माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो का, छान.

अग पहिली टेबल पुसुन घ्यायचं त्याच्याकडून ही प्रतिज्ञा तर खरी करून दाखव.

बकुळामावशीचे स्वगतः- अगं बायानो, वाईच धीर धरा की. लैच उतावळ्या तुम्ही. आत्ता कुटं शन्याच्या भिर भिरीला सुरुवात झालीयां. आता फुडं त्यो सौमित्र शन्याला पिरेमाचे आवताण देणार हाय की. मग शन्याबई काय करतात ते बघायचे सोडुन तुमी सगळ्या/ सगळे त्या राधाक्काच्या मागे मागे का फिरु र्हायले म्हंते मी? त्ये दाढीवालं सायब ( रंजनासारखे ओ प्यांटवालं ) आता घरचं रहाणार नाय ना बाहेरचं. जरा मज्जा बगा की ....

मी उगाच राधिका पकवते म्हणायचो.. तिच्यापेक्षा महा पकाऊ गुरुची आई निघाली.. काय ते डायलॉग.. काळे मणी, मंगळसूत्र... कहर नुसता..

शनिवारच्या भागात भांडान काय पेटिवलं दोन बायकांनी. खरे तर गुरू ला बीपीचा त्रास आहे तर राधिकेने आई बघताय्तं न बघु दे म्हणून आई आणि शनायाला हॉल मध्ये सोडून. बेडरूम मध्ये जाउन मस्त पडायच. सासुला सांगायचं मला पण एक प्लेट खिचडी पा ठवा अन काय गोंधळ घालाया चा तो घाला. पण सर्व नुसते ह्याव अन त्याव भांडूनच राहिले. शनायाला मारले ते मात्र चूक. आपल्याला इंटरेस्ट नाही तर सिचुएशन मधून अंग काढून स्वतंत्र व्हावे हा पुणेरी पोच राधि का ला नाही. त्यात ते बनी स्टेपणी मध्ये मध्ये फिरत राहेते. कोनालाच ह्यांचे पर्सनल आहे तर दूर राहावे असे वाटत नाही. तोंड वाजवत राहतात.

गुरू शनाया प्रेमचाळॅ दार उघडे टाकून चालू आहेत. झिंदा बाद.

शनायाला मारले ते मात्र चूक. >>>>> नाही अमा. मी तर म्हणते की उलट दोन्ही गाल रंगवायला हवे शनायाचे. आधी त्या पुचाट गुरुच्या कानाखाली जाळ काढायचा, मग शनायाला फटकावायचे. राधिका, शनायाला मारते कारण ती गुरुच्या आई वडिलांची लायकी काढते म्हणून. वास्तवीक शनया, गुरुइतकीच पूर्ण जबाबदार आहे राधिकाच्या फरफटीला.

मला शनया पहिल्यापासुनच उद्धट, स्वार्थी, माणुसकीहीन, बेजबाबदार वाटली होती. राधिकाचे माह्या नवरा करुन नवर्‍याला पाठिशी घालणे पण चूकीचे होते. आणी परवा, या बेवड्याचे सगळे करुनही तो आई वडिलांवर उलटतो हे बघुन त्यालाही बुकलावेसे वाटले.

दक्षिणा Lol बकुळा बरोबर बोलते. अंजू, मी मध्ये पहाणे सोडले होते आता शेवटपर्यंत पहाणार, कारण दुसरी कुठलीच सिरीयल बघत नाही. लागिर झालं आणी तुझ्या जीव मधल्या पात्रांनी पण वैताग आणलाय, आणी ग्रहण पहायची सोडलीय. उरली ही एकच वात आणणारी.

बनीचे राधा राधा करणे तिच्या सासू सासर्‍यांना खटकत नाही का?
सोनाली ने लेखकाचे मनोगत अगदी यथार्थ वर्णन केले आहे.....

तिला वाईट वाटत होत म्हणे त्याला बघून.>>. वाटणारच. काहीही झाले तरी तो माह्या नवरा आहे आणि प्रेम हे आयुष्यात फक्त आणि फक्त एकदाच होते. ते मी फक्त यांच्यावर केलय. त्याच प्रेमापोटी, अथर्वसाठी, माह्या सासूबाईंसाठी, यांना पुन्हा नव्याने जीवन सुरु करण्यासाठी मी यांना अजून एक संधी देणार. माणूस चुकू शकतो म्हणून त्याला कायमचे नाकारुन कसे चालेल? त्याला सुधारण्याची संधी द्यायला हवी. शन्या सारख्या मुलींमुळेच संसार मोडतात त्यांना शिक्षा झाली पाहिजे. यांना यांची चुक समजली आता अजून काय पाहिजे? मी माह्या नवर्‍याला परत मिळवलं, मी जिंकले......इती राधिका गुरुनाथ सुभेदार.

राधाक्का कि जय!!!

कणाहीन, मिळमिळीत मंडळी सगळी. तो गुरु तरी अगदी संताप दाखवतो...........................................
सारखं काय गं तुम्ही शनायाला बोलत असता? सदा पहावं तेव्हा आपली कटकट चालूच..!! इ ई.....

गुरूच्या आईचे लेक्चर अफाट होते, मंगळसूत्रातले काळे मणी सगळी नकारात्मकता शोषून घ्यायला आणि लाल कुंकू म्हणे नव-याने बायकोला पूर्णत्व द्यावे ही त्याला करून दिलेली आठवण. Uhoh किती बंडल संवाद. राधिका आज बनीला सांगत होती की शनायाच्या भावनांशी खेळू नको. तो तीला पैशाचे आमिष दाखवतो ते बरोबर आहे का. गुरूची आई एवढी सेंटी झाली आहे की मला वाटलं, आता ती म्हणेल की तुझी आवड ती आमची आवड, तुला श आवडते तर तीच्याबरोबर रहा पण सुखात राहा. राधिकाचा किती क्लोजअप दाखवतात.

चंपा. Biggrin

राधिकाच्या क्लोज अप बद्दल >>>>> +++++
आज बहुतेक बनी विल प्रोपोज शनाया....
काहीही..... तो सुद्धा तिला ब ssss च्चा म्हणतो!

गुरवाला जाम इन सिक्युरिटी वाटत्येय.
(आणि दूध पोळी कशी दाखविली? अशी खातात दूध पोळी ? अख्ख्या दोन पोळ्यांवर नुसतं दूध पसरवून टाकलं होतं! Uhoh आमच्याकडे तर बारीक कुस्करुन खोलगट डिशमधे खातात!)

यातली रेवती फक्त आजच्या जगातली आहे बाकी सगळी पात्र ८०/९० च्या दशकातली आहेत.

असो जे झीच्या बहुतेक सर्व मालिकांना लागू होतं ते सुत्र
मालिका ज्ञानदीप कडून किलबील कडे चालली आहे.

अर्थात अस म्हणणं तस किलबीलचा अपमानकरण्यासारख आहे. विजय चव्हाण, जयवंत वाडकर सुधा करमरकर चांगले कार्यक्रम सादर करायचे.

संत्र्यांचा मौसम नाही नागपूरला जाऊन तरी काय करणार?
नवीन Submitted by कृष्णा on 22 May, 2018 - 13:15`>>>>>>एकदम भारी Lol Lol Biggrin Biggrin

राधिका आज बनीला सांगत होती की शनायाच्या भावनांशी खेळू नको. तो तीला पैशाचे आमिष दाखवतो ते बरोबर आहे का. >>>> अग राधिके, ती तुझ्या भावनांशी खेळली त्याच काय? काय तर म्हणे शनायाच्या भावनांशी खेळू नको. Angry

मालिका ज्ञानदीप कडून किलबील कडे चालली आहे. >>> Rofl

अग राधिके, ती तुझ्या भावनांशी खेळली त्याच काय? काय तर म्हणे शनायाच्या भावनांशी खेळू नको.
>>> यात शनायची काय चूक.. ती नसती तर गुरू दुसऱ्या कोणाच्या प्रेमात पडला असता फॉर सुरे.
खेळला टर गुरू आहे राधिका च्या भावनांशी.

काल दुपारी जेवताना तोंडीलावणं म्हणून ही मालिका घेतलेली.

शनायाची मैत्रीण तिला म्हणत होती," म्हणजे तू आता गुरूपेक्षा जास्त ओल्ड आणि जास्त रिच मॅन शोधणार का?"

मैत्रीण असावी तर अशी.

टर..? Biggrin का मराठीची टर उडवताय?

शनाया खरंच बनीचा विचार करु लागली आहे. गुरु छान अभिनय करत होता...............................
त्याचा वैताग खरा वाटत होता

Pages