Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06
दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझा अत्यंत आवडता अभिनेता.
..
गोखले यांच्या निधनाच्या
गोखले यांच्या निधनाच्या बातमीची खातरजमा होईपर्यंत श्रद्धांजलीचे प्रतिसाद थांबवावेत असे मला वाटते
पुणे आकाशवाणी वरील सकाळी आठच्या बातम्यानुसार अजून ते जिवंत आहेत
तसं असेल तर किती बेजबाबदार
तसं असेल तर किती बेजबाबदार आहेत! दुपारी लोकसत्ता मध्ये मुख्यपानावर मोठी बातमी होती.
गोखलेंच्या संदर्भात
गोखलेंच्या संदर्भात
सकाळी नऊ तीस वाजता अधिकृत वैद्यकीय बातमीपत्र जाहीर होणार आहे
दुपारी लोकसत्ता मध्ये
दुपारी लोकसत्ता मध्ये मुख्यपानावर मोठी बातमी होती. >>>>> नाही, मला अशी बातमी दिसत नाही. पेपर आता माझ्या समोर आहे
मी 'अफवा वाटतेय' लिहिले होते,
मी 'अफवा वाटतेय' लिहिले होते, पण लोकसत्ता लिंकवर विश्वास ठेवला. फारच डिसरिस्पेक्टफुल व अटेंशन सिकींग. डेक्कन हेरल्ड मधेही वाचले. बऱ्याच जणांनी (अजय देवगण वगैरे ) ट्वीटही केलंय.
ॲडमिन , प्लीज त्या पोस्टी उडवाव्यात.
माध्यमांची बेपरवाई, बेफिकिरी
माध्यमांची बेपरवाई, बेफिकिरी वगैरे वगैरे...
काही वर्षांपूर्वी निशिकांत कामत अत्यवस्थ असताना त्यांच्या मृत्यूच्या बातम्या कित्येक तास आधी पसरवल्या गेल्या होत्या.
आज त्या इतिहासाची पुनरावृत्ती झालेली आहे....
विक्रम गोखलेंच्या बाबतीतही तेच होत आहे
निषेध !
हो मलाही लोकसत्ता app मध्ये
हो मलाही लोकसत्ता app मध्ये बातमी दिसली होती.
माध्यमांच्या बेपर्वाईचा निषेध.
विक्रम गोखले यांच्यासाठी प्रार्थना _/\_
मला आताही झी न्युजच्या
मला आताही झी न्युजच्या संकेतस्थळावर बातमी दिसतेय. काल रात्री ११:३०ची आहे.
लोकसत्ता आजच्या छापील आवृतीत ते अत्यवस्थ असल्याची मुख्य बातमी आहे. त्यांच्या संकेतस्थळावर मात्र काहीच बातमी दिसत नाहीए.
लोकसत्ता आजच्या छापील आवृतीत
लोकसत्ता आजच्या छापील आवृतीत ते अत्यवस्थ असल्याची मुख्य बातमी आहे. त्यांच्या संकेतस्थळावर मात्र काहीच बातमी दिसत नाहीए >>> पहाटेपर्यंत लोकसत्ताच्या संकेतस्थळावर विक्रम गोखलेंच्या निधनाची बातमी होती, कदाचित सकाळी हटवली. आणि कधी नव्हे ते लोकमतवर गोखले अत्यवस्थ असल्याचीच बातमी होती, अन्यथा बऱ्याचदा ते शहानिशा न करता निधनाच्या बातम्या छापतात.
माध्यमांच्या बेपर्वाईचा निषेध
माध्यमांच्या बेपर्वाईचा निषेध.
विक्रम गोखले यांच्यासाठी प्रार्थना _/\_
+१
मलाही लोकसत्ता app मध्ये
मलाही लोकसत्ता app मध्ये बातमी दिसली होती.
माध्यमांच्या बेपर्वाईचा निषेध.
विक्रम गोखले यांच्यासाठी प्रार्थना
>>>> +१
(त्यांची द्विधाता ही मालिका
(त्यांची द्विधाता ही मालिका त्या एज मध्ये एकदम वेगळी होती.त्यावेळी तश्या थ्रिलर्स नव्हत्या.))
मी-अनु याबद्दल थोडे अधिक लिहा ना...द्विधाता बद्दल ऐकले आहे पण फार माहिती सापडली नाही..
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची खोटी बातमी पसरली तर तिला दीर्घायुष्य मिळते म्हणे. हे विक्रम गोखले यांच्याबाबत खरे ठरो !
श्वेतांबरामध्ये होते का गोखले
श्वेतांबरामध्ये होते का गोखले? मला वाटतं बहुतेक होते?
Ventilator वर म्हणजे तांत्रिक
Ventilator वर म्हणजे तांत्रिक जीवन.
How information technology
गल्ली चुकली, योग्य धाग्यावर प्रतिसाद हलवत आहे.
मानव भाऊ मराठी मध्ये लिहा
मानव भाऊ मराठी मध्ये लिहा
माहिती चुकीची प्रसिद्ध
माहिती चुकीची प्रसिद्ध माध्यमांनी दिली .
सर्वात पुढे आम्हीच हे दाखवणे.ही वृत्ती ह्या मागे आहे.
आणि दुसरे हे खरे तर खरे कारण आहे.
उत्तम दर्जा चे पत्रकार आज घडीला कोणत्याच न्यूज पेपर कडे किंवा न्यूज चॅनल कडे नाहीत.
1) प्राथमिक माहिती मिळाली. त्या नंतर
२) त्या जागेवर जावून ती घटना खरेच घडली आहे का हे तपासून बघितल
३) जी घटना घडली आहे त्या घटनेचा विविध अंगांनी विचार केला.
आणि त्या नंतर ती प्रसारित केली.
ही पद्धत खरे पत्रकार वापरतात .
Ventilator वर म्हणजे तांत्रिक
Ventilator वर म्हणजे तांत्रिक जीवन.>>>
मी Ventilator वरून परत आलेल्या केसेस बघितल्या आहेत.
माध्यमाच्या बेपर्वा वागण्याचा
माध्यमाच्या बेपर्वा वागण्याचा निशेध, एरवी राजकिय बातम्यात धादात खोटेपणा करतात, एकाच दोन करुन छापतातच पण इतक्या सवेदनशिल विषयात सुद्धा अस कराव? लाज वाटायला पाहिजे सपादकाना... एवढ करुन घडलेल्या चुकिसाठी किमान दोन ओळिची दिलगिरी तरी छापावी.
श्वेतांबरामध्ये होते का गोखले
श्वेतांबरामध्ये होते का गोखले? मला वाटतं बहुतेक होते? >>> हो, व्हिलन होते. त्यांची बायकोही होती, व्हिलनच होती, त्या पाईप ओढणाऱ्या व्हिलनची बायको होती.
त्या पाईप ओढणाऱ्या व्हिलनची
त्या पाईप ओढणाऱ्या व्हिलनची बायको होती.>> रघुवीर नेवरेकर
*विक्रम गोखले यांच्या
खरं तर हा अपडेट इथे दुःखद बातमी मधे देणं अयोग्य आहे, पण चुकीच्या बातमीची इथे चर्चा झाली,. म्हणुन इथेच चिकटवते.
*विक्रम गोखले यांच्या तब्ब्येतीत सुधारणा. पुढील 48 तासांत व्हेंटीलेटर काढला जाऊ शकतो. ते डोळे उघडतायत* - शिरिश याडगीकर- जनसंपर्क अधिकारी, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय
मी Ventilator वरून परत
मी Ventilator वरून परत आलेल्या केसेस बघितल्या आहेत >>> माझी आई पंचवीस दिवस व्हेंटिलेटरवर होती. ती नऊ दिवस तर कोमात होती, मृतप्रेतवत होऊन केवळ श्वास सुरु होता. का कोण जाणे तिच्या यकृताने काम करणे बंद केले होते. रात्री अगदी गप्पा गोष्टी करून झोपल्यावर कधी कोमात गेली कळलंच नाही (आधी दोन-तीन दिवस केवळ मंद ज्वर होता, आणि उपचार सुरु होते). सकाळी ती जागीच होत नसल्याने तिला लगेच हॉस्पिटलला हलवले. डॉक्टरांनी चौथ्या-पाचव्याच दिवशी तिची वाचण्याची शक्यता सोडली होती, कारण उपचारांना काहीच प्रतिसाद नव्हता. दररोज त्यांची टीम सगळ्या पेशंट्सचे कॉन्सेलिंग करत असे. मात्र त्यादिवशी डॉक्टरांनी आई वाचण्याची शून्य शक्यता आहे; आम्ही सगळे शर्थीचे प्रयत्न करत/केले आहेत; तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही न्या, हेच उपचार असतील; शेवटी केवळ यकृत प्रत्यारोपणाचाच पर्याय शिल्लक आहे, पण आईचे चौसष्ट (६४) वय असल्याने, तो कितपत यशस्वी होईल ह्याबाबत साशंकता आहे; त्यामुळे आता केवळ सृष्टीचा कर्ता-करवताच आणि आईची ईच्छा शक्ती वाचवू शकेल; आमचे शर्थीचे प्रयत्न सुरूच आहेत, पण तुम्हीही आम्हाला यश येण्यासाठी आपल्या कुलदेवतेला किंवा ज्याला कोणाला मानता त्यांची प्रार्थना करायचे सुचवले होते (डॉक्टरांचा असा सल्ला वाचून काहीजण टीकाही करतील, मात्र आमचा डॉक्टरांवर पूर्णपणे विश्वास होता. किंबहुना अजूनही आहे. समजा ती वाचली नसती, तरी आमचा विश्वास डगमगला नसत्ता. कारण आम्ही त्यांचे अथक प्रयत्न बघत होतो). मग आम्हीही आमच्या परीने जे जे शक्य होते ते सगळे उपाय केले. शेवटी, अचानक नवव्या दिवशी आईने डोळे उघडले, व उपचारांना प्रतिसाद देऊ लागली. अँड द रेस्ट इज हिस्टरी.
डॉक्टर अजूनही आईच्या ईच्छाशक्तीला मानतात. एकूणच त्यांच्या वीस - पंचवीस (२५) वर्षांच्या करियरमध्ये एखादी व्हेंटिलेटरहून परत आलेली उतार वयातील पहिलीच रुग्ण आहे. मी आता चाळिशीच्या उंबरठ्यावर असलो तरी अविवाहित आहे. शिवाय फार मित्र-मैत्रिणी नाहीत. त्यामुळे अजूनही मला तर सगळे शेअर करायला आई लागते. त्यामुळे चार वर्षांपूर्वी ती मृतशय्येवर असतांना माझी बिकट परिस्थिती झाली होती. तिच्याविना माझ्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नव्हतो. माझी आई जरी भाबडी नसली तरी ती अत्यंत साधे, सोपे, सरळ व अपेक्षहीन आयुष्य जगत आली आहे. ती सत्तरच्या दशकात मेरिट असली तरी, तिने घराला प्राधान्य दिले (तिने नोकरी केली नाही म्हणून अजूनही टीका होते). तिची स्वतंत्र मते आहेत, जी हिरिरीने मांडते. ह्या वयातही माझ्या बाबांशी तत्त्वांवरून वादविवाद करते. त्यामुळे देवाने आईला एकदा तरी परत आणावे, म्हणजे तिच्या सगळ्या ईच्छा पूर्ण करता येतील असे मला वाटत होते. आता तर मी माझ्या ईवल्याश्याही कृतीने तिचे मन दुखणार नाही ह्याची काळजी घेतो.
राहुल तुमची पोस्ट वाचून जीव
राहुल तुमची पोस्ट वाचून जीव कळवळला. तुमच्या भावना पोहोचल्या. देव आईंना खूप छान पुढील आयुष्य देवो हीच प्रार्थना.
तुम्ही दोघे खूप छान सुखात जगणार आहात.
श्री गोखले ह्यांना पण रिकव्हरी साठी शुभेच्छा. बॅरिस्टर नाटकात काय दिसलेले. व्यक्ती म्हणून त्यांचा काहीच अनुभव नाही. पण जीव आहे तोपरेन्त
जीवनेच्छा आहे.
राहुल, तुमच्या आईंना निरोगी
राहुल, तुमच्या आईंना निरोगी दीर्घायुष्यासाठी खूप शुभेच्छा! अमा, तुम्हालाही!
मीरा, इथे अपडेट दिलात ते चांगलं झालं.
अशा व्यक्ती ची स्थिती सुधारेल
अशा व्यक्ती ची स्थिती सुधारेल प्राण वाचले हे उपचार किंवा डॉक्टर ह्या वर बिलकुल अवलंबून नसते.
अशा स्थिती मध्ये असलेल्या रुग्ण ना काय उपचार योग्य ठरतील ह्याची शाश्वती कोणताच मानव डॉक्टर देवू शकत नाही.
फक्त निसर्ग किंवा सर्व शक्तिमान शक्ती जे विश्वाचे नियोजन करते तीच. काही ही करू शकते.
आम्च्या इथे समीकरणात मी ती आई
आम्च्या इथे समीकरणात मी ती आई आहे >>> होय तर, म्हणून तर तू जेव्हा तुझ्या आजाराविषयी कोणत्यातरी धाग्यावर लिहिलं होतास, तेव्हा मलाही घाबरायला झालं होत, फार काळजी वाटली होती. आपण कधी भेटलो नसलो तरी माझ्या मनात तुझी एका आनंदी व खोडकर व्यक्तीची प्रतिमा आहे.
अमा व वावे, खूप खूप आभार. २०१७ पासून संकटांची शृंखला सुरूच आहे. प्रत्येक वेळी कुठून बळ येत कुणास ठाऊक. २०१७ च्या शेवटी बाबांचा रस्ता ओलांडताना अपघात झाला. शरीरावर कुठेही जखम व साधे खरचटलेलेही नव्हते. पण मेंदूला धक्का लागून, ४ दिवस कोमात होते. आठवडाभरानी सुट्टी झाली तरी, पूर्णपणे जागेवर यायला ६-७ महिने गेले. मग २०१८ च्या मध्यावर आईचे वरील आजारपण झाले. २०१९ ही छोट्या-मोठ्या कुरबुरींत गेले. मे २०२० मध्ये आई परत आजारी पडली (लॉकडाउनचा पहिला टप्पा); नवी मुंबईमधील कोणतेही हॉस्पिटल दाखल करून घ्यायला तयार नव्हते (त्याकाळात नॉनकोविड रुग्णांचे खूप हाल झाले), आम्ही पार घाबरून गेलो होते, कारण आधी ती कशीबशी वाचली होती. ह्याहीवेळी घरामागच्या एका छोट्या नर्सिंगहोमने तिला दाखल करून घेतल्यावर कसेबसे उपचार मिळाले. पुढे नवीन वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारी २०२२ मध्ये वडिलांचा पुन्हा अपघात झाला. ब्रेन इंज्युरी होती, ह्याहीवेळी शरीरावर कुठेही जखम व साधे खरचटलेलेही नव्हते. ५ दिवस कोमात होते. मात्र अजूनही पूर्णपणे जागेवर आले नाहीत. पंच्यात्तर वर्षाच्या उंबरठ्यावर दोनदा अपघात होऊनही हिंडतात - फिरतात, म्हणून डॉक्टरही चमत्कारच मानतात.
राहुल तुम्ही वाचले म्हणून मी
राहुल तुम्ही वाचले म्हणून मी प्रतिसाद संपादित केला आहे. हे सर्व पोस्ट वेगळ्या धाग्यावर नक्की लिहा. यु आर ब्लेस्ड.
Pages