दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रद्धांजली.
मी यांचे काही ऐकले नाहीये.पण एक जाणता प्रसिद्ध चांगला कलाकार गेला.वाईट झाले.

वाईट वाटले. राजु श्रीवास्तव ह्यांना श्रद्धांजली!
शादी का खाना, मुंबईच्या लोकल, शहरांची नावे, बॉलिूडमधील हिरोंची मिमिक्री इत्यादी वरची त्यांची कॉमेडी तुफान हसवून गेली. >>+१
त्यांचे ‘गजोधर’ बनून अनेक चित्रपटांवर विनोदी बोलणे आवडायचे. बहन कि शादी वाला भाग बघताना घरातले सगळेजण खोखो हसत होते ते आठवले.

खूप दुःखद घटना. राजु श्रीवास्तव. कॉमेडीतला एक हरहुन्नरी कलाकार. लाफ्टर चॅलेंजच पहिलं पर्व अक्षरशः गाजवल त्यानं. Bhai ka pravachan, म्हातारा गब्बर, शाहरुख खान आणि इतर कलाकार शॉपिंग ला जातात तेव्हा, गजोधर. एक ना अनेक ॲक्ट्स. खरंच खूप वाईट झालं.
भावपूर्ण श्रद्धांजली.

डॉ. रामचंद्र देखणे Sad
काल संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन

जामोप्या / ब्लॅककॅट यांची बातमी धक्कादायक आणि दु:खद आहे. काल संध्याकाळी मला फोनवर समजली तेव्हां विश्वास बसला नाही. काल मायबोली उघडत नव्हती त्यामुळे कन्फर्म करता नाही आले. आताही मायबोली उघडताना ही बातमी खोटी निघू दे असे वाटत होते. पण दुर्दैवाने खरी निघाली Sad
कधी कधी मिस्कील तर कधी कधी थोडेसे चिडून पण लॉजिकल दिलेले प्रतिसाद आणि ती एक विशिष्ट फिदी ची स्मायली मायबोलीवर पुन्हा दिसणार नाही याचे वाईट वाटतेय. त्यांच्या मागे त्यांच्या लहान मुलीचे सर्व व्यवस्थित होऊ दे ही प्रार्थना ! Sad
आभासी जगतात स्क्रीनवरचा आयडी आणि त्याच्यामागची व्यक्ती यात फरक केला पाहीजे असे तीव्रतेने वाटले.

मायबोलीकर गझलकार निशिकांत देशपांडे यांचे आत्ताच दुःखद निधन झाले आहे.

त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

सर्वांना सतत हसवणारे, निवृत्तीनंतर गझल शिकून त्यात हुकुमी कसब मिळवणारे व स्टेट बँकेत अत्यंत वरिष्ठ पद भूषवणारे काका नेहमीच स्मरणात राहतील.

त्यांच्यासोबतच्या असंख्य सहली आठवत आहेत.

_/\_

निशिकांत देशपांडे? अरेरे Sad त्यांनी आत्ता या महिन्यातच एक छान कविता लिहीली होती. खूप रेग्युलरली आणि चांगलं लिहायचे ते. त्यांना विनम्र श्रद्धांजली.

अरे काय हे एकापाठोपाठ... Sad
भावपूर्ण श्रद्धांजली __/\__
त्यांच्या रचना नेहेमी वाचल्या जात.

_/\_

अरे बापरे Sad

भावपूर्ण श्रद्धांजली __/\__

_/\_

Pages