Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06
दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आपण काहीच करू शकत नाही का>>
आपण काहीच करू शकत नाही का>> येत्या निवडणूकीत पुणेकरांनी लगबगीने पहाटे ३ वाजता पोलीस स्टेशन गाठणाऱ्याला तडाखा द्यावा.
इतकं केलं तरी खूप होईल
वेदांत अग्रवाल ची अल्कोहोल
वेदांत अग्रवाल ची अल्कोहोल टेस्ट निगेटिव आली.
हताश वाटतंय. त्या २४
आपल्याकडे जिवची किंमत नाही. म्हणे जमावाने कायदा हातात घेऊ नये! :रागः उद्विग्न!
मन सुन्न व उद्विग्न करणारी
मन सुन्न व उद्विग्न करणारी घटना
>> पेपर मध्ये लोकांच्या याबद्दल बऱ्याच तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत .
+१ अपघाताच्या बातम्या येतात. पण बेजबाबदारपणामुळे निरपराधांचे जीव घेणाऱ्यांना कायद्यानुसार शिक्षा झाली की नाही याच्या बातम्या मात्र अपवादानेच येतात. शिवाय सत्र, जिल्हा, उच्च, सर्वोच्च अशी गुन्हेगारीला सुटकेच्या संधीची चढती कमान आहेच. आजवर जबर शिक्षा झाल्या असत्या तर या मुलाला व त्याच्या बापाला जरब बसून हा अपघात घडला नसता.
दुर्दैवाने लोकभावनासुद्धा काही दिवसांनी/महिन्यानी ओसरतात. काय शिक्षा झाली? की सुटला असेल तर कसा सुटला? याचा ट्रॅक कुणीही ठेवत नाही.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/54217
ड्रंक ड्रायव्हिंग - त्यातून भलत्याच लोकांचे मृत्यू.
अशाच जान्हवी गडकर प्रकरणावरचा धागा
वेदांत अग्रवाल ची अल्कोहोल
वेदांत अग्रवाल ची अल्कोहोल टेस्ट निगेटिव आली.> यातच सगळं काही आलं.
चार दिवस मी मारल्यासारखं करतो तु रडल्या सारखं करतो चा खेळ होईल..
आज टेस्ट निगेटीव्ह आली, उद्या बाळाचे बाबा बाहेर येतील..
पडद्या मागे खोके ओक्के चा खेळ रंगेल..
आपणही विसरून जाऊ, रस्त्यावर तरफडत पडलेल्यात किंवा हंबरडा फोडणाऱ्यात आपले नाव नाही याचे समाधान घेऊन..
पुढचा बळी जाईपर्यंत..
पैसा बोलता है. मुंबईत अनेक
पैसा बोलता है. मुंबईत अनेक वर्षांपूर्वीअशीच एक केस झाली होती. त्या बाळाचे आई बाबा जामीनाची नेमकी रक्कम घेउन हजार झाले आणि बाळ सुटले
अंबानी पुत्राने गाडी ठोकली
अंबानी पुत्राने गाडी ठोकली होती, ज्यांच्या गाड्यांचे नुकसान झाले त्यांना दुसरे दिवशी नवीन गाड्या मिळाल्या. तक्रार ओण नोंदवली गेली नाही . आता त्या बातमीची निशाणी पण नेटवर नसेल
खेळ सुरु झाला पणhttps://www
खेळ सुरु झाला पण
https://www.lokmat.com/pune/it-is-wrong-to-politicize-or-blame-the-polic...
अंबानी पुत्राने गाडी ठोकली
अंबानी पुत्राने गाडी ठोकली होती, ज्यांच्या गाड्यांचे नुकसान झाले त्यांना दुसरे दिवशी नवीन गाड्या मिळाल्या.
>>>>> हो. दुसऱ्या दिवशी त्या त्या ब्रांडच्या नव्या गाड्या, हॉस्पिटलायझेशनचा खर्च दिला लोकांना. नक्की कोणी ठोकली त्याचं नाव पण आलं नाही.
अगरवालवर आता पोलिसांनी कल्पेबल होमिसाईडचा (म्हणजे गंभीर) गुन्हा दाखल केलाय पण अजून ‘एव्हरी सिनर हॅज फ्युचर’, क्राईम ॲंड पनिशमेंटमधले उतारे वाचत शिक्षेत सुट देणे वगैरे सुरूच नाही झालय.
उद्या पर्यंत बाळाच्या
उद्या पर्यंत बाळाच्या बाबाच्या छातीत दुखायाला लागेल आणि डॉक्टर बाबाला तातडीने दवाखान्यात दाखल करायचा सल्ला देतील.
श्रद्धांजली..!
श्रद्धांजली..!
DUI + double homicide+ underage drinking and driving हे तीनही गुन्हे स्वतंत्रपणे सुद्धा गंभीर आहेत. संताप आणि उद्वेग आहेच पण आपण काहीच करू शकत नाही का ?
नाहीतर आपला सोशल मीडियावर सक्रीय असण्याचा स्वतःची मतंबितं/ थोडे सामाजिक भान असण्याचा काय उपयोग. न्यायाचा तगादा लावून धरण्यासाठी (online/ in-person) Petition file करता येते का, जोपर्यंत सामान्य जनतेच्या भावना तीव्र आहेत तोपर्यंतच हालचाल केली तर काहीतरी निष्पन्न होईल. एकदा भावना बोथट झाल्यावर ही एक केस म्हणून डब्यात जाईल. दुर्दैवाने ही तरुण मुलं कधीही परत येणार नाहीत पण त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व न्यायाच्या enforcement मुळे लोकांवर वचक राहिला तर अशा गुन्ह्यांचं प्रमाण कमी राहील म्हणून काहीतरी कृती करायला हवी असे वाटते आहे. चूभूद्याघ्या. /\
संताप.
संताप.
कायप्पावर खालील पोस्ट फिरतेय,
कायप्पावर खालील पोस्ट फिरतेय, जर कुणाला जायचे असेल तर म्हणून इकडे देतेय
--–----------
*आम्ही अस्वस्थ झालो, तुम्ही?*
१८ मे २०२४ च्या मध्यरात्री 200 किमी प्रतितास या भरधाव वेगाने पोर्शे ही महागडी गाडी येते आणि आयटी क्षेत्रातल्या दोन इंजिनियर मुलांना उडवते. या अपघातात २४ वर्षांची एक तरुण मुलगी आणि तिच्याच वयाचा एक तरुण मुलगा जागीच मृत्युमुखी पडतात. हळू हळू गोष्टी उलगडू लागतात. गाडी चालवणारा कुमारवयीन मुलगा १७ वर्षांचा असून त्याने बारावीची परीक्षा झाल्यामुळे मित्रांना पार्टी देण्याचं ठरवलं.
वडिलांकडून ही गाडी तो घेऊन गेला आणि रात्री साडे नऊ ते बारा एका बारमध्ये, त्यानंतर समाधान झालं नाही म्हणून दुसऱ्या बारमध्ये गेला. मनसोक्त मद्यपान केल्यानंतर नशेमध्ये गाडी चालवून त्याने या दोन तरूण मुलांना अक्षरश: चिरडून टाकलं.
यानंतर जे घडलं ते आणखी अस्वस्थ करणारं. या मुलाला अल्पवयीन असल्यामुळे बालसुधारगृहात पाठवण्याऐवजी रविवारचा दिवस असूनही न्यायालयाने आपलं काम चोखपणे करत त्याला घरी पाठवतं. हे सगळं घडवून आणण्यासाठी एका पक्षाचा आमदार साहाय्यभूत झाला. त्यातच पोलिस स्टेशनमध्ये हा मुलगा थकला असेल, भुकेजला असेल असं समजून पोलिसांनी त्याला पिझ्झा, बर्गर खाऊ घातला. त्याला न्यायालयानेही ‘बाळा, तू घाबरू नकोस, तू फार गंभीर काहीच केलं नाहीस अशा पद्धतीने १५ दिवस ट्रॅफिकचे नियम समजून घे, वाईट संगत सोड, कौन्सिलिंग करून घे आणि झालंच तर तीनशे शब्दांचा एक अपघाताविषयी निबंध लिहून दे’ अशी महाभयंकर शिक्षा ठोठावली.
या सगळ्यात ज्यांचा जीव गेला त्यातली तरुणी आश्विनी कोष्टा आणि तरुण अनिष अवधिया यांचं आयुष्य सुरू होण्याआधीच संपवलं गेलं, त्यांच्या आई-वडिलांची काय अवस्था झाली असेल? पण त्याची चिंता या अल्पवयीन मुलाने आणि त्याच्या धनदांडग्या बिल्डर असलेल्या वडिलांनी आणि कार्यतत्पर पोलिसांनी आणि चोख न्यायव्यवस्थेने का करावी?
एकूणच कल्याणी नगर परिसरातल्या नागरिकांची शांतता या भागात असलेल्या अनेक पब्जनी नष्ट केली आहे. रात्रभर आवाज, संगीत आणि वाहनांचे कर्णकर्कश्श आवाज यांनी या लोकांचं जगणं कठीण करून सोडलंय. पब मालक याबद्दल काही काळजी घेतील का? वेळेची मर्यादा पाळतील का? अनेक निवेदनं, अनेक तक्रारी पोलिस कमिशनर जवळ करूनही यावर कुठलीच ॲक्शन घेण्यात आली नाही.
काहीजणांचे जीव गेल्यावरच ही बुद्धी आम्हाला होणार आहे का? तरुणाईला मौजमजेबरोबरच कर्तव्य आणि जबाबदारी यांचं भान देणं ही आपली जबाबदारी नाही का? सगळ्यांना सारखा न्याय मिळणार की नाही? असे अनेक प्रश्न या घटनेने मनात निर्माण झाले आहेत.
या प्रश्नावर प्रसार माध्यमांवर खूप पोटतिडकीने बोललं जातंय. पुण्यातच नव्हे तर आता देशभर या घटनेचे पडसाद उमटताहेत. मात्र आम्हाला वाटतं की आपण सर्व सामाजिक संस्था, सजग नागरिक, कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन याबद्दल बोललं पाहिजे, दबावगट तयार केला पाहिजे आणि व्यवस्थेला प्रश्न विचारून यावर उपाय केले पाहिजेत.
त्यासाठी ‘मिळून साऱ्याजणी..’च्या वतीने आम्ही आपल्याला आवाहन करत आहोत, की ३० मे २०२४ या दिवशी सायंकाळी सहा वाजता मुकुंद-गीताली निवास, बी २/५०१, कुमार प्राईड पार्क, डोमिनोझ पिझ्झा जवळ, सेनापती बापट मार्ग, पुणे १६ इथे जमून बोलूया आणि कृतीची पावलं टाकूया.
आपण आमच्याबरोबर आहात आणि येत आहात यासाठी 9822746663 या मोबाईलवर संपर्क साधा.
डॉ. गीताली वि. म.
संपादक, मिळून साऱ्याजणी
दीपा देशमुख/जमीर कांबळे
सल्लागार, मिळून साऱ्याजणी
मुकुंद किर्दत
संपादक, पुरूष उवाच
जे घडतेय ते संताप येण्यासारखे
जे घडतेय ते संताप येण्यासारखे आहे पण पैसेवाल्यांच्या हातुन अपघात घडल्यावर अजुन वेगळे काय घडणार होते ते कळत नाही.
काही वर्षांपुर्वी नव्या मुम्बईत अशाच एका १८ -१९ वर्षांच्या मुलाने हाय एंड परदेशी गाडी इतक्या वेगात चालवली होती की ताबा सुटुन गाडी रस्ता दुभाजक ओलांडुन पलिकडे जाऊन दुसर्या गाडीवर आदळली, त्यात न मुच्या सहाय्यक की कुठल्या पदावर असलेल्या कमिशनर ची पत्नी होती जी जागीच गेली. केसचे पुढे काय झाले माहित नाही. पार्ल्यात एका डोक्टरने पाच का किती वर्षाच्या मुलाला शेजारी बसुन गाडी चालवायला दिली ती एका घराची भिंत फोडुन आत घुसली, एकजण मृत झाला, याही केसचे पुढे कळले नाही. गडकर केसचेही माहित नाही पुढे काय होणार. ती जामिनावर युरोप टुरवर फिरतेय असे वाचले होते. केस अजुन सुनावणीलाही आलेली नाही, शिक्षा होणे दुरच. या सगळ्यांना खोट्याचे खरे करणारा हुशार वकिल परवडतो, राजकारणी लोक स्वतःहुन पुढे येतात मदत करायला. पोलिस तर तत्पर असतातच खुप दुबळी, हुशार वकिल क्षणात चिंध्या करेल अशी केस तयार करायला.. नंतर सगळ्यांसाठी खोकी अॅडजस्ट होतात.
मनात सहज विचार आला. सो मि वर संताप व्यक्त करणार्या लोकांपैकी कोणाचे मुल दुर्दैवाने उद्या अशा प्रकरणात अपराधी म्हणुन अडकले तर हे आज संताप व्यक्त करणारे काय भुमिका घेतील? स्वतःच्या मुलाला वाचवायच्या मागे लागतील की त्याला व इतरांना जरब बसेल अशी शिक्षा कोर्टाने द्यावी ही अपेक्षा ठेवतील? हे संतापी जन सगळे न्यायप्रिय नागरीक आहेत, ते स्वतःवर वेळ आली तर काय भुमिका घेणार?
माझ्यावर वेळ आली तर माझी द्विधा मनस्थिती होईल. चुक झाली हे मला मान्य असेल, शिक्षा व्हायला हवी हेही मला मान्य असेल पण माझ्या मुलाला शिक्षा व्हावी अशी ईच्छा मी कदाचित करु शकणार नाही. मुलाला वाचवायची संधी पैशांच्या बदल्यात यन्त्रणा देत असेल तर मी ती संधी झडप मारुन उचलेन. पैसे नसतील तर स्वतःला विकुन उभे करेन पण मुलाला वाचवेन. वर माझ्या या कृतीला तात्विक मुलामाही देईन.
वेळ आली की सगळेजण आधी स्वतःला वाचवतात हे मला रोज आजुबाजुला दिसतेय, तेव्हा कोणी कायद्याचा विचार करत नाही. माझ्यावर अशी ही वेळ न येवो.
यंत्रणा विकत घ्यायचे प्रयत्न न करणारा समाज असणे गरजेचे आहे. विकत घ्यायला गेलो तर सगळेच विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे, बस आपल्याला किंमत परवडायला हवी..
गेल्या महिन्यात अमेरिकेत
गेल्या महिन्यात अमेरिकेत अल्पवयीन मुलाने शाळेत केलेल्या गोळीबाराबद्दल पालकांना शिक्षा सुनावली गेली.
हा या प्रकारचा पहिला निर्णय होता.
या केसमध्ये तसंच व्हायला हवं!
जान्हवी गडकर च्या केस चे
जान्हवी गडकर च्या केस चे अपडेट्स वाचणे म्हणजे बीपी वाढवून घेणे! भयंकर आहे हे सारे. स्वतः वकील असल्याने असेल पण दहा वर्षे होत आली तरी अजून खटलाच सुरू झालेला नाही. सगळीकडे 'alleged drunk driving' असेच शब्द आहेत. दरम्यान आपली ऑडी कार परत मिळावी म्हणून तिने अर्ज केला व कोर्टाने उदार मनाने तो मान्यही केला. मग तिने ती कार विकायची परवानगी मागितली, थोडीशी तरी लाज शिल्लक असल्याने ती परवानगी मिळाली नाही. पुणे केस मुळे ही ही केस फास्ट ट्रॅक वर गेली तर बरे ( निर्भया मुळे इतरही एकदोन केसेस मार्गी लागल्या होत्या)
माझ्या मुलाने /भाच्याने/ पुतण्याने जुगारात भरपूर पैसे घालवले तर परत चूक न करण्याचा बोलीवर जरूर मदत करेन, इतरही काही दिवाणी गुन्हे/ अफरातफर/ चोरी केले तर प्रसंगी पैसे खर्च करून सुटका करेन. पण दोन तरुणांचा जीव घेतला तर मात्र एनकाउंटर करा अशीच विनंती करेन.
VB धन्यवाद इथे शेअर केल्या
VB धन्यवाद इथे शेअर केल्या बद्दल. पुण्यातील मित्रांना शेअर करतो.
साधना, तुम्ही प्रांजळपणे लिहिले आहे की संधी मिळत असेल तर मुलाला वाचवेन. जगभरात लोक असेच करतील अपवाद वगळता.
न्याययंत्रणेचा (पोलीस, न्यायालये, इतर सपोर्ट यंत्रणा) आणि राजकीय इच्छाशक्तीचा कल त्याचा हवा तेव्हा गैरफायदा उचलण्यात आहे की त्यावर मात करण्याचा आहे यावरून सगळा फरक पडतो.
सुन्न करणारी दुःखद घटना..
सुन्न करणारी दुःखद घटना..
बातमी वाचल्यापासून सुन्न वाटतंय..
मुलाला वाचवणे मुद्दा: खरंतर
प्रतिसाद इतरत्र हलवला आहे https://www.maayboli.com/node/54217
या कार्ट्या चे इतरही प्रताप
या कार्ट्या चे इतरही प्रताप आहेत
https://www.lokmat.com/pune/pune-kalyaninagar-porsche-accident-my-son-ha...
"तू काहीही कर मी सावरून घेईन,
"तू काहीही कर मी सावरून घेईन, तू अल्पवयीन असून दारू पी, मद्यधुंद होऊन भरधाव गाडी उडव, आपलं कोण काय वाकडं करू शकत नाही" हे तुम्ही तुमच्या मुलाला सांगू शकता का?>>> अॅपॅरियटली या केसमधे बापानेच दारुची सवय लावलेली अस वाचल...ओके मग पुढच पाउल काय ड्रग्ज?? धरुन चला की वेगात चालवुन ती बिचारी मुल नसति गेली पण हे दिवट स्वतःच एखाद्या ट्रकवर, भितीवर आदळुन गेल असत तर?? मग कुठे टाकला असतात तुमचा माज,पैसा,एश्वर्य?
या बाळासाठी आजोबा पण मैदानात
या बाळासाठी आजोबा पण मैदानात उतरले होते.
https://www.lokmat.com/maharashtra/surendra-kumar-agarwal-grandfather-ga...
आता वाचवत नाहीये हे सर्व इथे
आता वाचवत नाहीये हे सर्व इथे दुःखद बातमी धाग्यावर. दुःखापेक्षा अगतिक संताप जास्त आहे.
वेगळा धागा काढुन तिथे चर्चा करू.मनातल्या मनात या सर्व बाप लेकाना why don't you kill yourself विचारून झालं.
अशाप्रकारे गुन्हा घडतो तो एका
अशाप्रकारे गुन्हा घडतो तो एका क्षणात घडत नाही, त्याला अनेक गोष्टी जबाबदार असतात.
>>>>
पटलं. मुलाला वाचवायचा प्रयत्न कराल ही नंतरची गोष्ट.
मुलाला वाढवताना लाड करत असाल तरी सद्सदविवेकबुद्धी ठेवूनच वाढवाल ना?
बारावीच्या मुलाला सहमतीने पबमधे जाऊ द्याल का मुळात? एवढी सुपरकार लायसन्स, रजिस्ट्रेशन नसताना हातात द्याल का? पिझ्झा घेऊन पोलिस स्टेशनमधे जाल की मुलाच्या कानफटात माराल?
चर्चा वेगळ्या धाग्यावर व्हावी
चर्चा वेगळ्या धाग्यावर व्हावी यासाठीच अमांचा जान्हवी गडकरवरचा धागा वर काढला होता. इथे लिंक दिली होती.
>>>https://www.lokmat.com
>>>https://www.lokmat.com/maharashtra/surendra-kumar-agarwal-grandfather-ga...
रक्त तपासणी पॉझिटिव्ह आहे
आता पोझिटिव “आणली“ असावी.
आता पोझिटिव “आणली“ असावी.
आणली असली तरी ऊत्तम झाल.
आणली असली तरी ऊत्तम झाल. जनमताचा रेटा भयंकर वाढतो आहे शिक्षा व्हावी या साठी. या निमित्ताने शिक्षा होऊ शकते असा पायंडा पडला तर कुठेतरी थोडासा धाक निर्माण होईल. खोट कशाला सांगू त्ये वेदांत ला लोकांनी मारल ते बघून आत कुठेतरी समाधान वाटल
मुलाला वाचवायची संधी
.
Pages