सामाजिक उपक्रम -२०१८

Submitted by प्राची. on 7 March, 2018 - 22:56

सामाजिक उपक्रमाचे हे आपले नववे वर्ष. हा उपक्रम तसा मायबोलीकरांना नवा नाही. मायबोलीकरांच्या साथीने गेली ८ वर्षे स्वयंसेवक हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आले आहेत.समाजासाठी कार्य करणार्‍या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो. या उपक्रमात दरवर्षी ज्यांना सरकारकडून फारशी मदत मिळत नाही (वा मिळतच नाही) किंवा संस्था मुख्यत्वे फक्त देणगीदारांवर चालते अशा गरजू संस्थांना प्रामुख्याने वस्तुरुपात मदत करण्यावर आपला भर असतो.
ह्या वर्षी ५ पैकी 2 संस्था ह्या नोंदणी झालेल्या असल्या तरी त्यांना देणगी दिल्यावर अजून ८०जी कर सवलत मिळत नाही. या संस्था ८० जी मिळवायच्या प्रयत्नांत आहेत परंतु ती प्रक्रिया वेळखाऊ आहे व अद्याप पूर्ण झालेली नाही. तसेच काही संस्थांना निधीअभावी ८०जी चे काम पूर्ण करणे सध्या जमू शकलेले नाही. प्रस्थापित संस्थांपेक्षा या संस्था अलीकडच्या आहेत, तळागाळापर्यंत पोचून तिथे मदतीचा हात गरजूंना देत आहेत. त्यांना कॉर्पोरेट फंडिंग नाही किंवा मोठ्या स्वरुपातील देणारया प्राप्त नाहीत. सध्या सोशल मिडियामुळे जग जवळ आले आहे, त्याचे तोटे असतीलही पण चांगले काम सगळ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी ह्याचा सकारात्मक उपयोगही ह्या संस्था करत आहेत. ज्यां देणगीदारांना देणगीवर करसवलत नाही मिळाली तरी चालत असेल त्यांनी ह्या संस्थांचा जरूर विचार करावा. निवडलेल्या संस्थांना गरज असलेल्या गोष्टींची यादी मागवण्यात आली आहे.

गेल्यावेळेप्रमाणेच देणग्या खालील पद्धतीने स्वीकारल्या जातील,
१) ज्यांना देणगी द्यायची आहे त्यांनी स्वयंसेवकांपैकी कोणालाही संपर्क करुन तुम्ही किती देणगी देणार आहात इतकेच कळवावे. यासाठी ३१ मार्च ही मुदत ठेवत आहोत.

२) एप्रिलपासून, किती देणगी मिळत आहे ते पाहून सर्व संस्थांना साधारण समान निधीवाटप करण्यात येईल. त्याचवेळेस त्या निधीतून त्या संस्थेसाठी दिलेल्या यादीतून काय सामान घेता येईल, तेकोठून घेता येईल वगैरे ठरवले जाईल.

३) देणगीदारांचे गट करुन कोणी कोणत्या संस्थेला देणगी पाठवायची, संस्थेच्या अकाउंटची माहिती इत्यादी कळवण्यात येईल. त्यानंतर तुम्ही संस्थेच्या खात्यावर रक्कम जमा करु शकता.संस्थेच्या अधिकृत टॅक्स खात्याची माहिती इथेही लिहिण्यात येईल.

४) देणगीदारांनी देणगी पाठवल्यावर स्वयंसेवकांपैकी कोणालाही त्याबद्दल कळवणे महत्वाचे आहे. त्याप्रमाणे संस्थेला कळवले जाईल.

५) सर्व देणगीदारांनी देणग्या पाठवल्याचे आम्हाला कळवले की प्रत्येक संस्थेकडून खातरजमा केली जाईल.

६) सर्व जुळले की मग वस्तू विकत घेण्यासाठी पाऊल उचलले जाईल.

७) वस्तू खरेदी झाली व संस्थेला पोचली की इथे सांगितले जाईल.

ही पद्धत गुंतागुंतीची वाटेल पण देणगीदारांनी योग्य त्या संस्थेला फक्त योग्यवेळी देणगी पाठवायची आहे. बाकी काम उपक्रमाचे स्वयंसेवक करतील.

काही संस्था अभारतीय चलन पण स्विकारतात. ज्यांना वेगळ्या चलनामधे देणगी द्यायची आहे त्यांनी संपर्क किंवा विपुद्वारे स्वयंसेवकांशी संपर्क साधावा. जे मायबोलीचे सभासद नाहीत परंतु मदत करण्यासाठी उत्सुक आहेत ते सुनिधीशी lataismusic@yahoo.com या ईमेलवर संपर्क साधू शकतात.

या वर्षीच्या उपक्रमाद्वारे मदत केल्या जाणार्‍या संस्था खालीलप्रमाणे आहेत.

१. संस्थेचे नाव:- सहारा अनाथालय.
संस्थेचा पत्ता:- सहारा अनाथालय परिवार, बालग्राम, गेवराई, बीड.
संस्थेचे कार्यक्षेत्र:-
ऊसतोडणी कामगारांच्या, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या तसेच वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या ८५ मुलामुलींचे पालकत्व, पालन पोषण, वैद्यकीय खर्च, शैक्षणिक खर्च, शिक्षणेतर उपक्रम.
आयकरातील सवलत :- ८०जी.
संपर्क :- संतोष गर्जे, +919763031020
नोंदणी क्रमांक :- Mumbai Public Trust Act 1950-F- 13146 Beed.
वेबसाईट:- http://www.aaifoundation.org/
संस्थेचे प्रकल्प आणि त्याचा अंदाजे खर्च:-
धुलाई यंत्र - Rs. 25000 /-
जेवणाचे टेबल - Rs. 80,000/-
टीन पत्रे ४० (Per Sheet Rs 1750) - Rs. 70,000 /-
जनरेटर - Rs. 60,000/-
सोलर लाइट सिस्टीम - Rs. 70,000/-

२. संस्थेचे नाव:- शबरी सेवा समिती.
संस्थेचा पत्ता:- 'Anand', Dr Phadke hospital, Kotwal Nagar, Karjat (Dist Raigad)
संस्थेचे कार्यक्षेत्र:-
वनवासी क्षेत्रातील बालकांचे कुपोष, बालमृत्यू थांबवणे, आनंददायी शिक्षण, महिला विकास
आयकरातील सवलत :- ८०जी.
संपर्क :- प्रमोद करंदीकर Tel: (02148)-222102
नोंदणी क्रमांक :- F / 26509 (Mumbai).
वेबसाईट:- http://www.shabarisevasamiti.org/english/index.html
संस्थेचे प्रकल्प आणि त्याचा अंदाजे खर्च:-
गरजा नंतर अपडेट करु

३. संस्थेचे नाव:- अमेय पालक संघटना
संस्थेचा पत्ता:- खोणी, डोंबिवली MIDC जवळ
संस्थेचे कार्यक्षेत्र:-
मतिमंदत्व हे अपंगत्व अन्य प्रकारांपेक्षा अगदी वेगळ्या प्रकारचं आहे. अन्य अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सहाय्य याद्वारे पुष्कळसे स्वावलंबी होऊ शक्तात.' समजण ' हि प्रक्रियाच मतिमंदांच्या बाबतीत होत नाही त्यामुळे पालकांना कायमच यांची काळजी घ्यावी लागते. मतिमंदत्व तीव्र असेल तर त्यांना जगविण्याचीच जबाबदारी पालकांवर येते. एकूणच मतिमंदांचा तहहयात सांभाळ करणे भाग असते व त्यासाठी वसतिगृह उभे करणे आवश्यक होऊन बसते. मतिमंद व्यक्तींचा सांभाळ तहहयात करण्यासाठी पालकांनी एकत्र येउन ' अमेय पालक संघटना ' हि संस्था स्थापन केली. कैं. मेजर ग.कृ. काळे यांच्या प्रेरणेनेच हे काम सुरु झाले. शासनाच्या अनुदानाशिवाय हा उपक्रम उभा आहे कारण सुजाण व स्रह्दय हितचिंतक संस्थेस लाभले आहेत. अव्याहत चालणाऱ्या या कार्यास समाजाच्या पाठबळाची नेहमीच गरज असते.
आयकरातील सवलत :- ८०जी
संपर्क :- अविनाश बर्वे - 022 25334250 , सुनील जाधव - 9820035634 , रंजन जोशी – 9820430594
Email:ameyapalak@gmail.com / info@ameyapalaksanghatana.org
नोंदणी क्रमांक :- Bombay Public Trust Act. Reg.no.F 2955(Thane)
संस्थेचे प्रकल्प आणि त्याचा अंदाजे खर्च:-
रोजच्या गरजा , जसे कि धान्य , औषधे ह्यासाठी कायमच आर्थिक निधी लागतो.
तसेच सध्या संस्था थोडी फार ठेव शिल्ल्क राहील ह्यासाठी सुध्दा प्रयत्नशील आहे जेणेकरून जर अशा कोणी मुलांचे पालक नसतील तर त्यांच्या पुढील देखभालीसाठी तो वापरला जाईल

४. संस्थेचे नाव:- हरिओम शैक्षणिक व सांस्कृतिक मागासवर्गीय सेवाभावी बहुउदेशीय संस्था / मतीमंद निवासी शाळा
संस्थेचा पत्ता:- म्हसला बु || ता, बुलढाणा
संस्थेचे कार्यक्षेत्र:-
अतिदुर्गम खेडेभागत हि संस्था कार्यरत असून या टिकाणी मतीमंद मुलांच्या संगोपानासाठी शाळा उभारण्यात आली असून , येथे सध्या ३० हून अधिक मुलांचा सांभाळ केला जात असून पहिल्या वर्षी २० वर असणारी मुलांची संख्या आता ४० वर गेली आहे. मतीमंद मुले १८ वर्षाची होईपर्यंत त्यांचा संभाळ करणे खूप अवघड असते. मात्र त्यांच्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते.अनेक पालकांना कामाच्या व्यापातून हे शक्य होत नाही.त्यामुळे या संस्थेतून १८ वर्षापर्यंतच्या मुलांच सांभाळ केला जातो. श्री शिवनारायण पोफलकर व त्यांची मुले हे सध्या या संस्थेची देखभाल करत असून , या संस्थेत गोरगरीब आसपासच्या खेडेभागातील तसेच ज्याला कोणीच नाही अशी अनाथ मतीमंद ६ ते १८ वर्षापर्यंतची मुले वास्तव्यास आहेत. तर १० कर्मचारी त्यांचा उत्तमरीत्या सांभाळ करीत आहे.या संस्थेच्या १ एकर पसरलेल्या परिसरामध्ये निवासी वसतिगृह ,स्वयंपाकघर, मैदान,या सारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
आयकरातील सवलत :- अजूनपर्यंत तरी नाही
संपर्क :- राजेंद्र पोफलकर +917028212821
नोंदणी क्रमांक :- A -५९६.
वेबसाईट:- संस्थेचा Z 24 tasवरील व्हिडीओ या लिंक वर पाहू शकता. https://youtu.be/RVhP3yOnkd4
संस्थेचे प्रकल्प आणि त्याचा अंदाजे खर्च:-
१] शाळेचे व वसतिगृहाचे पक्के बाधकाम करायचे आहे (५ रूमचे )
२] वस्तीगृहातील मुलांना गरम पाण्यासाठी सोलर हिटर (१)
३] वस्तीगृहातील मुलाना झोपण्यासाठी बेड (४०),पलंग(४०) ,मुलांचे कपडे ठेवण्यासाठी कपाटे (२)
४] शाळा खेडे भागात असल्या कारणाने इथे लाईनचा प्रोब्लेम आहे ,त्यासाठी इन्व्हर्टर हवे (२)
५] मुलांना खेळण्यासाठी जोके (२) ,घसरगुंडी (२) इत्यादी
६] नवीन वर्षासाठी मतीमंद मुलांचे शैक्षणिक साहित्य (४० मुलांसाठी)

५. संस्थेचे नाव:- शिव ऋण प्रतिष्ठान
संस्थेचा पत्ता:- जुन्नर
संस्थेचे कार्यक्षेत्र:-
मायबोलीकरांना ह्याच्या कामाची ओळख आधीच शोभा ह्यांनी इथे करून दिली आहे. . अक्षय बोर्हाडे हा मुलगा अत्यंत निरपेक्ष वृत्तीने समाजसेवा करत आहे. वय वर्ष फ़क्त २१/२२. हा मुलगा, आपल्या सख्या, चुलत, मामे, आत्ये भावांबरोबर व काही मित्रांबरोबर, समाजातील निराधार, रस्त्यावर पडलेल्या, आजारी, मनोरुग्ण वगैरे लोकांच्या सेवेसाठी महाराष्ट्रात सगळीकडे जातो. इतक्या बेकार अवस्थेत ती लोकं जगत असतात, वर्षानुवर्ष अंघोळ नाही, स्वच्छता नाही. ज्यांच्या जवळपासही कोणी फ़िरकत नाही. तिथे जाऊन ही मुलं स्वत: त्या लोकांना गरजेप्रमाणे स्वच्छ करून, कपडे, जेवण, देऊन घरी घेऊन येतात व घरचे लोकही त्यांची सेवा करतात. त्याने सांगितले कि जेव्हा अशी निराधार दिसते तेव्हा त्याचवेळी त्या व्यक्तीचा फोटो काढून लगेच त्याला whatsapp वर पाठवले व कॉल करून अथवा video call देऊन कळवले कि ते मित्र त्या गावाला जाऊन त्या व्यक्तीला घेऊन जातात. तुम्हाला फक्त त्या व्यक्ती कुठे आहे तो पत्ता कळवावा लागेल. त्याला असंख्य मेसेजेस येतात त्यामुळे व्यक्ती कुठे आहे ते समजण्यास कॉल करणे आवश्यक असते त्याने सांगितले
आयकरातील सवलत :- अजूनपर्यंत तरी नाही
संपर्क :- अक्षय मोहन बोर्हाडे +917709092527
नोंदणी क्रमांक :- रजि.नं. महा./१६२१/२०१६/पुणे
वेबसाईट:- https://www.facebook.com/akshay.borhade.94043
YouTube वर देखील व्हिडीओ बघु शकाल
संस्थेचे प्रकल्प आणि त्याचा अंदाजे खर्च:-
अ‍ॅम्ब्युलन्स- आजारी किंवा वृद्ध लोकांना एका जागेहून त्याच्या ठिकाणी घेउन जाण्यासाठी त्यांना ह्याची गरज आहे. तसेच अ‍ॅम्बुलन्समुळे तो एकावेळी जास्त लोकांना ने-आण करू शकतो. सध्या त्यांच्याकडे एकच छोटी गाडी आहे ज्यामध्ये एकच माणूस नेता येउ शकते. कधी कधी ह्यांचा प्रवास १०००-१५०० किमी एवढा जास्त असु शकतो. तेव्हा एक मोठी अ‍ॅम्बुलन्स ही ह्यांची गरज आहे
तसेच बाकी प्रवास करणे , औषधोपचार व त्यांना सांभाळणे ह्यासाठीही आर्थिक गरज आहेच.
Akshay-NondaNi.jpg सामाजिक उपक्रम स्वयंसेवक चमू -
अरुंधती कुलकर्णी, सुनिधी, अतरंगी, कविन, महेंद्र ढवाण, निशदे, प्राची.

मागील काही वर्षी केल्या गेलेल्या सामाजिक उपक्रमांबद्दल खाली वाचता येईल - -

सामाजिक उपक्रम २०१७
सामाजिक उपक्रम २०१६
सामाजिक उपक्रम २०१५
सामाजिक उपक्रम २०१४
सामाजिक उपक्रम २०१३
सामाजिक उपक्रम २०१२
सामाजिक उपक्रम २०११
सामाजिक उपक्रम २०१०

आतापर्यंत खालील संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे वस्तुरुपी मदत केली गेली आहे - -
१. भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग २. शबरी सेवा समिती, ता. कर्जत ३. सुमति बालवन, पुणे ४. अनामप्रेम, अहमदनगर ५. माताबालक उत्कर्ष प्रतिष्ठान, सांगोला - सोलापूर, ६. दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळी, यवतमाळ ७. परिवर्तन संस्था, डोंबिवली ८. सावली सेवा ट्रस्ट, पुणे ९. अनुराधा किल्लेदार प्रशाला सांगली १०. घरकुल परिवार नाशिक ११. सुहित जीवन ट्रस्ट १२. माऊली सेवा प्रतिष्ठान १३. सहारा अनाथालय

मागील काही वर्षातल्या कामाचा आढावा खाली वाचता येईल
सामाजिक उपक्रम २०१७- आढावा
सामाजिक उपक्रम २०१६- आढावा
सामाजिक उपक्रम २०१५- आढावा
सामाजिक उपक्रम २०१४- आढावा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व संस्थांची विस्तृत माहिती न देता संक्षिप्त रूपात दिली आहे. देणगीदारांना कोणत्याही संस्थेची विस्तृत माहिती हवी असल्यास कळविणे, ती इथे अपडेट करता येईल किंवा त्यांना सेपेरेटली ईमेल करता येईल.

धन्यवाद प्राची.!
यावेळी निवडलेल्या सर्वच संस्था आपापल्या दृष्टीने खास आहेत व महत्वाचे काम करत आहेत. त्यांची उपक्रमाच्या माध्यमातून होणारी ओळख त्यांचे चांगले काम पुढे नेवो.
या संस्थांचे फारसे नाव नाही व आंतरजालावरही त्यांची विशेष प्रसिध्दी नाही. केवळ लोकाधारावर त्यांचे काम चालू आहे.

यातली हरिओम शैक्षणिक व सांस्कृतिक मागासवर्गीय सेवाभावी बहुउदेशीय संस्था , बुलढाणा (क्रमांक ४) यांची माहिती तात्पुरती काढून टाकली आहे.

त्यांचा नोंदणी क्रमांक (A596) , संस्थेचे नाव, बुलढाणा जिल्हातील सगळ्या नोंदणीकृत संस्थांमधे तपासले पण ऑनलाईन सापडले नाही. तुम्ही ते तपासले असले तर कृपया त्याची माहिती द्या. आणि ती माहिती दिल्यावर पुन्हा त्या संस्थेची माहिती प्रकाशीत केली तरी चालेल.

मायबोलीवर सेवाभावी संस्थांना आपण नेहमीच मदत केली आहे. पण मायबोलीकरांकडून आर्थिक मदत मागणार्‍या सगळ्या संस्था नोंदणी कृत असाव्यात असे मायबोलीचे धोरण आहे. वरील संस्थेची माहिती सगळ्यात त्रोटक असल्याने सगळ्यात पहिल्यांदा तपासली. इतर संस्थांची तुम्ही तपासली नसेल तर कृपया लवकर तपासून घ्या. ती माहिती तुम्ही इथे मायबोलीकरांकडून मदत मागण्याअगोदर तपासली असेल अशी अपेक्षा आहे. संस्थेने आम्हाला जे सांगितले ते लिहिले (आम्ही तपासले नाही) हा युक्तीवाद मदत मागण्यासाठी अपेक्षीत नाही. इतरांना मदत मागण्याअगोदर ती खात्री करणे ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही तपासू शकत नसाल तर कृपया त्या त्या संस्थेची माहीती अप्रकाशीत करा नाहितर नाईलाजाने हा लेख (आणि हा चांगला उपक्रम) अप्रकाशीत करावा लागेल.

वेमा, तुमच्या फिडबॕकसाठी धन्यवाद,
हो आम्ही खात्री करूनच संस्था निवडल्या होत्या.
आमच्याकडे त्या कागदपत्राचे फोटो आहेत , थोड्या वेळात इथे देते

नोंदणी पत्र : हरिओम शैक्षणिक व सांस्कृतिक मागासवर्गीय सेवाभावी बहुउदेशीय संस्था / मतीमंद निवासी शाळा
HariOmNondaNi.jpg

नोंदणी पत्रः शिव ऋण प्रतिष्ठान
Akshay-NondaNi.jpg

वरील दोन संस्था ह्या तुलनेने नविन आहेत आणि त्यांच्या देणगीवर कर सवलत नाही हे धाग्यात नमूद केलेले आहे.
बाकी संस्था ह्या प्रस्थापित असून , उपक्रमाद्वारे आधीही त्यांना मदत केली गेली आहे , तरी त्यांच्ये कागदपत्र हवे असल्यास टीम प्रस्तुत करु शकेल

शिव ऋण प्रतिष्ठान चे नोंदणी पत्र वरती हेडर मध्ये घातले आहे. मतीमंद निवासी शाळेबद्दल तुमच्या मताची वाट बघत आहे

न्यवाद प्राची , हे सर्व वे मा तुम्हाला वि पु करून हि कळवू शकत होते , धाग्या तुन माहिती काढण्या अगोदर ,हा सर्व स्वयंकसेवक याच्यावर एक प्रकारे अविश्वास आहे असो , ८ वर्षे अगदी व्यवसिथ चालला आहे हा उपक्रम , मग या वर्षी असे काय झाले , एकूणच वरील प्रकाराने दुःख झाले असो , आपण आपले काम करत राहूच

<< हे सर्व वे मा तुम्हाला वि पु करून हि कळवू शकत होते , धाग्या तुन माहिती काढण्या अगोदर ,हा सर्व स्वयंकसेवक याच्यावर एक प्रकारे अविश्वास आहे असो , ८ वर्षे अगदी व्यवसिथ चालला आहे हा उपक्रम , मग या वर्षी असे काय झाले , एकूणच वरील प्रकाराने दुःख झाले असो , आपण आपले काम करत राहूच >>

------ महेन्द्र मी येथे केवळ वाचक आहे. तुम्ही आणि तुमचे सहकारी खुप चान्गले कार्य करत आहात, स्तुत्य आहे.

सर्वान्साठी लिहीण्याचे काही फायदे पण आहेत. पारदर्शकता रहाते, सर्वान्ना दिसते, आणि तुमच्या कामाबद्दलचा विश्वास वाढतो आणि मुख्य म्हणजे ४ - २ व्यक्तीन्ना माहिती मिळण्यापेक्षा १०० - ३०० वाचकान्च्या ज्ञानातही भर पडते. आजचे वाचक हे उद्याचे स्वयमसेवक आहेत.
तुम्ही म्हणता त्या प्रमाणे दुखावले जाण्याचा तोटा आहेच, पण ते वैयक्तिक नाहीच घ्यायचे.

तुम्हा सर्वान्ना आणि तुमच्या कार्याला शुभेच्छा.

धन्यवाद प्राची. "हरिओम शैक्षणिक व सांस्कृतिक मागासवर्गीय सेवाभावी बहुउदेशीय संस्था / मतीमंद निवासी शाळा" यांची माहिती वर पुन्हा प्रकाशीत केली आहे. ही माहिती वारंवार परत परत द्यावी लागू नये म्हणून आणि एका सं स्थेची सगळी माहिती एकत्र रहावी म्हणून मायबोलीने काही विनामूल्य सोयी केल्या आहेत. यातल्या कुठल्या संस्थेला यात भाग घ्यायला आवडणार असेल तर कळवा. यासाठी कुणीतरी एक मायबोलीकर प्रोजेक्ट मॅनजर असावा लागेल. हे आर्थिक अर्थाने नाही तर , मायबोलीवर त्या संस्थेची माहिती संकलीत रहावी याची काळजी घेण्यासाठी वेळ देणारा स्वयंसेवक अ‍ॅडमीन अशा अर्थाने आहे. ही सुविधा वापरली तर त्या त्या संस्थेच्या कामात रस असणारे स्वयंसेवक मिळवायलाही या सुविधेचा उपयोग होऊ शकेल.

दुसरे असे की ही वर दिलेली माहिती संस्थेतर्फे अधिकृत रित्या मायबोलीवर ठेवली तर इतर कुणीही याबद्दल शोध घेत असेल तर त्यांनाही एका जागी मिळू शकेल. या संस्थेबद्दल मी ज्या काही सेवाभावी संस्थांच्या नोंदणी याद्यांमधे शोध घेतला तेंव्हा मला ऑनलाईन काही मिळाले नाही. माझ्यासारखे काही जण असेही असतात , ज्याना ही माहिती सापडली नाही तर मुद्दाम विचारून माहिती सापडवून देणगी देण्याच्या फंदात पडत नाही. सरळ इतर ज्या संस्थांची माहीती उपलब्ध आहेत त्याना देणगी देऊन मोकळे होता (Path of least friction)
याबद्दल अधिक माहीती साठी सेवाभावी संस्थांसाठी मायबोलीची नवीन सुविधा हे पहा.

@mahendra dhawan
>हा सर्व स्वयंसेवक याच्यावर एक प्रकारे अविश्वास आहे
तुम्हाला तसे वाटणे मी समजू शकतो. हा स्वयंसेवकांवरचा व्यक्तीगत अविश्वास नक्कीच नाही. पण तुमची प्रोसेस योग्य आहे का याबद्दलचा प्रश्न नक्कीच आहे. असं पहा "आम्ही ८ वर्षे हा उपक्रम व्यवस्थित चालवला आहे, आम्ही सांगतोय ना मग आमच्यावर विश्वास ठेवा" असे म्हणण्यापेक्षा, "तुम्ही काहीही शंका उपस्थित करा , आम्ही त्यावर विचार करून उत्तर तयार ठेवले आहे, हा घ्या कागदपत्रांचा दाखला" हे तुम्ही कृतींतून दाखवल्यामुळे या उपक्रमाची विश्वासार्हता आणखी वाढली आहे. कारण मी विचारले ते प्रश्न इतर कुणाच्या तरी मनात नक्कीच येऊन गेले असणार. त्यामुळे कुणीही वाचकाने शंका उपस्थित केली तर त्याचे तुम्ही उलट स्वागतच केले पाहिजे. कारण प्रत्येक शंका ही तुमच्यावरचा अविश्वास नसून, तुमची संघटना बळकट करण्याची ती आणखीन एक संधी आहे.

>हे सर्व वे मा तुम्हाला वि पु करून हि कळवू शकत होते
हो तसा विचार आधी आला होता. पण त्यामुळे ," या उपक्रमाबद्दल काही तरी अडचण चालू आहे , वेबमास्तरांनी विचारपुशीत का विचारले, जाहीर का नाही " अशी शंका येऊन काही अर्धवट गैरसमज पसरले असते. त्यामुळे इथे मी स्पष्ट विचारणे आणि तुम्ही लगेच त्याचे उत्तर देणे हे सगळ्यांसाठीच जास्त पारदर्शक होते.
जेंव्हा तुम्ही आयकरात अजून सवलत मिळत नाही , अशा संस्थांबद्दल लिहिता, तेंव्हा तुमचा हेतु कितीही चांगला असला तरी, एका बाबतीत आपण लंगडे असतो. आयकरात सवलत मिळवणार्‍या संस्थांना ज्या वेगवेगळ्या ऑडीट चाळण्यातून जावे लागते त्या अजून इथे झाल्या नसल्याने, आणखी तिर्‍हाईत संस्थाकडून होणार्‍या Due Diligence चा फायदा नसतो. त्यामुळे अशा संस्थांबद्दल शक्य तेवढी माहिती सुरवातीलाच देणे (Upfront याअर्थाने) तुमच्या उपक्रमासाठी जास्त हितावह राहील.

वेमांचा प्रतिसाद आवडला .

या उपक्रमात स्वयंसेवक म्हणुन काम केल्याने वेमांची पोस्ट अधिक पटली आहे .

संस्थेची निवड , देणगी दारापर्यत पोचणारी तिची माहिती, मदतीचा हिशोब , देणगी दारांना मिळणारी पावती , मदत वाटप झाल्या नंतर इथेच लिहिला जात असलेला मदतीचा लेखाजोखा ह्या वैशिष्ट्यामुळेच हा उपक्रम नीट चालू आहे ..त्यात कोणतीही तडजोड होता काम नये Happy

शबरी सेवा समिती उपक्रम
आज नसरापूर, जामरुंग, कोठिंबे ३ शाळांचे ३२ विद्यार्थी विज्ञान सहली करीता हेदवली शाळेत गेले होते.

IMG-20180321-WA0047.jpgIMG-20180321-WA0048.jpgIMG-20180321-WA0049.jpg

या वर्षीच्या उपक्रमामधे अमरावतीची आदिवासी फासेपारधी सुधार समिती (प्रश्नचिन्ह) ही संस्था घ्यायचे असे ठरले होते. परंतू महिला दिनाच्या आधी संस्थेची माहिती व गरजा संकलित न झाल्याने बीबी मधे प्रश्नचिन्ह संस्थेचे कार्य व माहिती देण्यात आली नव्हती. ती आता अपडेट करत आहोत.

संस्थेचे नावः- आदिवासी फासेपारधी सुधार समिती.

पत्ता:- मंगरुळ, नांदगाव, अमरावती.

नोंदणी़ क्रमांकः- ७७६/०५

संस्थेचे कार्यक्षेत्र:- संस्थेच्या नावात लिहिल्याप्रमाणे प्रश्नचिन्ह ही संस्था आदिवासी आणि फासेपारधी, भटक्या जमातीतील कुटुंबांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्या शालेय व सामाजिक प्रगती साठी कार्यरीत आहे.

आयकरातील सवलत :- संस्थेने ८०जी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे.

संपर्क :- मतीन भोसले, +९१९०९६३६४५२९

नोंदणी क्रमांक :- ७७६/२००५/अमरावती

वेबसाईट:- http://prashnchinha.org/ ( वेबसाईट सध्या बंद आहे. पण गूगल वर आदिवासी फासेपारधी सुधार समिती किंवा प्रश्नचिन्ह असे सर्च केल्यास बरीच माहिती मिळू शकेल)

संस्थेच्या सद्य गरजा:-

मुला मुलींना बसण्यासाठी बाके आणि फर्निचर, मुला मुलींची राहण्याची सोय करणे, बाथरुम आणि टॉयलेट बांधणे.
स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करणे.
किराणा सामन.

बँक अकांउट डिटेल्सः-
Adhiwasi Fase Pardhi Sudhar Samiti
SBI branch Mangrul Chawala, IFSC SBI0008252
Account No:- 36174604565

वराती मागुन दुसरे घोडे......

वेमानी उपस्थित केलेल्या संस्थेच्या नोंदणी आणि आयकरातील सवलत या शंकाविषयी थोडेसे.

दरवर्षी आयकरतील सवलत असणार्‍या, वेबसाईट/ ऑनलाईन अस्तित्व असणार्‍या, वृत्तपत्रातून माहिती असलेल्या संस्था उपक्रमात असतातच.
पण या सर्व संस्था नावजलेल्या असतात आणि त्यांना भरपूर मदत मिळत असते.
ज्या अतिशय ग्रास रूट लेव्हलला आणि गरजू संस्था आहेत त्या वरील निकषांमधे बसत नसल्याने त्या शॉर्ट्लिस्ट होत नव्हत्या. उपक्रमाचा मूळ उद्देश अशा संस्थांपर्यंत पोहचणे हाच आहे.

नावजलेल्या आणि मोठ्या संस्थांकडे सर्व सवलती/ कागदपत्रे आहेत, त्यांना मदत मिळते. काहि खूप गरजू, चांगल्या आणि प्रामाणिक संस्था आहेत त्यांना फक्त जर ८०जी ची पुर्तता न झाल्याने मदत मिळत नसेल तर त्या साठी काही तरी करायला हवे असे मला वाटत होते

या वेळेस माझ्या माहिती प्रमाणे प्रथमच आयकरातील सवलत नसणार्‍या संस्था उपक्रमात सामिल करण्यात आल्या आहेत. अनेक देणगीदार असे आहेत कि ज्यांना आयकरातील सवलत नसेल पण संस्था चांगली असेल तर मदत करायची आहे. पण अशा संस्था लोकांपर्यंत पोहचणार कशा?
म्हणून या वेळेस उपक्रमात संस्था घेताना काही संस्था आयकरातील सवलत नसणार्‍या सुद्धा सामिल करण्यात आल्या. जरी या संस्थांकडे आयकरातील सवलत नसली तरी त्यांचे कार्य बर्‍यापैकी प्रसिद्ध आहे.

यावर्षीचा प्रतिसाद पाहून पुढिल वर्षापासून अजुन चांगल्या, गरजू, तळागाळातील संस्था निवडायचा आमचा प्रयत्न राहील.

या प्रोसेस विषयी, संस्था निवडण्याविषयी, संस्थांविषयी काहीही माहिती हवी असल्यास, शंका असल्यास आम्ही कायम उत्तर देण्यास बांधील आहोतच. आमचे काही चुकत असल्यास आम्हाला मार्गदर्शन करायचा, आमच्या चूका दाखवायचा हक्कही माबोकरांना आहेच

शिवाय माबोवरील सभासदांना अजून काही चांगल्या संस्था माहित असतील, तर त्यांनी त्यासुद्धा कृपया आम्हाला सुचवाव्या. आम्ही त्यांना उप्क्रमात सामिल करण्याविषयी नक्की विचार करु.

धन्यवाद.

शिवऋण ह्यांच्याकडून आलेले काही फोटोज

आधीचा हॉल जिथे बेघर लोक आणून त्यांची व्यवस्था केलेली आहे - १५ * २५ फूट ... खाली माती होती
IMG-20180421-WA0009.jpgIMG-20180421-WA0008.jpg

आता लादी बसवली आहे
IMG-20180421-WA0005.jpg
रात्रीचे बाथरूम्चे काम सुरू असतानाचे फोटो
IMG-20180421-WA0004.jpg

खूप छान प्राची
शिव रुन ला खरे तर त्यांना एका रुग्णवाहिका गरचेची आहे , ह्या साठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे हीच अपेक्षा
सध्या प्राथमिक स्तरावर काम आहे , अजून मोठे होऊ शकते

शबरी सेवा समिती
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा डोंगर रांगां मधील पिंपळखुटा गावातील आंबाईपाडा ही लहानशी वस्ती. गावातील ८० टक्के लोक जगण्या करिता गुजरात मध्ये स्थलांतर करतात. त्याच गावातील ६,७ परिवाराने एकत्र येऊन एक विहीर खोदली आहे. ३० फुट खोल व २३ फुट रुंद अशा या विहीरीस भरपूर पाणी लागले आहे. त्या पाण्यावर १० ते १२ एकर जमीन ओलिता खाली येईल. १० ते १५ कुटुंबांचे स्थलांतर थांबेल. ते स्वावलंबी होतीलच पण अन्य अनेक परिवाराला धडपड करण्याची प्रेरणा देतील. परिश्रम करुन स्वाभिमानाने जगण्याची ऊमंग निर्माण होईल.
आज त्यांचे पुढे समस्या आहे की मे महिन्या अखेर पर्यंत ती विहीर बांधून पूर्ण करणे. नाही तर पावसाळ्यात विहीर ढासळून त्यांचे सर्व कष्ट वाया जातील.
मी दि 4 एप्रिल रोजी प्रत्यक्ष जागेवर जाऊन परिस्थिति पहिली आहे. शेतकरी कष्ट स्वतः करतील. आपण त्यांना फ़क लोखंड व सीमेंट द्यायचे आहे. खर्च आहे 80 हजार. शबरी सेवा समितिने संकल्प केला आहे त्या शेतकऱ्यांच्या मदतीला धाऊन जाण्याचा. अशाच लहान लहान प्रकल्पातून भारत भू सुजलाम सुफलाम होणार आहे. मला विश्वास आहे की आपल्या योगदानाने ती विहीर पूर्ण होइलच.

प्रमोद करंदीकर

----+++++++++
वरील मेसेज मिळाला होता. आम्ही काही देणगीदारांना शक्य असेल तर देणगी लवकर देण्याची विनंती केली होती ... आता विहीरीचे काम सुरू झाले आहे

IMG-20180420-WA0005.jpg

हरीओम बुलढाणा मतिमंद निवासी शाळा Zee 24 वर
https://youtu.be/WWoPvnizsQI

https://youtu.be/RVhP3yOnkd4

शिवऋण प्रतिष्ठान Zee 24 वर
https://youtu.be/qXJSHvoeRdg

शिवऋण प्रतिष्ठानच्या कामाचे बरेच विडिओज युट्युबवरही उपलब्ध आहेतच

https://www.esakal.com/pune/crime-against-sivrun-pratishthans-akshay-bor...
जुन्नर - महिला व बालविकास विभागाची मान्यता न घेता शिरोली बुद्रुक ता.जुन्नर येथे शिवऋण प्रतिष्ठान नावाने अनधिकृत संस्था सुरू केल्याच्या आरोपावरून संस्थाचालक अक्षय मोहन बोऱ्हाडे रा.शिरोली बुद्रुक ता.जुन्नर जि.पुणे याचे विरुद्ध जुन्नर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोऱ्हाडे याने शिवऋण प्रतिष्ठान संस्थेत सात लहान मुले विना परवानगी ठेवली होती. पुणे येथील बालकल्याण समिती सदस्य अर्जुन लक्ष्मण दांगट यांनी याबाबत जुन्नर पोलिसांकडे मंगळवारी ता.29 रोजी सांयकाळी तक्रार दिली. त्यानुसार बालन्याय अधिनियम 2015 कलम 42 अन्वये बोऱ्हाडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांनीं सांगितले.

गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात बोऱ्हाडेला आळेफाटा पोलिसांनी अटक केली. त्याच्या मनोरुग्ण संगोपन केंद्रातील रुग्णाची गैरसोय होऊ नये म्हणून 20 डिसेंबर रोजी जुन्नर पोलिसांनी येथील 53 मनोरुग्ण हलविले यावेळी येथे लहान मुले असल्याचे निदर्शनास आले होते. पोलिसांच्या कारवाई दरम्यान येथे कोणतीही परवानगी न घेता ही बालके संस्थेत ठेवली असल्याचे स्पष्ट झाले होते. यामुळे ही कारवाई करण्यात असली असल्याचे नलवडे यांनी सांगितले.