Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31
माझ्या नवर्याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिरकी ती नाही, तो बसलाय असं
तिरकी ती नाही, तो बसलाय असं वाटतं. होसूमीघ मधली त्याची बायको, त्याची खरी बायको आहे असं मला वाटायचं. गुरूचे आईवडिल छान अभिनय करतात, आई तर खरीच आई वाटते. रेवती सांगणार आहे आज राधिकाला, घटस्फोट देऊन टाक वगैरे. शनाया कुठे गेली गुरूला सोडून, परत ईशाच्या घरी रहायला गेली का.
होसूमीघ मधली त्याची बायको,
होसूमीघ मधली त्याची बायको, त्याची खरी बायको आहे असं मला वाटायचं. >>> मला सुद्दा. कारण त्या दोघान्चे आडनाव सुद्दा एकच होते ना. दोघान्नी एक नाटक सुद्दा केले होते एकत्र.
रेवती सांगणार आहे आज राधिकाला, घटस्फोट देऊन टाक वगैरे. >>> पण हि भैताड थोडीच ऐकणार आहे तिच?
शेवटी गुरू राधिका एकत्र येणार
शेवटी गुरू राधिका एकत्र येणार च आहेत...
आणि मनीष ची बायको मस्त आहे . क्युट दिसतायत दोघे
नेट वर शुक्रवारचा थोडा एपिसोड
नेट वर शुक्रवारचा थोडा एपिसोड बघितला, ती आई काय सरळ म्हणते बायको दुर्लक्ष करा म्हणू शकते आई नाही, आता ही राधिका प्रयत्न करतेय विसरायचा तर ही आई अति soft मुलाबाबत, त्याचं गुण उधळणे नाही दिसत. गुरु totally gone case झालाय तर आता तो सुधारला, अमके अमुक तमुक दाखवू नका.
नाहीतर शेवट हाच माह्या मुलाला माफ कर ग सुने करणार, disgusting totally.
ती हो सु मि मधली त्या मनीष ची
ती हो सु मि मधली त्या मनीष ची gf तिचं ऑलरेडी लग्न होऊन मुलगी आहे तिला, सिरीयलमध्ये यायच्या आधीच. तिचे सासर नागपूर आणि ती नवरा आणि सासर्यांच्या प्रोत्साहना मुळेचं सिरीयल नाटक करत होती अशी तिची मुलाखत मटाला आलेली.
तो मनीष आमच्या डोंबिवलीचा आहे.
काल काही घडलं का? ...
काल काही घडलं का? ...
कालच्या भागात रेवतीचं कौतुक
कालच्या भागात रेवतीचं कौतुक एक्स्टेन्डेड.. बस्स्स! इतकंच.
इतकं पाणी घालतात हे लोक की बस
त्या माह्या मुलगा करणा-या
त्या माह्या मुलगा करणा-या आईसाहेब काय म्हणतायेत, उपाशी राहीला ना गुरु त्या दिवशी मग गंगा जमुना वहात होत्या.
आईसाहेब म्हणत आहेत की शनायाच
आईसाहेब म्हणत आहेत की शनायाच वाईट आहे, तिला काय माझाच मुलगा दिसला का, तीला मी जाब विचारणार आहे, तर राधिका म्हणतेय की मी सिद्ध केलं की मी शनायापेक्षा हुशार आहे आणि मलाच सगळं येतं आणि मी शनायाला धडा शिकवणार. सासूसुनेचं उगीच नाही पटत.
काहीही चाललंय.
काहीही चाललंय.
ह्या आईसाहेब उगाच आल्या, त्यादिवशी डोक्यात गेल्या. अभिनय चांगला करतात पण सध्या रडायचं, मुलाच्या नावाने टीपं गाळायचं काम दिसतंय बहुदा. लेकाचे उधळलेले गुण दिसत नाहीत. थँक्स चंपा.
बघितला एपिसोड. गुरुला
बघितला एपिसोड. गुरुला शनायाची योग्यता माहीतेय ना मग तो तिला कसा रीप्रेझेंटेटीव्ह म्हणून पाठवतो. ती पहील्यापासून कुठे काही काम करते, गुरुच्या जीवावर मजा करते ना. आता तर पार बिनडोक केलंय तिला टीमने. ती गुरुची आई आणि शेजारच्या सर्व शनायावर का थोपत होत्या, त्या आईला गुरु म्हणजे संतपुरुष वाटतो का, तो सीन अगदी चुकीचा होता. एका शब्दाने आई म्हणाली नाही की माझ्या गुरुने अपराध केलाय, किंवा चुक आहे त्याची. राधिका मात्र मागे गुरुची पण चूक आहे म्हणत होती.
काही बघण्यात अर्थ नाहीये, एन्ड ऑफ द डे शनायाला एकटीला दोषी ठरवून गुरुला वाल्याचा वाल्मिकी करणार मानबावाले.
बाय द वे मी काल कोप-यावरच्या
बाय द वे मी काल कोप-यावरच्या दुकानात बटाटेवडा मसाला बघितला, सुरभीचा. म्हणजे राधिकाची कंपनी करते ते योग्य आहे, ब व मसाला. अनयाने पण सांगितलं खिडकीवडा वाले मसाला तयार करतात. माझ्यासाठी नविन ही गोष्ट.
माझ्यासाठीही नवीन होते.
माझ्यासाठीही नवीन होते.
गुरु कुठे गायब झाला?
राधाक्काने अजुनही गुरुच्या नावाचे मंसूत्र आणि त्याचे नाव टाकले नाही, त्यात सासूबाई गुरुला माफ करण्याची गळ घालायच्या तय्यारीत
अंजू मलाही तो सीन खूपच खटकला.
अंजू मलाही तो सीन खूपच खटकला...मी आतच चालले गेले मग..सिरीयल सोडली मी ! आई मुलावर असं आंधळं प्रेम कसं काय करु शकते? तो चुकतोय असं एका शब्दानेही म्हणत नाही? सगळं खापर फक्त शनायावर का? शनाया ला काल का पाठविलं राधिकाच्या ऑफीस मधे गुरवाने?
ती उधळ माधळ आणि शो ऑफ असली तरी जरा भोळसर आहे. तिला खाण्या बद्दल विचारलं तर लगेच हो म्हणाली!
आनंद किती पटर पटर बडबड करत होता! सगळे लोक किती दांभिक, खोटे आहेत!
भोळी नाही वाटत ती, सेल्फ
भोळी नाही वाटत ती, सेल्फ रिस्पेक्ट अजिबात नाहीये. डंब करुन ठेवलंय टोटली तिचं कॅरॅक्टर. खाणं आणि शॉपिंग.
सेल्फ रिस्पेक्ट असता तर गुरुने पहील्यांदा आरोप केले तिच्यावर, तेव्हा सोडून गेलेली, ती स्व निर्धारावर कायम राहीली असती. हिच्या फॅमिलीला आणि हीलाही एकमेकांचं काही पडलेलं दिसत नाही.
तो ऑफीस सीन पण काहीतरीच होता,
तो ऑफीस सीन पण काहीतरीच होता, प्रोफेशनली सांगू शकले असते तुम्ही तयारी नीट केली नाही, मिटींग कॅन्सल. पण ती डंब कशी आहे दाखवायला तो सीन होता.
अंजू....हो. खरंय. भोळी नाहीए
अंजू....हो. खरंय. भोळी नाहीए पण अशीच लूज एंडेड, सेल्फ रिस्पेक्ट नसलेली, स्वार्थी आहे.
ब वड्याचा मसाला ट्राय करायला पाहीजे एकदा.
तो ऑफीस सीन पण काहीतरीच होता,
तो ऑफीस सीन पण काहीतरीच होता, प्रोफेशनली सांगू शकले असते तुम्ही तयारी नीट केली नाही, मिटींग कॅन्सल. पण ती डंब कशी आहे दाखवायला तो सीन होता.

नवीन Submitted by अन्जू on 9 May, 2018 - 14:15 >>>> तिथे बघायला निदान गुरु असता तर वेगळी गोष्ट, हे प्रेक्शकाना दाखवुन लेखकाने स्वताच्या अकलेचे दिवाळे दाखविले. किति तो unprofessional scene होता. company ची CEO क्म्पनिच्या साध्या representative direct receive करते, आणि at a time कम्पनिचे सगळेच लोक एकदम घेरुन तिचि आवभगत करतात. फालतुगिरी.
आपल्याला लगेच लक्षात येत
आपल्याला लगेच लक्षात येत बहुदा गुरुनाथ सिरीयल सोडतोय किंवा सोडली आहे.
लवकरच कोणीतरी नवीन गुरूनाथ येईल
गेला का? अभिजीत खांडकेकर
गेला का? अभिजीत खांडकेकर वैतागलेला वाटायचा.
आणि कसला चिपाड झालाय तो.
कशावरुन?
कशावरुन?
काय कशावरुन?? चिपाड दिसतोय ते
काय कशावरुन?? चिपाड दिसतोय ते का वैतागलेला दिसतो ते?
आपल्याला लगेच लक्षात येत
आपल्याला लगेच लक्षात येत बहुदा गुरुनाथ सिरीयल सोडतोय किंवा सोडली आहे.
लवकरच कोणीतरी नवीन गुरूनाथ येईल>>> हे कश्यावरुन ??
असे होऊ शकते. राधाक्कने या
असे होऊ शकते. राधाक्कने या गुरवाला माफ केले तरी प्रेक्षक करणार नाहीत. चेहेरा बदलला तर नव्या चेहेर्याकडे बघून आधिसारखा राग येणार नाही. त्यामुळे नवर्याला माफ केले दाखवायला सोपे जाईल.
पण असल्या फडतूस नवर्याला माफ करणे म्हणजे महामूर्खपणा आहे.
तू नळीवर एक व्हीडीओ आहे पण
तू नळीवर एक व्हीडीओ आहे पण मला तो ऑफिसमधून उघडता येत नाही.
तुमच्याही लक्षात येईल तो अचानक कुठेतरी गेला. प्रत्येकजण बोलण्यातून दाखवतय.
अनेकदा हे लोक सुट्टीवर जातात तेव्हा बॅक अप एपिसोड्स शूट करून ठेवतात.
आठवा जेव्हा शशांक तेजश्रीच मोडलं तेव्हा अचानक सून सुन्न झाली आणि कितीतरी एपिसोड्स त्यात घालवले.
बरं गुरूने शनायला का पठवाव राधिकाच्या ऑफिसमध्ये? बाकी ताई माईच्या गप्पा लावून मालिका वाढवतायत.
उगाच टाळाटाळ चालली आहे अस वाटतय.
ते असो पण "अता तुला कळेल शनया.." वगैरे वगैरे ultra cheap वाटतय.
सगळेच तेच तेच बोलून कंटाळलेले वाटतायत.
बहुतेक गुरु कंपनीचा राजीनामा
बहुतेक गुरु कंपनीचा राजीनामा देऊन गेला असावा.. राजवाडे साहेबांनी शनायाला पाठविले असावे! आणि बहुदा गुरुच्या जागेवर तीला नेमतील सिरेल चे लेख दिग्दर्शक... मग गुरु पुन्हा घरी येईल माफी नामा.. वैगेरे शनायाची मिटींग फेल गेल्याने साहेब तीला हाकलून देतील मग राधिका बिच्चार्या शनायाला ऑफिस साफ सफाईच्या कामाला ठेवेल.. गुरू राधाक्काची कंपनी जॉइन करेल.. मग पुन्हा घराच्या ऐवजी ऑफिसात राधाक्का शनाया गुरु एकत्र मग शनायाची कीव येऊन गुरु एखाद्या दिवस तिचे टेबल पुसायचे काम करेल जुनी जाण ठेवून ते राधाक्का बघेल मग तिचे टेबल पुसायला लावण्याचे स्वप्न साकार होऊन सिरेल नवे वळण घेईल.. आणि इथे भाग ३ सुरु झालेला असेल!
इतकी भंगार सिरियल मी आयुष्यात
इतकी भंगार सिरियल मी आयुष्यात पाहिली नाही कधी
अक्षरशः घरगुती गप्पांवर निभावून नेतायत सध्या एपिसोड्स.
मे महिन्यात शाळेची सुट्टी,
मे महिन्यात शाळेची सुट्टी, IPL, ह्या सगळ्यात मालिका फार कमी पाहिली जाईल अशी खात्री असेल झी लागली. म्हणून एवढं बेचव करत आहेत
राधे अक्का चा हेअर कट करायला
राधे अक्का चा हेअर कट करायला पाहिजे शोल्डर कट केला तर जर चेहर्याचा निबर पणा कमी होईल. ती मोलकरीण किती आगाउ व चहाड खोर आहे. आणि राधिकात काही च्च्च दोष नाहीत असे सर्व कायम पिपाणी वाजव त राहतात.
राधिका च्या ऑफिसा त सर्व कायम खात असतात काम करताना दिसत नाहीत. सम्याचे बिग रिवील कधी होईल मग राधा अॅड्व्हान्स परत करेल का?
सम्या चे बिग रिव्हील झाले की
सम्या चे बिग रिव्हील झाले की राधाक्का खूप नाराज वगैर होईल..मग त्याचे सॉरी सॉरी.............
मग गुरवाचे दात ओठ खाणे...... नवीन गुरु पण दाढीधारी असेल का ?
Pages