प्रतिक्रिया देणार्‍यांचे होत असलेले बॅशिंग.

Submitted by हुप्पाहुय्या on 28 July, 2017 - 13:26

मायबोलीवरील कथा, ललित, लेख, गझल, कविता ई. साहित्य प्रकारांवर येणार्‍या प्रतिक्रियांना किंवा प्रतिक्रिया देणार्‍याला ईतर लोकांनी झोडपून प्रतिक्रिया देणार्‍याच्या प्रार्थमिक हक्कावर आक्षेप घेण्याबद्दल मायबोलीकरांची काय भुमिका आहे.?

प्रतिक्रियांच्या (चर्चेच्या नव्हे) अपेक्षेने लिहिलेल्या लेखावर किंवा कथेवर आलेली प्रतिक्रिया हा फक्तं आणि फक्तं लेखक आणि प्रतिक्रिया देणारा वाचक ह्यांच्यातला मामला आहे. असे असतांना ईतरांना प्रतिक्रिया देणार्‍याचे बॅशिंग करण्याचा काय हक्कं आहे?
लेख/ कथा हा काही चर्चेचा धागा नाही, चर्चा हवी असल्यास ती करण्यासाठी वेगळे धागे ऊघडण्याची सोय ऊपलब्धं आहे. तिथे कुणीही चर्चेत भाग घेणार्‍या ईतरांच्या प्रतिक्रिया कोट करुन प्रतिसाद लिहू शकते.

लेख्/कथा/कवितांवर कोणीही त्याला हवी तशी प्रतिक्रिया देवू शकतो. लेख चांगला वाटल्यास, आवडल्यास किंवा टीका करायची असल्यास तशी प्रतिक्रिया देण्याची मुभा मायबोलीने दिलेली असतांना त्या प्रतिक्रियेवर मतप्रदर्शानाचा अधिकार कुणाला का मिळावा?
वेगळ्या स्थळ, काळ, समाजात राहणार्‍या वाचकांकडून वेगळ्या प्रतिक्रिया येणारंच. कथेच्या लेखकाला काही आपत्ती असल्यास ती किंवा तो प्रतिक्रिया देणार्‍याशी थेट संवाद साधत असतांना ईतरांनी त्यात लुडबुड का करावी? गरज पडल्यास लेखकासाठी आणि प्रतिक्रिया देणार्‍यासाठी प्रशासनाची मदत घेण्याचाही मार्ग ऊपलब्धं आहे.

ईतरांची लुडबूड मनाजोगती प्रतिक्रिया देण्याच्या प्रत्येक मायबोलीकराच्या हक्कावर ही गदा आहे आणि हे थांबावे असे मला वाटते. कथा/कविता /लेखाचा विषय्/आषय बाजूला पडून एकमेकांच्या प्रतिक्रियांचे बॅशिंग हे लेखकासाठी आणि ईतर वाचकांसाठी क्लेशकारकच असते.

ईतरांच्या प्रतिक्रिया देण्याच्या हक्काप्रती सौजन्य दाखवावे किमान ईतकी अपेक्षा मायबोलीकरांकडून करणे रास्तं नाही का?

प्रतिक्रिया देणार्‍यांना झोडपणे हे आधी झाले असेल पण म्हणून पुढेही होत रहावे आणि होत राहिल हे बरोबर नाही. निर्मात्याने भूतकाळात झालेल्या चुका सुधारण्यासाठी भविष्यकाळाची तरतूद केलेलीच आहे.

*हा धागा चर्चेसाठीच ऊघडला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असू दे. बरा असतो एकमेकांवर चेक असलेला. लेखनाशी संबंधित अभिप्राय (पे अभिप्राय) येईनात का कितीही! पर्ष्नल से सवाल नाही उभे केले म्हणजे झालं. Happy

म्हणजे कथेवर दिलेल्या अभिप्रायावरून 'अस्संच नेहमीच्च करतातच्च काही जण(च्च!)' वगैरे म्हटलं तर मग गाडी लेखनाच्या कळवळ्यापेक्षा पर्सनल स्कोअर सेटलिंगवर गेली असं वाटायला लागतं.
चालायचंच. Happy

असू दे. बरा असतो एकमेकांवर चेक असलेला. >> चेक कुणाचा, कुणावर आणि कश्यासाठी? सगळेच मायबोलीकर एथिक्स कमिटीचे मेंबर आहेत का? सगळेच पोलिसिंग करायला लाग्ले तर मग निष्पक्ष प्रतिक्रियांची अपेक्षाच ठेवू नका असे म्हणायचे आहे का?
माझे बॅशिंग मला टाळायचे असेल तर माझी प्रतिक्रिया मी सोडून सगळ्या मायबोलीकरांच्या एथिक्स कमिटीने प्रमाणित करणे जरूरी आहे का?

आपले नाव कोट करून कोणी आपल्या प्रतिक्रियेचे जजमेंट द्यावे हे एखाद्याला नको असेल तर त्याच्यासाठी काय पर्याय ऊपल्ब्धं आहेत तुमच्याकडे?

मुळात प्रतिक्रिया देणारे कोणत्या लेवल ला गेलेत ते पहार मग कळेल बाकी लोक का झोडपटायत >> तुम्ही कोण? आणि का ठरवणार लेवल? मायबोली प्रशासनाने तुम्हाला एथिक्स कमिटीचे सभासदत्व दिले आहे का ऑफिशिअली?

कथा/ कविता यावर अभिप्रायावर अभिप्राय असं फार झालेलं आठवत नाहीये. म्हणून उदाहरण देऊन मुद्दा स्पष्ट करणार का?

कथा/ कविता यावर अभिप्रायावर अभिप्राय असं फार झालेलं आठवत नाहीये. म्हणून उदाहरण देऊन मुद्दा स्पष्ट करणार का?>>
सद्ध्या पुढच्या धाग्यावर घडतंय..
https://www.maayboli.com/node/63237.

ह्म्म्म. बरोबर आहे तुमचं.

आताच एका 'टुकार हास्यास्पद लेखा'वर मी माझे मत देऊन आलो तर त्या प्रतिक्रियेचे लेखकापेक्षा तिथल्या वाचकांना जास्त दु:ख झालेले दिसले, अगदी बुद्धीची कीव करतो वगैरे, तुमच्याकडे जे असते ते तुम्ही इतरांना देता इत्यादी इत्यादी वैयक्तिक हल्ले करणारे प्रतिसाद दिसले. कमाल आहे. चाय से ज्यादा किटली गरम.....

इन्टरेस्टिंग धागा वाटला. Happy

असे वाटले की त्या आधी 'मूळ प्रतिक्रिया किमान कोणत्या पातळीच्या असाव्यात' ह्यावर एक धागा यायला हवा होता. अर्थात, त्याला 'वावराचे नियम' हा धागा आहेच, पण त्याबरहुकुम कितीजण प्रतिसाद लिहितात? हा तो धागा:

https://www.maayboli.com/node/4843

आता मूळ प्रतिसाद ह्या धाग्यातील सूचनांप्रमाणे आले तर सगळेच आलबेल व्हायला हवे. पण मूळ प्रतिसाद तसे येत नाहीत. ते दुखावणारे, आकसयुक्त, उगीच पाणउतारा करणारे, पर्सनल स्वरुपाचे ह्यापैकी काहीही असू शकतात.

मग अश्या मुळातच नियमावलीनुसार नसलेल्या प्रतिसादांना कोणी दुसराच येऊन त्याच पद्धतीने झोडपू लागला तर दोष फक्त त्याचा कसा, हा प्रश्न मनात आला.

तरीही, प्रतिसादांच्या स्वातंत्र्यावर इतर प्रतिसाददात्यांनी बंधने आणणारे प्रतिसाद द्यायची गरज नाही हे पटत आहे. पण मग मोकाट सुटलेल्या 'मूळ' प्रतिसाददात्यांना समज मिळण्याचे प्रमाणही तितकेच वाढायला हवे ना? आणि जर तुम्ही असे म्हणत असाल की मूळ प्रतिसाद वाट्टेल तसे असले तरी ते त्या प्रतिसाददात्यांचे स्वातंत्र्य आहे तर मग त्यावर प्रतिसाद देणार्‍यांवरच बंधन का? Happy

हे सगळे जाऊदेत, पण प्रतिसाद देताना एक किमान माणुसकीही दर्शवली जात नाही असे कित्येक प्रतिसाद दिसतात. ज्याला उद्देशून ते प्रतिसाद आहेत तो प्रत्यक्षात कसे आयुष्य (तुम्ही म्हणता तसे स्थळकाळप्रतल वगैरे) जगतो, तो खरंच बाळबोध असेल का, त्याला त्रास होईल का ह्याचा विचारही केला जात नाही. म्हणजे आभासी जगाच्या बाहेर जगायचेच नाही जणू! सगळी भडास इथेच काढायची. हे काय?

टीप - एक आय डी गेल्यावर दुसरा घेऊन बेताल लिहू लागणार्‍यांबद्दल तर हे मुळीच नाही.

चु भु द्या घ्या

हुप्पाहुय्या ताई धन्यवाद! या धाग्याची गरज होती...
सगळ्यात महत्वाचं म्हणजे, नविनच लिहू लागलेले मुलंमुली यांचा वयोगट..लिहायची सुरूवात करतात, मोठ्या उत्साहानं पब्लिक फोरम वर टाकतात. फेसबुक सारख्या सोशल मिडिया वर टाकलं तर तेथे ठराविक टाईपचे साचेबद्ध (लय भारी, कडक, हवा, धूर, भावा जमलंय वैगरे) प्रतिसाद येतात. ते प्रतिसाद देणार्या बहुतांश जणांना लेखणाचं साहित्यिक मुल्य कळत असतंच असं नाही.. मग मायबोली सारख्या संस्थळावर जर आपलं लेखन टाकलं तर येथे तज्ञ लोकं असतात, जाणकार असतात. त्यांच्याकडून सखोल परीक्षण होतं आणि लिहीणार्याला फिडबैक मिळतं ज्यातून स्वत:ला सुधरावता येतं. मायबोलीवर येण्यामागे असलेल्या अनेक उद्दिष्टांपैकी हे एक.
प्रतिसाद पॉजिटिव असो वा निगेटिव दोन्ही स्वीकारायला हवेत मान्य आहे. पण आमची समस्या वेगळी आहे.

मी येथेच एक कविता वाचलेली, आशय सुंदर होता पण लेखिकेचा पहिलाच प्रयत्न होता, शुद्धलेखनाच्या चुका होत्या. तिला आलेली पहिलीच प्रतिक्रिया- 'शुद्धलेखन शिका कविता नंतर करा.'
मला स्वत:ला आलेली (माबोवर नव्हे इतरत्र) अशीच एक, 'बरेच सुमार लेखक नव्यानं येताहेत.'
हा धागा ज्यामुळे काढला गेलाय तिथे, 'लिहू नका, पुढचा भाग नाही आला तरी चालेल.'
अरे काय करता आहात तुम्ही लोकं? प्रतिक्रिया द्यायचीये? द्या की! निगेटिव द्यायचीय? चालेल. पण ती 'संयत' भाषेत द्या,समजावून सांगा. त्यामुळे लिहीणारा प्रोत्साहित होतो. आपल्या लेखनात सुधारणा घडवून आणण्याच्या मागे लागतो. पॉजिटिव प्रतिसाद लिहीला तर 'दुधात साखर!'
मुद्दा, डिसकरेज करू नका. नविन मुलामुलीना तरी. Happy
इथे अनेक रथी महारथी आहेत. उदाहरण आपले बेफी! जर त्यांनी काही लिहीलं असेल त्यावर तुम्ही निगेटिव प्रतिक्रिया दिली व लिहू नका म्हटलंत (अशी प्रतिक्रिया देताना तुम्ही चारदा सर्वांगानं विचार करणार मग बोटं चालवणार.) तर ते लिहीणं थांबवतील का? नक्किच नाही. पण जे लहान मुलं येताहेत त्यांना जर तुम्ही लिहूच नका म्हणताहात तर हे 'कळ्यांना खुडविण्याचं' काम करता आहात. आमची हीच तक्रार! ही नविनं मुलं नाउमेद होऊन लिहीणं बंद करतात हे वास्तव आहे. मग ज्यांनी आजवर काहीच लिहीलं नाही तेही लिहीणं टाळतात भितीपोटी.. तुम्ही जे तात्काळ बोलून मोकळे होतात त्याचे न दिसणारे परिणाम आहेत वरचे..
माझ्या एका छोट्या लेखावर मला येथिल एक सदस्या, त्यांनी निगेटिव प्रतिसाद दिलेला! त्यांचं नाव घ्यायला काहीच हरकत नाही, दक्षिणा ताई!!! मी तर म्हणतो एक आदर्श निगेटिव प्रतिक्रिया होती म्हणून लक्षात राहीली, 'राहुल, जेवढं लिहीलंय त्यावरून इतकंच पोहोचतंय. काहीतरी राहून गेलंय.' मला खुप आवडली ही प्रतिक्रिया.

एकच विनवणी,

खुडवू नका रे नविन कळ्यांना..
पाणी घाला प्रतिभेच्या मळ्यांना..
उमलू द्या ह्या उद्याच्या सुमनांना..
Happy

धन्यवाद Nidhii. आता पर्स्पेक्टीव्ह मिळाला.
तिकडच्या मूळ प्रतिक्रिया इतक्या जहाल आहेत की त्यावर प्रतिक्रिया न देण्यापासून स्वतःला परावृत्त करायला मलाही फार कष्ट पडले.
सो या विषयावर सर्वसमावेशक माझं मत नाही. या वरच्या धाग्यात लिहिलेले अनेक मुद्दे मान्य असूनही अपवाद असावे असं मला वाटतं.

बेफिकीर + 1.
राहुल +1.

हुपपाहुईया... प्रत्येकाला अधिकार आहे प्रतिसाद द्यायचा... लोक उगाचच कोणाची बाजू घेत नाहीत... एथिक्स कमिटी लागत नाही कोण चूक कोण बरोबर समजायला...

याच उत्तम उदाहरण तुम्ही आहेत... रूनमेश चे धागे कसे वाईट हे तुम्ही स्वतः ठरवून मोकळे झाला आहे.. तुम्ही निगेटिव्ह कंमेंट टाकली तर नक्कीच लोक ओप्पोस करणार.. आणि करत राहतील...

आता ज्या धग्यामुळे हे सुरू झाले... अजय चव्हाण यांना पुढचा भाग टाकू नका, फडतूस लिखाण.. असे ज्यांनी लिहिले त्यावर प्रतिक्रिया लोक का देणार नाहीत..त्यांना पण अधिकार आहे उत्तर द्यायचा….

आवडले नाही लिखाण... स्पष्ट सांगू शकता.. फडतूस, पुढचा भाग लिहू नका हे सांगणारे तुम्ही कोण...

>>> चेक कुणाचा, कुणावर आणि कश्यासाठी? सगळेच मायबोलीकर एथिक्स कमिटीचे मेंबर आहेत का? सगळेच पोलिसिंग करायला लाग्ले तर मग निष्पक्ष प्रतिक्रियांची अपेक्षाच ठेवू नका असे म्हणायचे आहे का?

चेक म्हणजे आपण लिहिला त्याव्यतिरिक्तही दृष्टीकोन असू शकतात ही जाणीव.
जोवर माझी पोस्ट तुम्हाला अपडेट / डिलीट करता येत नाही तोवर ते पोलिसिंग कसं? ते मतप्रदर्शनच आहे.
साहित्यकृतीवरची प्रतिक्रिया पटली तर घ्यावी नाहीतर दुर्लक्ष करावं तसंच प्रतिक्रियांवरच्या प्रतिक्रियांबाबतही म्हणता येईल.

इथे अनेक क्रमश: साहित्यकृतींवर 'पुढचा भाग लवकर टाका / पुढील भागाच्या प्रतीक्षेत' अशा पोस्ट्स येतात. त्याही चुकीच्या वाटतात का? मग 'पुढचा भाग नाही आला तरी चालेल' असं म्हटलं तर काय झालं? एक प्रतिक्रिया तशी आली तर ती कॉम्पेन्सेट करणार्‍या दहा 'लिहा हो' अशा प्रतिक्रियाही आल्यात ना? लेखकाला त्याचा गोषवारा समजेल.

अनेकदा कन्टेन्ट आवडला तर शुद्धलेखनासारख्या बाबींकडे कानाडोळा केला जातो असं माझं निरीक्षण आहे. तेव्हा प्रथम किंवा केवळ त्याबद्दलच बोललं गेलं तर याचा अर्थ वाचणार्‍यापर्यंत कन्टेन्ट पोचला नाही किंवा त्याला तो आवडला नाही असा असावा असं मानायला वाव आहे.

साहित्यकृतीवरची प्रतिक्रिया पटली तर घ्यावी नाहीतर दुर्लक्ष करावं तसंच प्रतिक्रियांवरच्या प्रतिक्रियांबाबतही म्हणता येईल. >> +१

आता मूळ प्रतिसाद ह्या धाग्यातील सूचनांप्रमाणे आले तर सगळेच आलबेल व्हायला हवे. पण मूळ प्रतिसाद तसे येत नाहीत. ते दुखावणारे, आकसयुक्त, उगीच पाणउतारा करणारे, पर्सनल स्वरुपाचे ह्यापैकी काहीही असू शकतात.
मग अश्या मुळातच नियमावलीनुसार नसलेल्या प्रतिसादांना कोणी दुसराच येऊन त्याच पद्धतीने झोडपू लागला तर दोष फक्त त्याचा कसा, हा प्रश्न मनात आला. > एकाने दुसर्‍याच्या घरी चोरी केली तर तिसर्‍याला दुसर्‍याच्या घरी चोरी करायचा परवाना मिळतो का ? मग प्रशासन कश्यासाठी आहे? तुम्हाला चोरी खुपली नाही तुम्ही ते प्रशासनाच्या निदर्शनाला आणून देऊ शकता.
त्या धाग्यावर 'अजय चव्हाण' ह्या लेखकापेक्षा प्रतिक्रियांवरच्या ईतरांच्या प्रतैक्रिया एक्स्ट्रीम आहेत. मग काय पहिल्या लोकांनी लेखाब्दाल त्यांची मते आणि प्रतिक्रिया बदलल्या का? मग काय साध्य झाले? लेखक बघून घेईलना काय कराय्चे ते बाकीच्यांनी ऊठाठेव का करावी?
मी वैयक्तिक आकसातून प्रत्येक लेखावर प्रतिक्रिया देणार्‍याचे ऊट्टे काढू लागले तर लेखक आणि ईतर वाचक वैतागून जाणार नाही का?
राहुल, तुम्हाला लेखकांना डिस्करेज करण्याबद्दल ईशू आहे ? नवीन चर्चा धागा ऊघडा.तो ह्या चर्चेचा विषय नाही.

साहित्यकृतीवरची प्रतिक्रिया पटली तर घ्यावी नाहीतर दुर्लक्ष करावं तसंच प्रतिक्रियांवरच्या प्रतिक्रियांबाबतही म्हणता येईल. >> तुम्ही बेसिक फरक दुर्लक्ष करीत आहात. साहित्य कृती प्रतिक्रिया मिळणायाच्या अपेक्षेनेच लिहिलेल्या असतात. माझ्या प्रतुक्रियेवर मला प्रतिक्रियांची अपेक्षा नाही. ते माझे लेखाबद्दलचे मत आहे आणि ते कोणी जज करावे ह्यासाठी मी ते लिहिलेले नाही.

इथे अनेक क्रमश: साहित्यकृतींवर 'पुढचा भाग लवकर टाका / पुढील भागाच्या प्रतीक्षेत' अशा पोस्ट्स येतात. त्याही चुकीच्या वाटतात का? मग 'पुढचा भाग नाही आला तरी चालेल' असं म्हटलं तर काय झालं? एक प्रतिक्रिया तशी आली तर ती कॉम्पेन्सेट करणार्‍या दहा 'लिहा हो' अशा प्रतिक्रियाही आल्यात ना? लेखकाला त्याचा गोषवारा समजेल.
अनेकदा कन्टेन्ट आवडला तर शुद्धलेखनासारख्या बाबींकडे कानाडोळा केला जातो असं माझं निरीक्षण आहे. तेव्हा प्रथम किंवा केवळ त्याबद्दलच बोललं गेलं तर याचा अर्थ वाचणार्‍यापर्यंत कन्टेन्ट पोचला नाही किंवा त्याला तो आवडला नाही असा असावा असं मानायला वाव आहे. >> ह्या दोन्ही मुद्द्यांबद्दल मला काहीही आक्षेप नाही ऊलट ते मान्यच आहेत.

इथे अनेक क्रमश: साहित्यकृतींवर 'पुढचा भाग लवकर टाका / पुढील भागाच्या प्रतीक्षेत' अशा पोस्ट्स येतात. त्याही चुकीच्या वाटतात का? मग 'पुढचा भाग नाही आला तरी चालेल' असं म्हटलं तर काय झालं?

>>> हे लॉजिक काई पटलं नाही.... पुभाप्र हे प्रोत्साहन आहे तर पुढे लिहूच नका हा प्रतिबंध समजावा का?

याच उत्तम उदाहरण तुम्ही आहेत... रूनमेश चे धागे कसे वाईट हे तुम्ही स्वतः ठरवून मोकळे झाला आहे.. तुम्ही निगेटिव्ह कंमेंट टाकली तर नक्कीच लोक ओप्पोस करणार.. आणि करत राहतील... > पुन्हा तोच प्रश्नं. तुम्ही कोण? आणि का ठरवणार मी लिहिलेलं निगेटिव आहे? मायबोली प्रशासनाने तुम्हाला एथिक्स कमिटीचे सभासदत्व दिले आहे का ऑफिशिअली?
मी लिहिलेले ऋन्मेष ह्यांना ऊद्देशून आहे तेव्हा ते पॉझिटिव की निगेटिव ते लेखक ऋन्मेष आणि मी बघून घेऊ. मला वाटतं ऋन्मेष ह्यांनीही तुम्हाला एक दोन वेळा ह्याबद्दल आठवण करून दिलेली आहे.

हुपपाहुईया यापुढं तुमचा एकही धागा आणि कंमेंट नाही आली तरी चालेल...नका लिहत जाऊ..
तुमचं लॉजिक लावून हा प्रतिसाद योग्य ठरतो का.. तुम्हीच सांगा..

राहुल, तुम्हाला लेखकांना डिस्करेज करण्याबद्दल ईशू आहे ? नवीन चर्चा धागा ऊघडा.तो ह्या चर्चेचा विषय नाही. >>>>
हुप्पाहुय्या, आपण गल्लत करता आहात. कथा, कविता अशा धाग्यांवर (अजय यांचा धागा व तत्सम) जे काही होतंय प्रतिसाद दात्यांमध्ये त्यामागची मुळ समस्या हे डीस्करेज करणं आहे...त्यालाच प्रतिबंध करायला हवा...

प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया देणार्‍यांचे होत असणारे बॅशिंग Happy

मायबोलीवरील कथा, ललित, लेख, गझल, कविता ई. साहित्य प्रकारांवर येणार्‍या प्रतिक्रियांवर जर कोणी संयमित भाषेत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तर त्यात गैर काही नसावे या मतापर्यंत मी पोहोचलो आहे.

एखाद्याची प्रतिक्रिया हा काही लेख नसतो. ते एखाद्याचे मत असते. एकदा का तुम्ही आपले मत, मग ते लेखावरचे मत असो वा चर्चेच्या धाग्यावरचे मत असो, सोशलसाईटवर टाकले तर ते मत पटले नाही असे सांगण्याचा आणि का पटले नाही हे देखील सांगण्याचा जन्मसिद्ध अधिकार त्या फोरमवर बागडणार्‍या प्रत्येकाला असायला हवा.

सोशलसाईटवर सार्वजनिक स्वरुपात प्रसिद्ध होणारी कथा आणि त्यावर येणारे प्रतिसाद हे केवळ दोन व्यक्तींमधील खाजगी संभाषण असते असे मला वाटत नाही. कारण बरेचदा काही प्रतिक्रियांमध्ये कथा चांगली आहे की वाईट यावरच भाष्य केलेले नसते. तर त्या कथेतील घटना, मुद्दा, प्रसंग घेऊन त्यावर भाष्य केलेले असते. अश्यावेळी त्याला निव्वळ कथेवरचा प्रतिसाद म्हणू शकत नाही. तो प्रतिसाद म्हणजे एक चर्चेची ठिणगी असते.

माझ्यामते सर्वात महत्वाचे आहे ते समोरच्या व्यक्तीबद्दल आणि त्याच्या मताबद्दल आदर, तसेच प्रतिसादातील भाषा. ते जमवले तर तुम्ही प्रतिसाद लेखावर द्या, प्रतिसादावर द्या किंवा प्रतिसादावर आलेल्या प्रतिसादावर द्या.. कधी कुठले प्रकरण चिघळणार नाही आणि असा वेगळा धागा काढायची गरज कधी भासणार नाही.

असो,

त्या धाग्यावरील चर्चा एका वेगळ्या धाग्यात आणलीत हे चांगले केलेत. मला वाटते तिथे सुरुवातीचे आलेले प्रतिसाद कथा चांगली लिहिलीय वा वाईट आली अश्या आशयाचे आले नसून पुढे कथा लिहू नका अशी प्रतिक्रिया आलेली त्यामुळे गदारोळ उडाला. कारण ईथे मग एक गंमत आहे. ईतर कोणाला ती कथा पुढे वाचायची असेल तर त्याला त्या प्रतिसादाला विरोध करणे भागच पडते.

तसेच त्या निमित्ताने एक वेगळाच मुद्दा चर्चेला आला. तो मुद्दा आपण या धाग्यात कंटिन्यू करू शकतो.
आणि तो म्हणजे, मायबोलीवर कुठल्याही लेखकाला क्रमश: नंतर पुढे लिहू नकोस असे सांगण्याचा हक्क प्रतिसादकर्त्याला असावा की नसावा? किंवा हक्क वगैरे एकवेळ बाजूला राहूद्या, पण असे एखाद्या लेखकाला सांगणे योग्य की अयोग्य?

हुपपाहुईया यापुढं तुमचा एकही धागा आणि कंमेंट नाही आली तरी चालेल...नका लिहत जाऊ..
तुमचं लॉजिक लावून हा प्रतिसाद योग्य ठरतो का.. तुम्हीच सांगा..>> आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

एक मुद्दा राहिला,
आपण प्रतिसाद देताना आळस म्हणून म्हणा किंवा आणखी काही म्हणा, वरच्याच प्रतिसाद घेऊन त्याला "प्लस वन" लिहितो..
अश्यावेळी ज्याचा मूळ प्रतिसाद असतो त्याचा आत्मा आतून नक्कीच सुखावत असेल, खोटे बोलू नका.
मग एखाद्या वेळी कोणी तुमचा प्रतिसाद कोट करत त्याला "मायनस वन" दिले तरी ते त्याच मोठेपणाने स्विकारायला हवे.
हा धागा चर्चेचा नाही तर कथेचा आहे, मी आणि कथालेखक काय ते बघून घेऊ हा स्टँड मला मायबोलीवर तरी चुकीचा वाटतो. फेसबूक मित्रांच्या खाजगी वॉलवर ते ठिक आहे.

मी लिहिलेले ऋन्मेष ह्यांना ऊद्देशून आहे तेव्हा ते पॉझिटिव की निगेटिव ते लेखक ऋन्मेष आणि मी बघून घेऊ.
>>>>>>>
मग विपु करा त्यांना सेपरेटली... सार्वजनिक ठिकाणी लिहिलेत तर आम्ही रिप्लाय करणारच..

>>> तुम्ही बेसिक फरक दुर्लक्ष करीत आहात. साहित्य कृती प्रतिक्रिया मिळणायाच्या अपेक्षेनेच लिहिलेल्या असतात. माझ्या प्रतुक्रियेवर मला प्रतिक्रियांची अपेक्षा नाही. ते माझे लेखाबद्दलचे मत आहे आणि ते कोणी जज करावे ह्यासाठी मी ते लिहिलेले नाही.
पण ते तुम्ही खाजगी संपर्कातून लेखकाला कळवलेलं नाही, जाहीर लिहिलंय.

चला आता धाग्यात शाहरूख आणतो Happy

जर मी शाहरूखचा फॅन आहे. कोणी त्याच्या यू ट्यूब वरच्या एका विडिओवर निगेटीव्ह कॉमेंट केली. जी मला पटली नाही. तर मी त्यावर आपले विरोधी मत नक्कीच व्यक्त करू शकतो. तो निगेटीव्ह कॉमेंट टाकणारा हा माझ्यातील आणि शाहरूखमधील प्रश्न आहे तुम्ही लांब राहा असे मला कसे बोलू शकेल मला?

काही पटत नसेल तर जरूर सांगा Happy

Pages