दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्येष्ठ लेखिका डॉ. अंजली कीर्तने यांचे शनिवारी निधन.
श्रद्धांजली _/\_
बातमी वाचून धक्का बसला. यावर्षी दिवाळी अंकात त्यांचा लेख वाचला होता.

ओह खरंच धक्कादायक! त्या सत्तर वर्षांच्या असतील असं वाटलं नव्हतं. दर वर्षीच दिवाळी अंकांत त्यांचे लेख वाचतो. यंदाही पहिल्या भारतीय महिला डॉक्टर कोण यावरचा लेख वाचला. दुर्गा भागवतांवर त्या पुस्तक की माहितीपट , करीत होत्या, ते पूर्ण झालं का?
त्यांच्या आई पद्मिनी बिनीवाले आमच्या कॉलेजात एका स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आल्या होत्या.

पहिल्या भारतीय महिला डॉक्टर कोण यावरचा लेख >> हो.

त्यांच्या आई पद्मिनी बिनीवाले अजून हयात आहेत असं बातमीत वाचलं.

श्रद्धांजली.
डॉ. कीर्तने फार आवडत्या लेखिका होत्या.

Sad
वडोदरा इथे १४ शाळकरी मुलं आणि दोन शिक्षकांचा तळ्यात बुडून मृत्यू. १६ लोकांची कपॅसिटी असलेल्या बोटीत एकूण ३४ व्यक्ती बसल्या होत्या. फक्त १० मुलांकडे लाईफ जॅकेट होते.

श्रद्धांजली Sad
किमान आता तरी सुरक्षित प्रवासाचा, लाईफ जॅकेट चा नीट आग्रह धरला जावा.

वडोदरा इथे १४ शाळकरी मुलं आणि दोन शिक्षकांचा तळ्यात बुडून मृत्यू. १६ लोकांची कपॅसिटी असलेल्या बोटीत एकूण ३४ व्यक्ती बसल्या होत्या. फक्त १० मुलांकडे लाईफ जॅकेट होते.
>>>>
श्रद्धांजली....
किती ढिसाळपणा सुरक्षेच्या बाबतीत. 'चलता है' अटीट्युड कधी सोडणार आपले लोक?

अरे देवा Sad श्रद्धांजली!
निरागस लहान मुलांचा काय दोष??
खरंच आहे. :चलता है' किंवा 'त्याला काय होतंय' नावाची ही निष्काळजी वृत्ती कधी नष्ट होणार?

ही बया मेलेली नाही जीवंत आहे.

प्रसिध्दी साठी ही लोक काही पण करतील आता कारण देत आहे कॅन्सर विषयी जागृती होण्यासाठी मी हे सर्व केले..भोळी जनताच तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवेल.

मीडिया नी स्वतःच इतके चरित्र हनन ,दर्जा हनन करून घेवु नये.

कोणी काही सांगितले म्हणून ते प्रसिद्ध करू नये..पहिले जागेवर जावून खात्री करून घावी माहिती खरी आहे की खोटी नंतर बातमी प्रसिद्ध करावी.

अफवा पसरवण्याचा धंदा करू नये

देशातील सर्वच प्रमुख माध्यमांनी काल तिच्या मृत्यूची बातमी प्रसिद्ध केली होती:

NDTV, टीव्ही९मराठी, लोकसत्ता, तरुण भारत, ABP live, टाईम्स ऑफ इंडिया

विकिपीडिया आणि IMDB सुद्धा अपडेट झाले होते (अर्थातच प्रमुख माध्यमांवर भरोसा ठेऊन या साईट्स अपडेट होतात)

हीच माध्यमे आज ती आज जिवंत आहे म्हणून सांगत आहेत. खरे काय आणि कशावरून असे प्रश्न पडतात.

Pages