधी एकदा पाहण्याचा प्रयत्न केला होता. ती आणि ही मिक्स अप झाली होती डोक्यात.

मेंटलिस्ट मस्त आहे.सायमन बेकर वेदनेचे, दुःखाचे एक्सप्रेशन्स खूप चांगले दाखवतो.आणि लबाड हसणं पण.रेड जॉन संबंधित बरेच भाग अचाट अतर्क्य आहेत, पण ते सोडून देऊ.
मी नुकतेच 7 सिझन संपवले.ग्रेस व्हॅन पेल्ट, चो, लिसबन सगळे आवडतात.

अरे वा , welcome to Mentalist fan club .

सायमन बेकर वेदनेचे, दुःखाचे एक्सप्रेशन्स खूप चांगले दाखवतो.आणि लबाड हसणं पण. >>>> + 1000000 .
Your heart goes for him many times. Kristina सोबतचे त्याचे सीन्स छान आहेत.
मध्ये मध्ये psychological किंवा behavioral facts पण कळतात.

welcome to Mentalist fan club >>>> + 1
मी म्हटलेलं ना सायमन बेकर इज अ लव्ह .

क्रिस्टिना अजून दिसली नाही. ती लिस्बन आहे तिची याच्या antics वरची प्रतिक्रिया मजेदार असते नेहमी. इन्ट्रोलाच तो ओरिगामी टाइप बेडूक तिच्या टेबलावर हा ठेवतो तो सीन सुद्धा Happy

The wilds नावाची वेब सिरीझ अमॅझॉन प्राईमवर बघितली. नऊ मुली एका विमान अपघातामुळे एका निर्जन बेटावर अडकतात व त्यानंतर त्यांना येणारे प्रॉब्लेम, सुटकेसाठीची धडपड व प्रत्येक मुलीची आधीची कहाणी वगैरे वगैरे... त्यांचे ते विमान अपघात व बेटावर अडकणे एक सोशल स्टडीचाच भाग असते जे त्यांना माहित नसते. काही जण त्यांचे वागणे लपवून ठेवलेल्या कॅमेर्‍यातून पहात असतात. प्रत्येक भाग म्हणजे एकेका मुलीची कहाणी असे दाखवले आहे.

सुरूवातीचे दोन तीन भाग मस्त वाटले पण नंतर कंटाळा आला. प्रत्येक भाग हा ४५ ते ५५ मिनिटांचा आहे त्यामुळे खूप मोठा वाटतो. जरा हाय फाय इंग्रजी आहे त्यामुळे काही गोष्टी समजून घेण्यासाठी हिंदी सबटायटल वापरावे लागले. फ शब्दाचा वापर खूप जास्त आहे पण अश्लिल द्रुष्ये नाहीत. त्यातल्या दोन तीन मुली खूपच irritate करतात. बाकी सिरीज ओके ओके आहे.

Kristina पहिल्या 10 एपि मध्ये येऊन जाते. एका victim ची spiritual advisor असते. जेन आणि ग्रेस तिच्या घरी जातात चौकशीसाठी. तिच्या मदतीने केस solve होते. आता ती season2 मध्ये परत येईल तेव्हा थोडा मोठा रोल आहे. ती आणि जेन एकत्र असले की आवडतात.
लिस्बन my all time favourite. एकदम धाकड आहे ती. पण तिचे अंदाज बरेचदा चुकताना दाखवले आहेत. जेन सगळ्या केसेस सोडवतो अस वाटत राहत. पण जेन ला फक्त तीच handle करू शकते.
And then comes चो. कसला भारी आहे तो. रिग्सबीच्या character ला एकदम balance करतो.

आणि बरचं काही आवडलं या सिरीज मधलं

Pages