प्रतिक्रिया देणार्‍यांचे होत असलेले बॅशिंग.

Submitted by हुप्पाहुय्या on 28 July, 2017 - 13:26

मायबोलीवरील कथा, ललित, लेख, गझल, कविता ई. साहित्य प्रकारांवर येणार्‍या प्रतिक्रियांना किंवा प्रतिक्रिया देणार्‍याला ईतर लोकांनी झोडपून प्रतिक्रिया देणार्‍याच्या प्रार्थमिक हक्कावर आक्षेप घेण्याबद्दल मायबोलीकरांची काय भुमिका आहे.?

प्रतिक्रियांच्या (चर्चेच्या नव्हे) अपेक्षेने लिहिलेल्या लेखावर किंवा कथेवर आलेली प्रतिक्रिया हा फक्तं आणि फक्तं लेखक आणि प्रतिक्रिया देणारा वाचक ह्यांच्यातला मामला आहे. असे असतांना ईतरांना प्रतिक्रिया देणार्‍याचे बॅशिंग करण्याचा काय हक्कं आहे?
लेख/ कथा हा काही चर्चेचा धागा नाही, चर्चा हवी असल्यास ती करण्यासाठी वेगळे धागे ऊघडण्याची सोय ऊपलब्धं आहे. तिथे कुणीही चर्चेत भाग घेणार्‍या ईतरांच्या प्रतिक्रिया कोट करुन प्रतिसाद लिहू शकते.

लेख्/कथा/कवितांवर कोणीही त्याला हवी तशी प्रतिक्रिया देवू शकतो. लेख चांगला वाटल्यास, आवडल्यास किंवा टीका करायची असल्यास तशी प्रतिक्रिया देण्याची मुभा मायबोलीने दिलेली असतांना त्या प्रतिक्रियेवर मतप्रदर्शानाचा अधिकार कुणाला का मिळावा?
वेगळ्या स्थळ, काळ, समाजात राहणार्‍या वाचकांकडून वेगळ्या प्रतिक्रिया येणारंच. कथेच्या लेखकाला काही आपत्ती असल्यास ती किंवा तो प्रतिक्रिया देणार्‍याशी थेट संवाद साधत असतांना ईतरांनी त्यात लुडबुड का करावी? गरज पडल्यास लेखकासाठी आणि प्रतिक्रिया देणार्‍यासाठी प्रशासनाची मदत घेण्याचाही मार्ग ऊपलब्धं आहे.

ईतरांची लुडबूड मनाजोगती प्रतिक्रिया देण्याच्या प्रत्येक मायबोलीकराच्या हक्कावर ही गदा आहे आणि हे थांबावे असे मला वाटते. कथा/कविता /लेखाचा विषय्/आषय बाजूला पडून एकमेकांच्या प्रतिक्रियांचे बॅशिंग हे लेखकासाठी आणि ईतर वाचकांसाठी क्लेशकारकच असते.

ईतरांच्या प्रतिक्रिया देण्याच्या हक्काप्रती सौजन्य दाखवावे किमान ईतकी अपेक्षा मायबोलीकरांकडून करणे रास्तं नाही का?

प्रतिक्रिया देणार्‍यांना झोडपणे हे आधी झाले असेल पण म्हणून पुढेही होत रहावे आणि होत राहिल हे बरोबर नाही. निर्मात्याने भूतकाळात झालेल्या चुका सुधारण्यासाठी भविष्यकाळाची तरतूद केलेलीच आहे.

*हा धागा चर्चेसाठीच ऊघडला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बा प रे... !
फार फार पूर्वी (म्हणजे जेव्हा हु.हु. या खर्‍या आयडी ने ईथे वावरत?) Happy तेव्हा ईथे प्रतिक्रीया बॅशिंग वगैरे देखिल एकदम दर्जेदार होते.. [जुन्या हितगुज वरील v n c वाचलेत तर ईतके मुद्देसूद, तात्विक, अलंकृत आणि खास मा बो दर्जा राखून असलेले बॅशिंग बघून धन्य व्हायला होईल] आजकाल मात्र दर्जा सगळीकडेच घसरतोय असे ऐ़कून आहे. आता खुद्द वेमा देखिल अवतरले असतील तर आपण काय बोलायचे.. तसे दर ठराविक वर्षांनी हा दर्जेदार वाद पेटला की ते आवर्जून अवतरतात आणि अगदी आकडेवारी पुराव्यासकट सर्वांना बाद करून टाकतात. Happy
[मात्र वेमा, या खेपेस तुमच्या तक्तेवारीतील (तख्ते वारी असे हवे का?) ५०% ऊंचवटे एका 'ऋन्मेष' आयडी चेच फक्त असतील.. तेव्हा it needs some sanity check!] Wink

असो. थेट 'कुजबुज' ला interesting धागा असे (अलिकडे) म्हटले गेलेले पाहिल्यावर अधिक कुठल्याही स्टॅट्स ची गरज ऊरली नाही... Happy

बाकी, एकदम थेट १५० आकडा बघून वाचायचा मोह आवरला नाही.. चालायचच. ती एक जुनी ट्री व्यु खोड आहे. फक्त अलिकडे गंडायला होतय.

it needs some sanity check! >> Biggrin
याला म्हणतात आ बैल और मुझे बॅश. >> Lol ऐकत नाही आज एकदम .

आजकाल सगळे गिजर वापरतात. पण गॅसवर पाणी तापवण्याची एक ट्रिक मी शोधून काढलेली... गॅसवर पाणी उत्कलनबिंदूपर्यंत पोचू द्यायचे, पण त्याला पहिली उकळी फुटायच्या आत गॅस बंद करायचा. बरेच लोक खळाखळा उकळतात पाणी, त्याने पाण्यातली हिट निघून जाते पटकन. उकळी फुटण्याच्या क्षणापर्यंत हवा भरलेल्या फुग्यासारखी पाण्यात हिट भरलेली असते, उकळी फुटणे म्हणजे फुग्यातली हवा जाण्यासारखे असते. जो गॅस वापरला तो असाच उडून जातोय असं समजा. तेव्हा गॅस वाचवा, हिट वाचवा, वेळही वाचवा.

फार फार पूर्वी (म्हणजे जेव्हा हु.हु. या खर्‍या आयडी ने ईथे वावरत?) Happy तेव्हा ईथे प्रतिक्रीया बॅशिंग वगैरे देखिल एकदम दर्जेदार होते.. [जुन्या हितगुज वरील v n c वाचलेत तर ईतके मुद्देसूद, तात्विक, अलंकृत आणि खास मा बो दर्जा राखून असलेले बॅशिंग बघून धन्य व्हायला होईल] >> चांगले-वाईट, चूक- बरोबर बहुतेकांना कळत असते नव्हे कळतेच. मतमतांतरे असायचीच आणि त्यानुसार आपल्या मतांची पाठराखण करणारेही.
वर्षानुवर्षे ईथले चर्चेचे धागे आणि लेखांवर होत आलेले बहुतेक वाद हे वादविवाद न राहता, वाद घालणारेच "स्वतःचा ईगो कुरवाळण्यात धन्यता मानणे, मग लेखाचा विषय आणि त्याच्या आशयाची ऐशीतैशी झाली तरी बेहेत्तर मला त्याच्याशी काही देणेघेणे नाही. माझा मुद्दा, माझे मत सगळ्यात महत्वाचे आहे" असा प्रवास करत आहेत आणि त्याचे परिणाम हीच मानसिकता वाढीस लागण्याकडे होत आहे. 'वी अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री' वर थांबायला लोक तयार नाहीत, आणि ह्यांना कुठल्याही परिस्थितीत स्वतःचेच क्लोजर हवे आहे.
ठीक आहे, कोणी किती हिरहिरीने मते मांडावीत ह्याचे काही प्रमाण नाही. तुम्ही तुमच्या मतांवर ठाम आहात, ते पटवून देण्याची कारणे देत आहात ईतरांची कारणे समजून घेत नाही आहात.... ईथवरही ठीक आहे वाद विकोपाला जातील आणि नंतर थांबतील. वादाच्या ठिकाणी वाद झाले आहेत, होत आहेत आणि होत राहतीलही.

पण आता मात्रं खाली लिहिले आहे तसा वेगळा, अनिष्टं प्रकार सुरू झाला आहे.

आजकाल मात्र दर्जा सगळीकडेच घसरतोय असे ऐ़कून आहे. >>हो. वर लिहिलेले वाद घालणारे निदान आपल्या मताशी (मत चूक की बरोबर हा मुद्दा नाही) ठाम होते पण आता मुद्दाम स्फोटक, भडकाऊ लिहून वाद कायम ज्वलंत ठेवणे हाच अजेंडा घेवून काही आयडी आले आहेत. प्रत्येक लेख, चर्चा, प्रत्येक विवाद एकाच विषयावर एकाच मुद्द्यावर आणला जाऊन बेमौत मारला जात राहणे हेच प्रत्येक लेखाचे आणि धाग्याचे नशीब झाले आहे.
प्रत्येक लेख आणि धागा काही आयडी त्यावर येताच अजेंडा प्रणित विषय येवून डिरेल होत माती होणार हेच भाग्य घेवून जन्माला येत आहे. हे कमी की काय म्हणून कायम असेच जंक धागे वरती रहावेत ह्या हेतूने दिवसाला अनेक ऊघडल्याही जात आहेत.
मायबोलीच्या 'माझ्यासाठी/ग्रूपमधील/मायबोलीवरील नवीन लेखन' (लास्ट ईन फर्स्ट आऊट) स्टॅक डिझाईन हे असे जंक आणि मुद्दाम वाद पेटवून दिलेले धागे सतत वरती राहण्याला पोषकंच झाले आहे. ईतरांच्या धाग्याचा, चर्चेचा जीव घेत कुठल्याही किंमतीत सतत चर्चेत राहून आपला अजेंडा रेटणार्‍या ह्या आयडींनी मायबोलीचा हा वीकपॉईंट (जो खरंतर चांगले, जास्तं प्रतिसाद मिळालेले धागे सतत वरती रहावेत आणि नव्याने येणार्‍या लोकांना दिसावेत ह्या हेतूने निर्मिलेला मायबोलीचा स्ट्राँगपाँईंट आहे ) एक्स्प्लॉईटच नव्हे अब्यूज करणे आपले मिशन बनवले आहे.
हे आयडी कुठलीही आडकाठी न येता राजरोजस पणे हे मिशन 'मुंह मे राम बगल में छुरा' पावित्र्यात सगळ्यांच्या डोळ्यादेखत राबवत आहेत.

गूगल सर्च मध्ये जर वरती कायम फालतू , वल्गर, स्पॉन्सर्ड, पॉर्न टाईप्स धागे दिसायला लागले तर युजर बेस वैतागणार, तक्रार करणार, आणि शेवटी डिसकनेक्ट होत जाणार तसेच आहे हे सुद्धा.

Pages