सामाजिक उपक्रम २०१५ - आवाहन (सार्वजनिक धागा)

Submitted by सुनिधी on 9 March, 2015 - 10:45

नमस्कार,
सामाजिक उपक्रमाचे हे सहावे वर्ष. हा उपक्रम आता तसा आपल्याला नवा नाही. तरीही नवीन सभासदांसाठी थोडक्यात ओळख,
या उपक्रमात दरवर्षी अशा गरजु संस्थांना वस्तुरुपात मदत केली जाते ज्यांना सरकारकडुन जास्त मदत मिळत नाही (वा मिळतच नाही) किंवा संस्था मुख्यकरुन फक्त देणगीदारांवर चालते. त्याकरता देणग्या मागवण्याचे हे आवाहन आहे.

देणग्या मार्च-एप्रिल या २ महिन्यात मागवण्यात येतात. नंतर एकुण जमा झालेल्या निधीतुन संस्थांच्या प्राधान्यानुसार वस्तु खरेदी करुन त्यांना पोचवल्या जातात व त्याची रीतसर नोंद इथे दिली जाते.

आतापर्यंत खालील संस्थांना या उपक्रमाद्वारे वस्तुरुपी मदत केली गेली,
शबरी, भगिरथ, सुमती बालवन, अपंग निवासी केंद्र सटाणा, सावली, मैत्री, गुरुकुल, कोथरुड येथील मुलींची अंधशाळा.

यावर्षी संस्थांना ज्या गोष्टींची गरज आहे ती यादी मागवुन इथेच पुन्हा लिहु.

सर्व संस्थांना जेव्हा देणग्या पोचतील तेव्हा त्या संस्था त्याचा उपयुक्त गोष्टींसाठी विनियोग करुन आपल्याला पोच देतील याची टीम सदस्यांनी खात्री करून घेतली आहे.

वरील संस्थांची माहिती व यावर्षीची गरज इथे वाचता येईल,
http://www.maayboli.com/node/53020#comment-3469660

मायबोली धोरणानुसार देणगीदारांना आपली मदत थेट संस्थेच्या ८०जी खात्यावर पाठवायची आहे.
पैसे जमा करण्याकरता सर्व संस्थांच्या बँक खात्यांची माहिती इथेच लिहिली जाईल.

गेल्यावेळेप्रमाणेच देणग्या खालील पद्धतीने स्विकारल्या जातील,
१) ज्यांना देणगी द्यायची आहे त्यांनी स्वयंसेवकांपैकी कोणालाही संपर्क करुन तुम्ही किती देणगी देणार आहात इतकेच कळवावे. ह्यासाठी ३१ मार्च ही मुदत ठेवत आहोत.
२) एप्रिलपासुन, किती देणगी मिळत आहे ते पाहुन सर्व संस्थांना साधारण समान निधीवाटप करण्यात येईल. त्याचवेळेस त्या निधीतुन त्या संस्थेसाठी दिलेल्या यादीतुन काय सामान घेता येईल, ते कुठुन घेता येईल वगैरे ठरवले जाईल.
३) देणगीदारांचे गट करुन कोणी कोणत्या संस्थेला देणगी पाठवायचे हे त्यांना कळवण्यात येईल व मगच तुम्ही देणगी पाठवायची आहे. संस्थेच्या अधिकृत टॅक्स खात्याची माहिती इथे लिहिण्यात येईल.
४) देणगीदारांनी देणगी पाठवल्यावर स्वयंसेवकांपैकी कोणालाही त्याबद्दल कळवणे. हे करणे फार महत्वाचे आहे नाहीतर आम्हाला त्याबद्दल काहीच कळु शकणार नाही.
४) सर्व देणगीदारांनी देणग्या पाठवल्याचे आम्हाला कळवले की प्रत्येक संस्थेकडुन खातरजमा केली जाईल.
५) सर्व जुळले की मग वस्तु विकत घेण्यासाठी पाऊल उचलले जाईल.
६) वस्तु खरेदी झाली व संस्थेला पोचली की इथे सांगितले जाईल.

ही पद्धत गुंतागुंतीची वाटेल पण देणगीदारांनी योग्य त्या संस्थेला फक्त योग्यवेळी देणगी पाठवायची आहे बाकी काम उपक्रमाचे सभासद करतील.

संस्था अभारतीय चलन पण स्विकारतात. ज्यांना वेगळ्या चलनामधे देणगी द्यायची आहे त्यांनी देखील संपर्कातुन कळवावे. जे मायबोलीचे सभासद नाहीत त्यांनी सुनिधीला lataismusic@yahoo.com या ईमेलवर कळवावे.

तर वर लिहिल्याप्रमाणे पहिले पाऊल म्हणुन फक्त आपण किती रक्कम देणगी देऊ इच्छित आहात ते आम्हाला संपर्कातुन कळवणे वा इथेच लिहिणे.

आपल्या मदतीकरता अनेक आभार.

सामाजिक उपक्रम टीम चमु - अकु, मो, स्वाती२, जिज्ञासा, मुग्धानंद, साजिरा, सुनिधी, जाई, कविन.

मनापासुन धन्यवाद.

अकुने सर्व संस्थांच्या खात्यांची माहिती इथे लिहिली आहे,
http://www.maayboli.com/node/53020#comment-3512287

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. अस्तित्व प्रतिष्ठान : गुरुकुल

१. संस्थेचे नाव:- अस्तित्व प्रतिष्ठान
संस्थेचे कार्य: संस्था गुरुकुल चालवते ते खूप गरीब, एकच पालक असलेल्या मुलामुलींसाठी निवासी शाळा म्हणून. बहुतेक मुलेमुली शाळाबाह्य व बालमजूर असून, काही पालक HIV +ve आहेत. या मुलामुलींसाठी संस्था निवासी शाळा चालवीत आहे. या मुलांनी स्वतःच्या पायावर आत्मविश्वासाने उभे राहावे यासाठी त्यांना व्यवसाय प्रशिक्षणही दिले जाते.
संस्थेच्या माध्यमातून बचतगट, सेंद्रिय शेती इ. विषयावर प्रशिक्षण दिले जाते. शहराकडे होणारे स्थलांतर कमी होऊन गावांचा विकास व्हावा हे मुख्य ध्येय आहे
२. नोंदणी :- ट्रस्ट अंतर्गत : क्रमांक :- ई ४१०४ पुणे
३. वेबसाईट चे काम सध्या सुरु केले आहे.
४. मदत :- संस्थेला कुठलीही सरकारी मदत मिळत नाही. काही लोकांकडून थोडीफार वस्तुरूप मदत मिळते आहे.
५. आयकरात सवलत ८०G अंतर्गत आहे. शिवाय आता FCRA (परदेशी मदतीसाठीची मान्यता) मिळाली आहे त्यामुळे तीही अडचण येणार नाही.
२. संपर्क व्यक्ती:- गीतांजली देगावकर,
अध्यक्ष,
०९८९०६९०५१३,
e-mail :-
geet.astitva@gmail.com

३. देणगी कशी देता येईल?
संस्था परदेशी देणगी परदेशी चलनात घेऊ शकते. आपल्याकडे तशी परवानगी आहे. संस्थेचे स्वतंत्र बँक खाते आहे. त्याची माहिती….

Bank Details:-
For Indian Currency
Astitva Pratishthan
Bank Of Maharashtra
Dhanakawadi, Pune 411 043
Maharashtra, India
Bank A/c no.- 20104804132
IFS code- MAHB0000776

For Foreign Currency
Astitva Pratishthan
State Bank of India
S.No. 153/1A/1, Pune Solapur Road,
Opp. Rammanohar Lohia Garden,
Kanchangunga Apartments,
Pune 411 028
Bank Account No. 32929789832
IFS Code SBIN0009062

संस्थेला यावर्षी कोणत्या अती महत्वाच्या गोष्टींची गरज आहे त्याची यादी.
१. कौशल्य प्रशिक्षण वर्ग/ व्यवसाय प्रशिक्षण वर्ग-

१) दागिने बनविणे -
२) वाखाच्या वस्तू बनविणे -
३) लेदर bag बनविणे-
४) कापडी bag बनविणे -
याचे प्रशिक्षण देण्यात येईल. यासाठी खालील खर्च अपेक्षित आहे-
bag साठी शिलाई मशीन ३ X रु . १५,०००/- प्रती मशीन = ४५,०००=००
कच्चे साहित्य = ४०,०००=००
पुस्तक, लेखी साहित्य = १०,०००=००
शिक्षक मानधन = २५,०००=००
एकूण = १,२०,०००=००

२. संगणक प्रशिक्षण वर्ग / e -learning -

१. संगणक = ३०,०००=००
२. LCD projector = ५०,०००=००
३. Software = १५,०००=००
४. Internet = ५,०००=००
५. पुस्तक = १५,०००=००
६. शिक्षक मानधन = २५,०००=००
एकूण = १,४०,०००=००

३. घरगुती उपकरणे - (गुरुकुलमध्ये सुमारे ५० विद्यार्थी आहेत. त्यांच्या वसतिगृहासाठी खालील वस्तू अत्यंत गरजेच्या आहेत )

१. Fridge (२९० लि.) = २८,०००=००
२. Washing मशीन = २७,०००=००
३. पीठ गिरणी (छोटी ) = १८,०००=००
४. फूड प्रोसेसर = ७,०००=००
एकूण - = ८०,०००=००

********************************

२. मैत्री संस्था, पुणे
मैत्री, ३२ कल्याण, नटराज सोसायटी, कर्वेनगर, पुणे५३२.
वेबसाईट : http://maitripune.net
नोंदणी क्रमांक : ई/२८९७ पुणे.
‘मैत्री’ – ‘100 दिवसांची शाळा, मेळघाट’ उपक्रम

1997 पासून मेळघाटामध्ये ‘मैत्री’ ने काम सुरु केले ते ‘कुपोषण आणि बालमृत्यू’ या समस्यांवर. आरोग्यासेवा उपलब्ध करुन देणे हा तातडीने करायचा उपचार आपण केलाच. मात्र या समस्यांना मुळापासून उखडून टाकण्यासाठी आरोग्याबरोबरच शिक्षण, शेती, रोजगार, संघटन अशा सर्व पातळ्यांवर कामाची गरज आहे हे लवकरच लक्षात आले. स्थानिक लोकांना सक्षम बनवणे हा या मागचा कळीचा मुद्दा. तेव्हापासून टप्प्याटप्प्याने ‘मैत्री’ ने काम सुरु केले. मेळघाटातील चिलाटी या दुर्गम ठिकाणी ‘मैत्री’ चे तीन कार्यकर्ते निवासी स्वरूपात काम करु लागले. आजूबाजूच्या गावांशी संपर्क वाढवणे, आदिवासी लोकांसाठी असलेल्या योजनांची लोकांना माहिती देणे, रोजगार हमीची कामे सुरु करण्याबाबत पाठपुरावा करणे असे अनेक उपक्रम चालू झाले.
याबरोबरच पावसाळ्याचे तीन-चार महिने चालणारी ‘धडक मोहीम’ ही तर ‘मैत्री’ ची खास ओळख झाली. दुर्गम भागामध्ये पावसाळ्यात स्वयंसेवकांच्या तुकड्या पाठवून तत्काळ आरोग्यसेवा पुरवणे व बालमृत्यू रोखणे हे या मोहिमेचे वैशिष्ट्य. 1997 पासून मेळघाटाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ‘मैत्री’ धडक मोहीम राबवते. 2/3 वर्षे एका भागात स्वयंसेवकांच्या मदतीने काम करणे, आरोग्यमैत्रिणी तयार करणे, त्यांना प्रशिक्षण देणे व त्यांच्याकडे मुलांच्या, गरोदर महिलांच्या आरोग्याची जबाबदारी सोपवण्याइतक्या त्या तयार झाल्या की दुस-या भागात ‘धडक मोहीम’ घेणे असे स्वरूप ठेवल्यामुळे आज 75 हून अधिक गावांमध्ये बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात आपण यशस्वी झालो आहोत.

2011 पासून मेळघाटात ‘मैत्री’ ने शिक्षण या मूलभूत गोष्टीवर भरीव, दीर्घकालीन परिणाम करणारे, टिकाऊ व स्वयंनियंत्रित काम करण्याचे ठरवले. पहिल्या वर्षी ने मेळघाटातील चिलाटी या ठिकाणी शाळाबाह्य 40 मुलांसाठी 100 दिवसांची निवासी शाळा चालवली. शाळा संपल्यानंतर त्या सगळ्यांना आश्रमशाळेत दाखल करुन खंडित झालेला त्यांचा शिक्षणप्रवाह पुन्हा सुरु केला. त्यानंतरच्या वर्षी म्हणजे 2012 मध्ये 3 गावांमध्ये असलेल्या जिल्हापरिषदेच्या शाळांबरोबर आपण 100 दिवस काम केले व सुमारे 70 मुलांपर्यंत आपण पोहोचलो. दोन्ही वर्षांचे हे उपक्रम स्वयंसेवकांच्या मदतीनेच पार पडले. त्यामुळे ‘धडक मोहीमे’ प्रमाणेच ‘100 दिवसांची शाळा’ हा पण मेळघाटातील ‘मैत्री’ चा चेहरा बनला.

तीन गावांमध्ये उपक्रम संपताना पालकांच्या बैठकी घेतल्या, तेव्हा सर्व पालकांनी सांगितले की, “वर्षभर आमच्या मुलांना असे काही मार्गदर्शन मिळाले तर जास्त उपयोग होईल. आमच्या गावात शाळा नीट चालतील. गावाच्या शाळेचे शिक्षक कित्येक दिवस, महिने गैरहजर असतात त्यामुळे मुलांचे नुकसान होते. त्याकरता तुम्ही काहीतरी करा”. पालकांकडून आलेल्या या मागणीमुळे नक्कीच हुरुप वाढला आणि यावर्षी म्हणजे 2013 जून पासून स्वयंसेवक व स्थानिक तरुण यांच्या एकत्रित सहभागातून आपण वर्षभर शाळेला ‘पूरक वर्ग’ असा उपक्रम सुरु केला. त्याची थोडक्यात रूपरेषा अशी आहे.

• 11 गावांमधून 10 वी, 12 वी किंवा पदवीधर तरुण ‘गावमित्र’ म्हणून निवडले.
• दररोज शाळेच्या आधी एक ते दोन तास गावमित्रांनी मुलांना शाळेत जमा करुन मराठी व गणित यामधील मूलभूत कौशल्ये त्यांनी शिकवायची. येथील स्थानिक भाषा आहे कोरकू व शाळेचे माध्यम आहे मराठी त्यामुळे भाषा शिकवण्यावर विशेष भर द्यावा लागतो.
• दर महिन्याला चिलाटीमध्ये एक शिबिर/ कार्यशाळा असते. यावेळी स्वयंसेवकांचा गट तेथे जातो. सर्व गावमित्र पण मुक्कामी येतात. स्वयंसेवक त्यांना पुढच्या महिन्यात काय शिकवायचे याचे प्रशिक्षण देतात. तसेच गावागावांमध्ये जाऊन स्वयंसेवक स्वत: शिकवतात.
• चिलाटीमध्ये रमेश व अशोक हे आपले स्थानिक कार्यकर्ते स्वयंसेवक नसताना गावांना भेटी देणे, गावमित्रांना मदत करणे, त्यांच्या अडचणी सोडवणे इ कामे व एकूणच स्थानिक पातळीवर या उपक्रमाचे समन्वयक म्हणून काम करतात.
• स्वयंसेवक वर्षभरात एकूण 100 दिवस मेळघाटात शिकवण्याच्या कामी मदत करतात म्हणून उपक्रमाचे नाव आपण ‘100 दिवसांची शाळा’ असेच ठेवले आहे.

गावमित्रांना बरोबर घेऊन हा कार्यक्रम केल्याचे अनेक फायदे जाणवतात ते असे.
• मुख्य म्हणजे वर्षभर मुलांना मार्गदर्शन मिळते.
• गावमित्रांना सतत प्रशिक्षण मिळाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो तसेच शिकवण्याचे कौशल्य पण वाढते.
• कोरकू भाषिक गावमित्राबरोबर शाळेत येणारी लहान मुले पटकन संवाद साधू शकतात.
• सातत्याने राखल्याने मुलांना कसा फायदा होते हे पालकांना समोरच दिसते आणि यातूनच त्यांच्याकडून शिक्षकावर काही प्रमाणात दबाव यऊन त्याच्या उपस्थितीमध्ये वाढ होते.

एकूण मैत्रीविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी http://maitripune.net आणि http://www.maitripune.net/PlusYou_contribute.html पहा.
Ø ‘मैत्री’ ही नोंदणीकृत संस्था आहे व तिला दिलेल्या देणगीकरता भारतीय आयकर नियमांनुसार 80G अंतर्गत आयकरात सवलत मिळते. वस्तूरुपाने दिलेल्या देणगीची किंमत सांगितल्यास तशी पावती ‘मैत्री’ कडून मिळू शकेल.

*****************************

३. भगीरथ ग्राम विकास प्रतिष्ठान संस्था
वेबसाइट : http://www.bhagirathgram.org/

*****************************

४. सावली संस्था

सावली संस्थेकडून देवदासी,वेश्याव्यवसायातील स्त्रिया, एच आय व्ही पॉझिटिव्ह पालक, एकटे व गरीब पालक, व्यसनाधीन पालक, गरीब शेतकरी व झोपडपट्टीत राहाणार्‍या गरीब पालकांच्या वंचित मुलांना आधार देण्यात येतो. मुलींना शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे सर्वात महत्त्वाचे व प्राधान्यक्रम असलेले काम आहे. या प्रकल्पात आम्ही गेली ११ वर्षे काम करत आहोत. सध्या आम्ही १२० मुलांसाठी काम करत आहोत. ही मुले आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत आणि त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी जे जे शक्य आहे ते ते करण्याचा आमचा प्रयत्न असतो. मुलांचा प्रतिसादही उत्तम आहे. यातील २६ मुलांना वेगवेगळ्या क्षेत्रांत नोकर्‍या मिळाल्या असून ते आता आपल्या कुटुंबाची काळजी घेत आहेत. ही मुले आमच्यासोबत गेली १० वर्षे आहेत.

आमच्या एका विद्यार्थ्याने प्रथम श्रेणीत एम सी एस कोर्स पूर्ण केला, दुसर्‍याने एम पी एम प्रथम श्रेणीत पूर्ण केले. आमचे विद्यार्थी विद्यार्थिनी एम बी ए (हायर सेकंड क्लास), अभिनव कला महाविद्यालयाचा पाच वर्षांचा कमर्शियल आर्टिस्ट कोर्स पूर्ण, पाच वर्षांचा बी एस एल, एल एल बी कोर्स पूर्ण, पुणे विद्यापीठातून दोघांनी बी.कॉम पूर्ण करून एम.कॉमसाठी तयारी, दोघांनी कॉम्प सायन्स व ई अँड टीसी मध्ये इंजिनियरिंग कोर्स पूर्ण अशा प्रकारे कोर्सेस पूर्ण केले आहेत. आमची ४५ मुले कॉलेज लेव्हल व पोस्ट ग्रॅज्युएशन लेव्हल कोर्सेस करत आहेत. आपल्या मदतीमुळे आमची मुले अधिक महत्त्वाकांक्षी बनली असून आपल्या भविष्याबाबत विचारपूर्वक पावले उचलण्यास प्रवृत्त झाली आहेत. तुमच्या सातत्याच्या मदतीमुळेच हे सर्व शक्य झाले आहे. आम्ही आपल्या मदतीसाठी व आमच्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी आपले शतशः ऋणी आहोत.

आपल्या आर्थिक मदतीतून आम्ही खालील गोष्टी करू शकलो :

# आम्ही हुजूरपागा मुलींच्या शाळेत शिकणार्‍या ज्यु. के.जी. ते बारावीपर्यंतच्या ७३ गरजू मुलींची फी भरू शकलो.
# इयत्ता आठवी ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतच्या सावलीतील ७८ गरजू मुलांच्या फी आम्ही भरत आहोत.
# आम्ही मुलांना गणवेश, दप्तरे, शैक्षणिक साहित्य, सँडल्स, स्वेटर्स इत्यादी पुरवू शकलो. तसेच नूतन समर्थ विद्यालय बुधवार पेठ शाळेतील ६० मुलांची सहल संस्कृती रिसॉर्ट येथे घेऊन जाऊ शकलो.
# आमच्या १३ मुलांना आदर्श स्कूल, आगरकर स्कूल, भावे स्कूल येथे इयत्ता आठवीसाठी प्रवेश मिळाला आहे.
# सावलीतील ७ मुले इयत्ता १०वीच्या परीक्षेसाठी बसत आहेत आणि ४ मुले बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी बसत आहेत.
# आम्ही ६ मुलांसाठी वसतिगृह व भोजनाची सोय केली आहे.

savali 2015 needs.jpg

सावलीच्या दोन्ही खात्यांचे तपशील (भारतीय व FCRA)

Indian account for Donation in Indian Rupees

Account Name-Savali Seva Trust

Savali's account No- 033701004572

Branch Name- ICICI Satara Road,Pune

IFSC- ICIC0000337 MICR- 411229010

Purpose-Educational

Cheque should be drawn with the name "Savali Seva Trust"

If you want to transfer direct to savali's account, please write description.

From "your name" To Savali

You will get Tax benefit when you donate to Savali Project.ie 80-G exemption.

Address is

Mrunalini Mandar Bhatavdekar

E-1004 Treasure Park

Sant Nagar, Near Walwekar Nagar

Parvati, Pune - 9, Maharashtra

Mob-9823270310

Land line- 020-24203282

*******************************

५. संस्थेचे नावः राधाबाई हार्डीकर प्राणिजात मंगल संस्था
पत्ता:12152, Kanchanshree, Shirole Road, Opp. Fergusson College, Shivajinagar, Pune-411001. Tel:25531881

चालवत असलेले उपक्रमः सुमती-बालवन शाळा, पाखरमाया अनाथाश्रम
संस्थेबद्दल माहिती: २००१ साली संस्थेची स्थापना झाली. संस्थेतर्फे कात्रजच्या पुढे असलेल्या गुजर-निंबाळकरवाडी ह्या गावात आर्थिक दृष्ट्या हालाखीची परिस्थिती असलेल्या मुला-मुलींकरता सुमती बालवन ही शाळा चालवली जाते. तसेच गरजू आणि अनाथ मुलांकरता पाखरमाया अनाथाश्रम चालवला जातो. शाळेत सध्या साधारण १५० विद्यार्थी शिकत आहेत आणि त्यातील साधारण १५% मुलं ही वसतिगृहात राहतात. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच, लघूउद्योगाचे शिक्षण देऊन लवकर स्वावलंबी बनविण्याकडे शाळेचा कल आहे. अनाथाश्रम आणि वसतिगृहातील मुलांचा राहण्याचा, शाळेचा खर्च, सकस आहार, वैद्यकीय मदत हे सर्व संस्थेमार्फत केले जाते.

रेजिस्टेशन नंबरः Maharashtra/846/2001/Pune, dated July 26, 2001.

निकडीच्या वस्तू :
# शाळेसाठी २ फळे, ८ लाकडी टेबल्स
# मुलांसाठी अंतर्वस्त्रे, हायजीन प्रॉडक्ट्स, टॉवेल्स, शूज.
# वसतिगृहासाठी काही भांडीकुंडी

*******************************

६. निवासी अपंग कल्याण केंद्र, सटाणा, जि. नाशिक

satana sanstha 2015 needs.jpg

***********************************

७. शबरी सेवा समिती
वेबसाईट : http://shabarisevasamiti.org/

आम्ही आपल्या मदतीसाठी आपले अत्यंत आभारी आहोत. आपल्याला माहीत असेलच की आम्ही कशेळे, ता. कर्जत येथे १५ मुलांसाठी वसतिगृह चालवत आहोत. या गरीब मुलांना येथे मोफत शिक्षण, मोफत वसतिगृह व भोजन दिले जाते. ग्रामीण भागातील सातत्याच्या वीजकपातीमुळे ही मुले नीट अभ्यास करू शकत नाहीत. तरी आम्ही आमच्या केंद्रावर सोलर दिव्यांचे युनिट बसवण्याचे योजिले आहे, जेणेकरून मुलांना अभ्यासासाठी सोलर दिव्यांचा उजेड उपयोगी पडेल.

सोलर दिव्यांसाठी आम्ही कोटेशन मागविले आहे.

quotation:-
Sr. No - Description UoM Qty. Rate Offer Price (Rs.)

1 LED Street Light – 12W Unit 1 12,300 12,300/-
2 Solar Home Power Pack Unit 2 11,300 22,600/-

Total 34,900/-

सोलर होम पॉवर पॅक : कोटेशनमधील किमती या करासहितच्या आहेत. काही प्रश्न असल्यास जरूर विचारा.

आपले,
प्रमोद करंदीकर
एस. जे. पांढरकर

८. कोथरुड, पुणे येथील मुलींची अंधशाळा. (द पूना स्कूल अँड होम फॉर द ब्लाईंड ट्रस्ट)
गांधी भवनजवळ, डहाणूकर कॉलनीजवळ, पुणे ३८.
फोन : ०२० २५३८४५८९.

गरज : हायजीन प्रॉडक्ट, शैक्षणिक वस्तू (वेगवेगळ्या क्षमतेची डिजिटल मॅग्निफायर्स वगैरे)

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मायबोलीकरांनी या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद द्यावा असे वाटते. संस्थांनी गेल्या वर्षी देणगीदाखल मिळालेल्या निधीतून काय खरेदी केली व त्याचा कसा उपयोग होत आहे याबद्दल कळवले आहेच!

धन्यवाद सुनिधी .

<<<<< दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मायबोलीकरांनी या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद द्यावा असे वाटते. संस्थांनी गेल्या वर्षी देणगीदाखल मिळालेल्या निधीतून काय खरेदी केली व त्याचा कसा उपयोग होत आहे याबद्दल कळवले आहेच!>>>> +१००

सामाजिक उपक्रमतर्फ़े जाहीर केलेले आवाहन वाचले.

समिती सदस्या जाई यांच्याशी संपर्क साधला आहे. यथाशक्ती रक्कम देत असल्याचा त्याना निरोप दिला आहे.

DWG Quotation -Street Light(LED)& Home pack - Shabri Seva  Samiti__Page_1.jpgDWG Quotation -Street Light(LED)& Home pack - Shabri Seva  Samiti__Page_2.jpg

शबरी सेवा समितीला आलेले कोटेशन वरील प्रमाणे आहे.

अकु, प्लीज हे वरती अ‍ॅड करशील का तुझ्या प्रतिसादात?

वरील मजकुर खुप बारिक दिसतो आहे.
तेच टेबल परत देते आहे.
quotation:-

Sr. No Description UoM Qty. Rate Offer Price (Rs.)

1 LED Street Light – 12W Unit 1 12,300 12,300/-

2 Solar Home Power Pack Unit 2 11,300 22,600/-

Total 34,900/-

नमस्कार,
३१ मार्च जवळ येत आहे.
सांगायला वाईट वाटते आहे की यावेळी प्रतिसाद फार कमी आहे. मागल्यावेळेस १७-१८ देणगीदारांनी आधार दिला होता, यावेळेस जेमतेम निम्मे आहेत. आमचे काही चुकले आहे का की ज्यामुळे प्रतिसाद इतका अल्प आहे?
या संस्थामुळे ज्यांना आधार दिला जातो ते पुर्णपणे आपल्या याच उपक्रमावर अवलंबुन नसले तरी त्यांच्या महत्वाच्या गरजा यातुन नक्कीच पुरवल्या जातात. त्यामुळे आपणांस शक्य असेल व इच्छा असेल तर पुढे येऊन उपक्रमास हातभार लावावा ही कळकळीची विनंती. हा उपक्रम देणगीदार कमी कमी होऊन शेवटी बंद पडु नये ही इच्छा आहे. मायबोलीमार्फत लाखो लोकांपर्यंत हा उपक्रम पोचतो, तरीही उपक्रम बंद पडला तर फार वाईट वाटेल.

ज्यांनी आधाराचा हात पुढे केलाय त्यांचे मनापासुन आभार.

धन्यवाद.

सुनिधी +१.

ज्यांना उपक्रमात सामील होण्याची, देणगी द्यायची इच्छा आहे त्यांनी कृपया ३१ मार्चपर्यंत संपर्क साधावा ही विनंती.

सुनिधी....

तुमचा प्रतिसाद वाचून मनस्वी वाईट वाटले, हे मी कबूल करतो. मी समजत होतो मागील वर्षाप्रमाणे याही वर्षे तुम्ही सार्‍यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून केलेल्या आवाहनाला अगदी भरभरून प्रतिसाद मिळेल. शिवाय देणगी ही यथाशक्तीच द्यायची असल्याने तुम्ही कुणीही अमुक इतकी रक्कम यावी असेही कुठे लिखित स्वरूपात जाहीर केल्याचे वाचनात आलेले नाही.

तरीही असो....अजूनही किमान मागील वर्षी ज्यानी या निधीत अगदी खारीचा म्हणावा तसा वाटा उचलला असेल ते सारे पुन्हा तुमचे आवाहन वाचून पुढे येतील याचा मला विश्वास आहे.

"..हा उपक्रम देणगीदार कमी कमी होऊन शेवटी बंद पडु नये ही इच्छा आहे...." ~ असे होऊ नयेच.

लवकरच सर्व देणगीदारांना संपर्क करुन पुढील कामाला लागत आहोत. मागील प्रतिसादात काळजी व्यक्त केली होती. पण आता मागल्या वर्षाइतके देणगीदार यावर्षी पण मिळाले आहेत. त्या सर्वांना स्वयंसेवकांकडुन खुप धन्यवाद.

१)
Astitva Pratishthan

For Indian Currency
Astitva Pratishthan
Bank Of Maharashtra
Dhanakawadi, Pune 411 043
Maharashtra, India
Bank A/c no.- 20104804132
IFS code- MAHB0000776

For Foreign Currency
Astitva Pratishthan
State Bank of India
S.No. 153/1A/1, Pune Solapur Road,
Opp. Rammanohar Lohia Garden,
Kanchangunga Apartments,
Pune 411 028
Bank Account No. 32929789832
IFS Code SBIN0009062

२)
Maitri
HDFC Bank, Mayur Colony, Pune
Account Number 01491450000152
Cheques should be drawn in favour of 'MAITRI'
RTGS/NEFT Code: HDFC0000149
MICR Code: 411240009

३)
Bhagirath Gramvikas Pratishthan

खाते नाव :- भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान.
बँक :- बँक ऑफ इंडिया, शाखा कुडाळ.
खाते नं. :- 147110210000004.
IFSC Code :- BKID0001471.

४)
Savali Seva Trust
ICICI, Satara Road, Pune
Account Number 033701004572
IFSC- ICIC0000337
MICR- 411229010

५)
Radhabai Hardikar Pranijat Mangal Sanstha (Sumati Balwan)
State Bank of India, Dhankawadi branch, Pune.
Account Number 30408527601
IFS code SBIN0005413.
Cheques should be made payable to Radhabai Hardikar Pranijat Mangal Sanstha

६)
Niwasi Apang Kalyan Kendra
State Bank of India Satana
Account Number 32497062860
TAN NO:- NSKK02578C.
80G NO:- Ph.T/80G/N.150/99/2005.
PAN NO:- AAATN5460F.
Account Name :- Namdeorao Mohol Vidya & Krida Pratishthan.
MICR Code :- 423002820
IFSC Code :- SBIN0000472 (SATANA Branch)

७)
Shabari Seva Samiti
IDBI Bank, Ramnagar, Dombivali East
Account Number 66910010002698
IFS Code : IBKL-0000669
Donations can be made by cheque in the name of 'Shabari Seva Samiti'

८)
Pune blind school

Bank of Baroda, Branch: Wadia College Branch, Pune

(Indian Contribution)

Account No: 98100100000199

IFSC Code: BARB0WADCAM

MICR Code: 411012051

कोथरुड अंधशाळेस देणगी देण्यासंबंधी :- त्यांच्या संकेतस्थळावर त्यांच्या बँक अकाऊंट्सची माहिती आहेच!
http://puneblindschool.org/donation.php
तरीही पुन्हा एकदा शाळेच्या मुख्याध्यापिकांशी बोलून व खात्री करून देणगीसाठीचे बँक अकाऊंट तपशील येथे देईन.

Pages