खेळ शब्दांचा -५ - शास्त्रीय / तांत्रिक शब्द
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
पाचवा विषय : जरा अवघड घेऊ या का ?
तांत्रिक/ शास्त्रीय शब्द
(शास्त्रीय आणि तांत्रिक संज्ञांसाठी मराठी प्रतिशब्द)
पहिला क्लू :
आहे एक साधेसेच यंत्र पण हिच्या सहाय्याने पृथ्वी पण उचलून दाखवेन असे एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणाला होता! ३ अक्षरी.
- - -
थोडे जवळपास आहात.
थोडे जवळपास आहात.
समीकरण आणि सिद्धांताचे नांव अपेक्षित
कर्णभुजा सिद्धांत
कर्णभुजा सिद्धांत
फक्त नाव लक्षात आहे.
फक्त नाव लक्षात आहे.
काटकोन त्रिकोणाच्या एकरूपतेचा/ समरूपतेचा सिद्धांत असावा
वावे, तेच असणार.
वावे, तेच असणार.
बरोबर!
बरोबर!
पायथागोरस कर्णभुजा सिद्धांत
पायथागोरस कर्णभुजा सिद्धांत
कर्ण वर्ग = दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज
वावे, पुढचं कोडं घाला.
वावे, पुढचं कोडं घाला.
६ अक्षरी.
५ अक्षरी.
' धोपट मार्गा सोडू नको' हा उपदेश जे ऐकत नाहीत त्यांचं हे होतं
मला जरा बाहेर जायचं आहे. मी
मला जरा बाहेर जायचं आहे. मी संयोजकांना उत्तर कळवून ठेवते.
क्ल्यू पण कळवून ठेवा
क्ल्यू पण कळवून ठेवा
अपवर्तन
अपवर्तन
बरोबर दिसतंय
बरोबर दिसतंय
बरोबर दिसत असेल तर ते अपवर्तन
बरोबर दिसत असेल तर ते अपवर्तन नाही. चूक दिसायला हवे.
संयोजक, बरोबर आहे का?
संयोजक, बरोबर आहे का?
परावर्तन?
परावर्तन?
माझ्या डोक्यात परावर्तन
माझ्या डोक्यात परावर्तन नव्हतं, वक्रीभवन होतं. ं
वक्रीभवन म्हणजेच अपवर्तन ना? मग अपवर्तन बरोबर.
दोन शब्द. प्रत्येकी ३ अक्षरं.
दोन शब्द. प्रत्येकी ३ अक्षरं. एकाच प्रकारचं एका फळीवर लावून अश्या वेगवेगळ्या फळ्यांची रचना.
सोप्पं आहे.
हलक्यापासून जडपर्यंत
हलक्यापासून जडपर्यंत
जणू काही कुंडलीच. त्यात
जणू काही कुंडलीच . त्यात अधुनमधुन भर पडते.
आवर्त सारणी
आवर्त सारणी
पायस बरोबर असणार तुमचं.
पायस बरोबर असणार तुमचं.
आवर्त सारणी योग्य दिसतंय
आवर्त सारणी योग्य दिसतंय
correct
correct
पायस, पुढचं कोडं?
पायस, पुढचं कोडं?
खेळ थांबल्यामुळे मीच देते
खेळ थांबल्यामुळे मीच देते पुढचा क्लू.
स्थानमहात्म्य म्हणता येईल - पण सत्ता नव्हे.
- - ज - -
विषय कुठला?
विषय कुठला?
शास्त्र .
शास्त्र .
अगं पण कुठलं ?
अगं पण कुठलं ?
मी आपलं एकमस्थान सहस्रस्थान वगैरे आठवत होते. पण कशातच ज बसत नाही.
Physics म्हटले की फार सोपे
Physics म्हटले की फार सोपे होईल म्हणून शास्त्र म्हटले. आता बघ विचार करून . सोपे आहे तसे.
स्थितिजऊर्जा
स्थितिजऊर्जा
Pages