१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.
२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)
३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383
४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385
COSTCOतून आणल्यात का? मी पण
COSTCOतून आणल्यात का?
मी पण आणल्यात. जोडीतली एक पिशवी कशीबशी खपली. उरलेल्या मनुकांसाठी माझ्या तेलगू मैत्रिणीने एक चटणी सांगितली. त्याची कृती टाकते. चवदार लागते.
या मनुकांचे द्राक्षासव करता
या मनुकांचे द्राक्षासव करता येते, पण त्याचे घटक दुर्मिळ आणि कृति फारच किचकट आहे.
बरोबर ओळखलेस ,म्रिण्मयी .
बरोबर ओळखलेस ,म्रिण्मयी :). झटपट प्रतिसादा बद्दल धन्यवाद.
माझं इडलीचं पीठ फसफसलं नाही.
माझं इडलीचं पीठ फसफसलं नाही. मला दोन तासात इडल्या करायच्या आहेत. परवा रात्री डाळ भिजत घातली होती. काल सकाळी वाटली. काल दिवसभर आणि रात्रभर अव्हनमध्ये ठेवलं होतं सुरूवातीला अव्हन थोडासा गरम करून घेतला होता आणि संध्याकाळी परत एकदा गरम केला होता. पण पीठ आत ठेवल्यावर बंद केला. आत्ता १७५ वर पीठ आत असताना चालू ठेवलाय. पीठ फुगेल का? अव्हन चालू ठेवला तर पीठ शिजणार नाही ना? दुसरे काय करता येईल?
प्लीज लवकर सांगा.
अश्विनी, (दोन तास होउन गेले
अश्विनी,
(दोन तास होउन गेले आहेत तरी लिहिते:) )
प्रत्येक इडलीच्या घाण्यात अगदी इडल्या जस्ट इडली पात्रात घालताना अर्धा टी स्पून् इनो घालून नीट हलवून फसफसून घे आणि मग नेहेमी सारख्या इडल्या करायच्या.
नॅचरल फरमेंटेशन इतक्या नाही पण हलक्या होतील इडल्या.
मला छोले शिजवताना सोडा
मला छोले शिजवताना सोडा घालायचा नाही. तर पुर्ण शिजण्यासाठि काय करु? सोडा घातला की ब वर्ग तिल व्हीटॅमिन नष्ट होतात.
छोले निदान १२ तास भिजवावेत.
छोले निदान १२ तास भिजवावेत. तसेच भरपुर पाण्यात कूकरमधे शिजवावेत. नीट शिजतात. सोड्याची गरज नसते.
छोले शिजताना करवंटीचा तुकडा
छोले शिजताना करवंटीचा तुकडा टाकतात. थोड तेल टाकतात. अस मी ऐकलय.
जास्त अनुभवी सल्ला देतिलच.
खरंय तेल टाकले की कोणतेही
खरंय तेल टाकले की कोणतेही कडधान्य छान शिजते. वाटल्यास थोडी हळदही टाका.
ओक्के. आता हे करुन बघते.
ओक्के. आता हे करुन बघते.
हो हो नारळाच्या करवंटीचा
हो हो नारळाच्या करवंटीचा तुकडा टाकल्याने शिजायला कठिण असे छोले चांगले शिजतात.
मला महितच नव्हत की कडधान्य
मला महितच नव्हत की कडधान्य शिजवायला पण आपण करवंटीचा तुकडा वापरु शकतो ते.
आमच्याकडे गावाला जर चिकन बनवताना जुन गावठी कोंबडी वापरली असेल तर त्यात आज्जि चक्क करवंटिचा एक तुकडा टाकायची. आणि अस पण म्हणतात कि नारळाच्या करवंटिच्या तुकड्याने चिकन मटण पण पटकन शिजत.
काय कारण असेल याच्या मागे?
करवंटी आणी तेल वापरण्याची
करवंटी आणी तेल वापरण्याची आयडिया हीट
कडधान्ये शिजवताना तेल घालणे,
कडधान्ये शिजवताना तेल घालणे, हा उपाय पुर्वापार चालत आलेला आहे. (पुरणाची डाळ शिजवतानादेखील, तेल घालतात )
तेल घातल्याने पाण्याचा उत्कलनबिंदू थोडा वाढतो, तसेच तेलाचे रेणू डाळीत शिरुन त्यातला कणाना वेगळे ठेवतात. थोडेसे वाढीव तपमान, व तेलाने वेगळे ठेवलेले कण, यामूळे डाळीत पाण्याचे शोषण जास्त होते व ती शिजते. (करवंटीच्या तूकड्याने पण असेच होत असावे )प्रेशर कूकरमधे मूळातच उच्च दाब व तपमान असल्याने, तेल घालायची गरज नसते.
कडधान्याच्या टरफलात गुंतागुंतीची रचना असलेल्या साखरेचे रेणू असतात. आपण ते पचवू शकत नाही. (आपल्या पोटातील विकर इथे निष्प्रभ ठरतात) पण पोटातील बॅक्टेरिया मात्र त्यावर प्रक्रिया करुन, त्यापासून कार्बन डाय ऑक्साइड, हायड्रोजन व मिथेन तयार करतात, (आणि पोटात "गॅस" होतो)
त्यासाठी कडधान्य रात्री गरम पाण्यात भिजवून, सकाळी ते पाणी फेकून द्यावे. या पाण्यात थोडि जीवनसत्वे जात असली तरी अपायकारक अशी साखर मात्र बर्याच प्रमाणात निघून जाते. (संदर्भ -कॅलिफोर्निया ड्राय बीन्स अॅडव्हायजरी बोर्ड )
मटण शिजवताना कच्ची पपई घातली
मटण शिजवताना कच्ची पपई घातली तर ते लवकर शिजते. (पपईतले विकर मदत करतात) अर्थात इथेही प्रेशर कूकर हे काम करतोच.
ओहो चक्क पपइ??? पण त्या मुळे
ओहो चक्क पपइ??? पण त्या मुळे चवित काहि फरक पडत नाहि ना?
मी , असेच भांडे अडकले असताना,
मी , असेच भांडे अडकले असताना, वरचे भांडे स्क्रू ड्रायव्हर आणि पकड घेऊन कापले आणि आतले भांडे वापरले होते
सिंडे, तू मनुस्विनी चा उपाय कर (त्या भांड्यात दुसरे भांडे अडकव) ... भांड्याचे काळे दिसणार नाही अजिबात
मनु तुझी भांडी अजुन अडकलियेत
मनु तुझी भांडी अजुन अडकलियेत का? की सुटका झाली त्यांची??? नसेल तर हा एक उपाय करुन बघ....
दोन भांड्यांच्या मधे सुरी अथवा तत्सम टोकेरी वस्तु घुसवता आली तर बघ.. मग रात्री झोपायच्या आधी एका बादलीत साबणाचे पाणी तयार कर. ही भांडी त्यात ठेव. आतल्या भांड्यात एखादी जड वस्तु जसे बत्ता/वरवंटा अस काहीतरी ठेव म्हणजे भांडी बादलीच्या तळाशी रहातिल. आता रात्रभर राहु देत भांडी पाण्यात. सकाळी थोड्याश्या गॅप मधुन साबणाचे पाणी आत जाईल. आता ही भांडी एंटी-स्लिप मॅट मधे धरुन दोन जणांनी विरुद्ध दिशेला खेचा/फिरवा.... सुटका होईल तुझ्या भांड्यांची... मी केलाय हा यशस्वी प्रयोग....
अर्धा किलो मटणासाठी एक
अर्धा किलो मटणासाठी एक टेबलस्पून वाटलेली कच्ची पपई पूरेल. त्याने चवीत काहि फरक पडत नाही.
माझ्याकडे भरपुर साबुदाणा आहे.
माझ्याकडे भरपुर साबुदाणा आहे. कितिही पाणी घालुन आणि कितिही तास भिजवला तरी नीट भिजला जात नाही. साबुदाणा नीट भिजावा म्हणुन काय करता येइल ??
http://vadanikavalgheta.blogs
http://vadanikavalgheta.blogspot.com/2008/06/sabudana-khichadi.html
मी साबुदाणा असा भिजवते. नेहेमी चांगला होतो. ही टीप आद्य पार्लेकर योगीबेअर यांची आहे.
योगी अस्शील तिथुन परत ये. पार्लेकर मंडळी तुझी वाट पहात आहेत.
धन्स ग मनोती, तुझ्या पध्दतीने
धन्स ग मनोती, तुझ्या पध्दतीने भिजवुन बघते आता.
आमच्याकडे इलेक्ट्रिक हॉटप्लेट
आमच्याकडे इलेक्ट्रिक हॉटप्लेट (इलेक्ट्रिक शेगडी) आहे, त्यावर तापमानाच्या खुणा आहेत. जसे दुध तापवण्यासाठी २००W वर नॉब ठेवणे, उकळण्यासाठी ६००W वर नॉब ठेवणे अशा आहेत.
आत्ता मला या हॉटप्लेट चा वापर करून अंडी शिजवायची आहेत, तर ४ अंडी शिजवण्यासाठी किती तापमान सेट करावे व पाण्याचा वापर किती करावा? तसेच अशा इलेक्ट्रिक शेगडीवर तवा वापरता येतो का?
हे काय, कुणीच उत्तर दिले नाही
हे काय, कुणीच उत्तर दिले नाही
प्रश्न चुकीच्या धाग्यावर विचारला काय?
तवा हॉटप्लेट वर वापरता येतो,
तवा हॉटप्लेट वर वापरता येतो, नाहीतर पोळ्या कशा भाजणार ?

अंडी उकडताना पाणी उकळते, त्यामुळे पाणी उकळण्याच्या सेटींग वर ठेवून बघा.
अंडी ३/४ बुडतील एवढे तरी पाणी घाला, अंड्यांचा आणि भांड्याचा आकार बघून
rangseth,electric hotplate वर
rangseth,electric hotplate वर coils असतात त्यवर नेहेंमी सपाट बुडाची भान्डी वापरावीत.तवा ही सपाट बुडाचाच वापरा.
उकळत्या पाण्यात पाच मिनिटात
उकळत्या पाण्यात पाच मिनिटात अंडी शिजतात. शिजण्यापूर्वी अंडी
रुम टेंपरेचरला असावीत. खरे तर साडेतीन मिनिटात अंडी शिजतात,
त्यातला पिवळा भाग हा थोडासा पातळ राहतो, पण घट्ट उकडण्यासाठी
पाच मिनिटे पुरेत. उकळत्या पाण्याचे तपमान १०० अंश से. असते,
अंडी त्यापेक्षा कमी तपमानाला शिजतात. अंडी उकडताना जर एखादे
अंडे तडकले तर पाण्यात मीठ टाकायचे असते. थोडक्यात पाण्याला
मंद उकळी येत राहील एवढे तपमान पूरे. शिजणाऱ्या भातातही अंडी
शिजू शकतात.
पायनॅपल जाम उरलाय घरी, त्याचे
पायनॅपल जाम उरलाय घरी, त्याचे काय करता येईल?
माझ्या हॉट प्लेट वर
माझ्या हॉट प्लेट वर तापमानाच्या खुणा नाहीत..
.. ० ते ६ आकडे आहेत..... १-३ गरम करणे, ४-५ उकळणे.... ५-६ एकदम रोस्ट करण्यासाठी... साधारणपणे एवढेच पुस्तकात लिहिले होते....
वर्षा, कुठलाही स्पाँज केक
वर्षा, कुठलाही स्पाँज केक आणून मध्ये कापून हा जाम थापायचा मध्ये. मग वरून व्हिप क्रीम व फ्रेश पाईनॅपल तुकडे लावून पाईनअॅपल केक म्हणून खपवायचा semihome made केला सांगून. आणखी पाईनॅपल टेस्ट हवी असेल तर फ्रूट रम आणून त्यात जरासा अननसाचा रस टाकून ह्या केकच्या तुकड्यावर आधी टाकून सेट करून मग तो जाम मध्ये थापायचा. सहज खपतो. खानेवाले की कमी नही है .:)
Pages