माह्या भैताड नवर्‍याची दुसरी बायको-२

Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31

माझ्या नवर्‍याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इसविसनपूर्व काळात हे लोक स्वत: चे कपडे वापरायचे. (ऐतिहासिक वगैरे नसतील तर)
मला वाटते "देख भाई देख " सेरीअल पासून कपडे स्पोंसोर करायची पद्धत आली.

मागे कधीतरी अलका कुबल ची मुलाखत होती.
तिच्या २ सीरिअल एका वेळी चालू होत्या, मग मी प्रत्येक सेरीअल च्या कपड्यांची कशी एक bag केली आहे वगैरे सांगत होती

पण या कपडेपट सांभाळणाऱ्या लोकांना थोडे समजावा यार,
कोणीही माणूस/ बाई एका स्टाईल चे कपडे वापरतो हे लॉजिक ठीक पण , म्हणून हिच्या एकुणेक साड्या ब्लाउज च्या बॉर्डर च्या, परत तीच साडी नेसून ती कामाला जाणार , आणि घरी काम पण करणार.
कोणी बाई काठपदराची कॉटन ची साडी नेसत असली कि ती कायम त्याचं स्टाईल ची फक्त वेगळ्या रंगात साडी नेसणार.
बाप्या कॉलर वाला म्हणजे तसाच घालणार कधी चुकून गोल गळ्याचा वापरणार नाही.
इकडे गुरु कितीही उकडत असेल तरी ते जाकेट घालूनच फिरणार, त्या मानाने शनाया चे कपडे खरे वाटतात
खर्या आयुष्यात असे असते का...

तर ते एक असो...

सिंबा.. Happy
प्रोड्युसर करतो का स्पाँसर कपडे, दागिने वगैरे ? भाड्यानेच आणत असेल अर्थात. आपण चेक करायला पाहीजे...दुसर्‍या कुठल्या सिरीयल मधे सेम कपडे दिसताहेत का ते!
आणि हो ना...हिच्या साड्या डोक्यात जातात.....!!! आणि गुरुचे जॅकेट्स ही! गुरु अगदीच पोरसवदा दिसतो तिच्या पुढे!

प्रोड्युसर नाही , कुठलीतरी शो रूम वगैरे, देख भाई देख ला बहुतेक अमर सन्स णे केलेलं स्पोंसोर.
आता अर्थात इतके टाईप cast कपडे ती ती सीरिअल स्वत: च म्यानेज करत असेल

एका production house च्या दोन वेगळ्या सिरियल्स असतील तर तेच कपडे दोन्हीकडे दिसतात Lol

मी याची देही याची डोळा बघितलेत.

हल्ली बरेच वर्ष निर्माते कपडे देतात.

भिकारछाप सिरियल Proud
सम्या काल हापिसात आंबे घेऊन आला होता वाटायला आणि राधिकाने 'इतके पैसे खर्च करायची काय गरज होती? तुझ्याकडे काम ना धाम" असे म्हणून त्याची इज्जत काढली.
त्याला इतर काही कामं नाहित का? Uhoh तो सतत राधिकाच्या हापिसात किंवा घरी पडिक असतो. हे दोन्ही नसेल तर गेलाबाजार यांना घेऊन हॉटेलात तरी जातो.
इतका मोठा (?) व्यवसाय करू घातलाय राधिकाने तर एस बी म्हणजे नक्की काय हे शोधायचा साधा प्रयत्न पण ती करत नाही. किंवा एस बी म्हणजे सौमित्र बनहट्टी हे साधे लॉजिकल समिकरण तिला मांडता येऊ नये?
जिथे तिथे प्रेझेंटेशन प्रेझेंटेशन खेळणारी राधिका एस बी कंपनी बरोबर सगळं काही फोनवर डिल करते? Uhoh प्रत्यक्ष पहायला एकदाही जात नाही? एकदाही मिटिंग, अ‍ॅग्रीमेंट वगैरे साईन करायला जात नाही?
हॉटेलात तर कॉलेज च्या पकाव आठवणी Sad आम्ही तर इयत्ता पहिलीत सुद्धा याच्यापेक्षा बरी मज्जा करायचो, हे लोक कॉलेजात असं करायचे?

हॉटेलात तर कॉलेज च्या पकाव आठवणी Sad आम्ही तर इयत्ता पहिलीत सुद्धा याच्यापेक्षा बरी मज्जा करायचो, हे लोक कॉलेजात असं करायचे? >>>>>>> सही...

एस बी म्हणजे सौमित्र बनहट्टी >>> हायला दक्षे शिरेल फारच मनापासुन बघतेस की. पुर्ण शिरेलमधे मल फक्त राधिका (गुरुनाथ सुभेदार) आणि गुप्ते भाऊंच आडनाव माहीत आहे.

त्याचं काये नताशा, पिसं काढण्यासाठी का होइना पण मी ही सिरियल नक्की पाहते.
रोज मी सकाळी ओझी वर पाहते कालचा भाग, आता बोल... (इतकी आवडते मला ही सिरियल :फिदी:)

अमुक आठवणी तमुक आठवणी करत वेळ भरतात.

आनंद = समिर राजदा गुजराथी रंगभुमीवरचा चांगला अभिनेता आहे. स्वतःला इतका वाया का घालवतोय?

मिहीर राजदा. गुजराथी, मराठी दोन्ही रंगभुमी तसच सिरीयल्स मधे काम करतो. लेखक, दिग्दर्शक पण आहे. माधुरी मिडलक्लासमधे याआधी काम केलेलं त्याने.

रोज मी सकाळी ओझी वर पाहते कालचा भाग, आता बोल...
>>> मी बोलू? खूप चांगले करताय रिपीट भाग बघून, trp कमी होऊन बंद तरी करतील.

काल गुरु जेन्युईन वाटला मला तरी. त्याने मान्य केलं की तो शनायाला चाहतो. भलेही ते गलत असेना !! Happy
हिने तर काय विचार करुन करुन तीन ऑब्जेक्टिव्ह्ज लिहून काढले.
१. राधिका मसाले नं १ बनविणे
२. ए एल एफ ला टेक ओव्हर करणे
३. ह्यांना व शनाया ला माझ्या ऑफीस मधील टेबल पुसायला लावणे!

जर ती ए एल एफ टेकओव्हर करणार आहे, तर ए एल एफ मधलेच टेबल्स पुसले तरी चालेल ना? Happy
तेव्हढंच गॅनायाला तिथल्या तिथे काम मिळेल.

काहीही!

३. ह्यांना व शनाया ला माझ्या ऑफीस मधील टेबल पुसायला लावणे! >>>> ह्यांना ऐवजी गुरुनाथ सुभेदार असे लिहिणे जास्त योग्य होते.

कालचा भाग कसला बोअर होता. इतकं समोर सत्य सांगतोय तो गुरु की त्याचं शनायावर प्रेम आहे. आता राधिका पण माह्या नवरा करत नाहीये तर ह्या अ दा ला काय करायचं आहे, जबरदस्ती त्यांना एकत्र आणणारच वगैरे, too much.

अपर्णा बरोबर ह्यांना ऐवजी गुरु चं नाव लिहायला हवं होतं.

बास हा आता एकत्र आणणे वगैरे. काहीतरी सेन्सिबल दाखवा. त्या गुरूला राधिकाला हीन समजायची, तिच्या कामात अडथळे आणायची आणि मुलाला महत्व न द्यायची शिक्षा मिळूदे, बाकी हिने सोडावा त्याला आणि करुदे लग्न शनायाशी. त्याला पश्चाताप वगैरे, ती महत्वाची वाटणे, दोघांनी एकत्र येणं हे आता पटणार नाही, करूही नये. तो राधिकाला हेट किती करतो हे दिसलं नाही का मित्राला, काय उगाच.

पण अगदी कंपनी बुडाली.. जॉब गेला,, पैसे नाही.. अशा परिस्थिती मधेही.. हिच्या इथे टेबल पुसायला ते का थांबतिल? बाकी काहिही करतिल कुठेही जाउन..
की आता राधिकाच स्वप्न आहे.. तिने आपल्याला हरवल आहे तर टेबल पुसलच पाहिजे असा काही नियम आहे.. की पैज लावलिये?
त्रासच्च्च्च आहे डोक्याला

बरं जर ह्याला राधिका नकोय तर तो अ दा त्या अ दा ला म्हणजे राधिकाला राधा राधा करतो, मागेपुढे करतो तर गुरूला राग का येतोय, हे बरोबर नाही त्याचं.

Pages