प्रतिक्रिया देणार्‍यांचे होत असलेले बॅशिंग.

Submitted by हुप्पाहुय्या on 28 July, 2017 - 13:26

मायबोलीवरील कथा, ललित, लेख, गझल, कविता ई. साहित्य प्रकारांवर येणार्‍या प्रतिक्रियांना किंवा प्रतिक्रिया देणार्‍याला ईतर लोकांनी झोडपून प्रतिक्रिया देणार्‍याच्या प्रार्थमिक हक्कावर आक्षेप घेण्याबद्दल मायबोलीकरांची काय भुमिका आहे.?

प्रतिक्रियांच्या (चर्चेच्या नव्हे) अपेक्षेने लिहिलेल्या लेखावर किंवा कथेवर आलेली प्रतिक्रिया हा फक्तं आणि फक्तं लेखक आणि प्रतिक्रिया देणारा वाचक ह्यांच्यातला मामला आहे. असे असतांना ईतरांना प्रतिक्रिया देणार्‍याचे बॅशिंग करण्याचा काय हक्कं आहे?
लेख/ कथा हा काही चर्चेचा धागा नाही, चर्चा हवी असल्यास ती करण्यासाठी वेगळे धागे ऊघडण्याची सोय ऊपलब्धं आहे. तिथे कुणीही चर्चेत भाग घेणार्‍या ईतरांच्या प्रतिक्रिया कोट करुन प्रतिसाद लिहू शकते.

लेख्/कथा/कवितांवर कोणीही त्याला हवी तशी प्रतिक्रिया देवू शकतो. लेख चांगला वाटल्यास, आवडल्यास किंवा टीका करायची असल्यास तशी प्रतिक्रिया देण्याची मुभा मायबोलीने दिलेली असतांना त्या प्रतिक्रियेवर मतप्रदर्शानाचा अधिकार कुणाला का मिळावा?
वेगळ्या स्थळ, काळ, समाजात राहणार्‍या वाचकांकडून वेगळ्या प्रतिक्रिया येणारंच. कथेच्या लेखकाला काही आपत्ती असल्यास ती किंवा तो प्रतिक्रिया देणार्‍याशी थेट संवाद साधत असतांना ईतरांनी त्यात लुडबुड का करावी? गरज पडल्यास लेखकासाठी आणि प्रतिक्रिया देणार्‍यासाठी प्रशासनाची मदत घेण्याचाही मार्ग ऊपलब्धं आहे.

ईतरांची लुडबूड मनाजोगती प्रतिक्रिया देण्याच्या प्रत्येक मायबोलीकराच्या हक्कावर ही गदा आहे आणि हे थांबावे असे मला वाटते. कथा/कविता /लेखाचा विषय्/आषय बाजूला पडून एकमेकांच्या प्रतिक्रियांचे बॅशिंग हे लेखकासाठी आणि ईतर वाचकांसाठी क्लेशकारकच असते.

ईतरांच्या प्रतिक्रिया देण्याच्या हक्काप्रती सौजन्य दाखवावे किमान ईतकी अपेक्षा मायबोलीकरांकडून करणे रास्तं नाही का?

प्रतिक्रिया देणार्‍यांना झोडपणे हे आधी झाले असेल पण म्हणून पुढेही होत रहावे आणि होत राहिल हे बरोबर नाही. निर्मात्याने भूतकाळात झालेल्या चुका सुधारण्यासाठी भविष्यकाळाची तरतूद केलेलीच आहे.

*हा धागा चर्चेसाठीच ऊघडला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<कुणासाठी का? मी माझ्या अनुभवावरून माझ्यासाठी धागा ऊघडूच शकतेच ना?>
हो उघडू शकता. पण घटनाक्रम पाहून आणि इथेही त्या कथेची चर्चा झालेली पाहून हे त्या कथेवरच्या प्रतिक्रियांशी संबंधित असावं असं वाटतंय. तुम्हीही तुमच्या पहिल्या प्रतिसादात ठळक अक्षरांत त्या कथेचा उल्लेख केलाय.

माझं मत : प्रतिसाद संयत शब्दांत असेल, तर त्याचे प्रतिध्वनीही संयत शब्दांतच उमटतील. जेव्हा प्रतिसाद देणारे मर्यादा सोडून भाषा वापरतात(किंवा टोकाची प्रतिक्रिया देतात) , तेव्हा आपल्यालाही त्याच प्रकारच्या भाषेला/प्रतिक्रियेला सामोरं जावं लागेल याची त्यांना कल्पना असते; तशी त्यांची तयारीही असते.

तुमच्या या लेखावरचे प्रतिसाद पाहता, प्रतिसादांवर प्रतिसाद नकोत, हे म्हणणं बहुसंख्य प्रतिसाददात्यांना पटलेलं नाही.
लेखकांनाही हे पटेल का याबाबत शंका आहे, कारण अशा चर्चांतूनही चांगलं काही वाचायला, शिकायला मिळाल्याचं
अनेकदा पाहिलं आहे.

तरीही एखाद्या लेखकाला वाचकांनी फक्त आपल्य लेखनावरच प्रतिसाद द्यावेत, प्रतिसादांवर नव्हे ; एखाद्या वाचकाला आपल्य प्रतिसादांवर अन्य कोणी प्रतिसाद देऊ नये अशी इच्छा असेल, तर त्यांनी तसं लिहावं. (बहुसंख्य) मायबोलीकर त्या इच्छेचा मान ठेवतील असं वाटतं.

आता चेंडू मायबोली प्रशासनाच्या हद्दीत आहे. त्यांना काही वाटलं तर सांगतीलच.

प्रतिसादकर्त्यांच्या बॅशिंगमुळे धागालेखिकेला धाग्यातला मजकूर डिलिट करावा लागला आणि प्रकरण कुठल्या थराला गेलं ते पाहा :-

https://www.maayboli.com/node/52671

माझं मत : प्रतिसाद संयत शब्दांत असेल, तर त्याचे प्रतिध्वनीही संयत शब्दांतच उमटतील. जेव्हा प्रतिसाद देणारे मर्यादा सोडून भाषा वापरतात(किंवा टोकाची प्रतिक्रिया देतात) , तेव्हा आपल्यालाही त्याच प्रकारच्या भाषेला/प्रतिक्रियेला सामोरं जावं लागेल याची त्यांना कल्पना असते; तशी त्यांची तयारीही असते. >> जी भाषा आहे ती लेखकाला ऊद्देशून आहे ना? जी लेखकाचा लेख वाचून प्रतिक्रिया देणार्‍याला वापरावीशी वाटली असेल. प्रत्येक जण लेखाशी वेगवेगळ्या भावनिक पातळीवर कनेक्ट होतो तशी त्याची प्रतिक्रियाही संयत किंवा जहाल असेल. एकाने संयत प्रतिक्रिया दिली नाही म्हणून दुसर्‍याने भावना ओतून लिहिलेल्या लेखावर ईतर सगळ्यांनी मिळून रणकंदन करायचे का? ह्यात लेखकाला स्वतःलाही काही से आहे की नाही. त्याला जर निगेटिव प्रतिक्रियांशी काही प्रॉब्लेम नाही तर बाकींच्याना का असावा? रणकंदन हतबलपणे बघत बसण्याशिवाय त्याच्याकडे काही ऊपाय आहे का?
ऊदा ह्या धाग्याच्या पहिल्या लाईन्स वाचा
https://www.maayboli.com/node/63294

तुमच्या या लेखावरचे प्रतिसाद पाहता, प्रतिसादांवर प्रतिसाद नकोत, हे म्हणणं बहुसंख्य प्रतिसाददात्यांना पटलेलं नाही. >> पहिली प्रतिक्रिया देणार्‍याचे बॅशिंग टाळण्यासाठी तुमच्याकडे काही ऊपाय असल्यास मी ही म्हणेन प्रतिसादांवर प्रतिसाद असावेत.

लेखकांनाही हे पटेल का याबाबत शंका आहे, कारण अशा चर्चांतूनही चांगलं काही वाचायला, शिकायला मिळाल्याचं
अनेकदा पाहिलं आहे. >> मान्यं आहे.

मुळात लेखनावरच्या प्रतिसादांवर प्रतिसाद देऊ नयेत असं कोणाच्या डोक्यात आलेलं नाही. लेखकानीही आक्षेप घेतल्याचं पाहिलेलं नाही.
गंमत म्हणजे मी अनेकदा सरळ नवीन प्रतिसादवर क्लिक करून मग मूळ लेखन वाचलं आहे.
असो. याबाबत आणखी कआही लिहिण्यासारखं तूर्तास नाही.
वेमांचा धावा करा

पहिली प्रतिक्रिया देणार्‍याचे बॅशिंग टाळण्यासाठी तुमच्याकडे काही ऊपाय असल्यास मी ही म्हणेन प्रतिसादांवर प्रतिसाद असावेत.
>> का हो? पहिली प्रतिक्रिया देणारा कुणी राष्ट्रपती लागून गेलाय का? त्याचे बॅशिंग टाळायचे आणि तुम्ही त्या पहिल्या प्रतिसादात, अत्यंत जहाल भाषेत मूळ लेखाचे जाहीर धिंडवडे काढणार त्यावर कुणी काही बोलायचे नाही. हा कुठला न्याय?
तुमचे प्रतिसाद वर्षानुवर्षे अत्यंत आक्रमक, आक्रस्ताळे आणि समोरच्याची अक्कल काढणारे असत आलेत. निरनिराळे आयडी घेतले तरी पाठीमागचा मूळ चेहरा दिसतोच. तेंव्हा हिंमत असेल तर ओरिजीनल आयडीने पोस्ट करा. आणि मग प्रामाणिक प्रतिक्रिया इ. बाष्कळ बडबड करा.
मूळ लेखकाला काही प्रॉब्लेम नसेल तर इतरांना का उठाठेव हेही तुमचे लाडके आर्ग्युमेंट. पण लेखकाला प्रॉब्लेम नाही हेही तुम्हीच ठरवून टाकता. काही लेखक तुमच्या रणचंडिकेच्या अवताराला घाबरतात, तर काही सरळ इग्नोअर करतात.
तुमचा प्रॉब्लेम हा तुम्हीच निर्माण केला आहे.

भाषा सुधारा. इतरांचे त्यावरचे प्रतिसाद आपोआप सुधारतील.

काही लेखक तुमच्या रणचंडिकेच्या अवताराला घाबरतात, तर काही सरळ इग्नोअर करतात.

>>>>>
कोणी घाबरत नाही हो... पण या आयडी ला भांडभांडी हवी असते नुसतं.. किती वेळ भांडणार कोणी, शेवटी इग्नोर करावे लागते. काहीही मुद्दे घ्यायचे, आपलंच खर अशी समजूत, आपण म्हणू तीच पुर्व दिशा, दुसरे काही बोलले की तुम्हाला मायबोली ने कमिटी चे सभासदत्व दिलाय का म्हणणे..
अरे कोण किती वेळ ऐकून घेणार, म्हणून इग्नोर..
एखाद्याचे लेखन सुमार दर्जाचे आहे हे हेच स्वतः ठरवून मोकळे...
भाषा अशी वापरणार की समोरचा दबला पाहिजे.

अत्यंत जहाल भाषेत मूळ लेखाचे जाहीर धिंडवडे काढणार त्यावर कुणी काही बोलायचे नाही. हा कुठला न्याय? >> जहाल भाषेची तुमची डिक्शनरी मायबोलीवर प्रकाशित करता का?. पुढच्यावेळी प्रतिसाद देतांना माझे शब्दं त्यात नाहीत हे पाहून प्रतिसाद लिहिन. किंवा तुम्हाला पाठवू का माझी प्रतिक्रिया आधी तपासण्यासाठी म्हणजे आपल्याल बॅशिंग टाळता येईल.
तुमचे प्रतिसाद वर्षानुवर्षे अत्यंत आक्रमक, आक्रस्ताळे आणि समोरच्याची अक्कल काढणारे असत आलेत. निरनिराळे आयडी घेतले तरी पाठीमागचा मूळ चेहरा दिसतोच. तेंव्हा हिंमत असेल तर ओरिजीनल आयडीने पोस्ट करा. आणि मग प्रामाणिक प्रतिक्रिया इ. बाष्कळ बडबड करा. >> मी आजवर अगदीच हाताच्या बोटांवर मोजता येईल एवढ्याच तुरळक लेखांवर लिहिलेले असतांना (चर्चेत भाग तर एखादेवेळीच घेतला असेन) तुम्हाला वर्षानुवर्षे माझ्या पोष्टी दिसत आहेत का? कमाल आहे तुमच्या स्मरणशक्तीची.
तुम्ही करता का सुरूवात तुमचा ओरिजिनल आयडी कोणता ते सांगण्याची मग मीही सांगते माझा ओरिजिनल आयडी.
आणि माझे लिहिणे बाष्कळ म्हणत असाल तर असो बुवा.तुम्ही मुद्दाम ईथे लिहून सांगण्याची तसदी घेतल्याबद्दल धन्यवाद.

च्रप्स तुमचे सगळे मुद्दे खोडले गेलेले असतांना तुम्ही परत परत येवून जे करत आहात त्यालाच बॅशिंग म्हणतात. येत रहा, लिहित रहा ह्या धाग्याला अश्याच ऊदाहरणांची गरजच आहे.

पुढच्यावेळी प्रतिसाद देतांना माझे शब्दं त्यात नाहीत हे पाहून प्रतिसाद लिहिन.
>> तसं कशाला? तुम्हाला तुमच्या प्रतिसादावर कुठ्ले प्रतिसाद आलेले आवडत नाहीत ते तपासा आणि ती भाषा तुमच्या प्रतिसादात टाळा. विषय संपला.

तुम्ही करता का सुरूवात तुमचा ओरिजिनल आयडी कोणता ते सांगण्याची मग मीही सांगते माझा ओरिजिनल आयडी.
>>अहो, पण तुमचा ओरिजिनल आयडी कुठला हा प्रश्न विचारलाच नव्हता. तो स्वच्छ दिसतो आहे. त्या आयडीने लिहा असा मुद्दा होता. Lol

● Submitted by ऋन्मेऽऽष on 12 July, 2017 - 21:27
भारी कथानक आहे, आवडली कथा
शेवटचा फकिराच्या तोंडच्या सुविचारालाही >>>> +७८६ !!!

बायकोला अशी फडतूस वागणूक देणारे नवरे कथेतच नाही तर प्रत्यक्ष जगातही कैक असतात.. आहेत..
अश्या नवर्याच्या खूनाचा विचार तिच्या मनात आला म्हणून तिला दोषी ठरवणारे प्रतिसाद वर आलेले बघून खरेच आश्चर्य वाटले..
कारण मी कथा वाचत असताना जेव्हा तिने दाराला बाहेरून कडी लावली हे वाचले तेव्हा मनात "है शाब्बास, मस्त केले" असेच आले.. तर त्याउलट जेव्हा तिचे मन खाताच तिने पुन्हा कडी उघडली तेव्हा काय मुर्खपणा करतेय असे आले.. पण शेवटी तिच्या याच चांगुलपणाचे बक्षीस तिला मिळाले समजूया जे त्यामुळेच क्लेम लवकर सेटल होत पैसे मिळाले. पण शेवटी पैसेही भोगलेल्या यातनांची भरपाई करू शकत नाहीच..

Submitted by हुप्पाहुय्या on 12 July, 2017 - 22:10
अश्या नवर्याच्या खूनाचा विचार तिच्या मनात आला म्हणून तिला दोषी ठरवणारे प्रतिसाद वर आलेले बघून खरेच आश्चर्य वाटले. >>>> खून पकडला गेल्यास आज एक जण कोंडून ठेवतो तिथे सरकार कायदेशीर रित्या दोषी ठरवून जेलमध्ये कैक वर्ष कोंडून ठेवेल आणि आज एक जण टॉर्चर करतो तिथे असे शेकडो जण टॉर्चर करतील हा विचार तुमच्या डोक्यात आला नाही ह्याचे खरंच आश्चर्य वाटले नाही.
न्याय मिळवण्यासाठी कायदेशीर मार्ग ऊपलब्धं असतांना खुनाची भलामण करण्याच्या तुमच्या वाक्याचा निषेध.
दुसर्याला त्रास देतांना आपल्याला मजा आली पाहिजे ही तुमची सॅडिस्ट मानसिकता तुम्ही वेळोवेळी मायबोलीवर बोलून दाखवलेली आहेच, तेव्हा कथेतल्या नवर्याच्या वागणुकीला फडतूस म्हणतांना तुम्हीही थोडे आत्मपरिक्षण करावे.

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 July, 2017 - 22:27
न्याय मिळवण्यासाठी कायदेशीर मार्ग ऊपलब्धं असतांना खुनाची भलामण करण्याच्या तुमच्या वाक्याचा निषेध.
>>>>>
कायदेशीर मार्ग
तुम्ही हा मुद्दा घेऊन माझ्या या धाग्यावर याल का?
कायदेशीर, बेकायदेशीर आणि नैतिकता!
http://www.maayboli.com/node/51663
किंबहुना हा धागा पुर्ण वाचून घेतलात तर तुम्हाला तुनच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल आणि मला पुन्हा तेच लिहावे लागणार नाही.
तरी काही शंका असल्यास तिथेच विचारलेल्या आवडतील जेणेकरून ईथे अवांतर चर्चा होणार नाही

Submitted by हुप्पाहुय्या on 12 July, 2017 - 22:50
किंबहुना हा धागा पुर्ण वाचून घेतलात तर तुम्हाला तुनच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल आणि मला पुन्हा तेच लिहावे लागणार नाही.
तरी काही शंका असल्यास तिथेच विचारलेल्या आवडतील जेणेकरून ईथे अवांतर चर्चा होणार नाही Happy >>
किंबहुना तुम्ही कुठलाही धागा पूर्ण वाचून घेतल्यास तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची ऊत्तरं मिळतीलच आणि पुन्हा प्रतिसाद जमवण्यासाठी शाहरूख, गर्लफ्रेंड वगैरे तेच ते लिहावे लागणार नाही.
तरी काही शंका असल्यास मुद्दाम थापा, खोटे, सनसनाटी, भावना ऊचकावण्यासाठी भडकाऊ असे न लिहिता तिथेच विचारलेल्या सगळ्यांनाच आवडतील जेणेकरून मला ईथेच काय ईतर कुठेही तुमच्याशी अवांतरंच काय पण कुठलीही चर्चा करावी लागणार नाही.>>>>>>

हुप्पाहुय्या ताई,
प्रामाणिकपणा!!!!

हा धागा काढण्याचा विचार ज्यावेळी मनांत आला तेव्हा जरा मागचाही विचार करायचा होता. Happy

मी हा मजकूर जिथून येथे आणलाय, त्या कथेवर ऋन्मेषने कथेवर भाष्य केलेलं असताना, त्याचं सो कॉल्ड bashing करायला सुरूवात केली होतींत. बर हे ठिक समजू आपल्यासारख्यांच्या प्रतिसादावर त्यानं फक्त आश्चर्य व्यक्त केलेलं! तेही स्वगत बोलल्यासारखं! पण आपण नुसतं तेवढंच करून थांबला नाहीत तर त्याचं लिखाण, त्याची गर्लफ्रेंड, त्याचा शाहरुख ह्या गोष्टींवरूनही त्याला सुनावलंत..

१) आपण त्याचं bashing करत होतात का?
२) लेखिका आणि ऋन्मेषनं बघून घेतलं नसतं का?
३) जर त्या धाग्यावर आपण करत होता ते bashing नसेल तर हे bashing म्हणजे नक्की काय हे मायबोलीकरांना विस्तारानं समजावून सांगाल का?
४) तिथलं जर bashing असेल तर मग हा धागा काढण्याचा नैतिक अधिकार आपल्याला कोणी दिलाय?

आणखी...

● Submitted by हुप्पाहुय्या on 10 April, 2015 - 09:22
सोडा की आता ...७० च्या वर घाणेरडे धागे काढून अजून चालूच आहे. काही प्रॉब्लेम आहे का की हे विषय चघळल्याशिवाय राहवत नाही. हिरोइन्स, गर्लफ्रेंड, व्यभिचार, अश्लीलता, आक्षेपार्ह दृष्ये फारच बाई विंट्रेस्ट तुम्हाला टॅबू गोष्टीत.
थोडक्यात व्यभिचार व्यभिचार म्हणत ज्याची हवा केली जाते, तसेच व्यभिचाराचे समर्थन करणार्यावरही टिका केली जाते, तो व्यभिचार प्रत्यक्षात एक फुसका बार आहे. समाजमान्यता मिळाली की तो व्यभिचार राहत नाही. ----------- बरं मग करून टाका की तुम्ही पण एखादा. मायबोलीकर कश्याला मनाई करतील. किंवा करू की नको पोल काढता का ? समर्थ्न आणि समाजमान्यता ही मिळवूनच टाका एकदाची.
काय पण लोक असतात एकेक...>>>>>>

प्रतिसादांवर प्रतिसाद देणार्यांचा प्रॉब्लेम...लिहीणार्यांचा प्रॉब्लेम...
काही चुकतंय का?...
का लोकांना नावेच ठेवता येतात फक्त? कि सगळ्यांनी आपल्याला हवं तसंच लिहावं?

आता मी आणखी एक धागा 'हुंगून' येतो.↓

●Submitted by हुप्पाहुय्या on 29 October, 2014 - 01:14
निषेध मान्य आहे, आणि झाली चूक कबूलही आहे त्याबद्दल मनापासून दिलगिरीही व्यक्त केलेली आहे आणि पुन्हा करीत आहे.
ईतरांचे वाभाडे काढतांना बेफिकिरांनी भान ठेवायला हवे होते.
मायबोलीवर येणार्या कुणाचीही कुठल्याही प्रकारची कुवत काढण्याचा अधिकार त्यांना, मला आणि ईतरांनाही कोणी दिलेला नाही. कुणाच्या बोलण्याने ज्या तीव्रतेचा जो मानसिक त्रास आपल्याला होतो तसाच तो ईतरांनाही होत असेल ह्याचा विचार लिहिण्यापूर्वी असू द्यावा. >>>>>>

आपल्या ह्या धाग्याच्या वरील प्रतिसादांना जरा स्क्रोल करून पहाल का?
कुवत, पात्रता, मर्यादा, प्रतिसादसंख्या असं काही सापडतंय का?
आणि जर असलं काही आढळंच तर मग प्रतिसाद कोणाचा होता हेही तपासा...

● थोडं नविन..

मी एक धागा काढलेला आपल्या सुदैवाने तो उडाला... (ऋन्मेषचा स्कोर)

पहिला प्रतिसाद होता दक्षिणाजींचा 'राहूल, तु काय करतो लक्षात येतंय का?' अशा स्वरूपाचा...
आता दक्षिणा ताईंनी अन् मी बघून घेतलं असतंच ना! आपण त्यांच्याशी बोलत माझ्यावर वैयक्तिक ताशेरे ओढलेले आठवतंय का त्या धाग्यावर? शांतपणे विचार करून आठवून बघा बरं.

'ह्यांचाही तोच उद्योग आहे, दिसेल त्या धाग्यावर प्रतिसाद देत सुटतात..ह्यांची सौंदर्यदृष्टि, चिप पब्लिसिटी स्टंट वगैरे वगैरे' हे नक्की काय होतं बर?

अरेच्चा!!!! वरचं तर दक्षिणाताईंचं माझ्याबाबतीत ब्रेनवॉशिंग करण्याचा प्रयत्न होता तर!

मी अनेक कवितांना 'सुंदर' म्हणून प्रतिसाद दिलेंत आणि त्यांचा उल्लेख तुम्ही माझ्या उडालेल्या धाग्यावर कुत्सितपणे 'सौंदर्यदृष्टी' फुटलीय असा केलेला...कवीमन आहे...कवितेशी ह्रदयाचं नातं आहे.. संवेदनशीलता आहे...त्या प्रतिसादांचं आपल्याला उठलेलं वावडं माझं bashing च होतं.. त्यावेळी मला वाईट वाटलं होतं..पण म्हणून मी कवितेंवर प्रतिसाद देणं थांबविलेलं नाही...

अजून बरंच मी 'हुंगलं' पण बर्याच ठिकाणी आपण दिलगीरी व्यक्त केलीत..काही प्रतिसाद डिलीट केलेले आढळलेत...

हुप्पाहुय्या ताई,
जरासं विचारपूर्वक आणि प्रामाणिक बोलणं असलं तर दिलगीरी व्यक्त करावी लागत नाही, प्रतिसाद एडिट आणि डिलीट करावे लागत नाहीत.

आपण खुप लवकर व्यक्तिगत पातळीवर खालच्या स्तराला येऊन बोलायला लागतात. आणि दुसर्यांना न मागताही शाहजोगपणाचे सल्ले देतात!... वर आपल्यापेक्षा वयानं छोट्या असलेल्या मुलीनं आपल्याला, 'बोलताना थोडा तरी विचार करा ओ' असा प्रतिसाद देऊन, 'बोलण्याची एक किमान पातळी असते' असं सांगितलंय.म्हणजे एखाद्या लहानग्यालाही जे सौजन्य आणि सामाजिक शिष्टाचार दाखविता यावा तो आपल्यासारख्या ज्ञानी, अनुभवी, समजूतदार व्यक्तीला दाखविता येऊ नये याचं आश्चर्य वाटतं..( कालचं आपण मला बोललेलं 'हुंगण' सोडलं तरी आणखी बर्याच ठिकाणी आपले असेच प्रतिसाद आहेत.)
आत्मपरीक्षणाची खरी गरज आपल्याला आहे हे निदर्शनास आणून देतो...

आणि हो...
ऋ च्या आणि बाकी अजून काहीजणांच्या प्रतिसादांवर/ धाग्यांवर जाऊन हुंगून वरचं संभाषण आणलेलं आहे.

हा धागा निकाली निघालाय.. कारण उघड आहे! धागाकर्ती आपल्या स्वत:शी प्रामाणिक नाहीये...

का हो तुम्हाला वाटते आहे की तुम्ही काही तरी पोल खोल लिहिले आहे का.
वरती 'लॉटरी' लेखावरचा भला मोठा प्रतिसाद कॉपी करतांना ज्यावर ऋन्मेष ह्यांनी प्रतिसाद लिहिला आहे तो माझा पहिला प्रतिसाद सोडून दिलात ? दिसला नाही का की लोकांपुढे खोटं खोटं अर्धमुर्ध लिहून काहितरी सिंपथी मिळवता आहात.
असो हा घ्या माझा त्या धाग्यावरचा पहिला प्रतिसाद ज्या नंतर बॅशिंग चालू झाले

संजयचा खून करण्यापर्यंत कांचनची तयारी होती, ईतका तिरस्कार वाटत असतांना वेळीच आपल्या त्रासाबद्दल परदेशातल्या (ऑथोरिटिजकडे) जाऊन मदत का मागितली नाही कांचनने? तिथले पोलिस नक्कीच अश्या डोमेस्टिक वायलंस बाबतीत कर्तव्यदक्ष असतात.
पासपोर्टही वरतीच होते म्हणजे ती कधीही तिथून निघून जाण्यास समर्थ होती?
वाईट माणसाच्या का असेना पण एखाद्याचा मृत्य्य्पश्चात मिळालेली भरपाई 'लॉटरी' कशी? समजा संजय बंद रूममध्ये जळून मेला असता तर खुनाचे बक्षीस झाले असते. कुठल्याही परिस्थितीत कांचनने पैसे नाकारणे योग्य झाले असते, माणूस नको पण त्याचा पैसा हवा असे वाटते आहे.
कथा फसल्यासारखी वाटली.
Submitted by हुप्पाहुय्या on 12 July, 2017 - 09:56

हा किती जहाल आहे त्याचेही निरूपण / रसग्रहण करालच.
बाकी प्रतिसाद चर्चांच्या धाग्यावरचे आहेत की लेखांवरचे ते बघा बरं पुन्हा एकदा खोदकाम करून.
मग खोदकाम झाल्यावर पुन्हा एकदा ह्या धाग्याचा विषय वाचा.... रात्रं पुरेल तुम्हाला हा दिलेला गृहपाठ करायला. काही मदत लागली तर विचारा.

हा धागा निकाली निघालाय.. कारण उघड आहे! धागाकर्ती आपल्या स्वत:शी प्रामाणिक नाहीये... >> तुम्ही प्रामाणिकपणे खोदकाम करा बरं पहिले. असे स्वतःच स्वतःला प्रामाणिक असल्याचे सर्ट्फिकिट देणे बरे नव्हे.

अरे काय हे रोज रोज वाद वाद वाद ... काल मागच्या पानावर ते शाहरूख आणि माझ्याबद्दल सुरू केलेले ते पुन्हा बोला ना, वाटल्यास तीच पोस्ट जरा वेगळ्या शब्दात लिहा, शाहरूख आणि मी एकाच पोस्टीत आलो की वाचायला छान वाटते Happy

मी संदर्भ दिलेला आहे.
>> आपल्यासारख्यांच्या प्रतिसादावर त्यानं फक्त आश्चर्य व्यक्त केलेलं! तेही स्वगत बोलल्यासारखं! <<<<

''एखाद्याचं आश्चर्य व्यक्त करणं हेही आपल्याला दुसर्यांची पात्रता काढण्यास पुरेसं ठरावं! ''
कमाल आहे!
बाकी मुद्द्यांचंही समर्थन करालच!

हुपपाहुईया, आपणास कळून चुकले असेल की तुमच्या एकही मुद्द्याला आधार नाहीय..फक्त लेखकाला असे वाटत असेल या अससंपशन वर तुमचे वाद बेस्ड आहेत.
तुम्ही जाहीर माफी मागा, माबोकर मोठ्या मनाने माफ करतील तुम्हाला.. नक्कीच

माफी कसली?
त्यांनी काय केलंय की माफी मागतील? त्यांच्या मुद्द्याला समर्थन नाही म्हणून डायरेक्ट माफी???? Rofl

च्र्पस, हे विनोदाच्या धाग्यावर टाका कदाचित दीड दोन लोक हसतीलही तुम्हाला.. कारण विनोदाला हसण्यासारखे तसेही काही नाहीए तुमच्या.

मी माझ्या आयुष्यात कोणाचे बॅशिंग केले असेल नसेल तरीही जाहीर माफी मागायला तयार आहे...
फक्त मी त्याचा वेगळा धागा काढणार.. Happy

पाघक्ल आणि गितोटांउ चं अध्यक्षपद ह्यांनाच मिळायला हवं अशी मागणी करा रे सगळ्यांनी.
राहुल, चांगला प्रतिसाद.
ऋ, तु शाख्याला जरा होल्ड कर

पाघक्ल आणि गितोटांउ चं अध्यक्षपद ह्यांनाच मिळायला हवं अशी मागणी करा रे सगळ्यांनी. >> सस्मित, तुमच्या ह्या धाग्यावरच्या तीन-चार प्रतिसादात तुम्ही एकंही मुद्दा चर्चेला न आणता फक्तं बॅशिंग आणि ईतर धाग्यांवरून स्कोर सेटलिंग करता आहात.
तुमच्या सारख्या लोकांनी बॅशिंग करणे हा आपला हक्क समजत मायबोलीवर हे बॅशिंग प्रत्येक ठिकाणी करून ईतरांच्या लेखांची आणि प्रतिक्रियेची वाट लावू नये त्यासाठीच हा धागा ऊघडलेला आहे.

तुम्हीच मायबोली बॅशिंग क्लबचे अध्यक्षपद घेवून रोल मॉडेल बॅशर बनता का?

ऋ, तु शाख्याला जरा होल्ड कर
>>>>
मी नाही आणलाय त्याला या धाग्यात.. तो तर कालपासून हवा येऊद्यामध्ये धमाल करतोय Happy

@ टॉपिक, आज बोलायला काही नाही. माझ्या आधीच्याच मुद्यांवर उत्तरे आली नाहीयेत. चेंडू अजूनही समोरच्याच कोर्टात आहे.

'लेखकांशिवाय ईतरांनी मतप्रदर्शनाची गरज नाही' ही टीप प्रतिक्रियेत स्पष्टं लिहिणे हा ऊपाय बॅशिंग टाळण्यासाठी काम करतो आहे असे ह्या धाग्यावरून सध्यातरी वाटते आहे.
https://www.maayboli.com/node/63316

बहूतेक सगळ्याच समंजस मायबोलीकरांनी प्रतिक्रियेचा आदर राखला. दोनेक पालथा घड्यांनी थेट ऊल्लेख न करता क्षीण प्रयत्न केला काऊंटर मते लिहिण्याचा. चालयचेच एकदा सांगून सगळ्यांनाच समजेल अशी अपेक्षा नव्हतीच.

आपले वा आपल्या प्रतिक्रियेचे बॅशिंग टाळायचे असल्यास, प्रतिक्रिया लिहिल्यानंतर ४ तासात केव्हाही अशी टीप मायबोलीकर लिहू शकतात.

कधीतरी एकदा मी हुप्पाहुय्या यांची तळमळ जाणवते असा प्रतिसाद दिला होता. या धाग्यावर त्यांची मते वाचून मी माझ्या आधीच्या प्रतिसादाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.

[तरीही एखाद्या लेखकाला वाचकांनी फक्त आपल्य लेखनावरच प्रतिसाद द्यावेत, प्रतिसादांवर नव्हे ; एखाद्या वाचकाला आपल्य प्रतिसादांवर अन्य कोणी प्रतिसाद देऊ नये अशी इच्छा असेल, तर त्यांनी तसं लिहावं. (बहुसंख्य) मायबोलीकर त्या इच्छेचा मान ठेवतील असं वाटतं.]

हे मी माझ्या ३१ जुलैच्या प्रतिसादात लिहिलंय.
त्या प्रतिसादातल्या अन्य मुद्द्यांना उत्तरं मिळाली होती.

धन्यवाद आणि धन्यवाद व्यत्यय. आधीच्या आणि आताच्या दोन्ही प्रतिसादांबद्दल.
तुम्ही धागा वाचलात ह्यापेक्षा महत्वाचे ते काय? टीप वाचून त्या बरहुकूम आपणास लिहिता आले तर आपली आभारी राहीन.
मला आणि तुम्हालाही पुन्हा दिलगिरी व्यक्तं करण्याची वेळ येणार नाही एवढ्या समंजसपणाची आशा करते.

हो भरत, माझा बहुसंख्यं मायबोलीकरांच्या समंजसपणावर आणि righteousness सारासार विचार करण्याच्या क्षमतेवर गाढ विश्वास आहे म्हणूनच ही क्लेषदायी ऊठाठेव करते आहे.
प्रतिसादांवर प्रतिसाद देणारंच असे रेक्कावून म्हणणारे आणि कायम गदारोळ, धागे डीरेल करणारे ह्या आयडींचा संच जवळजवळ सेमंच आहे जे सगळ्यांना दिसते आहे.
गदारोळ टाळण्यासाठी पुढची पायरी कदाचित लेखकांनी आणि प्रतिक्रिया देणार्‍यांनी नावानिशी 'अमुक तमुक आयडींनी प्रतिक्रिया देवू नये' अशी असेल असे वाटते आहे. ज्यात माझे म्हणणे मान्य नसणारे वरच्या संचातले आयडी माझेच नाव अग्रक्रमाने घेतील याचीही कल्पना आहे आणि तेच हवे आहे. कुठेतरी सुरूवात होणे मह्त्वाचे आहे.

Pages