प्रतिक्रिया देणार्‍यांचे होत असलेले बॅशिंग.

Submitted by हुप्पाहुय्या on 28 July, 2017 - 13:26

मायबोलीवरील कथा, ललित, लेख, गझल, कविता ई. साहित्य प्रकारांवर येणार्‍या प्रतिक्रियांना किंवा प्रतिक्रिया देणार्‍याला ईतर लोकांनी झोडपून प्रतिक्रिया देणार्‍याच्या प्रार्थमिक हक्कावर आक्षेप घेण्याबद्दल मायबोलीकरांची काय भुमिका आहे.?

प्रतिक्रियांच्या (चर्चेच्या नव्हे) अपेक्षेने लिहिलेल्या लेखावर किंवा कथेवर आलेली प्रतिक्रिया हा फक्तं आणि फक्तं लेखक आणि प्रतिक्रिया देणारा वाचक ह्यांच्यातला मामला आहे. असे असतांना ईतरांना प्रतिक्रिया देणार्‍याचे बॅशिंग करण्याचा काय हक्कं आहे?
लेख/ कथा हा काही चर्चेचा धागा नाही, चर्चा हवी असल्यास ती करण्यासाठी वेगळे धागे ऊघडण्याची सोय ऊपलब्धं आहे. तिथे कुणीही चर्चेत भाग घेणार्‍या ईतरांच्या प्रतिक्रिया कोट करुन प्रतिसाद लिहू शकते.

लेख्/कथा/कवितांवर कोणीही त्याला हवी तशी प्रतिक्रिया देवू शकतो. लेख चांगला वाटल्यास, आवडल्यास किंवा टीका करायची असल्यास तशी प्रतिक्रिया देण्याची मुभा मायबोलीने दिलेली असतांना त्या प्रतिक्रियेवर मतप्रदर्शानाचा अधिकार कुणाला का मिळावा?
वेगळ्या स्थळ, काळ, समाजात राहणार्‍या वाचकांकडून वेगळ्या प्रतिक्रिया येणारंच. कथेच्या लेखकाला काही आपत्ती असल्यास ती किंवा तो प्रतिक्रिया देणार्‍याशी थेट संवाद साधत असतांना ईतरांनी त्यात लुडबुड का करावी? गरज पडल्यास लेखकासाठी आणि प्रतिक्रिया देणार्‍यासाठी प्रशासनाची मदत घेण्याचाही मार्ग ऊपलब्धं आहे.

ईतरांची लुडबूड मनाजोगती प्रतिक्रिया देण्याच्या प्रत्येक मायबोलीकराच्या हक्कावर ही गदा आहे आणि हे थांबावे असे मला वाटते. कथा/कविता /लेखाचा विषय्/आषय बाजूला पडून एकमेकांच्या प्रतिक्रियांचे बॅशिंग हे लेखकासाठी आणि ईतर वाचकांसाठी क्लेशकारकच असते.

ईतरांच्या प्रतिक्रिया देण्याच्या हक्काप्रती सौजन्य दाखवावे किमान ईतकी अपेक्षा मायबोलीकरांकडून करणे रास्तं नाही का?

प्रतिक्रिया देणार्‍यांना झोडपणे हे आधी झाले असेल पण म्हणून पुढेही होत रहावे आणि होत राहिल हे बरोबर नाही. निर्मात्याने भूतकाळात झालेल्या चुका सुधारण्यासाठी भविष्यकाळाची तरतूद केलेलीच आहे.

*हा धागा चर्चेसाठीच ऊघडला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>एखाद्याची प्रतिक्रिया फक्तं आणि फक्तं लेखनासंदर्भात त्या लेखकासाठी आहे आणि त्याला ईतरांशी त्यावर चर्चा करण्यात काहीही ईंट्रेस्ट नाहीये हे समजणे आणि पाळणे एवढे अवघड आहे का? आपण एवढे कंपल्सिव आहोत का की एखाद्याच्या प्रतिक्रियेवर रिअ‍ॅक्ट होण्याशिवाय दुसरे ऑप्शन नाही. <<<<

विषयाला हवे तसे वळण देत आहात. आता तुम्हालाच विचारतो. ज्यांना असे वाटत असेल की त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया याव्यातच, त्यांचे काय? आपल्या विद्वत्तेला, उपरोधिकपणाला, आक्रमकपणाला, दुसर्‍यांची अक्कल काढण्याच्या क्षमतेला दाद व समर्थक / पाठीराखे मिळावेत असे वाटून येथे बव्हंशी लोकं प्रतिसाद देतात. त्यांचे काय? पुन्हा हा मुद्दा आहेच की 'तुमचे आणि लेखकाचे' जे आहे ते जाहीररीत्या होत आहे म्हंटल्यावर जाहीररीत्याच त्यावरही प्रतिक्रिया येणार. आता समजा एखादा माणूस मूळ लेखनावर म्हणाला की बरे झाले, त्या लहान मुलाचा हट्ट पाहून त्याला चटका दिला गेला हे व्हायलाच हवे होते कथेत! तर ते वाचून सहृदय बाकीच्यांनी गप्प बसायचे का? आणि त्यांनी गप्प बसावे हे सांगणारे तुम्ही तरी कोण? तुम्हाला तरी कुठे मायबोली प्रशासनाने अधिकार दिले आहेत 'असे अधिकार इतरांना दिले आहेत का' हे विचारण्याचे? तुम्ही तुमचे पाहा आणि बाकीचे बाकीच्यांचे पाहतील. प्रतिक्रियांवरच्या प्रतिक्रिया हा प्रकार रद्द झाला तर ८० टक्के मायबोली ओस पडेल. इथे मुळी लोक येतात तेच स्वतःचा अहं सुखावून घ्यायला सर्वाधिक! त्यानंतर वाचन करायला / लेखन करायला.

आता ह्या प्रतिसादाची तुलना चव्हाणांच्या धाग्यावर मी दिलेल्या प्रतिसादाशी केली जाईल Proud

दोन्हीत फरक आहे. एखाद्या लेखकाला हाणून पाडून पूर्ण नाउमेद करणे निराळे आणि लेखातील विषयात इन्व्हॉल्व्ह होऊन त्यावर विचित्र प्रतिक्रिया नोंदवणे निराळे! म्हणजे कथेतील नायकाला समजायला नको का 'नो मीन्स नो', नालायक कुठला, फटके टाका त्याला, हे ठीक आहे. पण ही कथाच लिहू नका असे म्हणणे वेगळेच आहे. Happy

मस्तच रंगली की चर्चा.
हुप्पाहुय्या ताई, तुम्ही लिहा अजुन. चांगली चर्चा वाचायला मिळाली तुमच्यामुळे. मुळ लेखनातलं कंटेंट कितीही एकांगी असलं तरी मायबोलीकरांची अ‍ॅवरेज विचारसरणी कळली.
अवांतर, बेफी मधेमधे येउन असं लिहित रहा ओ तुम्ही. पुर्वीसारखे नसता तुम्ही इथे. जे काही मनात असतं (माझ्या आणि बर्याच जणांच्या असेलच) ते तुम्ही नेमकं लिहिलेलं असतं.

हा धागा ज्यावर आहे, त्या प्रकाराचं एकदम ताजं उदाहरण
https://www.maayboli.com/node/63284#new

हा धागा तर सरळ सऱळ हुप्पाहुय्यांसारख्या मायबोलीचं स्पिरिट जपू पाहणार्‍या सदस्यांना खुले आव्हान आहे, या धाग्याचा उपमर्द आहे , असंच मला वाटतंय.

मग सांगा, एक लेखक म्हणून कोण मायबोलीवर आपले लेखन प्रसिद्ध करेल?
अपवाद ऋन्मेष Happy>> Rofl हे भारीये ऋ..
दहा कशाला शंभर जणांची टोळी तुझ्या लेखनावर तुटून पडली तरी तूच भारी पडशील त्यांच्यावर. ते शंभर जणच बिचारे होऊन बघत बसतील. Wink

जर माबो प्रशासनालाच अशा प्रतिसादांवर प्रतिक्रिया नको असतील तर त्यांनी प्रतिसाद फक्त धागालेखकाला दिसतील इतरांना फक्त धागाच दिसेल त्याखालील प्रतिसाद दिसणार नाहीत अशी सोय करावी. Happy

अमित,
हुप्पाहुय्या जे माझ्या धाग्यांवर माझ्या ईतर धाग्यांवरील प्रतिसादांवर जे करत होते ते मी एंजॉय करत होतो. त्यांच्यामुळे माझ्या धाग्यांना टीआरपी आणि मला प्रसिद्धी मिळत होती. त्याचे बायप्रॉडक्ट म्हणून त्यांनाही प्रसिद्धी मिळाली. याला विन विन सिच्युएशन की काय म्हणू शकतो. अगदी ते माझेच आयडी आहेत किंवा माझ्याच सांगण्यावरून करत आहेत ईतपत लोकांना वाटू लागलेले.
त्यामुळे ती वेगळी केस झाली. या धाग्यात पुन्हा ती चर्चा नको. आधीच मोठ्या मुश्कीलीने मी माझ्या एका मायबोलीकर मैत्रीणीला पटवले आहे की आम्ही दोघे वेगळे आहोत.

पण एक मात्र दिसतेय माबोवर.. काहिहि असो एखादि प्रतिक्रिया तिरकस आली की लगेच झोड उठते प्रतिसादांची... लेखकाचे लेखन राहते नामानिराळीच...

मग तीन पानानंतर नक्की काय ठरलं याचे मतदान घ्या.>>> आधी हे वाक्य वाचल आनि क्षणांत डोक्यात विचार आला ,,ऋन्मेष नविन धागा काढतोय की काय ????
हुश्श्स अस काही नाहीये. Proud

हल्ली ते प्रश्नाचे धागे आणि मतदान सोय बंद झाली आहे ना?
कोणी काढलाय का एवढ्यात प्रश्नांचा धागा?
माझे बरेच प्रश्न अडकलेत..

एक समांतर मुद्दा -

सो कॉलड बॅशिंग निगेटीव्ह प्रतिसाद देणारयांचेच होते असे नाही. सकारात्मक प्रतिसाद देणारयांचेही होतेच.
उदाहरणार्थ अ ने लेख लिहिला. ब ने तो फार्र आवडला असे नमूद केले. ते पाहून क च्या पोटात मळमळले. कारण अ त्याच्या नावडीचा. त्यामुळे तो अ चे कौतुक करणारया ब च्या अंगावर धावून गेला.

एक निरीक्षण :
हुप्पाहुय्या ताईंचे बॅशिंग ऋ ने एंजॉय केले (असे त्याचे म्हणणे आहे ) पण नंतर त्याची नविन धागे निर्मीती रोडावली. ही गोष्ट मला अनपेक्षित आहे. कदाचित त्याचा काही पर्सनल प्रोब्लेम असेल. ऋ चा प्रतिसाद अपेक्षित.

पण नंतर त्याची नविन धागे निर्मीती रोडावली. 
>>>>>

याचे आकडे आणलेत तर मला समजेल की लोकांना माझ्याकडून आठवड्याला किमान किती धाग्यांची अपेक्षा असते. आणि त्यानुसार मी माझ्या वैयक्तिक अडचणींवर मात करून त्या अपेक्षा पूर्ण करायचा प्रयत्न करेन.

तसेही ते घरांवर धागा काढनार होते तो पण नाही आला
>>>>
तुम्ही घरांचे घेऊन बसला आहात.. माझे तेवीस प्रपोज पाईपलाईनमध्ये अटकले आहेत Happy

पण घरांवर लिहितो नक्की. आपली प्रॉपर्टी जरा मोठी असल्याने वेळ लागतोय ईतकेच

हुप्पाहुय्या जे माझ्या धाग्यांवर माझ्या ईतर धाग्यांवरील प्रतिसादांवर जे करत होते ते मी एंजॉय करत होतो. त्यांच्यामुळे माझ्या धाग्यांना टीआरपी आणि मला प्रसिद्धी मिळत होती. त्याचे बायप्रॉडक्ट म्हणून त्यांनाही प्रसिद्धी मिळाली.
<<

वृषभनेत्रभेदी (Bull's Eye) प्रतिसाद म्हणतात तो हाच. Lol

(प्लीजच नोट, "होते". "होत्या" नव्हे.) ऋणम्या, यू आर राईट्ट अ‍ॅज युज्वल.

*

बाकी धाग्यातल्या प्रतिसादांना दिलेल्या प्रतिसादांबद्दल धागा आहे, तर आपल्या राजकवींच्या

>>
टीप - एक आय डी गेल्यावर दुसरा घेऊन बेताल लिहू लागणार्‍यांबद्दल तर हे मुळीच नाही.

चु भु द्या घ्या
<<

या अनावश्यक उमाळ्याबद्दल अधिक काय लिहावे?

"गंभीर समिक्षक" हा यांचा डुप्लिकेट आयडी (म्हणजे मूळ आयडी जिवंत असताना ट्रॉलिंगकरता काढलेला दुसरा आयडी, जो यांचाच आहे, हे यांनी मान्य केलेले आहे;) प्रशासकांनी उडवला, ही एक डॉक्युमेंटेड व "पुराव्यासकट शाबित" झालेली घटना. तरीही यांना इतरांचे आयडी जाऊन परत दुसरे घेतल्याची पोटदुखी असंबद्ध रित्या ओकावीशी वाटावी, यापरते ट्विस्टेड, संकुचित, व डूख धरणार्‍या विखारी मनोवृत्तीचे दुसरे उदाहरण कोणते?

जिथल्या प्रतिसादांवरून हा धागा सुरू झाला तिथले लेखक गेले मायबोली सोडून.. तुम्ही आता ईथे प्रतिसादांवर चर्चा करत बसा. जे काही घडलं, वाईट घडलं

जिथल्या प्रतिसादांवरून हा धागा सुरू झाला तिथले लेखक गेले मायबोली सोडून.. तुम्ही आता ईथे प्रतिसादांवर चर्चा करत बसा. जे काही घडलं, वाईट घडलं >> ऋन्मेऽऽष, हे म्हणून तू प्रतिक्रिया देणार्‍यांचं बॅशिंग करतोयस का?

जिथल्या प्रतिसादांवरून हा धागा सुरू झाला तिथले लेखक गेले मायबोली सोडून..
>>>>>
हे असे घडले असेल तर फार वाईट झालेय... एका लेखकाला मारलंय काही कुचकट प्रतिसाद कर्त्यांनी...
Admin यांचे अभय आहे काहीं जणांना.. केवळ जुने सभासद म्हणून असे दिसत आहे.. मुळात त्या धाग्यावर वेमा ने हस्तक्षेप करणे गरजेचे होते...

अहो भास्कराचार्य मी काय कोणाचे बॅशिंग करणार.. हे बॅशिंग वगैरे शब्द मला ईथे मायबोलीवरच समजले. एवढे ईंग्लिश येत असते तर आज मी ऑक्सफर्ड केंब्रिज टॉपर असतो.

मुळात त्या धाग्यावर वेमा ने हस्तक्षेप करणे गरजेचे होते...
>>>>
लहान आहोत का आपण? असे छोटेमोठे प्रश्न सामोपचाराने सोडवायला हवेत. क्रांतीवीरच्या नानाने त्या मदत मागायला आलेल्या पोराला काय डायलॉग मारलेला आठवा जरा..

सामोपचाराने माबो वर प्रश्न सोडवणे ....
तुम्ही स्वतः कंमेंट्स वाचल्या त्या धग्यावर त्या 1 , 2 आयडी च्या... झोपलेल्याला झोपेतून उठवू शकता तुम्ही, झोपेचं सोंग घेतलेल्यालाना कसे उठवणार?

हे बॅशिंग वगैरे शब्द मला ईथे मायबोलीवरच समजले. एवढे ईंग्लिश येत असते तर आज मी ऑक्सफर्ड केंब्रिज टॉपर असतो. >>>>>
मी तर धाग्याचं शिर्षकच पुढीलप्रमाणे वाचलेलं, 'प्रतिसाद देणार्यांना बाशिंग बांधण्याची गरज' Wink

Pages