प्रतिक्रिया देणार्‍यांचे होत असलेले बॅशिंग.

Submitted by हुप्पाहुय्या on 28 July, 2017 - 13:26

मायबोलीवरील कथा, ललित, लेख, गझल, कविता ई. साहित्य प्रकारांवर येणार्‍या प्रतिक्रियांना किंवा प्रतिक्रिया देणार्‍याला ईतर लोकांनी झोडपून प्रतिक्रिया देणार्‍याच्या प्रार्थमिक हक्कावर आक्षेप घेण्याबद्दल मायबोलीकरांची काय भुमिका आहे.?

प्रतिक्रियांच्या (चर्चेच्या नव्हे) अपेक्षेने लिहिलेल्या लेखावर किंवा कथेवर आलेली प्रतिक्रिया हा फक्तं आणि फक्तं लेखक आणि प्रतिक्रिया देणारा वाचक ह्यांच्यातला मामला आहे. असे असतांना ईतरांना प्रतिक्रिया देणार्‍याचे बॅशिंग करण्याचा काय हक्कं आहे?
लेख/ कथा हा काही चर्चेचा धागा नाही, चर्चा हवी असल्यास ती करण्यासाठी वेगळे धागे ऊघडण्याची सोय ऊपलब्धं आहे. तिथे कुणीही चर्चेत भाग घेणार्‍या ईतरांच्या प्रतिक्रिया कोट करुन प्रतिसाद लिहू शकते.

लेख्/कथा/कवितांवर कोणीही त्याला हवी तशी प्रतिक्रिया देवू शकतो. लेख चांगला वाटल्यास, आवडल्यास किंवा टीका करायची असल्यास तशी प्रतिक्रिया देण्याची मुभा मायबोलीने दिलेली असतांना त्या प्रतिक्रियेवर मतप्रदर्शानाचा अधिकार कुणाला का मिळावा?
वेगळ्या स्थळ, काळ, समाजात राहणार्‍या वाचकांकडून वेगळ्या प्रतिक्रिया येणारंच. कथेच्या लेखकाला काही आपत्ती असल्यास ती किंवा तो प्रतिक्रिया देणार्‍याशी थेट संवाद साधत असतांना ईतरांनी त्यात लुडबुड का करावी? गरज पडल्यास लेखकासाठी आणि प्रतिक्रिया देणार्‍यासाठी प्रशासनाची मदत घेण्याचाही मार्ग ऊपलब्धं आहे.

ईतरांची लुडबूड मनाजोगती प्रतिक्रिया देण्याच्या प्रत्येक मायबोलीकराच्या हक्कावर ही गदा आहे आणि हे थांबावे असे मला वाटते. कथा/कविता /लेखाचा विषय्/आषय बाजूला पडून एकमेकांच्या प्रतिक्रियांचे बॅशिंग हे लेखकासाठी आणि ईतर वाचकांसाठी क्लेशकारकच असते.

ईतरांच्या प्रतिक्रिया देण्याच्या हक्काप्रती सौजन्य दाखवावे किमान ईतकी अपेक्षा मायबोलीकरांकडून करणे रास्तं नाही का?

प्रतिक्रिया देणार्‍यांना झोडपणे हे आधी झाले असेल पण म्हणून पुढेही होत रहावे आणि होत राहिल हे बरोबर नाही. निर्मात्याने भूतकाळात झालेल्या चुका सुधारण्यासाठी भविष्यकाळाची तरतूद केलेलीच आहे.

*हा धागा चर्चेसाठीच ऊघडला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे असे घडले असेल तर फार वाईट झालेय... एका लेखकाला मारलंय काही कुचकट प्रतिसाद कर्त्यांनी...
Admin यांचे अभय आहे काहीं जणांना.. केवळ जुने सभासद म्हणून असे दिसत आहे.. मुळात त्या धाग्यावर वेमा ने हस्तक्षेप करणे गरजेचे होते... >> लेखकांनी तिथे स्पष्टं लिहिले आहे ते गदारोळ आणि वादावादीमुळे सोडून जात आहे. तुम्हाला मराठी लिहिता येत नाही हे माहित आहे पण वाचताही येत नाही हे पाहून लिहिता न येण्याचे कारण पटले.

लेखकाने समर्थपणे तुमच्यामते ज्या कुजकट प्रतिक्रिया आहेत त्याला ऊत्तरं दिली आहेत. ज्यावर त्यांना ऊत्तर द्यायचे नाही तिथे प्रतिक्रिया लिहिणेही टाळले आहे. निगेटिव प्रतिक्रियांमुळे ते जात आहेत असे त्यांनी म्हंटले आहे का?
लेखक त्यांना आलेल्या प्रतिक्रिया व्यवस्थित हँडल करत असतांना ईतरांनी जो भोचकपणा केला त्याचीच परिणिती लेखकांनी मायबोली सोडण्यात झाली आहे.
दहा पंधरा प्रतिसाद देणारे, दुसर्‍या धाग्यांवरून स्कोर सेटल करणारे, गोंधळ घालण्याच्या ईराद्यानेच येणार्‍या आयडींना प्रोवोक करणारे, गदारोळ घालणारे तुम्ही आणि अपेक्षा आहे अ‍ॅडमिन ने पहिली प्रतिक्रिया देणार्‍यावर कारवाई करावी. किती धडधडीत दांभिकपणा आहे हा.

तुम्ही जर प्रत्येकाचा लेखावर प्रतिक्रिया देणार्‍याचा हक्क मान्य करून त्या प्रतिक्रियेला कसे रिअ‍ॅक्ट व्हायचे हे लेखकावर सोडून दिले तर असे प्रसंग पुन्हा पुन्हा ऊद्भवणार नाहीत. तुम्ही हे मुद्दाम करत आहात आणि गदारोळ घालणे हाच तुमच्या कंपूचा अजेंडा आहे हे सगळ्यांना दिसते आहे.
ऋन्मेष ह्यांच्या पोष्टींची आड घेवून त्यांना प्रोवोक करत राहणे आणि एकंदर मोहोल खराब करणे ह्यासाठी हा कंपू सदोदित कार्यरत असतो हे सत्य आहे.

कथा/कविता /लेखाचा विषय्/आषय बाजूला पडून एकमेकांच्या प्रतिक्रियांचे बॅशिंग हे लेखकासाठी आणि ईतर वाचकांसाठी क्लेशकारकच असते. >> हे जे मी वरती म्हंटले आहे तेच नेमके अजय चव्हाण ह्यांच्या बाबतीत झाले आहे.
कथेच्या विषयाला धरून ईतरांच्या लेखावर हवी तशी प्रतिक्रिया देण्याच्या हक्कावर आक्षेप घेवून त्या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया लिहिणारा प्रत्येक जण ह्या त्यांना झालेल्या त्रासाला कारणीभूत आहे आणि अश्या प्रतिक्रिया देणार्‍या सगळ्यांनी आत्मपरिक्षण करण्याची जरूरी आहे.

तुम्ही जर प्रत्येकाचा लेखावर प्रतिक्रिया देणार्‍याचा हक्क मान्य करून त्या प्रतिक्रियेला कसे रिअ‍ॅक्ट व्हायचे हे लेखकावर सोडून दिले तर असे प्रसंग पुन्हा पुन्हा ऊद्भवणार नाहीत. तुम्ही हे मुद्दाम करत आहात आणि गदारोळ घालणे हाच तुमच्या कंपूचा अजेंडा आहे हे सगळ्यांना दिसते आहे.
>>>>पुन्हा तेच... सार्वजनिक फोरम वर प्रतिसाद दिला तर पब्लिक रिप्लाय करणारच.. बाशिंग वगैरे शब्द टाकून काही होणार नाही.
बाकी रूनमेश च्या धाग्यांचा तुमचा तिरस्कार नवीन नाहीय.
आणि असा कंपू आहे आणि त्यात मी पण आहे हे तुमच्यामुळे कळले ☺️

रसप यांच्या धाग्यावर बॅशिंग बांशिगचा खेळ सुरू झालाय. काही जण प्रामाणिक मत मांडत आहेत तर काही जण वाहत्या गंगेत हात धुवत आहेत. बोला लोकहो, तिथे आपण काय भुमिका घ्यायचीय. ठरवा काय ते पटकन.. उद्या रसप गेले माबो सोडून तर नवीन चित्रपटांचे परीक्षण धागेही मला माझ्या शिरावर घ्यावे लागतील आणि तुम्हाला झेलावे लागतील...

सार्वजनिक फोरम वर प्रतिसाद दिला तर पब्लिक रिप्लाय करणारच.. बाशिंग वगैरे शब्द टाकून काही होणार नाही. >> तुमच्या मराठी बद्दल जे आधी म्हणाले तेच पुन्हा एकदा वाचा.
प्रशासनाने वेळोवेळी मायबोली ही खाजगी जागा आहे हे सांगितले असतांना ती सार्वजनिक आहे हा जावईशोध तुम्ही कुठून कसा लावला?
माझी प्रतिक्रिया लेखकाने लिहिलेल्या लेखावर मायबोलीने मला दिलेल्या जागेत लिहिलेली आहे ह्यामध्ये लेखक, मी आणि मायबोली प्रशासन ह्यामध्ये ऊपटसुंभासारखे न बोलावता, न विचारता तुम्ही कुठून आलात?
तुम्हाला लेखाबद्दल माझे मत मान्य नाहीये तुमचे मत वेगळे आहे तर तुम्हीही लिहा ना लेखावर प्रतिक्रिया. तुम्हाला तुमच्या मतावर चर्चा करायची आहे तर ऊघडा नवीन धागा. माझ्याशीच चर्चा करायची आहे मला निरोप पाठवा , मला ईंट्रेस्ट असेल तर मी येईन माझे मत डिफेंड करायला, तुमचे खोडायला आणि तुमच्याशी चर्चा करायला.
तुमचे मत, तुमचा मुद्दा लेखनाच्या अनुषंगाने असायला हवा की प्रतिक्रियेच्या?

हुपपाहुईया... तुम्ही पुन्हा पुन्हा तेच मुद्दे टाकतेय ज्यावर अलरेदी चर्चा झालीय...

हे आहे तुम्हाला उत्तर जे रूनमेश ने आधीच दिलंय 2 पेज आधी... मी कॉपी पेस्ट करतो इथं परत...

जर मी शाहरूखचा फॅन आहे. कोणी त्याच्या यू ट्यूब वरच्या एका विडिओवर निगेटीव्ह कॉमेंट केली. जी मला पटली नाही. तर मी त्यावर आपले विरोधी मत नक्कीच व्यक्त करू शकतो. तो निगेटीव्ह कॉमेंट टाकणारा हा माझ्यातील आणि शाहरूखमधील प्रश्न आहे तुम्ही लांब राहा असे मला कसे बोलू शकेल मला?

नवीन Submitted by पद्म on 30 July, 2017 - 20:36
सीतेवर शूर्पणखेने हल्ला केला, आणि लक्ष्मणाने तीचे नाक कापले......(आता तो मधे का पडला? बिचार्या शूर्पणखेचे बॅशिंग)
>>>>
पद्म Rofl

हुपपाहुईया... तुम्ही पुन्हा पुन्हा तेच मुद्दे टाकतेय ज्यावर अलरेदी चर्चा झालीय... >> जर तुमचा मराठी कळण्याचा प्रॉब्लेम नसता तर ती चर्चा वाचल्यानंतर तुम्ही तेच तेच मुद्दे डिफेंड केले नसते.

हे आहे तुम्हाला उत्तर जे रूनमेश ने आधीच दिलंय 2 पेज आधी... मी कॉपी पेस्ट करतो इथं परत...
जर मी शाहरूखचा फॅन आहे. कोणी त्याच्या यू ट्यूब वरच्या एका विडिओवर निगेटीव्ह कॉमेंट केली. जी मला पटली नाही. तर मी त्यावर आपले विरोधी मत नक्कीच व्यक्त करू शकतो. तो निगेटीव्ह कॉमेंट टाकणारा हा माझ्यातील आणि शाहरूखमधील प्रश्न आहे तुम्ही लांब राहा असे मला कसे बोलू शकेल मला? >> मला ह्या अर्ग्यूमेंटला ऊत्तर देण्याची गरज भासत नाही. पण तुम्ही हेच अर्ग्यूमेंट एकेके शब्दं सावकाशीने वाचले तर तुम्हाला त्या अर्ग्यूमेंट मधला फोलपणा कळेल. तो कळण्यासाठी हिंट म्हणून स्वतःलाच एक प्रश्न विचारा 'हा व्हिडिओ शाहरूखने टाकला आहे का?'
वर झालेल्या चर्चेचा सारांश तुम्हाला सांगते.
प्रतिक्रियेवर ट्री व्यू ऊपलब्धं नसल्याने टेक्निकल कमतरतेपाई सध्यापुरते दुसर्‍याच्या प्रतिक्रियेवर आक्षेप न घेणे हा शिष्टाचाराचा , शिकवणूकीचा आणि सौजन्याचा भाग आहे.
हा शिष्टाचार, सौजन्य तुम्हाला मान्य नसेल तर 'तुम्ही माझ्या प्रतिक्रिया कोट करू नका वा चर्चेला घेवू नका' हे संगाण्याचाच मार्ग ऊरतो आणि तसे सांगितलेलेही समजत नसेल तर त्याला फक्तं आणि फक्तं बॅशिंगच म्हणता येईल.

काही नाही चालूद्या तुमचं सगळ्यांच..
मी आपला ९९ बघून १०० पुर्ण करायला डोकावलो.. धन्यवाद!

काही नाही चालूद्या तुमचं सगळ्यांच..
मी आपला ९९ बघून १०० पुर्ण करायला डोकावलो.. धन्यवाद! >> हे काय आहे राहुल ?.. माझ्या विपू मध्ये तुम्हीच प्रतिसाद लिहिला आहे ना कळकळीविषयी. ? मग तुमचा तो चेहरा खरा आहे की ईथे चर्चेसाठी मुद्दे न लिहिता मुद्दाम काही तरी विनोदी लिहून गदारोळ करायचा प्रयत्न करता आहात का?
ऋन्मेष ह्यांच्या पोष्टींचा माग काढत त्यावरून काही तरी चीप/टाकाऊ विनोद करीत त्यांना प्रोवोक करू धागा डिरेल करणारे अशी तुमची ओळख झाली आहे, होत आहे.
तुमच्या साहित्यावर किती प्रतिसाद येतात ह्यावरून तुमच्या मर्यादा तुम्हाला कळल्या असाव्यात म्हणूनच ईतरांच्या पोष्टींचा माग काढत येणे आणि काहितरी फालतू लिहिणे हे तुम्ही तुमचे धोरण बनवलेले आहे हे दिसतेच आहे.
तुम्हाला चालू चर्चेबद्दल काही लिहायचे आहे तर जरूर लिहा, गदारोळ आणि घाणच करायची असेल तर ती सुद्धा करू शकता... पण मायबोलीवर पत साहित्यातून आणि त्याअनुषंगाने आलेल्या प्रामणिक प्रतिसादानेच बनते हे लक्षात ठेवा ... आणि एकदा लोकांना तुमचा ऊद्योग कळाला की तुमच्या चांगला साहित्यावरही प्रतिसाद देण्याची तसदी तुमच्यासारख्याच ऊद्योगात सामील असलेल्यांशिवाय कोणी घेणार नाही हे ही ध्यानात ठेवा. चॉइस तुमचा आहे.
एका धाग्यावर कनवाळू, कळकळ समजते वगैरे सूर आणि दुसर्‍यावर घाण करत राहणे ह्यावरून तुम्ही कश्याबद्दलही प्रामाणिक नाहीत हे दिसून येतंच आहे.

सीतेवर शूर्पणखेने हल्ला केला, आणि लक्ष्मणाने तीचे नाक कापले......(आता तो मधे का पडला? बिचार्या शूर्पणखेचे बॅशिंग) >> रामाने सीतारक्षणाची जबाबदारी लक्ष्मणाला दिली होती तसे लेखकाचे रक्षण आणि प्रतिक्रिया देणार्‍यांचे बॅशिंग करण्याची जबाबदारी मायबोली प्रशासनाने तुम्हाला दिली आहे का ?
तुम्हीही ह्या बॅशिंगचे विक्टिम झाला असाल आणि ह्यापुढेही होऊ शकता हे लक्षात येतंय का?

स्वतःलाच एक प्रश्न विचारा 'हा व्हिडिओ शाहरूखने टाकला आहे का?'
>>>>>

येस्स,
शाहरूखच्या चित्रपटाचा ट्रेलर म्हणजे त्याच्यातर्फेच टाकलेला असतो. कोणीही त्याच्या मनाविरुद्ध आणि कोणाच्याही परवानगीशिवाय त्याच्यावर चित्रित विडिओ टाकेल आणि तिथे आणखीनच तिसरा येऊन त्याला शिव्या घालेल. गंमत आहे का Happy

आणि शाहरूख मोठी हस्ती आहे म्हणून तो काही स्वतःचा विडिओ स्वतः टाकणार नाही, पण कित्येक छोटेमोठे कलाकार आपली कला दाखवायला आपले विडिओ आपले आपण टाकत असतातच की..

ऋन्मेष ह्यांच्या पोष्टी हुंगत येवून त्यावरून काही तरी चीप/टाकाऊ विनोद करीत त्यांना प्रोवोक करू धागा डिरेल करणारे अशी तुमची ओळख झाली आहे, होत आहे.
ईतरांच्या पोष्टी हुंगत त्यांचा माग काढत येणे आणि काहितरी फालतू लिहिणे हे तुम्ही तुमचे धोरण बनवलेले आहे हे दिसतेच आहे.
>>>>
धन्यवाद! दोन्ही गोष्टींशी सहमत आहे..
पण कसं आहे ना.. एक माणूस आहे चारचौघात मिसळ्याची, बोलण्याची, वातावरणातला तणाव हलका करण्याची सवय आहे.. इतरांच्या धाग्यांवर हुंगत येऊन बोलतो तरी.. चारचौघांना बोलतं करण्याचा, लिहीतं करण्याचा प्रयत्न करतो. पण नुसते 'हुंगणारे' संस्थळावर कमी नाहीत. असो.
ऋन्मेष च्या धाग्याचं विडंबन केल्याची समस्या असेल तर मीही काही करू शकत नाही..
आणि हो, मी छंद म्हणून लिहीतो गरज म्हणून नाही त्यामुळे माझ्या लिहीण्याच्या प्रतिसादसंख्येची काळजी करण्याची मला गरज नाहीये.. Happy

हुप्पाहुय्या,
तुम्ही माझ्या धाग्यावर प्रतिसाद देणार्‍या राहुल यांचे त्या प्रतिसादांवरून बॅशिंग करू नका Happy

चर्चाप्रस्तावावर आलेल्या प्रतिसादांवर प्रतिसाद देणे योग्य आहे ऋ. त्या लेख, कविता, इ. वरील प्रतिसादांबद्दल म्हणतायत. Happy

राहुल, माझ्या मूळ प्रतिसादातल्या शब्दांच्या चॉईस बद्दल दिलगिरी व्यक्त करते, मूळ प्रतिक्रियेत बदलही केला आहे.

तुमची तणाव हलका करण्याची सवय ईतरांच्या प्रतिक्रियेची खिल्ली ऊडवणे होत नाहीये ह्याकडे जमत असल्यास तुम्ही लक्ष ठेवावे ही विनंती.

आणि हो, मी छंद म्हणून लिहीतो गरज म्हणून नाही त्यामुळे माझ्या लिहीण्याच्या प्रतिसादसंख्येची काळजी करण्याची मला गरज नाहीये.. Happy >> असे असेल तर चांगलं आहे... मग तुम्हाला ईतरांच्या धाग्यांवर प्रतिसादसंखेची काळजी करत ९९ ते १०० करण्याचा भार वहायची गरज का पडावी?

तुमची तणाव हलका करण्याची सवय ईतरांच्या प्रतिक्रियेची खिल्ली ऊडवणे होत नाहीये ह्याकडे जमत असल्यास तुम्ही लक्ष ठेवावे ही विनंती.
मी कुठल्याही गंभिर प्रतिक्रियेची खिल्ली उडविलेली नाहीये..

मग तुम्हाला ईतरांच्या धाग्यांवर प्रतिसादसंखेची काळजी करत ९९ ते १०० करण्याचा भार वहायची गरज का पडावी? >>>>
हि काळजी नाही आणि गरज तर नव्हेच! कदाचित १०० चं आकर्षण असावं.. जे सामान्य आहे... आजवर अनेक ठिकाणी यासाठी प्रतिसाद दिलेत.. कुणाला काहीच समस्या आलेली नाही.. आपल्याला आली त्याबद्दल आपल्याप्रमाणेच दिलगीरी व्यक्त करतो.
आपण ज्या गोष्टीसाठी धागा उघडलांत त्यासाठी आपल्याला तो लखलाभ! धन्यवाद! Happy

भास्कराचार्य, त्यांनी सरसकट राहुल यांनी माझ्या धाग्यावर लिहिलेल्या प्रतिसादांबद्दल टिप्पणी केली आहे, आणि माझे सारेच धागे चर्चेचे नसून ललितलेख आणि कथाही असतातच की..

उदाहरणार्थ गेले ३-४ धागे घ्या..
माझी जीसटी फ्रीज खरेदी...
जगात देव आहे श्रावणी सोमवार..
टमाटर आणि मध्यमवर्गीय..
हे सारे लेख आहेत..

ईथे प्रतिसाद देणार्‍यांना ते ऋन्मेषच्या पोस्टी हुंगणे आणि या धाग्यांवर ९९-१०० असे करणार्‍यांना ते तुम्ही का त्याच्या
प्रतिसाद संख्येचा भार वाहता असे काही बोलत असतील तर ते त्यांच्याच मते बॅशिंग नाही का? Happy

आणि हो, मला या सो कॉलड बॅशिंग पासून काही हरकत नाहीये हे देखील ईथे नमूद करतो.
मी ईथे त्यांच्याशी वाद घालायला लिहीत नाहीये तर आजवर त्यांनी माझ्या कित्येक धाग्यांना टीआरपी मिळवून दिला, आज माझी वेळ आहे. हा ऋन्मेष कोणाचे कर्ज ठेवत नाही Happy

मी ईथे त्यांच्याशी वाद घालायला लिहीत नाहीये तर आजवर त्यांनी माझ्या कित्येक धाग्यांना टीआरपी मिळवून दिला, आज माझी वेळ आहे. हा ऋन्मेष कोणाचे कर्ज ठेवत नाही Happy > तुमच्या लेखावर मी लिहिलेले माझी तुमच्या लिखाणावर टीका करणारी जेन्यूईन मते होती त्यावर तुमचा टीआरपी वाढल्याचा तुमचा गैरसमज होत असेल तर तुमचा ह्या सोशल मिडियावरील वावर शाहरूख नाही तर कमाल खान च्या वागण्याशी सुसंगत आहे. जे मी आधीही म्हणाले आहे आणि तुम्ही मायबोलीकरांना वेळ्वेळी त्याचा प्रत्यय दिलेलाच आहे. ऊलट तुमच्याशी बोलावे लागू नये, तुमच्या लेखांना, प्रतिक्रियांना टाळून पुढे जाता यावे हाच माझ्यासहित सर्वांचा प्रयत्न असतो नेहमी. तुम्ही माझ्या टीआरपी ची चिंता करता आहात ? जरा विपू करून सांगायचे होते हो, असे बाळबोध ईथे लिहिल्याने लोक हसतील तुम्हाला.

तुम्ही एकदा सर्वाधिक कमी प्रतिसाद मिळालेल्यांपैकी तुमचाच एक धागा पुन्हा वाचा. हवी तर तुमच्याच धाग्याची लिंक तुम्हाला देते
https://www.maayboli.com/node/62694
विचार करा त्यावर फक्तं १० प्रतिसादंच का आलेत. काही सुचत नसल्यास हिंट देते.
तुम्ही ज्या लोकांबद्दल तो धागा लिहिला आहे त्यात तुमचा मायबोलीवरचा चेहरा दिसतो का ते पहा.

मागे कुठेतरी वाचले होते...
विदुषकाला सर्कशीत सगळ्यात जास्तं टाळ्या आणि हसे मिळतात... बिचारे विदुषक जिथे जातात तिथे लोक त्यांच्याकडून विदुषकी चाळ्यांची अपेक्षा करतात. मग विदुषक नवीन करामती शोधत स्वतःलाच विसरून कायमच हे चाळे करत लोकांचे लक्ष वेधायचा प्रयत्न करत राहतो. असे करतच राहणे त्यांची गरज बनून जाते. मग कधी तरी विदुषक जेव्हा स्वतःबद्दल खरे सांगतो तेव्हा लोक हसत नाहीत ते दुसर्‍या विदुषकाच्या शोधात जातात. आणि लोकांना दुसरा विदुषक मिळाला की पहिल्या विदुषकाचे काय होते माहितीये 'हसे'.. ते ही कायमचे. फार दुर्दैवी सत्य आहे हे.
ह्या गोष्टीतल्या विदुषकाला नेहमीच माहित असते मी करतो ते खोटे खोटे आहे मी खरा ह्यापेक्षा खूप वेगळा आहे, पण जसे दिवस जातात तसे त्याच्याही नकळत तो 'खर्‍याला' विसरून 'खोट्याला' अंगी बाणवतो कारण खोट्याशिवाय त्याला अस्तित्वच ऊरत नाही.

लोकांना शाहरूख खान लक्षात राहतो त्याच्या जिवावर विदुषकी चाळे करणारा कमाल खान नाही. शाहरूख एक ग्रेट आणि यशस्वी माणूस आहे त्याच्या सारखे बनायचे असेल तर आयुष्यात कामाप्रती मेहनत आणि डेडिकेशन लागते.. जगाला मी शाहरूख आहे हे दिवसरात्रं ओरडून सांगायची गरज पडत नाही.

बाकी, ह्या पोस्टवर ही तुम्ही विदुषकी कोलांट्या ऊड्यांसारखे काही तरी लिहिणार हे नक्की. बरेच लोकंही वाचणार हेही नक्की. ते तुमच्याबद्दल काही तरी मत बनवणार हे पण नक्की. काहींना वाईट वाटेल काहींना बरे वाटेल हे सुद्धा नक्की. काही तुम्ही हसवत रहावे म्हणून तुमच्या समर्थनार्थ काहितरी लिहितील हे देखील नक्की. आणि हे सगळे एक दिवस थांबेल आणि तुमची जागा तुमच्या भाषेत सांगायचे तर तुमचा 'टीआरपी' दुसरे कोणी तरी घेईल हे तर अगदीच नक्की.

तो एक दिवस कधी येणार हे तुमच्या कसबावर अवलंबून आहेत. मला विचाराल तर मला वाटते असा दिवस खूप जवळ आहे.
तो दिवस येईपर्यंत चालू द्या 'द ग्रेट कमाल खान सर्कस शो' ... गुड लक.

हुप्पाहुय्या,
एवढी मोठी पोस्ट माझ्यावर लिहून तुम्ही माझ्या पोस्टमधील मूळ मुद्दा टाळलात Happy

तुम्ही राहुलने माझ्या धाग्यावर दिलेल्या प्रतिसादांवर केलेले नकारात्मक भाष्य हे तुमच्याच भाषेत प्रतिसादांचे बॅशिंग आहे की नाही हे सांगा Happy

तुम्ही राहुलने माझ्या धाग्यावर दिलेल्या प्रतिसादांवर केलेले नकारात्मक भाष्य हे तुमच्याच भाषेत प्रतिसादांचे बॅशिंग आहे की नाही हे सांगा>> 1

तुमच्या साहित्यावर किती प्रतिसाद येतात ह्यावरून तुमच्या मर्यादा तुम्हाला कळल्या असाव्यात>>>बोलताना थोडा तरी विचार करा ओ..
माझ्या साहित्यावर याहून पण कमी प्रतिसाद येतात मग याचा अर्थ मी काय काढू??
आधी ऋ बद्दल तुमच मत वाईट होतं आणि आता राहुल दादा बद्दल सुध्दा??

प्रतिसाद चांगला आणि वाईट दोन्ही पध्दतीचा असतो..फक्त असा प्रतिसाद देऊ नये की ज्याने तुम्ही समोरच्याची लायकी काढाल.

ईतरांच्या पोष्टी हुंगत त्यांचा माग काढत येणे आणि काहितरी फालतू लिहिणे हे तुम्ही तुमचे धोरण बनवलेले आहे हे दिसतेच आहे.>>>
आणि तुम्ही राहुल दादा ला बोललात पण तुम्ही पण ऋ च्या धाग्यावर हेच तर करतात ना?
तो मनावर घेत नाही हे नशीब..

हुप्पाहुय्या, तुम्ही माझ्या वरच्या प्रश्नावर स्पष्टीकरण द्यालच..

तर आता माझ्यावर लिहिलेल्या पोस्टवर बोलूया. खरे तर मला माझ्यावर चर्चा झालेली आवडते. फक्त ती दुसरयाच्या धाग्यावर होऊन उगाच धागा हायजॅक झाल्याचे पाप नको असते. पण हा तुमचाच धागा असल्याने आणि तुम्ही स्वत:च ईतकी मोठी पोस्ट लिहीत ईंटरेस्ट दाखवल्याने तुमची काही हरकत नसावी.

तर कमाल खान! मी जवळपास तासभर विचार केला. पण ते साम्य सापडले नाही. मुळात कमाल खान ही व्यक्ती प्रसिद्ध व्यक्तींवर टिका करून प्रसिद्ध होणारया कॅटेगरीतली आहे आणि त्यासाठी ओळखली जाते. मी मायबोलीवर आलो आणि माझे लेख, माझ्या कथा, माझे विचार, यानुसार माझे धागे लिहित स्वत:चे वेगळे दुकान थाटले. ईथल्या प्रसिद्ध सभासदांवर टिका करत प्रसिद्धी मिळवायचा वा त्या जीवावर ओळख निर्माण करायचा प्रयत्न नाही केला. त्यामुळे ही कमाल खान थिअरी काही पटली नाही.

@ शाहरूख खान, आपण जे म्हणालात...
शाहरूख एक ग्रेट आणि यशस्वी माणूस आहे त्याच्या सारखे बनायचे असेल तर आयुष्यात कामाप्रती मेहनत आणि डेडिकेशन लागते..
यासाठी +786 __/\__
शाहरूख हा एकच आहे. त्याच्यासारखा दुसरा ना कोणी आहे ना कोणी बनू शकतो. पण त्याच्यासारखे बनायचा प्रयत्न करणारे जगात लाखो करोडो आहेत. आपण चार मराठी माणसं उगाच राजकारणाला बळी पडून त्यावर टिका करतो. आणि त्याबद्दल कौतुकाचे दोन शब्द बोलणारा मी त्याचा फॅन वगैरे म्हणून ओळखला जातो. मात्र जगभरातील त्याचे फॅन फॉलोईंग आणि क्रेझ पाहिले तर तुम्हीही थक्क व्हाल! मला तर त्या कमाल खान सारख्या लोकांचे सखेद आश्चर्य वाटते जे शाहरूखसारख्या व्यक्तीवर टिका करून आपले दुकान चालवायचा प्रयत्न करतात. ईतर ठिकाणी त्याचे मंदिर उभे राहिले असते. आणि तो त्याचा हक्कही असता ज्याने तमाम भारतीयांना प्रेमाची भाषा शिकवली Happy

तुमच्या साहित्यावर किती प्रतिसाद येतात ह्यावरून तुमच्या मर्यादा तुम्हाला कळल्या असाव्यात>>>बोलताना थोडा तरी विचार करा ओ..
माझ्या साहित्यावर याहून पण कमी प्रतिसाद येतात मग याचा अर्थ मी काय काढू??

>>>>>

हे थोडे ईंटरेस्टींग आहे.
जर त्या एखाद्या धाग्यावर किती प्रतिसाद येतात यावरून धाग्याकर्त्याची योग्यता ठरवणार असतील तर हाच निकष त्यांनी मलाही लावणे अपेक्षित आहे, पण त्या तसे करत नाहीयेत Happy

काय बेताल बोलत सुटलाय हा हुप्पाहुया आयडी. प्रतिसाद हुंगत काय, विदुषक काय
वेमा, बघा जरा इथे. का हे बसतंय माबोच्या नियमात?

<रामाने सीतारक्षणाची जबाबदारी लक्ष्मणाला दिली होती तसे लेखकाचे रक्षण आणि प्रतिक्रिया देणार्‍यांचे बॅशिंग करण्याची जबाबदारी मायबोली प्रशासनाने तुम्हाला दिली आहे का ?>

ज्यांच्या प्रतिक्रियांचं सो कॉल्ड बॅशिंग झालंय, त्यांनी तुम्हाला खलिता पाठवलाय का? मला तर त्या दोन आयडींची काही तक्रार असल्याचं कुठे दिसलं नाही.

मुळात मायबोली प्रशासनाने कथा/कवितांच्या धाग्यावर प्रतिसाद फक्त मूळ लेखनावरच द्यावा, प्रतिसादांवर नव्हे, असा नियम करणं दूर, तसं कधी सुचवल्याचंही पाहिलेलें नाही.
मग असा नियम आहे किंवा व्हावा असं तुम्हाला वाटत असेल, तर प्रशासकांकडूनच तसं स्पष्टीकरण येईल, यासाठी प्रयत्न केलेले बरे नाही का? जमल्यास, आधी कोणीतरी सुचवलेली, लेखनावरचे प्रतिसाद फक्त लेखकालाच दिसतील, अशी तांत्रिक (गैर)सोय करायलाही प्रशासनाला सुचवता येईल.

ज्यांच्या प्रतिक्रियांचं सो कॉल्ड बॅशिंग झालंय, त्यांनी तुम्हाला खलिता पाठवलाय का? मला तर त्या दोन आयडींची काही तक्रार असल्याचं कुठे दिसलं नाही. >> कुणासाठी का? मी माझ्या अनुभवावरून माझ्यासाठी धागा ऊघडूच शकतेच ना?

मुळात मायबोली प्रशासनाने कथा/कवितांच्या धाग्यावर प्रतिसाद फक्त मूळ लेखनावरच द्यावा, प्रतिसादांवर नव्हे, असा नियम करणं दूर, तसं कधी सुचवल्याचंही पाहिलेलें नाही. > कदाचित हीच ती वेळ असेल असं काही सुचवायची?

भरत, वादासाठी वाद नवीन नाहीत. शिष्टाचार , सौजन्याला धरून प्रतिक्रियांवर प्रतिक्रिया लिहायलाही माझी ना नाही. पण हे सौजन्य आधी जजमेंटल नंतर बॅशिंग आणि त्यानंतर मोहीम होऊन जाते. ( ऋन्मेष आणि मी ह्यांचा मुद्दा तुम्ही जर पुन्हा काढणार असाल तर त्याचे स्प्ष्टीकरण मी आधीच दिले आहे ते प्लीज वाचा. ऋन्मेष ह्यांच्या लिखाणाचा विषय माझ्यासाठी ह्यापुढे संपलेला आहे. जे सांगायचे होते ते सांगून झाले आहे मायबोलीकर आणि प्रशासनानेही त्याची नोंद घेतली असेल.)

जसा लेखक अजय चव्हाणांना झाला तसा प्रतिक्रिया देणार्‍याला ह्या बॅशिंगचा त्रास होतोच. तुम्ही म्हणाल प्रतिक्रियांवरच्या प्रतिक्रिया ईग्नोर करा मग हे ईग्नोर पहिल्या प्रतिक्रियेलाच का करू नये? ईग्नोर करण्याची जबाबदारी ज्याचे बॅशिंग होत आहे त्यावरंच का?

मग असा नियम आहे किंवा व्हावा असं तुम्हाला वाटत असेल, तर प्रशासकांकडूनच तसं स्पष्टीकरण येईल, यासाठी प्रयत्न केलेले बरे नाही का? जमल्यास, आधी कोणीतरी सुचवलेली, लेखनावरचे प्रतिसाद फक्त लेखकालाच दिसतील, अशी तांत्रिक (गैर)सोय करायलाही प्रशासनाला सुचवता येईल. >> हा ही त्या प्रयत्नाचाच एक भाग आहे असे समजा.

Pages