युक्ती सुचवा/ युक्ती सांगा

Submitted by पूनम on 12 March, 2009 - 05:13

१) एखादा पदार्थ हमखास जमावा, यासाठी तुम्ही काही युक्त्या (टिप्स) वापरत असाल, तर सगळ्यांना सांगा.
निव्वळ पाककलेतच नाही, पण स्वयंपाकघरात वेळ वाचावा म्हणून, भांडी/उपकरणं स्वच्छ रहावी म्हणून इत्यादीसाठी काही खास टिप्स असतील तर त्याही सांगा.

२) कोणत्या बाबतीत अडला असाल आणि एखादी टिप हवी असेल, तर इथे विचारा. (पदार्थ करताना जमला नाही, तर तो 'माझं काय चुकलं' मध्ये विचारा. इथे त्या व्यतिरिक्त काही असल्यास विचारा)

३) पदार्थांची वेगवेगळ्या भाषेतली नावे, एकाच पदार्थाची एकाच भाषेतली पण वेगवेगळ्या देशातली नावे , कधी त्यात असलेला लहानमोठा फरक या संबंधी माहिती इथे विचारण्याआधी ह्या धाग्यावर पहा- http://www.maayboli.com/node/25383

४) मऊसूत गोल पोळ्या करायच्या आहेत? त्या कशा करायच्या? कोणत्या तव्यावर करायच्या? सुगरणींच्या युक्त्या इथे पहा- http://www.maayboli.com/node/25385

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवाला काही खायला नाही ठेवलं. दिव्यात घालायला काहीच हरकत नाही. टाकून देण्यापेक्षा नक्कीच चांगला उपयोग. अर्थात आपापलं मत.

दिवाळीला यंदा साजुक तुपातले दिवे. Happy

दिवाळीतले दिवे देवासाठी नसतात नाहीतरी, सुरसुर्‍या आणि नागांसाठी असतात Proud

आपण स्वतः खातो. देव कुठे खातो?

आपण साक्षात असतो. देव कुठे असतो ?

अर्थात आपापलं मत....

***

ये कहांकी दोस्ती है, के बने है दोस्त नासेह,
कोइ चारासाज होता, कोइ गम गुसार होता...

(नासेह्=सल्ले देणारा, चारासाज= दु:खावर फुंकर घालणारा, गम गुसार= दु:खात भागीदार)

हे विकतचे तूप नीट कढवलेले नसते म्हणून तसे लागते. त्यात मिठाचा एक कण टाकून ते कढवायचे. त्यातला खवट वास येणारा भाग कढून जातो. ( पण बेरी मात्र निघत नाही. )

मिनोति,
दुकानदाराकडे देवासाठी म्हणुन खास वेगळ्या सुपार्‍या असतात. आकाराने लहान, हलक्या आणि बहुदा किडक्या. !!!

कविता,
अजुन तुझा ऑइल् स्प्रे बाकी असेल तर Happy

ऑइल स्प्रे चा सर्वात सही उपयोग इडली करताना होतो Happy
इडली पात्राला नॉर्मल तेल लावुन इडल्या करतो तेंव्हा निदान चमचा तरी वापरायला लागतो इडल्या काढण्या साठी पण ऑइल स्प्रे नी इडली पात्राला स्प्रे केल तर चमचा सुध्दा वापरायला लागत नाही, अगदी हातच्या बोटांनी इडल्या अलगद सुट्या होतात :), आणि इडली पात्र पण चकाचक रहाते , बघ नक्की ट्राय करून :).
कुठला ऑइल्स स्प्रे आहे तुझ्या कडे ?
तू म्हणतेस तो ओइल्स स्प्रे चा वास जर गरम पॅन वर स्प्रे मारला तर येतो, इडली पात्राला स्प्रे केला तर नाही येत ( मी कनोला ऑइल स्प्रे वापरते.)

दिपांजली ऑईल स्प्रे इडली करताना वापरायची आयडीया मस्त दिलीस!

पुढचा सुग्रणीचा(?) सल्ला दिलान ग रूनी! Proud
आपण(काही जणं) जस खायला साजुक तूप वापरतो, देवाच्या नैवेद्यासाठीही. दिव्याला वापरायला अश्या केसमध्ये माझ्या मते काही हरकत नाही, मुद्दाम वाशीळं तूप विकत आणून थोडीच वापरायचा सल्ला दिलाय?
अन चांगल उकळून घेतलं तर दिव्यात जळताना वास थोडीच येणार?
माझ्या सासरी माझं लग्न होण्याआधी देवाच्या दिव्याला चक्क डालडा वापरायचे. Sad
काय करणार! व्यक्ती तितक्या प्रकृती ! अन.. जाऊदे.. Happy

ऑइल स्प्रे भारतात विकत मिळतो का? इडलीसाठी चांगली आईडिया आहे. Happy

मी ही इडल्या करताना, केक/स्लाईसेस इ. साठी भांडे/ट्रे ग्रीस करताना ऑईल स्प्रे च वापरते. कनोला किंवा ओलिव्ह ऑईल...तेल पण कमी लागते.

अ‍ॅना, भारतात-मुंबईत्/पुण्यात मिळतो ऑईल स्प्रे. किंवा स्प्रे बॉटल पण मिळते. त्यात आपल्या आवडीचे तेल घालुन वापरता येते.

ए, मायक्रोवेव्ह मध्ये ईडली करता येते का? एकीने ती मायक्रोत इडलीचा वेगळा साचा वापरते असं सांगितलं.

हो भाग्या, करता येते. मी आणलं होतं भांड पुण्याहुन येताना. एकदाच केल्या. पण इतक्या हलक्या नाही झाल्या. कदाचित पाण्याच प्रमाण वगैरे चेंज कराव लागत असेल. ते भांड तसच पडुन आहे आता. त्याचा दुसरा काहीतरी उपयोग शोधायला हवा... Happy

तेच गं, भांडं भारतातून मागवायच्या आधी विचारलेलं बरं ना कशा होतात ते.

तुझ्याकडे मायक्रो सेफ राईस कुकर असेल तर त्यात वाटीत पीठ घालुन कुकरच्या जाळीवर ठेउन बघ, पुढच्या वेळेला इडल्या करशिल तेव्हा. मी ढोकळा करुन बघितला होता अश्याच पद्धतिने. बरा झाला होता...
बा द वे... तुझ अंगण मेकओव्हर सहीच... Happy

मलापण नाही आवडल ते भांडं. मीपण एकदाच वापरलं. लाजो तू काही त्याचा उपयोग शोधून काढलास तर जरूर सांग. टॉर्टिया मेकर आणलं होतं सॅन होजेच्या BMMच्या स्टॉलवर त्याचपण तसच झालं.

जरूर आर्च.

त्यात मी एकदा केक ठेवला होता. केक वर फ्रॉस्टिंग आणि डेको केले होते. ते खराब व्ह्यायला नको म्हणुन जरा उंच पण पसरट डब्बा हवा होता कारण माझ्याकडे तेव्हा केक ठेवायच काचेच भांड नव्हत. आणि इडली पात्राच वरच व्हेंट थोड उघड ठेवल होत त्यामुळे उबला पण नाही आत केक. केक काढायलाही सोप्पा कारण खालती ताटली आणि वरती उंच झाकण. आता केक चं भांड पण आहे त्यामुळे तो डब्बा परत तस्साच.... Happy

मलाही सांगा त्या ईडली पात्राचा उपयोग कोणी केला तर. Happy
मायक्रोवेव्ह नविन असताना मीही केला होता तो उद्योग, पण त्यात ईडल्या अजिबातच फुगल्या नाहित आणि कडक पण झाल्या.
असाही त्या मायक्रोवेव्हचा उपयोग कमीच करते मी, कारण माझ्या सासु-सासर्‍यांना त्यातला एकही पदार्थ आवडत नाही, घरामध्ये अडचण करुन ठेवली म्हणुन येताजाता टोमणे मात्र ऐकते मी.:)

हुडा, मायक्रोत आपल्या भरल्या मिरच्या (तळायच्या), मिरगुंड हे सुद्धा मस्त करता येतात...बीना तेलाचे त्यामुळे उत्तमच.

लाजो, मेकोव्हर बघितलास तर! या स्प्रिंगमध्ये मैत्रिणींबरोबर तिथे बसून चहा प्यायचा आहे. तेव्हा तरी जमवू या. मला तुझी विपु दिसत नसल्याने इथेच लिहितेय,

हो नक्की जमवुयात. माझा वि.पु. का दिसत नाहिये?? या नविन मा बो चा घोळ असेल कदाचित. होपफुली दिसायला लागेल लवकरच...

भरलेली मिरची माझ्या लेकीला खुप आवडते.
लाजो त्या मिरच्या कशा करायच्या ते सांगणार का?
दही भातात घालताना करुन बघेन.

ऑईल स्प्रे ने पापडावर ऑईल स्प्रे केले आणि मायक्रो. मधून काढले तर हॉटेल मधल्या सारखे कमी तेलकट फ्राईड पापड करता येतील. शिवाय मसाला पापड ही छान होतील. हाताने तितकं एक सलग नाही लागत तेल.

अगं वर्षा, मायक्रो च्या डिश वर एक पेपर टॉवेल ठेव. त्यावर २ मिरच्या ठेव. आता पहिल्यांदा २० से. गरम कर. जरा मायक्रो उघडुन बघ अजुन व्ह्यायला हव्यात का ते. मग परत १०-२० से. ठेव. मायक्रो च्या पॉवर प्रमाणे किती वेळ लागतोय हे तुला अंदाजाने कळेल. जास्त वेळ नको, नाहीतर खुप भाजल्या गेल्या तर मायक्रो चे दार उघडल्यावर नाकात तिखट वास जायचा आणि परत मायक्रोच्या नावाने टोमणे खायला लागायचे Happy Light 1

मायक्रो मधे बटाटे पण मस्त शिजतात. बटाटा धुवुन, त्याला सुरीने २-३ टोचे मारायचे. पेपर टॉवेल मधे गुंडाळुन दीड ते २ मि. (पॉवर आणि बटाट्याच्या साइ़ज प्रमाणे) गरम करायचे. बटाटा मस्त लुसलुशित शिजतो. बटाट्याचे भरित, चीज-बटाटा असे करायला १-२ बटाटे उकडायचे असतिल तर पटकन काम होतं आणि कुकर पण लावायला लागत नाही....

तुझ्याकडे मायक्रो सेफ राईस कुकर असेल तर त्यात (मायक्रो सेफ) वाटीत पीठ घालुन कुकरच्या जाळीवर ठेउन बघ, पुढच्या वेळेला इडल्या करशिल तेव्हा
>>
यात चांगल्या होतात इडल्या...
मी करून पाहिल्या आहेत...
कुकर च्या पेक्षा पीठ थोडंसं सैल ठेवलं की चांगल्या होतात...

घरी मायक्रोवेव्ह बरोबर जो इडली स्टँड आलाय त्यात पण छान झाल्या होत्या पीठ सैल केल्यावर...
पण खूप सैल नाही... थोडंसंच...

मायक्रो सेफ राइस कुकर वर मी जाम फिदा...
या देश वारीत प्रेशर कुकर घरी नेऊन टाकला आणि हा घेऊन आलोय...

मायक्रो च्या डिश वर एक पेपर टॉवेल ठेव<<<< पेपर टॉवेल म्हणजे पेपर नॅपकीनच ना?? आणि तेल न वापरता मिरच्या होतात?? मिरगुंड पण अशीच करायची का? सही आहे.

हो, पेपर नॅपकिनच. पण पातळ असेल तर डबल टाक. तेल न लावतासुद्धा छान होतात मिरच्या आणि मिरगुंड पण.... Happy

राईस कुकर ब्येश्टच असतो. भात, पुलाव, भाज्या उकडणे सगळ्यासाठी उपयोग होतो. माझी आई आणि ताई साबुदाणा खिचडी पण करतात त्यात. मला अजुन त्याची टॅक्ट जमली नाहिये पण प्रयत्न चालु आहेत... Happy

त्या मायक्रोवेव इडली पात्रात वेळ पडल्यास इन्स्टन्ट इडल्या बर्‍या होतात. म्हणजे गिट्स इत्यादीच्या. घरी बनवलेल्या पीठाच्या करायच्या असल्यास वर अ‍ॅन्की ने जे सांगितलंय ते बरोबर आहे, पीठ सैल ठेवणे. त्या पात्राचा जो बेस आहे तो ढोकळा बनवण्यासाठी वापरता येतो.. गिट्स, चितळे यांच्या पॅकचा. त्याचाच उपयोग जास्त होतो.

Pages