दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोविंदा सोबत त्यांचे चित्रपट आठवतात. एका चित्रपटातली (नाव आठवत नाही) पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका अधूनमधून अनेकदा आठवते. काहीही काम करायचे असले तरी हा इन्स्पेक्टर हसत हसतच बोलत असतो, असे ते पात्र होते. गुन्हेगाराला हातात बेड्या घालायच्या तरी हसून, साहेबांशी बोलायचे तरी हसत हसत, हाताखालच्या नोकराला काम सांगायचे तरी हसत हसत इत्यादी. कौशिक यांनी तो अभिनय इतका नैसर्गिक व सुंदर साकारला होता. ते आठवूनसुद्धा सुद्धा आपल्या चेहऱ्यावर स्मितहास्य येते.

उमदा अभिनेता. उमदा अभिनय. सतीश कौशिक यांना श्रद्धांजली _/\_

श्रद्धांजली!
सतिश कौशिकचा नुकताच कपिल शर्मा शो बघत होतो. किती हसत खेळत होते. अचानक काय झालं.
कॅलेंडर खाना दो मुळे लक्षात राहिले एकदमच. बाकी डायरेक्टर पण आहेत माहित नव्हतं.

_/\_ Sad

श्रद्धांजली _/\_

त्यांनी त्यांच्या २ वर्षा च्या मुलाला गमावलेलं

नीना गुप्ताने त्यांनी लग्नाची मागणी घातली होती हे लिहि ले आहे. ह्या बाईंना समजायला पाहिजे..>>>> +१११

sateesh kaushik ह्यांनी नुसती मागणीच घातली नव्हती तर मुलीला आपली म्हणून सांभाळायला तयार होते.

नीना सिंगल मदर असताना सतीश कौशिकनी त्यांना मागणी घातली असेल तर ती आठवण सांगणं उचित आहे. त्यात सतीश यांचा मोठेपणाचा दिसतो.

>>नीना सिंगल मदर असताना सतीश कौशिकनी त्यांना मागणी घातली असेल तर ती आठवण सांगणं उचित आहे. त्यात सतीश यांचा मोठेपणाचा दिसतो.<< +1

सेल्समन रामलाल (नाटक) आणि "द लास्ट शो" (हिंदी सिनेमा, अद्याप अप्रदर्शित) या निमित्ताने त्यांच्याशी अनेकवेळा जवळून संपर्क आला होता.
अतिशय सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व.. दिग्दर्शन आणि अभिनय यातल्या तांत्रिक बाबतींमधे अतिशय हुकूमत..
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..

अतिशय सुरेख व्यक्तिमत्त्व, प्रामाणिक व मोकळा वावर.
सतिश कौशिक /\

'सुमित संभाल लेगा' मधला 'पडवलच्या पुलावाऐवजी कमीतकमी व्हेज बिर्याणी करूने का बे' म्हणणारा खवैया आगाव बाबा.

कॅलेंडर तर आमचा आवडता. किचन के अंदर जाणारी लेकरांच्या पोटापाण्याची व्यवस्था करणारी निवडक व्यक्तिरेखा.

शर्माजी नमकिन मधला मित्राला केटरींगच्या ऑर्डरी घ्यायला लावणारा प्रसंगी लपवाछपवी करणारा धमाल सरदारजी मित्र.

हळवं होत NSD चे गुरू इब्राहिम अल्काजी यांच्या आठवणी सांगणारा जे मिळेल ते काम मन लावून करणारा शिष्य.

अनुपम खेरला गोऱ्या माणसाप्रमाणे गेटअप देऊन अनोळखी लग्नात जाऊन सगळ्या ग्रुपला जेवू घालून लिलया परत आणणारा धमाल मित्र.

पुन्हा हॉलिवूड मधल्या भूमिका मिळवण्यासाठी त्यांच्यात लागलेली चुरस डोळे मिचकावत सांगणारा सहकलाकार.

कुठल्या तरी सिनेमात अनिल कपूरशी झालेले क्रिएटिव्ह डिफरेन्सस म्हणजे दिग्दर्शक म्हणून सतीशने ओके केलेला शॉट अनिलला काही पटेना, हे परदेशातले शूट, खर्च वाढत चाललेला, अनिल वन मोअर टेक म्हणतोय सतीश 'मी आहे की तू आहेस बे दिग्दर्शक, पुरे.. ये आता , पैसे संपतील ' असं खूप दूरवरून कॅमेरा मागून ओरडताना, एकमेकांवर किंचाळताना बघून सोनाली बेंद्रेला काही कळेचना हे असं कसं बोलताहेत. नंतर त्या पर्फेक्ट शॉट बद्दल सतीशने मोकळेपणाने अनिलचं हसतहसत केलेलं कौतुक. हे असं मोकळेपणाने मांडणारा व चुका हसत कबूल करणारा दिग्दर्शक.

रंगरूपावरून बऱ्याच भूमिका हाताच्या निसटून गेलेल्या वर NSD च्या मुली हा आणि अभिनेता असं म्हणून हसताना केलेलं दुर्लक्ष, नीनाच्या घरमालकिणीनी वारंवार काळा म्हणून तोंडावर दार लाऊन घेणे व गोऱ्यागोमट्यांना चहापाणी विचारणं हे गमतीने घेणारा दिलखुलास टीममेट .

हरहुन्नरी अभिनेता व दिग्दर्शक. थिअटर असो, सिनेमा असो, मालिका असो, मजेमजेत तरीही मन लावून काम करणारा कलावंत.

कसलाही अभिनिवेश नसलेला माणूस व कलाकार.

श्रद्धांजली.
कपिल शर्मा शो मधल्या गप्पा जरूर बघा.
https://youtu.be/LAwVbJ9gq6w

मागच्याच महिन्यात बहुतेक चला हवा येऊ द्यामध्ये आले होते. एका चित्रपटात ते आणि जॉनी लिव्हर यांचा फोनवरचा विनोदी प्रसंग लक्षात आहे. बहुतेक अनिल कपूर आणि काजोल कॉन्ट्रॅक्ट लग्न करतात तो चित्रपट.

हॅल्लो ओ जी महाराज मी जर्मन बोलते, तुम्ही आमचे पैशे कधी देणार

जर्मन वापस कईच बोलणार नाही, जर्मनची उधारी कशीच उतरत नाई आता. जर्मन हमेशा अमरच रायते आता.

Good bye SK.

>> मी जर्मन बोलते

बरोब्बर! प्रत्येक वेळीं आठवलं कि हसायला येतं.
कॉमेडी करणारे कलाकार जाताना मात्र फार रडवतात. राजू श्रीवास्तव यांच्या नंतर हा मोठा धक्का Sad

हाऊ,

जर्मन,
मिस्टर अँड मिसेस खिलाडी - मामाजी
मिस्टर इंडिया - कॅलेंडर
राम लखन - काशिराम

एक से एक काम, त्याहीची अन् अनुपम खेरची यारी बम नामी होती, दोघं कायम एकठ्ठे जायत जात जेव्याले , फिऱ्याले इकडे तिकडे

कमलाकर नाडकर्णी म टा मुळे लहानपणापासून परीचित, त्यांना श्रद्धांजली.

अवांतर आई कुठे काय करतेच्या प्रोजेक्टमधे नमिता वर्तक आहेत, त्यांचे वडील होते ते. हे त्यांनीच पुर्वी मला गोठ सिरीयलच्या वेळी सांगितलं होतं.

३०० हून अधिक मराठी चित्रपटात काम केलेले ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे कोल्हापूरमध्ये निधन झाले. भावपूर्ण श्रद्धांजली _/\_

एखादी भारदस्त मिशी असलेली मराठी व्यक्ती दिसली की भालचंद्र कुलकर्णीची आठवण यायची; विशेषतः महेश कोठारेंच्या चित्रपटांतील भूमिकांमुळे कायमच स्मरणात राहतील.

समीर आणि भालचंद्र कुलकर्णी दोघांना श्रद्धांजली.

समीर यांना हल्लीच फर्जी मध्ये बघितलं, पटकन नाव आठवेना, हा तर नुककड मधला करत राहिले मग सुचलं की सीन थांबवून नाव बघता येईल.

Pages