मायबोलीवरील कथा, ललित, लेख, गझल, कविता ई. साहित्य प्रकारांवर येणार्या प्रतिक्रियांना किंवा प्रतिक्रिया देणार्याला ईतर लोकांनी झोडपून प्रतिक्रिया देणार्याच्या प्रार्थमिक हक्कावर आक्षेप घेण्याबद्दल मायबोलीकरांची काय भुमिका आहे.?
प्रतिक्रियांच्या (चर्चेच्या नव्हे) अपेक्षेने लिहिलेल्या लेखावर किंवा कथेवर आलेली प्रतिक्रिया हा फक्तं आणि फक्तं लेखक आणि प्रतिक्रिया देणारा वाचक ह्यांच्यातला मामला आहे. असे असतांना ईतरांना प्रतिक्रिया देणार्याचे बॅशिंग करण्याचा काय हक्कं आहे?
लेख/ कथा हा काही चर्चेचा धागा नाही, चर्चा हवी असल्यास ती करण्यासाठी वेगळे धागे ऊघडण्याची सोय ऊपलब्धं आहे. तिथे कुणीही चर्चेत भाग घेणार्या ईतरांच्या प्रतिक्रिया कोट करुन प्रतिसाद लिहू शकते.
लेख्/कथा/कवितांवर कोणीही त्याला हवी तशी प्रतिक्रिया देवू शकतो. लेख चांगला वाटल्यास, आवडल्यास किंवा टीका करायची असल्यास तशी प्रतिक्रिया देण्याची मुभा मायबोलीने दिलेली असतांना त्या प्रतिक्रियेवर मतप्रदर्शानाचा अधिकार कुणाला का मिळावा?
वेगळ्या स्थळ, काळ, समाजात राहणार्या वाचकांकडून वेगळ्या प्रतिक्रिया येणारंच. कथेच्या लेखकाला काही आपत्ती असल्यास ती किंवा तो प्रतिक्रिया देणार्याशी थेट संवाद साधत असतांना ईतरांनी त्यात लुडबुड का करावी? गरज पडल्यास लेखकासाठी आणि प्रतिक्रिया देणार्यासाठी प्रशासनाची मदत घेण्याचाही मार्ग ऊपलब्धं आहे.
ईतरांची लुडबूड मनाजोगती प्रतिक्रिया देण्याच्या प्रत्येक मायबोलीकराच्या हक्कावर ही गदा आहे आणि हे थांबावे असे मला वाटते. कथा/कविता /लेखाचा विषय्/आषय बाजूला पडून एकमेकांच्या प्रतिक्रियांचे बॅशिंग हे लेखकासाठी आणि ईतर वाचकांसाठी क्लेशकारकच असते.
ईतरांच्या प्रतिक्रिया देण्याच्या हक्काप्रती सौजन्य दाखवावे किमान ईतकी अपेक्षा मायबोलीकरांकडून करणे रास्तं नाही का?
प्रतिक्रिया देणार्यांना झोडपणे हे आधी झाले असेल पण म्हणून पुढेही होत रहावे आणि होत राहिल हे बरोबर नाही. निर्मात्याने भूतकाळात झालेल्या चुका सुधारण्यासाठी भविष्यकाळाची तरतूद केलेलीच आहे.
*हा धागा चर्चेसाठीच ऊघडला आहे.
राहुल, तुम्हाला लेखकांना
राहुल, तुम्हाला लेखकांना डिस्करेज करण्याबद्दल ईशू आहे ? नवीन चर्चा धागा ऊघडा.तो ह्या चर्चेचा विषय नाही.>>>> -१११११
अश्यावेळी ज्याचा मूळ प्रतिसाद असतो त्याचा आत्मा आतून नक्कीच सुखावत असेल, खोटे बोलू नका. >>>> +१११११
स्वाती , रूनमेश, राहुल +
स्वाती , रूनमेश, राहुल + 99999999
पण ते तुम्ही खाजगी संपर्कातून
पण ते तुम्ही खाजगी संपर्कातून लेखकाला कळवलेलं नाही, जाहीर लिहिलंय. >> माझे मत, माझे लेखाबद्दलचे विचार जज होऊन माझे बॅशिंग केले जाऊ शकते ह्या भितीने मी प्रतिसाद देण्याचे टाळावे असे तुम्हाला सुचवायचे आहे का?
विचार स्वातंत्रय आणि मत स्वातंत्र्य आहे म्हणून ओपन हाऊस वोटिंग सेटिंग मध्ये एखाद्या पार्टीला मत का दिले ह्याचा जाब विचारण्याला ही जाब विचारणार्याचे मतस्वातंत्र्य म्हणतो का? (प्रश्न राजकीय नाही तर तात्विक आहे)
समजा मी प्रतिक्रिया दिलीच तर ती प्रतिक्रिया ईतर लोक जज करत असतांना मी ईग्नोर करावे? मायबोली प्रशासनालाही हेच अपेक्षित आहे का?
हे एखाद्याचे मत आहे आणि मला त्याबद्दल आक्षेप असल्यास मी अॅडमिनकडे तक्रार करू शकतो हे नियमाप्रमाणे होत नाही का?
मला हा स्लिपरी स्लोप वाटतो.. अमित प्रमाणे मलाही एक साईड घेता येत नाही. पण एखाद्याला चर्चेत न येता प्रतिसाद देता यावा हे पटते.
माझे मत, माझे लेखाबद्दलचे
माझे मत, माझे लेखाबद्दलचे विचार जज होऊन माझे बॅशिंग केले जाऊ शकते ह्या भितीने मी प्रतिसाद देण्याचे टाळावे असे तुम्हाला सुचवायचे आहे का?
>>>>>
लेखक आपली कथा बॅशिंग व्हायच्या भितीवर मात करून ईथे टाकतो, मग प्रतिसाद देणारे ती हिंमत का दाखवू शकत नाही
चला जरा हा मुद्दा भविष्यकाळात नेऊया, तुम्ही म्हणता तसे नियमच झाला मायबोलीवर. कथांवर आलेल्या प्रतिसादांवर लेखक सोडून कोणीही काही बोलणार नाही.
आता समजा तुम्ही मायबोलीचे एक वाचक आहात. ईथे तुम्ही म्हणजे तुम्ही कोणीही. तर तुम्ही फक्त एक वाचक आणि प्रतिसादक आहात, स्वत: काही लिहित नाही. तर तुम्ही काय करणार, मायबोलीवर येणार, कथा कविता वाचणार, जे आवडले त्याला आवडले बोलणार आणि नाही आवडले त्यावर मनसोक्त तोंडसुख घेणार. कारण तुम्हाला कोणी काही बोलणार नाही हा नियम आहे. आणि तुम्ही स्वत: काही लिहीत नसल्याने तुमच्यावर कोणी तोंदसुख घेतेय अशी वेळ येणारच नाही.
चला आता समजा तुम्ही लेखक आहात, आणि असा नियम असलेल्या साईटवर आपली कथा प्रसिद्ध करत आहात. एखाद्या अश्या तोंडसुख घेणार्या प्रतिसादाला तुम्ही उत्तरही द्याल. पण दहावीस जणांची टोळीच अंगावर आली तर तुम्ही काय करणार? आता गंमत म्हणजे तिथेच शंभरेक जण असे आहेत ज्यांना तुमची कथा आवडली आणि पटली आहे, जे तुमच्या बाजूने आहेत. पण ते हताशपणे त्या दहा जणांची टोळी तुमच्या कथेची चिरफाड करताना बघत बसणार.. का? तर कानूनने हमारे हाथ बांध के रखे है
मग सांगा, एक लेखक म्हणून कोण मायबोलीवर आपले लेखन प्रसिद्ध करेल?
अपवाद ऋन्मेष
पण एखाद्याला चर्चेत न येता
पण एखाद्याला चर्चेत न येता प्रतिसाद देता यावा हे पटते. >>> +१
हायझेनबेर्ग - आपला मूळ
हायझेनबेर्ग - आपला मूळ प्रतिसाद वाचला, आणि आता संपादित पण वाचला... काय संपादन केले ते देखील समजले...
कधी कधी गडबडीत अशी चूक राहून जाते...
>>> ओपन हाऊस वोटिंग सेटिंग
>>> ओपन हाऊस वोटिंग सेटिंग मध्ये एखाद्या पार्टीला मत का दिले ह्याचा जाब विचारण्याला ही जाब विचारणार्याचे मतस्वातंत्र्य म्हणतो का?
ओपन हाऊस सेटिंगमध्ये दिलेली मतं जज होत नाहीत का? (फेक मीडिया कशासाठी आहे मग?!
)
जाहीर फोरमवर लिहिलेली पोस्ट - मग ती साहित्य असो, चर्चाप्रस्ताव किंवा प्रतिक्रिया - ती जज होणार नाही हे ह्यूमनली पॉसिबल नाही.
पण एखाद्याला चर्चेत न येता
पण एखाद्याला चर्चेत न येता प्रतिसाद देता यावा हे पटते. >>> +१
>>>>>
अगदी सहमत,
आणि याची काळजी प्रतिसाद देणार्यानेच घ्यायची असते.
जर त्याला शंका आली की की त्याचा प्रतिसाद चर्चेत येणार तर त्याने तो ज्याच्यासाठी लिहिला आहे त्यालाच खाजगी संपर्कातून सांगावे हे उत्तम.
जर त्याला शंका आली की की
जर त्याला शंका आली की की त्याचा प्रतिसाद चर्चेत येणार तर त्याने तो ज्याच्यासाठी लिहिला आहे त्यालाच खाजगी संपर्कातून सांगावे हे उत्तम. >>>>हे पटतंय पण येथे एक गंमत आहे, 'ऋ, लिहूच नका.' हे खाजगी संपर्कातून कसं सांगणार ना?
ओपन हाऊस सेटिंगमध्ये दिलेली
ओपन हाऊस सेटिंगमध्ये दिलेली मतं जज होत नाहीत का? (फेक मीडिया कशासाठी आहे मग?! Proud ) >> मॅक्केन वरून म्हणताय का?
जाहीर फोरमवर लिहिलेली पोस्ट - मग ती साहित्य असो, चर्चाप्रस्ताव किंवा प्रतिक्रिया - ती जज होणार नाही हे ह्यूमनली पॉसिबल नाही. >> जज करणारेही ह्युमन्सच आहेत ना
'ऋ, लिहूच नका.' हे खाजगी
'ऋ, लिहूच नका.' हे खाजगी संपर्कातून कसं सांगणार ना?
>>>>
यात काय न जमण्यासारखे? मला तुमच्या अमुक तमुक कथेचा आशय आवडला नाही तर शक्य झाल्यास अशी कथा पुढे लिहू नका. याने लोकांवर असे अमुकतमुक घातक परीणाम होतील वगैरे सल्ला उपदेश सूचना विनंती योग्य भाषेत खाजगी संपर्कातून सांगणे शक्य आहेच.
हायझेनबेर्ग - आपला मूळ
हायझेनबेर्ग - आपला मूळ प्रतिसाद वाचला, आणि आता संपादित पण वाचला... काय संपादन केले ते देखील समजले...
कधी कधी गडबडीत अशी चूक राहून जाते... >> हो स्पेलिंग मिस्टेक संपादित केल्या? तुम्ही कोणत्या चुकीबद्दल बोलत आहात?
यात काय न जमण्यासारखे? मला
यात काय न जमण्यासारखे? मला तुमच्या अमुक तमुक कथेचा आशय आवडला नाही तर शक्य झाल्यास अशी कथा पुढे लिहू नका. याने लोकांवर असे अमुकतमुक घातक परीणाम होतील वगैरे सल्ला उपदेश सूचना विनंती योग्य भाषेत खाजगी संपर्कातून सांगणे शक्य आहेच. >>>>>> हो नक्कीच.. माझा प्रतिसाद गंमतीनं (डोमा ध्यानात आला असेलच) तर होताच पण असं कुणी सहसा करत नाही हे सांगणाराही होता....
संपादित.
पण असं कुणी करत नाही हे
पण असं कुणी करत नाही हे सांगणाराही होता....
>>>>>
मला स्वतःलाच दोन अनुभव आहेत. नाव नाही सांगू शकत, अन्यथा खाजगीकरनाच्या हेतूलाच तडा जायचा.
हुप्पाहुय्या हा धागा
हुप्पाहुय्या हा धागा काढण्याबद्दल धन्यवाद.
)
इतके दिवस ऋन्मेऽऽषच्या पोस्ट स्किप करणे जमायचं नाही. या धाग्यावर त्या पोस्ट पूर्ण इग्नोर करून पुढे जाता आले. फिलिंग गुड.
(सेकंड थॉट, हे ही प्रतिक्रिया देणाऱ्याचे bashingच झालं ...
इतके दिवस ऋन्मेऽऽषच्या पोस्ट
इतके दिवस ऋन्मेऽऽषच्या पोस्ट स्किप करणे जमायचं नाही. या धाग्यावर त्या पोस्ट पूर्ण इग्नोर करून पुढे जाता आले. फिलिंग गुड. >>>>


अमितव, का केलंत हो असं? का नाही दिली प्रतिक्रिया?
अरेच्चा!!! हेही bashing च की!!
प्रतिसाद कोणाचा आहे हे नाव
प्रतिसाद कोणाचा आहे हे नाव शेवटी येते ना?
बाकी हुप्पाहुय्या यांनी
बाकी हुप्पाहुय्या यांनी पूर्वी इतरांच्या धाग्यावर रुन्मेश प्रतिक्रिया देऊन त्या धाग्याची वाट लावतो म्हणून जे मध्यंतरी कॅम्पैग्निंग केलेले (ज्याला माझा पाठींबा आहे) त्याला bashingच म्हणतात ना? का आणखी काही?
<<<स्वाती , रूनमेश, राहुल +
<<<स्वाती , रूनमेश, राहुल + 99999999>>>
आता हे जाहीर ठिकाणी लिहीले. जाहीर लेखनावर प्रतिसाद देणे हा मा़झा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी बजावणारच!
काहो, ही कंजुषी कशाला? ९९९९९९९९, नि ते सुद्धा इंग्रजीत?
+१ देऊन सरळ १०००००००० लिहीले असते तर १ रु. जास्त पडला असता का?
नि म्हणतो पडला असता तर पडला असता. नाहीये का तुमच्याकडे? कुणिहि दिला असता.
असे हातचे राखून बोलायला हे काय राजकारण आहे?
वचने कं दरिद्रता असे वेदात सांगितले आहे (खरे तर नाही. पण वेद कुणि वाचले आहेत? असेल, म्हणून लोक सोडून देतील!)
आता या प्रतिसादाचे वर्गीकरण करा.
पेपरच्या छापील माध्यमातून
पेपरच्या छापील माध्यमातून प्रतिक्रिया कळत नसत॥ पण आता तसं होत आहे. वाइट्ट लिहितो हे कळल्याने वाइट कशाला वाटून घ्यायचं? आता प्रतिसादांनाही वाहवा अथवा विरोध होतोय हे चांगलंच आहे. लेखकाने टक्केवारी पाहावी, अमक्याला आपले लेखन नेहमीच आवडत नाही हे लक्षात ठेवावे. दुसरा काही उपाय नाही.
बाकी एक/दोन/तीन आकडी संख्येत गुणांकन करायचं तर ९ अथवा९९अथवा ९९९ याच संख्या येतील.
काहो, ही कंजुषी कशाला?
काहो, ही कंजुषी कशाला? ९९९९९९९९, नि ते सुद्धा इंग्रजीत?
+ साइन मराठी आहे की नांदूशेत
प्लस (+) साईन हिब्रू मध्ये
प्लस (+) साईन हिब्रू मध्ये उलटा T सारखी काढतात माहित होतं. मराठीत काही वेगळी काढतात का हल्ली? त्रिशूळ, चक्र, कमळफुल इत्यादी काही?
अमितव ☺️☺️☺️
अमितव ☺️☺️☺️
अमितव, स्वास्तिक विसरलंच की!!
अमितव, स्वास्तिक विसरलंच की!!!
बाकी हुप्पाहुय्या यांनी
बाकी हुप्पाहुय्या यांनी पूर्वी इतरांच्या धाग्यावर रुन्मेश प्रतिक्रिया देऊन त्या धाग्याची वाट लावतो म्हणून जे मध्यंतरी कॅम्पैग्निंग केलेले (ज्याला माझा पाठींबा आहे) त्याला bashingच म्हणतात ना? का आणखी काही? >> ऋन्मेष ह्यांचा कुठलाही लेख्/कथा डीरेल करून अवांतर ट्रॅक वर नेऊ शकण्याचे मूळ ह्या प्रतिक्रियांवर प्रतिक्रिया येण्याच्या प्रॉब्लेमचे फलित आहे.
मला मुक्तं विचारांतून आलेल्या प्रतिक्रिया वाचण्यात आणि त्या प्रतिक्रियांमागचा विचार समजून घेण्यात ईंट्रेस्ट आहे. लेखनावर वाचकांची प्रतिक्रिया मग अजून त्या प्रतिक्रियांचे मॉरल पुलिसिंग करावयाची गरज मला कळत नाही. बाकी साईट्स वर साईट अॅडमिन प्रतिक्रियांचे पब्लिश होण्याआधी मॉडरेशन करतात मग जर ईथे स्वातंत्र मिळालेले आहे तर मग जे आपले मत आहे ते लिहायला बाकीच्यांकडून मॉडरेशन आणि ह्या स्वातंत्र्याचा अनादर का व्हावा?
तुम्हाला कथा आवडली तुम्ही जीव ओतून कौतूक करा. एक सोडून पंचवीस कौतुकाच्या प्रतिक्रिया लिहा. पण एखाद्याने त्याला प्रामाणिकपणे वाटले तसे टीकात्मक लिहिले किंवा लिखाणातल्या चुका काढणारी प्रतिक्रिया लिहिली तर त्याबद्दल ईतरांना प्रॉब्लेम का असावा हे न कळण्याजोगे आहे.
पब्लिक स्पेस वर तुम्ही लिहिलेल्यावर आम्ही हवे ते लिहिणारंच असे रेक्काऊन बोलल्याने काही अधिकार शाबित होतो का?
स्वाती_आंबोळे ह्यांनी 'मग खाजगीतून संपर्क साधा' असे सुचवले - हे सोल्यूशन कसे होऊ शकते? लेखाखाली प्रतिक्रिया देणे जास्तं रिलेवंट आहे तशी सोयही करून दिली आहे आणि माझी लेखकाशी खाजगी संपर्क साधण्याची काहीही ईच्छा नाही तर मी का राजमार्ग सोडून आडमार्ग पत्करावा.
एखाद्याची प्रतिक्रिया फक्तं आणि फक्तं लेखनासंदर्भात त्या लेखकासाठी आहे आणि त्याला ईतरांशी त्यावर चर्चा करण्यात काहीही ईंट्रेस्ट नाहीये हे समजणे आणि पाळणे एवढे अवघड आहे का? आपण एवढे कंपल्सिव आहोत का की एखाद्याच्या प्रतिक्रियेवर रिअॅक्ट होण्याशिवाय दुसरे ऑप्शन नाही.
ऋन्मेष ह्यांचा कुठलाही लेख्
ऋन्मेष ह्यांचा कुठलाही लेख्/कथा डीरेल करून अवांतर ट्रॅक वर नेऊ शकण्याचे मूळ ह्या प्रतिक्रियांवर प्रतिक्रिया येण्याच्या प्रॉब्लेमचे फलित आहे. >> बरं असं मानून चालू. पण मग म्हणून तुम्हाला रुन्मेशच्या प्रतिक्रियांवर प्रतिक्रिया द्यायची मुभा आहे का? का हा अपवाद आहे? मग तो जर अपवाद आहे तर इतर काही कॉर्नर केसेस वर विचार झाला आहे का? का इतर करतात ते पुलिसिंग आणि तुम्ही करता ती मोरल हाय ड्युटी असला काही भंपकपणा आहे?
तुम्ही काही वेगळं केलं आहे आणि केलं असल्यास कसं? हे जो पर्यंत क्लिअर होत नाही तो पर्यंत हा धागा ही तुमच्या पुलिसिंगच्या डेफिनिशन मध्ये मोडतो असं माझं मत आहे. ओपन फोरम वर चर्चा डीरेल न होता/ सर्वसाधारण नेट वावराचे नियम पाळून तुम्ही आणि इतर सर्वजण प्रतिसादांवर प्रतिसाद लिहीतच असतात. हे का थांबवावे हे मला समजले नाही. टेक्निकली कसं करावं/ कितपत फिजिबल आहे हा पुढचा प्रश्न. (हे ट्री व्ह्यू ने शक्य होईल. अशा बोल्ड आणि रंगीत प्रतिसादाची कमी जाणवते आहे
)
आपण एवढे कंपल्सिव आहोत का की एखाद्याच्या प्रतिक्रियेवर रिअॅक्ट होण्याशिवाय दुसरे ऑप्शन नाही. >> हे ज्याचं तो बघून घेईल. तुम्ही का बरं कंपल्सिव्ह होताय?
अमितव... एकदम व्यवस्थित
अमितव... एकदम व्यवस्थित प्रतिसाद... मला पण हेच म्हणायचे होते... इन्का खून .. खून ..बाकीयोंका खून पानी...
मी ऋन्मेष ह्यांच्या स्वतःच्या
मी ऋन्मेष ह्यांच्या स्वतःच्या फ्रिजच्या धाग्यावर बहुतांश प्रतिक्रिया लिहिलेल्या आहेत ईतरांच्या धाग्यावर नाही. असे समजू 'कदाचित लिहिल्या असतील' त्यांनाच नाही तर कदाचित ईतरांनाही लिहिलेल्या असतील पण त्या फक्तं माझ्या प्रतिक्रियांवर 'त्या' ईतरांनी आक्षेप घेतल्यावर ऊत्तरा दाखलच. नेमके जे मला नको आहे आणि ते टाळण्याबाबतंच मी ईथे बोलते आहे.
तुम्ही काही वेगळं केलं आहे आणि केलं असल्यास कसं? हे जो पर्यंत क्लिअर होत नाही तो पर्यंत हा धागा ही तुमच्या पुलिसिंगच्या डेफिनिशन मध्ये मोडतो असं माझं मत आहे. ओपन फोरम वर चर्चा डीरेल न होता/ सर्वसाधारण नेट वावराचे नियम पाळून तुम्ही आणि इतर सर्वजण प्रतिसादांवर प्रतिसाद लिहीतच असतात. हे का थांबवावे हे मला समजले नाही. टेक्निकली कसं करावं/ कितपत फिजिबल आहे हा पुढचा प्रश्न. (हे ट्री व्ह्यू ने शक्य होईल. अशा बोल्ड आणि रंगीत प्रतिसादाची कमी जाणवते आहे Proud ) >> मी कधीही लेख सोडून त्याखालील ईतरांच्या प्रतिक्रियांवर प्रतिक्रिया दिलेली नाही, आक्षेप घेणे तर लांबची गोष्टं. ईतरांच्या प्रतिक्रियांची अनवॉलंटरी चिरफाड मी करत नाही आणि करणारही नाही.
तुम्हाला प्रतिक्रियांमधून संवाद साधायचा आहे कन्स्ट्र्कटिव चर्चा करायची आहे अवश्य करा, पण जर एखाद्याने प्रतिक्रियेत लिहिले की 'ही प्रतिक्रिया कोट करू नये किंवा ती चर्चेला घेवू नये' तर ऊदार मनाने त्या आयडीच्या मताचा आदर करता आला पाहिजे.
अशी नोट लिहिणे एवढेच एक टेक्निकल सोल्यूशन सध्या दिसते आहे.
आपण एवढे कंपल्सिव आहोत का की एखाद्याच्या प्रतिक्रियेवर रिअॅक्ट होण्याशिवाय दुसरे ऑप्शन नाही. >> हे ज्याचं तो बघून घेईल. तुम्ही का बरं कंपल्सिव्ह होताय? >> हे मी 'आम्ही तुमच्या प्रतिक्रियांवर रिअॅक्ट होणारंच' असे म्हणणार्यांना त्यांना लिहिलं आहे.
तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया ईतरांनी कोट करून चर्चेला घेण्यात वा त्यातल्या तुमच्या मतावर प्रश्नं विचारण्यात काही ईश्य्यू नाही, मलाही नाही.
प्रतिक्रिया जज केल्या जाणार आणि लेबलं लावली जाणार नाही ह्याची हमी नाही, ह्यातही तुम्हाला काही ईश्यू वाटत नसेल तर तुम्ही पुढे चर्चा करूच शकता, पण ज्यांना एकदा प्रतिक्रिया दिल्यानंतर ही पुढची ऊठठेव नकोय त्याचं काय?
जर एखाद्याने प्रतिक्रियेत
जर एखाद्याने प्रतिक्रियेत लिहिले की 'ही प्रतिक्रिया कोट करू नये किंवा ती चर्चेला घेवू नये' तर ऊदार मनाने त्या आयडीच्या मताचा आदर करता आला पाहिजे.
>>>>> या मुद्याशी सहमत. जर असे कोणी लिहणार असेल नक्कीच ती प्रतिक्रिया इग्नोर करण्यात यावी चर्चेसाठी...
की 'ही प्रतिक्रिया कोट करू
की 'ही प्रतिक्रिया कोट करू नये किंवा ती चर्चेला घेवू नये' तर ऊदार मनाने त्या आयडीच्या मताचा आदर करता आला पाहिजे.
अशी नोट लिहिणे एवढेच एक टेक्निकल सोल्यूशन सध्या दिसते आहे.>>>>> अहो अस्कसकाय होईल? पब्लिक फोरम वर येऊन प्रतिक्रिया द्यायची पण त्या प्रतिक्रियेवर दुसर्यांनी काही म्हणू नये असा नियम घालणं कसं शक्य आहे? आणि त्याही पेक्षा का घालावा हा मुख्य मुद्दा आहे.
लेख न वाचता प्रतिक्रिया देउ नये. लेख न वाचता फक्त प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया कशाला द्यायची हे ज्याचे त्याचे वैयक्तिक दृष्टिकोनातून त्यांचा शिष्टाचाराच्या काय कल्पना आहेत त्यावरुन ठरतं, जे पुर्ण पणे सापेक्ष आहे असं म्हणता येइल. एकंदरितच काय बरोबर आणि काय चूक हे ठरवण्यात "सापेक्षता" हा मोठा मुद्दा असल्यामुळे त्याबाबतीत ठोस नियम असणे ह्याला वॅलिड बेसिस नाहीये काहीच.
Pages