दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतका मूर्ख प्रकार बघण्यात आला नव्हता. मुळात हा कार्यक्रमच पूर्णपणे अनावश्यक होता. शिवाय या नावाची एक व्यक्ती अस्तित्वात आहे हे निदान मला तरी या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी कळले. स्वारी म्हणतात म्हणे त्याला!

अनुयायीही अविचारीच, त्रास होतोय असे वाटले की निघून जावे. मुळात यायचेच नाही एवढ्या संख्येने! अन त्या स्वारीचे भाषण तर इतके रटाळ होते की त्याला पुरस्कार मिळालाच कसा हा प्रश्न पडावा.

अत्यंत दुर्दैवी घटना, जी हकनाक घडली. यातून अक्कल घेऊन निदान पुढे तरी असे कार्यक्रम एखाद्या छोटेखानी सभागृहात संध्याकाळी घ्यावेत.

मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली!

आता पाच पाच लाख घेऊन काय करायचे त्यांनी?

फेसबुकवर आत्ताच एक लेख वाचला एका कोणी ताईंनी लिहिलेला! त्या बरीच वर्षे अनुयायी होत्या व आता उबग येऊन बाहेर पडल्या. त्यांनी स्वानुभवाने दिलेली मते वाचून तिळपापड झाला.

बापरे...एवढा त्रास होईपर्यंत हे लोक कसे बसून राहिले...काय म्हणावं याला...

मागे कुठल्यातरी रेल्वे अपघाताबाबतच निकाल देताना न्यायमूर्ती रडले होते...ते म्हणाले होते की जगाच्या पाठीवर असा कुठला देश आहे का जिथे लोक असे सर्रास ट्रेन मधून पडून मरतात...!

अशा घटना मन सुन्न करतात...हकनाक जीव गेले..भावपूर्ण श्रद्धांजली _/\_

अरे देवा! फारच भयंकर आहे सगळे Sad

चार लाख, बारा लाख, बावीस लाख. एकूण किती होते हा आकडा यातला कितीही असला तरी घडलेल्या घटनेचे गांभीर्य कमीजास्त होत नाही (होऊ नये). बेफ़िकीर यांच्या प्रतिसादाशी सहमत. शिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक जिथे जमतात तिथे एखादा छोटा अपघात किंवा अफवा इतके निमित्त चेंगराचेंगरी सुरु व्हायला पुरेसे असते, हा सुद्धा भाग आहे. त्यानंतर तर कल्पनाही करू शकत नाही आपण.

मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली! Sad

कोण गुरू आहेत हे ? त्यांनी काही जबाबदारी घ्यायला नको का. कुठल्याही कार्यक्रमाला थोडक्यात थोडकं न करता उन्मादात रूपांतर केल्याशिवाय चैन पडत नाही.
मूर्खांचा देश आहे आपला. राग यावा की कीव यावी कळत नाही. मला तर शिसारी यायला लागली आहे बाबा-बुवांची आणि त्यांच्या अंधभक्तांची !!

बेफिकीर+१

मृतांना श्रद्धांजली.

>>शिवाय या नावाची एक व्यक्ती अस्तित्वात आहे हे निदान मला तरी या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी कळले.<< मला तर हा प्रकार घडला त्यानंतर कळले.

खूपच वाईट घटना. हकनाक मृत्यू!

ज्यांना आत्ता महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला, त्यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांनी सुरू केलेल्या या उपासनेच्या पंथाचे अनुयायी आमच्या गावाकडच्या भागात भरपूर आहेत. साधारण तीसेक वर्षांपूर्वी आमच्या भागात याचा प्रसार व्हायला सुरुवात झाल्याचं मला आठवतंय. आधी तालुक्याच्या ठिकाणी पुरुषांच्या बैठकींना सुरुवात झाली. आठवड्यातून दोनदा होणाऱ्या या एक प्रकारच्या प्रवचनाच्या कार्यक्रमांना 'बैठक' म्हणत असत. नंतर महिलांसाठीच्या रविवारी होणाऱ्या वेगळ्या बैठका इतर लहान गावांमध्ये सुरू झाल्या. पुरुषांच्याही बैठका लहान लहान गावांमध्ये सुरू झाल्या. लहान मुलांसाठीची 'बालोपासना' नावाची बैठक गावागावात भरायला लागली. माझ्या माहितीनुसार दासबोधाचं निरुपण तिथे करतात. मुलांना स्तोत्रं वगैरे शिकवली जायची. माझ्या वडिलांनी दोनतीन वेळा या बैठकीला जाऊन पाहिलं, पण ते फारसं न रुचल्यामुळे ते परत तिकडे गेले नाहीत. पण नंतरच्या वर्षांमध्ये प्रचंड प्रमाणात याचा प्रसार होत गेलेला मी बघितला आहे. अनेक चांगली कामंही त्यांनी केली आहेत. उदाहरणार्थ अनेक माणसांची दारू सुटली. रस्त्यांच्या कडेने झाडं लावून ती नीट वाढवली गेली. अजूनही कामं असतील, मला हीच दोन माहिती आहेत.

बातमी ऐकून खूप वाईट वाटलं. नियोजन चुकलं.

आमच्या भागातली पण सध्या मुंबईला राहणारी एक महिला यात मृत्यू पावल्याचं आज समजलं.

वावे,
तुझी पोस्ट वाचल्यावर आठवले की तीस एक वर्षांपूर्वी मी देखील दासबोधाचे वाचन, नवरा/जावई बैठकीला जातो- दारु सुटली वगैरे कुणाकुणाकडून ऐकले होते. ते लोकं अलीबागला जायचे.

मी पण एकदा ही बैठक काय असते ते पहायला गेले होते पण झेपली नाही … नितीमत्तेचे धडे असे स्वरूप वाटले जेवढ्यावेळ जागी होते , ऐकलं त्यावरून वाटलं.
मूर्खांचा देश आहे आपला. राग यावा की कीव यावी कळत नाही. मला तर शिसारी यायला लागली आहे बाबा-बुवांची आणि त्यांच्या अंधभक्तांची !!
बेफिकीर+१
मृतांना श्रध्दांजली !

Queen of Rock 'n' Roll टीना टर्नर हिचे निधन झाले. तिच्यामुळे What's love got to do with it, Private Dancer, The Best अशी अनेक गाणी ऐकायला मिळाली. तिला श्रद्धांजली.

What's love got to do with it - आवडते गाणे आहे.
सर्वेशाम स्वस्तिर्भवतु - हा मंत्रही मस्त गायलाय तिने.

नितेश पांडे शॉकींग बातमी. हसतमुख, दिलखुलास व्यक्तिमत्व. फार वय नसावं. श्रद्धांजली.

टीना टर्नर कोण माहीती नाही, गुगलून बघते. तिलाही श्रद्धांजली.

नितेश पांडे हे नाव माहिती नव्हतं, पण फोटो बघितल्यावर लक्षात आलं की खोसला का घोसलामधे याला बघितलं आहे! Sad
श्रद्धांजली.

छोटा पण खूप मस्त रोल होता हिचा. सिरीयल अजून चालली असती तर मोनिशा इतकेच पोटेनशीयल वाला.
या सर्व अकाली गेलेल्या अभिनेत्यांना नम्र श्रद्धांजली.

नितीश पांडे अकालीच - १९७३ चे होते. बाप रे!
टिना ८३ वय होते. कॅन्सर वगैरे अनेक आजारांनी ग्रस्त होती असे वाचले.
सर्व गेलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली. उत्तम गतीसाठी प्रार्थना.

Pages