दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पेले! एक युग फुटबॉल मधले. ते निवृत्त झाले तेव्हा हे युग संपले. आता तर ते काळाच्या पडद्याआड गेले आहे. श्रद्धांजली.

पेले यांना विनम्र श्रद्धांजली! एक महान युगाचा अंत! __/|\__

पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्रीं हिराबेन यांना भावपूर्फ्ण श्रद्धांजली! __/|\__

पेले ह्यांना श्रध्दांजली.

साडेसाती संपता संपता शनिने हा फटका दिलेला दिसतोय. >> अंधश्रद्धेचे उत्तम उदाहरण. असो, धाग्यांचा विषय हा नाही.

डॉ. विश्वास मेहेंदळे यांना श्रद्धांजली _/\_
त्यांचा वाद-संवाद हा कार्यक्रम दूरदर्शनवर बघितल्याचं आठवतंय. महाचर्चा हा कार्यक्रमसुद्धा त्यांचाच होता का?
अवांतर- जेव्हा वृत्तवाहिन्यांचा सुळसुळाट नव्हता, तेव्हा मोजक्या वाहिन्या असायच्या आणि त्या वाहिन्यांवर कार्यक्रमांची विविधता असायची. दूरदर्शनच असं नाही, तर ईटीव्ही मराठी, झी मराठी या वाहिन्यांवरदेखील वेगवेगळ्या प्रकारचे उत्तम कार्यक्रम असायचे. ईटीव्हीवर दर तासाला लागणारं बातमीपत्र, राजू परुळेकर घेत असलेला मुलाखतीचा कार्यक्रम (संवाद?), सुधीर गाडगीळांचा एक मुलाखतीचा कार्यक्रम (रूबरू?), मानाचा मुजरा (हिंदीत फारुख शेखच्या 'जीना इसीका नाम है' कार्यक्रमाच्या धर्तीवरचा), टिकल ते पोलिटिकल, झीवरचं नक्षत्रांचे देणे, घडलंय बिघडलंय असे कार्यक्रम दर्जेदार असायचे.

संयमी,विद्वान, जाणकार असे ते होते.
उगाच आज च्या सारखे अर्थवट ज्ञान असणारे सूत्र संचालक ,बातमीदार ते नव्हते.
त्यांना विनम्र आदरांजली

श्रद्धांजली विश्वास मेहेंदळे यांना.

दूरदर्शनवर होते तेव्हा ते डोंबिवलीत राहायचे. वाद संवाद हा फार गाजला, किती वेगवेगळे विषय हाताळले होते.

मी पण बघायचो त्यांचा सपट महाचर्चा हा कार्यक्रम..... आमंत्रित मुद्द्याला धरुनच वाद घालायचे/चर्चा करायचे असा तो काळ होता

एका मैत्रीणीच्या लग्नात मेहेंदळेंना पाहण्याचा, भेटण्याचा प्रसंग आला होता. हसतमुख आणि ऋजू स्वभावाचे वाटते. त्यांच्या दुरदर्शनवरच्या भव्य योगदानाबद्दल लोकसत्तेने उत्तम लिहिले आहे. ते वाचून आदर दुणावला. आदरांजली.

वाणी जयराम.
बोल रे पपीहरा - पं रविशंकर यांनी संगीत दिलेल्या मीरा चित्रपटातील गीते.
ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी!

भावपूर्ण श्रद्धांजली!
मलाही मीरा मधले 'जो तुम तोडो पिया' हे गाणेच हे आधी आठवले.

आपला मित्र मायबोलीकर मॅक्स (पूर्वीचा आयडी शॅंकी) याचे दु:खद निधन झाले. त्याच्या घरच्यांना हे दु:ख पचवायची देव ताकद देवो __/\__

माझा शाळेतला एक वर्ष ज्युनियर. आम्ही सगळे एकाच एरियात बालपण घालवले. हि बातमी सकाळी शाळेच्या गृपवर समजली त्यानंतर इथे चारवेळा येऊन गेले पण लिहायचे धाडस झाले नाही. विश्वासच बसत नव्हता बातमीवर Sad

शशांक उर्फ मॅक्स, मित्रा तुला कायम मिस करु आम्ही.

Pages