आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

साधना सरगम बरोबर...
सोनू निगम नाही...
इंग्रजी एसने सुरू पण स किंवा सा सु .... सं किंवा जवळपास... किती नावे?

गायक, संगीतकार ओळखा.... गीतकार सोडून द्या वेगवेगळा डेटा येतोय

पारंपारिक गीतप्रकार गुंफलाय म्हणजे पार्श्वगायनापेक्षा जास्त कसबी गायन लागेल.... तो कोण?
म ग न भ द र = मिल गये नैन भुले दिन रैन >>>>> यावरून सामान्य माणसांचे भांडण कशाला होईल? कधी होईल मग? खडाजंगी कुठे कुठे होते? संसद / अधिवेशने सोडून द्या

सगळे क्ल्यू नीट वाचा....
कुठे कुठले नाव, किंवा गाण्याचे शब्दच देऊन पेपर फोडलाय का बघा...

@ मानव Happy इथे भावी गीतकार बरेच आहेत.... तो धागा कधी २००० पुढे जाईल कळायचे पण नाही

स्निग्धा, आद्यांक्षरांवरुन नवे गाणे बनवा धागा सुरु करायचा का? >> Lol

इंग्रजी एसने सुरू पण स किंवा सा सु .... सं किंवा जवळपास << सुखविंदर सिंग / Suresh Waskar / S P Balasubrahmanyam,

सुखविंदर सिंग बरोबर पण कोण? गायक की संगीतकार?
आता साधना च्या विकी पेजवर सुखविंदर ^एफ केले की सुफळ संपूर्ण.... Happy

गाना मेरे बस की बात नही
सुर और ताल का साथ नही

लाडिक तक्रार वगैरे छटा... सामान्य माणसाच्या विश्वातही ती तक्रार अस्तित्वात असते पण मग लाडिकपणाची जागा खडाजंगी घेते. >> यामुळे मला ते लाडीक तक्रार असच वाटल होत. म ग न भ द र >> मला अजुनही माहित नाही तुम्हीच सांगा. सुखविंदर सिंग संगीतकार हे क्लिअर झाल्यावर गाण क्लीक झाल. Happy

बरोबर... Happy द्या पुढचे....
म ग न भ द र ........... ????

मोरी गगरी ना भरन देत रे.....
याने सुरूवात होते.... ती गायला कंटाळते / जमणार नाही म्हण्ते.....मग शब्द बदलून तेच सूर-ताल..... मग शेवटाला शिकते....
हिराबाई बडोदेकरांची गायलेली चीज / बंदिश आहे ( हे अर्थात शोधून कळले, अभ्यास नाही)

२४९७ हिंदी ५० - ६०
ब ब न र ब ब न
ब स न ल म प क भ न ज
ब क म प प म अ त म म र

नमस्कार अगाओ
सुखविंदर सिंग संगीतकार आणि गीतकार आहे माहीतच न्हवतं.

२४९७ हिंदी ५० - ६० क्लू मिळेल का?
मी अशाताईंचं 'बायला बायला नाचो रे' असं एक गाणं ऐकलंय पण ते नविन आहे बहुतेक

२४९७.

बलमा बड़ा नादान, रे बलमा बड़ा नादान
बेदर्दी संग नाता लागा मेरे प्रीत का भाग न जागा
बिनती करूँ मैं पैंया पड़ूँ मैं अब तो मेरी मान रे
बलमा बड़ा नादान रे ...

२४९८.

मराठी

अ अ अ अ स र
अ स झ अ व छ

सोप्पे आहे क्ल्यु ची गरज नाही!

सुखविंदर सिंग संगीतकार आणि गीतकार आहे माहीतच न्हवतं. >>>> बर्‍यापैकी फरक आहे डेटात वेगवेगळ्या साईट्सवर. काही ठिकाणी ब्लँक आहे, काही ठिकाणी सिनेमाच्या मराठी-हिंदी व्हर्जन्सची क्रेडिट्स सरमिसळ झाली आहेत.....साधना सरगम विकीपेज + हिंदीगीतमाला इथली माहिती जुळतेय. संगीतकार तर आहे.... गीतकार? देव जाणे आणि तो स्वतः+ महेश मांजरेकर

अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती
आम्हीहि सुंदर झालो असतो वदले छत्रपती

श्रीरंग गोडबोले असेल गीतकार बहुतेक सगळीकडे तुम्ही म्हणताय तसं महेश मांजरेकर + सुखविंदर सिंग दाखवतंय

कोडे क्र २४९८ मराठी (१९५१-१९६०)
अ अ त स
ल र प अ अ क

कोडे क्र २४९८ मराठी (१९५१-१९६०) -- उत्तर
उद्धवा अजब तुझे सरकार
लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी सरकार

कोडे क्र २४९९ मराठी सार्वकालिक
अ अ ब र म
ब र म ब घ च
च ख प प
भ अ ज

२४९९ उत्तर

इथे इथे बस रे मोरा
बाळ माझं घालतय चारा
चारा खा पाणी पी
भुर्र उडुन जा

२५००
हिंदी (१९७० - ८०)

ज प द भ द च अ
ब अ स प ख च अ

२५०० हिंदी (१९७० - ८०) -- उत्तर
ज़ुबाँ पे दर्द भरी दास्ताँ चली आयी
बहार आने से पहले खिजा चली आयी

२५०१ हिंदी (७० - ८०)
व प क स ल
त द ज ब
क ग क प न अ त
क छ क प न अ त

२५०१.

वो परी कहाँ से लाऊँ
तेरी दुल्हन जिसे बनाऊँ
कि गोरी कोई पसन्द न आये तुझको
कि छोरी कोई पसन्द न आये तुझको

२५०३
हिंदी ( १९६० - ७०)

अ म स ल क
ज म स भ ल
अ ह क ज श ढ
त य ह भ क ल

२५०३ हिंदी ( १९६० - ७०) -- उत्तर
आँचल में सजा लेना कलियाँ,
ज़ुल्फ़ों में सितारे भर लेना
ऐसे ही कभी जब शाम ढले,
तब याद हमें भी कर लेना

२५०४ हिंदी ( ७०-८०)
अ त च प ल ज
प भ स स
छ ब ब
अ न द ब

२५०४ हिंदी ( ७०-८०) >> उत्तर
आओ तुम्हे चाँद पे ले जाए
प्यार भरे सपने सजाए
छोटासा बंगला बनाए
एक नयी दुनिया बसाए

कोडे क्र २५०५ हिंदी (१९५५-१९६०)
व क न प क ग ह ह
य अ प क ज त ह ह
द म द ल ब ह प म ध ख ब

२५०५.

वफ़ा के नाम पे कितने गुनाह होते हैं
वो उन से पूछे कोई जो तबाह होते हैं
दामन में दाग लगा बैठे हम प्यार में धोखा खा बैठे

अन्दाजे गुगलले!

२५०६

त द म ज स
त ब ह क म ज
व अ व अ व ग ह क ज

५०-६०

२५०६:
तेरी दुनिया मे जिने से
तो बेहतर है की मर जाए
वही आंसु, वही आहें, वही गम है जिधर जाए.

२५०७ उत्तर

दिन महीने साल गुज़रते जाएंगे
हम प्यार में जीते प्यार में मरते जाएंगे
देखेंगे देख लेना, देखेंगे देख लेना

२५०८ हिंदी ६० - ७०
अ द अ अ च
फ व द च
य न द क व क ह
अ अ अ अ द अ अ च

२५०८
ए दिल ए आवारा चल
फिर वहीं दोबारा चल
यार ने दीदार का वादा किया है

विशेष म्हणजे हे गाणे मघाशी सहज गुणगुणत होतो... Happy

२५०९.

म प व ह क
म क भ त
ज अ ब स ह न द
म म ज त ज क ब
ख स म ज त म ल

Pages