दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाईट झाले.विशेषत: मृत्युसमयी एकटे असल्याचे वाचून खेद वाटला.

रमेश देव यांच्याप्रमाणे ते ही राजस्थानी होते. ...नाही.मराठीतील पत्रकार ह.रा.महाजनी यांचे रवींद्र महाजनी हे सुपुत्र होते.

श्रद्धांजली.
एकाकी मृत्यू फार वाईट. ललिता पवार यांच्या मृत्यूची बातमी ही अशीच होती.

खूप वाईट झालं, श्रद्धांजली.

वरती देवकी यांनी लिहिलेलं बरोबर आहे, त्यांचे वडील लोकसत्ताचे संपादक होते.

हे त्यांच्यावर चित्रित गाणे आज त्यांच्याचबाबत नियती इतक्या क्रूरपणे खरे ठरवेल असे वाटले नव्हते Sad
व्हिडीओखालील प्रतिक्रिया वाचून भडभडून येते:
https://www.youtube.com/watch?v=HHOnqwYSHjg

परवीन बाबी, ललिता पवार आणि आता रवींद्र महाजनी
खरेच आहे, खेळ कुणाला दैवाचा कळला!

ओह Sad

कालच मी सई केसकर (मायबोलीकर) ची डॉ. मंगला नारळीकरांच्या प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना लिखाणात मदत करत असल्याची पोस्ट फेसबुकवर वाचली होती आणि आज डॉ. मंगला नारळीकरांच्या दुःखद निधनाची बातमी वाचली.

अरे बाप रे! त्यांची मुलाखत बघितली होती. फारच सुंदर होती. तुझं आहे तुजपाशी मध्ये ते तरुणपणी श्याम करायचे. नंतर आचार्यांची व्यक्तिरेखा करत असत.

छोटी सिरीयल असो वा बिग बजेट हिंदी सिनेमा, छान सहजसुंदर अभिनय असायचा. छोटी असो वा मोठी पण त्यांनी साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहत असे. भावपूर्ण श्रद्धांजली _/\_

जेव्हा पहिल्या प्रथम अंतू बर्वा वाचला तेव्हा सावरकर डोळयांसमोर आले. नंतर मालिकेत त्यांना कडून ती व्यक्तिरेखा सादर केली गेली. खूप चांगला अभिनेता. विनोदी वा गंभीर, सर्व भूमिकांत स्वतःचा ठसा उमटवत असत. श्रद्धांजली

सावरकरां ची दिल के करीब मध्ये मुलाखत बघितली होती. व त्या आई कुठे काय करते मध्ये पण एक दोन भागात ते आले होते. श्रद्धांजली.

हॅकर इन चीफ केव्हिन मिट निक ह्यांचे निधन झाले. ५९ वय एक वर्शापासून पँक्रिआटिक कॅन्सर शी झगडत होते व नव्याने एक बाळ होणार होते. बायको प्रेग्नंट आहे. इश्वरेच्छा बलीयसी. मी ह्यांच्यावरचे पुस्तक वाचले आहे फक्त व त्यांचे मेटल बिझनेस कार्ड कम्युनिटीत फेमस आहे. ह्याचा उपयोग कुलुपे उघडायला करता येतो अशी त्यातली गंमत आहे. रेस्ट इन पीस केविन.

९० च्या दशकात जे लेखक कवी आपले 'हिरो' होते, त्यातले एक नाव म्हणजे शिरीष कणेकर! "माझी फिल्लमबाजी", "कणेकरी" हे कार्यक्रम कधीतरी टीव्हीवर पहायला मिळायचे. त्यातून कणेकर आवडत गेले. अफलातून विनोदबुद्धी असलेला जवळचा मित्र असावा तशी जवळीक साधणारी कणेकरी शैली होती! खास कणेकरी स्टाईल मध्ये लिहिलेली त्यांची चित्रपट/नाटक परिक्षणे सुध्दा वाचण्यासारखी असत. अशी कणेकरी अशी फिल्लमबाजी पुन्हा होणार नाही. भावपूर्ण श्रद्धांजली

ओह.श्रद्धांजली. कालच मला त्यांचे जोक्स आठवत होते, माँ मै बीए पास हो गया वगैरे.
नंतर नंतर लिहिण्याचा सूर वयाप्रमाणे गंभीर होत गेला.पण फिल्लंबाजी, एकला चलो रे ही अतिशय आवडती पुस्तकं आहेत.

Pages