नार्सिजम Narcissism आणि सेल्फी selfie - आत्मप्रेम ?

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 May, 2017 - 06:01

तुमचे तुमच्या शरीरावर / चेहर्‍यावर प्रेम आहे का?
तुम्हाला स्वत:चा फोटो म्हणजेच सेल्फी काढायला आवडतो का?
साधारण आठवड्याला किंवा महिन्याला तुम्ही किती सेल्फी काढता?
त्यातले किती फेसबूक, व्हॉट्सप, इन्स्टाग्राम वा तत्सम सोशलसाईटवर शेअर करता?
एखादा नवीन मोबाईल विकत घेताना तुम्ही त्यातून सेल्फी चांगला येतो की नाही याला प्राधान्य देता का?
तुम्हाला अगदी वॉशरूममध्येही एकांत मिळालाय तर चला सेल्फी काढूया असे होते का?
सेल्फी चांगला यावा म्हणून तुम्ही तुमचे बाह्यसौंदर्य कसे चांगले दिसेल याची सतत काळजी करता का?
तुम्ही आरश्यासमोर वेगवेगळे चेहरे बनवत आपण कश्या अ‍ॅंगलने जास्त चांगले दिसतो हे बघत राहता का?
मित्रांचे गेट टू गेदर असो वा फॅमिली फंक्शन, त्याची सुरुवात वा सांगता सेल्फीने झालीच पाहिजे असे घडते का?
कुठे दोनचार दिवसांसाठी फिरायला गेले असता एकवेळ दात घासायचा ब्रश विसरलो तरी चालेन, पण सेल्फी स्टिक विसरता कामा नये असे तुमचे होते का?
फिरताना कुठे सेल्फी काढायला हवा? कुठे तो मस्त येईल? हे सतत तुमच्या डोक्यात चालू असते का?

थोडेसे गूगाळल्यावर समजले की नार्सिजम Narcissism म्हणजे स्वत:बद्दल असलेले प्रेम आणि आकर्षण हा एक आजार आहे. सेल्फीच्या नादात जीव गमवायला लागला या बातम्या आता फारश्या नवीन राहिल्या नाहीयेत. कित्येक लोकं हातपाय गळ्यात टांगून घेत असतील त्याची गिणतीच नाही. जीव धोक्यात घालावासा वाटणे हे कसले वेड? आजकालच्या यंगिस्तानला चोवीस तास सेल्फीस्तानमध्ये बुडालेले बघून हा आजार एका मोठ्या लोकसंख्येला आपल्या विळख्यात घेतोय असे वाटते. ऑफिसमध्ये कोणी नवीन मोबाईल घेतला तर सर्वजण आधी त्यातून सेल्फी कसा निघतो हेच चेक करतात. त्यानिमित्ताने आठ दहा सेल्फी घेतलेही जातात. अगदी मोबाईलच्या जाहीरातीत देखील चांगला सेल्फी कॅमेरा हेच मोबाईलचे सर्वात मुख्य फंक्शन असल्यासारखे त्यावरच भर दिला जातो. हे स्वत:बद्दलचे प्रेम सेल्फीमुळे वाढू लागले आहे, की मुळातच ते प्रत्येकामध्ये आधीपासूनच असायचे फक्त सेल्फीद्वारे त्याला बाहेर यायला वाट मिळाली आहे? हे सेल्फी एक फॅड म्हणत काही काळाने लोकं विसरून जाणार की हे वेड ईथून वाढतच जाणार? आणि या सर्वात तुम्ही कुठे आहात?

गंभीर चर्चा अपेक्षित !
धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचे तुमच्या शरीरावर / चेहर्‍यावर प्रेम आहे का?
तुम्हाला स्वत:चा फोटो म्हणजेच सेल्फी काढायला आवडतो का?
साधारण आठवड्याला किंवा महिन्याला तुम्ही किती सेल्फी काढता?
त्यातले किती फेसबूक, व्हॉट्सप, इन्स्टाग्राम वा तत्सम सोशलसाईटवर शेअर करता?
एखादा नवीन मोबाईल विकत घेताना तुम्ही त्यातून सेल्फी चांगला येतो की नाही याला प्राधान्य देता का?
तुम्हाला अगदी वॉशरूममध्येही एकांत मिळालाय तर चला सेल्फी काढूया असे होते का?
सेल्फी चांगला यावा म्हणून तुम्ही तुमचे बाह्यसौंदर्य कसे चांगले दिसेल याची सतत काळजी करता का?
तुम्ही आरश्यासमोर वेगवेगळे चेहरे बनवत आपण कश्या अ‍ॅंगलने जास्त चांगले दिसतो हे बघत राहता का?
मित्रांचे गेट टू गेदर असो वा फॅमिली फंक्शन, त्याची सुरुवात वा सांगता सेल्फीने झालीच पाहिजे असे घडते का?
कुठे दोनचार दिवसांसाठी फिरायला गेले असता एकवेळ दात घासायचा ब्रश विसरलो तरी चालेन, पण सेल्फी स्टिक विसरता कामा नये असे तुमचे होते का?
फिरताना कुठे सेल्फी काढायला हवा? कुठे तो मस्त येईल? हे सतत तुमच्या डोक्यात चालू असते का?
थोडेसे गूगाळल्यावर समजले की नार्सिजम Narcissism म्हणजे स्वत:बद्दल असलेले प्रेम आणि आकर्षण हा एक आजार आहे>>>

मला माहीत आहे असा मनुष्य.

हे सेल्फी वगैरे छोट्या शिशुतल्या मुलांचे चाळे आहेत.
मायबोलीच्या आद्य नार्सीसिस्ट गुरुजींच्या कार्यशाळेत जाऊन धडे गिरवा राव

आला का धागा ____/\____ Happy
यातलं फकस्त एकाच प्रश्नाचं उत्तर द्यायला आवडेल..
१) तुमचे तुमच्या शरीरावर / चेहर्‍यावर प्रेम आहे का? >>> अस म्हणण्यापेक्षा मी म्हणेन ,
तुमचे स्वत:वर प्रेम आहे का? ----> अफकोर्स आहे.....ते प्रत्येकाचचं स्वतःवर असलं पाहिजे Happy
कुठेतरी वाचलयं/ ऐकलयं आणि ते पटते सुद्धा :
जो खुदसे प्यार नही करता....तो लोग उसे क्या खाक प्यार करेंगे ? Happy

बाकी ,हे सेल्फी वगैरे मधे काही इंटरेस्त नाही....

तुमचे स्वत:वर प्रेम आहे का? ----> अफकोर्स आहे.....ते प्रत्येकाचचं स्वतःवर असलं पाहिजे
>>>>>>
हा टोटली वेगळा विषय आहे. माझे तर स्वत:वर प्रचंड प्रेम आहे. अगदी ते नार्सिस्ट वगैरे लोकं मलाच कित्येकदा बोलतात हा अनुभव घेऊन झालाय Happy

हर्पेन, चेकतो. विपुच्या हल्ली नोटीफिकेशन येत नाही आणि माझ्या थकेल्या मोबाईलवरून सारखे विपु आलीय का नाही चेक करायला त्या पेजवर जाणे जिकीरीचे पडते म्हणून कळत नाही. बरेच विपुना मी असेच लेट रिप्लाय दिलेले दिसतील.

हा टोटली वेगळा विषय आहे. >>> हो,की मग..
म्हणूनतर सुरुवातीला बोलले आहे ना कि, फकस्त एकाच प्रश्नाच उत्तर द्यायला आवडेल म्हणून Happy
बाकिचे प्रश्न मला लागू होत नाही...

की मग तुम्हाला सेल्फि प्रेमींबद्दल ओवरॉल त्याबद्दल प्रत्येकाचं मत जाणून घ्यायचयं कि त्यांच काय म्हणन आहे याबाबत ते ???

मेघा हो, मला हे सेल्फीचे वेड चिंतेचा विषय वाटतो.
अर्थात मलाही फोटोंची आवड असली तरी हे सेल्फी वेड तितक्या प्रमाणात नसल्याने ईथे जर कोणाला सेल्फीची भरमसाठ आवड असेल तर त्याची बाजू, त्याचा दृष्टीकोण जाणून घ्यायला आवडेल.

सेल्फीचे वेड चिंतेचा विषय वाटतो.>> > +१११११
खरतर हा मेन मुद्दा आहे लेखाचा किंवा असला पाहिजे ...

आता याबद्दल नेमक काय वाटतं ते लिहिन नंतर ...

व्यत्यय,
>>>>>
मायबोलीच्या आद्य नार्सीसिस्ट गुरुजींच्या कार्यशाळेत जाऊन धडे गिरवा राव>>>>
हे आद्य गुरुजी कोण?
कुठलाही विषय असो, मी माझे, मला ,माझा अनुभव, करणारे गुरुजी का?

अगदी बरोबर सिम्बा, आपल्यावरचा प्रकाशझोत कोणा दुसऱ्यावर जातोय या विचारानेही अंगाचा तिळपापड होऊन आकांडतांडव करणारे तेच ते.