प्रेमात असंच का होतं ?

Submitted by अजय चव्हाण on 25 July, 2017 - 03:56

"आज व्हॅलेटाईन डे है ड्युड आज नही तो कभी नही..
आज फुल न फायनल करही दे ये तोफा उसे दे उसने लिया तो ठीक वरना इसी तोफा को तोड दे और तेरे जजबात को भी तोड दे.. प्राॅमिस.." विरल आणि माझे इतर मित्र क्लासच्या बाहेर माझ्याकडून प्राॅमिस घेत होते.. विरलचे शब्द माझ्या कानात घुमत होते..

प्राॅमिस ..त्याने परत एकदा प्राॅमिस मांगितले..

तसे मी ते प्राॅमिस करून त्याच्या हातावर फाय दिली...तिच्यासाठी मी ओम शांती ओममधलं काचेत असलेलं एका कपलच डान्सिंग विथ साॅगवाल गिफ्ट घेतलं होतं..
ते भराभर पॅक करून मी निघालो.

मनात थोडीशी धाकधुक होती..ह्रदयाची धडधडही आता वाढू लागली कसलीतरी एक अनामिक भितीही वाटत होती..

इतक्यात ती आणि तिच्या मैत्रिणी मला येताना दिसल्या..
मी थोड पुढे जाऊन मला तुझ्याशी काही बोलायच आहे असं तिला सांगून साईडला येण्याची खुण केली.

तिनेही जास्त आढेवेढे न घेता साईडला आली..
"बोल लवकर तुला काय बोलायच आहे ते.. क्लास आता सुरू होईलं.." ती उगाचच ओढणी सावरल्याच आव आणत म्हणाली...

अं..ह..अॅक्चुली...मला तुला काही द्यायच आहे..थोडीशी हिंमत करून मी म्हणालो. ..

काय ? खुपमोठ प्रश्नचिन्ह घेऊन तिने मला विचारलं..

" हे बघ..मी हळूच मागे लपवलेलं गिफ्ट तिच्या पूढे केलं..
मला माहीतेय तुझ्या मनात मी नाहीये..पण तरीही हे गिफ्ट घ्याव असं मनापासून मला वाटतं.." एका दमात मी सारं सांगून टाकलं..

"साॅरी जयेश हे गिफ्ट मी नाही घेऊ शकत.. तु प्लिज दुसर्‍या कुणालातरी हे गिफ्ट दे.." - ती..

" हे गिफ्ट फक्त मी तुझ्याचसाठीच घेतलं आहे आणि ह्या गिफ्टवर फक्त तुझाच अधिकार आहे..तु नाही घेतलेस तर मी हे इथेच तोडून टाकेन" मी तिला आर्जव करत बोललो..

" हे बघ जयेश हे जरा अति होतय..तु आता नाही ऐकलस ना तर सरांना तुझ नाव सांगेन "..

" सांग ना मग..सर येऊन काय करतील फार फार तर माझ्या कानाखाली मारतील पण त्याने तुझ्यावर असलेलं माझं प्रेम थोडीच कमी होणार आहे??"

" लिव्ह ईट ..तुला काय करायच आहे ते कर मी चालले बाय"
इतकं बोलून ती निघूनही गेली..

ती गेल्यानंतर माझे मित्र जवळ आले..काय झाले हे त्यांना दिसले होतेच ..
" जयेश तोड दे इस गिफ्ट को..और तेरे अंदर के चुपे हुए जजबात को भी.." पुन्हा एकदा विरल बोलत होता...

माझ्या मनात चलबिचल सुरू झाली..
हे गिफ्ट नव्हतच मुळी...माझ्या भावना होत्या त्या... माझं प्रेम होत ते..असं कसं मी तोडू शकलो असतो ते गिफ्ट..

"नही यार मै इसे नही तोड सकता चाहे तो तुम तोड दो.."

विरलने ते गिफ्ट घेतलं आणि जवळच असलेल्या गटारावर ठेवलं एक एक करून सगळ्यांनी लाथा मारायली सुरूवात केली...
ते गिफ्ट जेव्हा तुटत होतं तेव्हा ते गिफ्ट तुटत नसून जणू काही माझ्याच ह्रदयाच्या काचा तुटत आहेत असं मला वाटतं होतं...

फायनली सगळ्यांनी लाथा मारून घेतल्यानंतर मलासुद्धा एक लाथ तरी मारायला फोर्स केलं..

तसे मी डोळे बंद करून एक लाथ मारली..
आणि खर्या अर्थाने त्या गिफ्टचा चकणाचुर झाला..
कदाचित त्या गिफ्ट पेक्षा माझ्याच ह्रदयाच्या चकणाचुर झाला होता...

............................................................................ .............................................................................

भर उन्हात मी मुकाट्याने चालत होतो..अंगाची नुसती लाही लाही होत होती ..पण त्याचबरोबर माझ्या मनात लावारस उसळला होता..डोळ्याच्या कड्यात थोडे कोमट अश्रू जमा झाले होते.. ते कसेबसे लपवून मी एकटाच जात होतो.. लहान मुलाला एखादं अविचत काहीतरी सापडावं आणि सगळं काही विसरून
त्याने त्यासोबत रमावं असंच काहीतरी माझं मन तिच्या जुन्या आठवणीत रमतं होतं..एक एक क्षण क्षण मला आठवतं होता..

क्लासचे सर अकांऊट विषयाचे सरावाचे पेपर तपासुन घेऊन आले होते..
एक एक नाव ते उच्चारून ते तपासलेले पेपर वाटत होते..
शेवटी एकच पेपर आता उरला होता..
सरांनी वाजवीपेक्षा जरा जास्तच जोराने तिच नाव उच्चारलं...

"प्रेरणा मानेऽऽऽ. ." तशी एक काळीसावळी मुलगी दबकत बेंचवरून उठून सरांकडे गेली...

"काय ग असा पेपर कुणी लिहत का कधी..?" सर जरा खेकसतच तिला बोलले..
ती तिथेच स्तभ झाल्यासारखी उभी राहीली..
हे तिला अपेक्षित नसावं बहुतेक..
तिला असं बघून सर खुप खळखळून हसले..आणि तिचा पेपर तिच्या हातात दिला..तिने भराभर नजर मार्कावर फिरवली..आणि अत्यांनंदाने तिने हलकीशी उडी मारली...
बस तोच एक क्षण..तो क्षण माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण होता..त्या क्षणात नक्कीच काहीतरी वेगळं होतं..
त्या क्षणाने जणू माझं मन मंतरल होतं ..तिच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा तो आनंद हा मला आतापर्यतच्या माझ्या आयुष्यात मिळालेल्या अत्यानंदापेक्षा कितीतरी पटीने मोठा वाटत होता..कित्येक वेळा ती मला दिसायची पण तिच्याबद्दल असं कधीच काही वाटलं नाही पण आज मात्र खुप वाटत होतं..

तिला पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले होते..त्यामुळेच ती इतकी खुश झाली होती..मी एकटक वेड्यासारखा तिच्याचकडे बघत होतो..कदाचित सरांच ते लक्षात आलं असावं म्हणूनच की काय सरांनी माझ्याकडे मोर्चा वळवला..

"काय जयेशराव...सालाबादप्रमाणे यंदाही नापास झालात तुम्ही. .
काय लाज लज्जा आहे की नाही?"

माहीत नाही पण माझ्याही नकळत मी..

" सर अभी तो रास्ता मिला है.. मंझिल भी मिलही जायेगी.."
असं काहीतरी मी पुटपुटलो आणि सरांनी कपाळावर हात मारून घेतला..

ती कुठे राहयची माहीत नाही...मीही तिला काय वाटेल म्हणून कधी फाॅलो केलं नाही पण ती कलासमध्ये यायची..
तेव्हा खुप छान वाटायचं...
ती खुपच साधी होती..तिच्यात असं काही नव्हतंच मुळी..
चारचौघातही ती उठून दिसणारं नाही अशी होती ती..
तरीही मला ती खुप आवडली होती..

असाच एकदा बसस्टाॅपवर बसची वाट पाहत उभा होता..
आज ती दिसावी असा विचारच मी करत होतो की, समोर मला ती येताना दिसली..तिला असं अनपेक्षित समोर आलेलं पाहताना..माझ्या मनात फुलपाखरे भिरभिरत होती..
एकाच बसमधून आम्ही दोघंही गेलो...
आम्ही एकत्र क्लासला जरी असलो तरी आमची ओळखच नव्हती..कधी आम्ही एकमेंकांशी बोललोच नाही..

ती हयाच स्टाॅपला येते म्हणून मी रोजच त्या वेळी तिची वाट पाही पण पुन्हा कधी ती दिसलीच नाही..
ती मला बाहेर जरी दिसली नाही तरी क्लासमध्ये दिसायचीच..
पण क्लासमध्ये तिला पाहणं आणि बाहेर पाहण ह्यात खुप फरक असायचा कारण क्लासमध्ये ती नेहमीच पुस्तकांच्या किंवा मैत्रणीच्या गराड्यात असायची..
तिने वेळ बददली असेल म्हणून मीही वेळ बदलून पाहीली बट तरीही ती परत त्या स्टाॅपवर दिसलीच नाही..
तरही माझं मन एक वेडी आशा घेऊन रोज त्या स्टाॅपवर तिची वाट पाही..

..........................................................................................................................................................

लवकरच गणपती बाप्पाचे आगमन होणार होते...त्यामुळे आमच्या चाळीत होणार्या सार्वजनिक गणेशोत्सवसाठी जय्यत तयारी सुरू झाली होती आता मंडळाचा सदस्य या नात्याने संपुर्ण एरियामधून वर्गणी गोळा करण्याचे काम माझ्या वाटेला आले होते...संध्याकाळची सात साडेसातची वेळ असावी बहुतेक...असेच छोटया छोट्या गल्लीतून रस्ता काढत आम्ही एका घराजवळ पोहचलो मी दारावर टकटक केली..
घराचा पडदा बाजूला सारत एका मध्यम वयाच्या बाईने प्रश्नार्थक नजरेने आमच्याकडे पाहीले..
"काकू गणपतीची वर्गणी..." असे सगळेच एकदम म्हणाले
"आणते हा"...असं म्हणून काकू आत किचनमध्ये गेल्या ..
मी सहजच आतमध्ये पाहीलं...छोटसच पण नीटनेटक आवरलेलं घर..मस्त गरगर पंखाच्या वार्यावर उडणारे खिडकीचे रेशमी परदे...नुकतीच धुतलेली स्वच्छ फरशी...समोरच खुप मोठ अधिष्ठान ( दत्तात्रय या देवाचा फोटो. बैठकीला जे जातात त्यांना माहीत असेलच)
अगरबत्ती धुपाचा मस्त घरभर दरवळलेला सुवास..
आणि नेमक्या देवार्याच्या पायथ्याशी दासबोध वाचणारी "ती"
मला स्पष्ट दिसत होतं..वार्यावर तिचे केस भुरभुरत होते..
हलक्या पांढर्‍या रंगाची तिची ओढणी त्या हवेत हलकेच लहरत होती..चेहर्‍यावर सात्विक भाव..ह्या जगात देव जर कुठे असेल तर तो तिच्याच ह्रदयात असेल हे मी छातीठोकपणे सांगू शकतो...तिच्यात आज नव्याने मला "रब" दिसला होता...
काही डब्बाच्या खडखडाट आवाजानंतर काकू बाहेर आल्या..
"किती द्यायची रे पोरांना??" काकूने प्रश्न केला..
कुणीतरी एकशेएक म्हणण्याअगोदरच मी एक्कावन म्हटलं..
तसे माझ्याकडे सगळे विचित्रपणे पाहू लागले...
आम्ही ते पैसे घेऊन निघालो..तशे सारी मित्रमित्रमंडळी माझ्यावर उखडली...मग मी त्यांना माझी सासुरवाडी असल्याचं सांगितल्यावर कुठे ते शांत झाले..
गणपत्ती बाप्पा येण्याअगोदरच मला पावले होते...
त्यांनीच तिच्या घरची वाट दाखवली होती..

ती माझ्याच एरियात राहत असताना मला ती कधी दिसलीच नाही..पण आज बाप्पाने तिचे दर्शन मला स्वतःहून घडवले होते..
पुढे आमची ओळख झाली..जाता येता स्माईल एक्सेंज होऊ लागल्या.. मीही मुद्दाम कधीतरी तिच्याकडे नोटस मागायचो..
मग नंबर एक्सेंज झाले...मी मुद्दामच रोज सकाळी काॅलेजला थोड्याशा आडवाटेने तिच्या घराजवळून रोज जायचो..ती मला दिसायची..कधी बॅग भरताना, कधी केस विंचरताना, कधी सॅडल घालताना..आणि रोज सकाळी मी तिला मॅसेज पाठवून काॅम्पीमेंट द्यायचो..."गुड माॅर्निंग. आज हिरव्या ड्रेसमध्ये छान दिसतेस तु" ह्या मॅसेंजमध्ये फक्त रोज फक्त रंग बदलायचा..

एव्हाना तिलाच काय अख्ख्या क्लासमध्ये, एरियामध्ये माहीत झालं होतं..फक्त विचारायची देरी होती...
शेवटी एकेदिवशी धाडस करून विचारलच ..ती " नाही " असं बोलली..
आठवडाभर क्लासला नाही गेलो..
जेवणही सोडलं होतं. तब्येत खालावली होती...थोडासा तापही आला होता. संध्याकाळी डाॅक्टरकडे जाताना ती मला दिसली..
तिने मला पाहीलं होतं..कदाचित कुठेतरी तिच्या मनात
दया उत्पन्न झाली असावी म्हणूनच तिने मला दुसर्या दिवशी फोन केला...

" मी थरथरत फोन उचलला..समोरून एक अनोळखी आवाज ऐकू आला..

"तुझी हिंमतच कशी झाली प्रेरणाला प्रो करण्याची ?"

मीपण जरा घुश्यातच "तुला तर नाही केला ना..मग तुझ्या का पोटात दुखतय असं म्हणालो.."

असं बोललो न बोललो तोच प्रेरणा लाईनवर आली...
बहुतेक फोन लाऊडस्पीकरवर होता..

" माझ्यावर प्रेम आहे ना तुझं?? मग माझ्या मैत्रिणीशी असं उद्धट बोलणार तु..हेच का तुझ प्रेम??

हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली...तरीही तिच्या प्रेमापोटी..त्या तिघी चौघीनी मिळून केलेला शाब्दीक आणि मानसिक सामुहीक बलात्कार मी सहन केला होता...

पुढे आमची मैत्री तर कायम राहीली बट मी फक्त युज होत राहलो...तिच्यावर माझं खुप प्रेम आहे हे सिद्ध करण्यासाठी
ती आणि तिच्या मैत्रिणीच्या हातातलं बाहुल बनलो होतो मी..

बट तरीही मी हार नव्हती मानली.
कधी ना कधी कळेल तिलाही माझं खरं प्रेम...

आणि आजही तिने गिफ्ट नाही घेतलं म्हणून काय झाले??
पुढे तिला ते घ्यावच लागेलं..

क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फालतू गोष्ट आहे. मुलगी नाही म्हणतेय तर त्याचा अर्थ नाही असाच होतो हे शिकवा आता असल्या पुचाट पोरांना. पुढचा भाग नाही आला तरी चालेल.

कथा वाचल्यावर एकतर्फी प्रेमाचा प्रकार आहे असं दिसत,
लेखक या प्रकारचं समर्थन करतो की नाही हे लेखकाने स्पष्ट करावे.
लेखकाने या कथेबद्दलची भूमिका स्पष्ट करावी.
माझ्या मते लेखकाने दुसरा भाग टाकावा.

कथेचं शिर्षक सांगतंय की निगेटिव आहे कथा. लेखक नायकाची व्यथा सांगतोय हे अगदी स्पष्ट आहे...मग एकदम फालतू आणि फडतूस लेबलं आपण कसे लावू शकतो?...
जुनं माहीत नाही अगदी अलिकडलं सांगतो, कॉलेजजिवनात (ज्युनिअर कॉलेजेस आणि सिनीयर कॉलेजची पहिली एकदोन वर्ष) मुलीला प्रपोज केल्यावर त्यांच्यातील बहुतांश जणी सुरूवातीला नकार देतात आढेवेढे घेतात..नंतर काहीजणांचं सुत जुळूनही येतं.. अनेकदा मुलींकडून मुलांचा वापरही होतो..बिचारी मुलं ऐकत राहतात.. प्रत्यक्ष पाहीलंय... भाषेचं म्हणाल तर आज सर्रास ही भाषा (हि तरी खुप संयत लिहीली गेलीय प्रत्यक्ष यापेक्षा खुपच फालतू असते) वापरली जातेय कॉलेजलाईफमध्ये..जे बघण्यात येतंय ते तसंच लेखकाने लिहीलेलं दिसतंय....आणि शेवटी ही कथा आहे काही अनपेक्षित वळण पुढील भागांमध्ये देताही येईल...
एकदम लिहूच नका म्हणून लिहीणार्याला निरूत्साहि करण्यात काही अर्थ नाहीये...

अजय, तुम्ही लिहीत रहा...पुढील भागाच्या प्रतिक्षेत..

लेखकाने या कथेबद्दलची भूमिका स्पष्ट करावी +१११११
अशा प्रेमाने जर मुलीला मानसिक त्रास होत असेल तर, मी सुद्धा एकतर्फी प्रेमाच्या पूर्ण विरोधात आहे.
माझ्या मते एकच भाग वाचून लेखकावर बहिष्कार टाकणे योग्य वाटत नाही

अशा प्रेमाने जर मुलीला मानसिक त्रास होत असेल तर, मी सुद्धा एकतर्फी प्रेमाच्या पूर्ण विरोधात आहे. >>>+१
पण नाण्याला दोन बाजू असतात. मी एकतर्फी चं अजिबात समर्थन करत नाहीये..
कथेचं शिर्षक, 'प्रेमात असंच का होतं?' म्हणजे नायक असलेल्या मुलाला मानसिक त्रास होतोय आणि तो लेखक आपल्याला उलगडून दाखवतोय..

साधना आणि सायो,
सर्वप्रथम प्रतिसादाबद्दल धन्यवाद..

ही खरीखुरी कथा आहे माझ्या मित्राच्या आयुष्यात घडलेली आणि त्यावर लिहाव अशी त्याची इच्छा होती म्हणूनच हे धाडस मी केलं.....

तुम्हाला कथा नाही आवडली हे तुमच मत आहे आणि आपलं मत तुम्ही मांडलत ह्यावर मला काहीच आक्षेप नाही...
मी प्रत्येकाच्या मताचा आदर करतो..

आणि राहीला प्रश्न लिखाणाविषयी तर हो मी अजुनही स्वःतला लेखक मानत नाही मी प्रयत्न करतोय...हा प्रयत्न कदाचित फसला असेलही पण" प्रयत्नांती परमेश्वर " ह्या उक्तीप्रमाणे मी प्रयत्न करणं सोडणार नाही....

वास्तव हे नेहमी दाहकच असतं आणि हेच वास्तव मांडण्याचा मी प्रयत्न केलाय...

असो तुमचा आदर करतो मी आणि करत राहीन..

तुम्हाला जर माझ्या लिखाणावरून काही त्रास झाला असेल तर त्याबद्दल क्षमा असावी..

धन्यवाद राहुल आणि कल्पना..

निस्तुला : मी एकतर्फी ,दुतर्फी कुठल्याच प्रेमाच समर्थन करत नाहीये...ही खरी खुरी गोष्ट जशी घडलीय तशीच लिहण्याचा प्रयत्न केलाय....

मला ह्यातून काहीच बोध द्यायचा नाही ..

ही केवळ कथा म्हणून वाचावी इतकीच माफक अपेक्षा आहे...

सत्यकथा असेल तर असो बापडी. पण हल्ली मराठीत गोष्टी लिहिताना हिंदी शब्द वापरायची फॅशन आली आहे की असाच ट्रेण्ड आहे? हे असे लेख, कथा वाचल्या की विरस तर होतोच आणि चीडही येते.
तुमच्या गोष्टीत चकणाचुर, परदे, रब, विचारायची देरी वगैरे शब्द सापडले.

वैदर्भीय असतील त्यांचे मित्र. हिंदीचा बराच प्रभाव असतो तिथे भाषेवर.

त्या मुलीने इतकं स्पष्ट सांगूनही ते तो शाब्दिक मानसिक सामूहिक बलात्कार की काय तो ओढवून घेत आहेत आणि वर परावृत्तही होणार नाही असंही म्हणत आहेत हे विचित्र वाटतं खरं वाचायला. सत्यघटनेवर आधारित म्हटल्यावर आणखीनच. त्या मुलीची काळजी वाटते. कथेत काहीही होवो, प्रत्यक्षात तुमच्या मित्राला सद्बुद्धी झाली असेल अशी आशा करते.

प्रेम आंधळ असतं आणि त्याचा त्याच्या प्रेमावर विश्वास असेल तर काय हरकत आहे...

प्रेमाने जग जिंकता येतं तर जिच्यावर प्रेम केलं तिला का नाही जिंकू शकत ...

आणि नकार दिल्यानंतरही नंतर काही दिवसांनी,काही वर्षानी होकार दिल्याची खुप उदाहरणे आहेत..

आणि हो हिंदी शब्दांच म्हणालं तर बोलण्यात आपण सहज कितीतरी शब्द बोलून जातो आपल्याही नकळत....सहवासाचा कधीतरी परिणाम होतोच की..

कथेचं मुख्य पात्र नकारात्मक असेल म्हणून कथा "फडतूस" ठरते आणि लेखक भंगार होतो, किंवा लेखक त्या पात्राचं समर्थनच करतोय, अशी बाष्पळ विधान कोणी करत असेल, तर दुर्लक्ष करावे
याच मुद्द्यावर आलेला "ए दिल है मुश्किल" हा सिनेमा सुद्धा "फडतूस" ठरतो, त्या सिनेमात तर "एकतर्फी प्रेमाचा" सत्कार केला आहे.

कथा जर नकारात्मक पात्राच्या दृष्टीकोनातून लिहली गेली असेल, तर ती कथा वाईट ठरत नाही, कारण कथा वाचताना ते पात्र चुकीचं वागत आहे, याची जाणीव आपल्याला पदोपदी होत असते आणि हेच कदाचित सांगण्याचा लेखकाचा प्रयत्न असू शकतो

मुलगी नाही म्हणतेय तर त्याचा अर्थ नाही असाच होतो हे शिकवा आता असल्या पुचाट पोरांना.
>>>>>
नो मीन्स नो.. हा विचार योग्य आहे.
पण प्रॅक्टीकली पोरगा प्रेमात पडला, पोरीला प्रपोज केले, ती नाही म्हणाली, पोरगा तिला विसरला... हे ईतके सोपे नसते. किंबहुना हे असे सहजपणे होत नाही.
पण प्रेम कायम राहिले म्हणून प्रत्येक पोरगा डर वा अंजामच्या शाहरूखसारखाच वागला पाहिजे असे नाही. कभी हा कभी ना च्या शाहरूखसारखाही वागू शकतोच.

एकतर्फी प्रेम मनात तसेच तेवत ठेवून तिच्या सुखात आपले सुख हे समजून घेणे ही या केसेसमध्ये मला आदर्श स्थिती वाटते.

असो, ही कथा आहे. अर्धवट कथेवर काय भाष्य करणार. लेखक पुढच्या भागात कशीही फिरवू शकतो. मला शेवटचे पॅराग्राफ पाहता वेगळीच शंका येतेय. त्या मुलाच्या एकतर्फी प्रेमाचा मुलीने फायदा उचलला वगैरे..

अर्थात या कथेत त्या मुलाचे जसे रोड रोमिओ टाईप कॅरेक्टर उभे केलेय ते पाहता असे झाले तरी त्याला फारशी सहानुभुती द्यावी वाटणार नाही.

पण यानिमित्ताने माझा एक स्कॉलर मित्र आठवला. तितकाच तो सज्जन देखील होता. त्याचे वर्गातल्याच एका मुलीवर प्रेम होते. अखेरपर्यण्त करत राहिला. आणि तिने त्या प्रेमाचा कसा फायदा उचलला यावर आता मलाही लिहावेसे वाटू लागलेय... पण आधी झोप पूर्ण करतो Happy

आणि हो, त्यांना पुर्ण कथा लिहू द्या. निगेटीव्हिटीचे उदात्तीकरण आढळले तर नक्कीच निषेध करूया. पण त्या आधी त्यांची बाजूही ऐकूया. कारण लेखकाला जे मांडायचे आहे ते नेमके तसेच न पोहोचण्याची शक्यताही असतेच. जसे ते म्हणाले की मित्राची सत्यकथा आहे, आणि मी म्हणालो मला ते कॅरेक्टर रोडरोमिओ टाईप वाटले. पण प्रत्यक्षात त्यांचा मित्र तसा नसावा आणि त्यांच्या लिखाणातील दोषामुळे तसे वाटले असावे. किंवा माझ्या वाटण्यातही गल्लत असू शकते. हुशार मुलगा म्हटले की सज्जन आणि अभ्यासात गती नसलेला म्हटले की दुर्जन हे आपले साधारण फर्स्ट ईंप्रेशन असते.

तर लिहू द्या त्यांना. एखादी सत्यघटना असेल तर नक्कीच लिहू द्या. कारण मगच त्यावर काय बरोबर काय चूक याची चर्चा करून योग्य ते विचार लोकांपर्यंत पोहोचवता येतात.

जबरदस्त कथा... अत्यंत फालतू कंमेंट्स...लेखक आहे.. उपदेश द्यायला नाही लिहिलंय कथा... येऊ द्या पूर्ण कथा...

मग मी त्यांना माझी सासुरवाडी असल्याचं सांगितल्यावर कुठे ते शांत झाले..

हा हा हा

फालतू गोष्ट आहे. मुलगी नाही म्हणतेय तर त्याचा अर्थ नाही असाच होतो हे शिकवा आता असल्या पुचाट पोरांना. पुढचा भाग नाही आला तरी चालेल.
Submitted by साधना on 27 July, 2017 - 09:08
अगदीच फडतूस आहे गोष्ट. कंटेंट आणि भाषा दोन्ही.
साधनाशी सहमत. प्लीज नका टाकू पुढचा भाग.
Submitted by सायो on 27 July, 2017 - 09:36
>>>>>>>>
@ Admin - नवीन लेखकांना नाउमेद करतायत लोक इथं...

अजय.. पुढचा भाग नक्की येऊ द्या... निगेटिव्ह कंमेंट्स इग्नोर करा...

च्रप्स, तुम्हांला आवडली आहे तर तुम्ही वाचा ना. नाही कुणी म्हटलंय? माझं मत मी लिहिलंय आणि गोष्टीच्या खालीच लिहिलं आहे. लेखकाने गोष्ट पब्लिश केली आहे तर चांगल्या वाईट प्रतिक्रिया येणारच ना?

>>>कथेचं मुख्य पात्र नकारात्मक असेल म्हणून कथा "फडतूस" ठरते आणि लेखक भंगार होतो, किंवा लेखक त्या पात्राचं समर्थनच करतोय, अशी बाष्पळ विधान कोणी करत असेल, तर दुर्लक्ष करावे. >>>+१
मायबोलीवर ' पुढचा भाग टाकु नका ' अशा प्रतिक्रिया योग्य नव्हेत. वाचणे - न वाचणे आपण ठरवू शकतो ना ?

वाचणे न वाचणे आपण ठरवा, बघणे न बघणे आपण ठरवा... मुलींनी 10 दा नकार दिला तरी त्या नंतर होकार देणार हे आपण ठरवा.. तिने तरीही नकार दिला तर तोंडावर ऍसिड फेकायचा विचार करा...

कसं असतं ना, जोवर हे आपल्या बाबत होत नाही तोवर आपण व्यक्ती स्वातंत्र्य, तौलनिक विचार, योग्य अयोग्य हे सगळे विचार आरामात सुरक्षितरीत्या करु शकतो. आपण हे करताना कशाचं समर्थन करतोय हे कळत नाही आपल्याला.

अशाच एका पॅनेलवर लोक असेच अतिशयच उदारमतवादी होऊन अशाच आदर्शवादी विचारांची देवाणघेवाण करत होते. जिच्या संदर्भात हे सगळे सुरू होते त्या मुलीची आईही त्या पॅनेलवर उपस्थित होती, जिने त्या घटनेनंतर कसे दिवस काढले असतील याचा विचारही मला करवत नाही. तिला हे उदारमतवादी लोक इतके असह्य झाले की तिने व्याकुळ होऊन शेवटी विचारले, तुम्हारा अपना कोई मरा नही ना?

त्यामुळे तुम्हीही जोवर तुमच्या मुलीला कोणी असा त्रास देत नाही तोवर अजीबत विरोध करू नका. मजा बघत बसा.

कथेची भुमिका नंतर काय असेल माहीत नाही पण "पुढे तिला ते घ्यावच लागेलं.." म्हणुन निगेटिव्ह वळणावरनक्कीच नेउअन ठेवली आहे.
नो मीन्स नो.. हा विचार योग्य आहे. <<< ++१११
सलमान खान ने सुलतान च्या वेळी हा शब्द वापरला होता तेव्हा मोठा गदातोळ झाला होता. आणि ईथे तर फोनवर झालेल्या कॉन्व्हर्सेशन साठी (जे थांबवण एका क्लिक ने करता येण्यासारख होत) वापरला आहे.... काही शब्द असे लुसली वापरुन त्यातील गांभीर्य घालवायला नकोत.

कितीही युक्तिवाद करा... पुढचा भाग टाकू नका प्लिज, पुढचा भाग नाही आला तरी चालेल, असे कसे म्हणू शकता एखाद्या लेखकाला तुम्ही...

तुमची पुढची कंमेंट अली नाही तरी चालेल, प्लिज यापुढे कंमेंट्स करू नका प्लिज... अशी उत्तरे चालतील का तुम्हाला...

लेखकाचा विचार करा जरा...

आपण स्वतः मोठे लेखक असल्यासारख्या प्रतिक्रिया लोकं का देतात कोण जाणे! नाही आवडली नका वाचू. कोणी आग्रह केला आहे का?
अजय चव्हाण, तुम्ही सगळ्या प्रतिक्रियांना अगदी संयमीत उत्तर दिलीत त्याबद्दल कौतुक वाटलं.

आर्च, >>नाही आवडली नका वाचू. कोणी आग्रह केला आहे का?>> हे मला वाटतं आता सोशल वेबसाईट्सवर घासून घासून गुळगुळीत झालंय असं नाही वाटत?
तू फक्त प्रतिक्रिया वाचल्यास का? गोष्ट आवडली ते नाही सांगितलंस ते? Wink

>>अजय चव्हाण, तुम्ही सगळ्या प्रतिक्रियांना अगदी संयमीत उत्तर दिलीत त्याबद्दल कौतुक वाटलं.<< +१००
मी कधी कधी लेखावरच्या सुरवातिच्या काही प्रतिक्रिया वाचुन मग लेख वाचायचा की नाही ठरवतो. कथा / कविता आवडली नसली तरी 'लिहुच नका' असा सल्ला देण्याऐवजी मीच काही लिहित नाही. सगळे लेख कविता आपण वाचलेच पाहिजे असंही नाही ना!

त्यामुळे तुम्हीही जोवर तुमच्या मुलीला कोणी असा त्रास देत नाही तोवर अजीबत विरोध करू नका. मजा बघत बसा.
>>>>>>>

कुठला विषय कुठे नेत आहात?

मजा बघत बसा?
एक कथा आहे. अजून पुर्णही झाली नाही. पण झालीय समजा. त्यातला नायक(?) मुलीला त्रास देत आहे. आणि वाचक विकृतपणे मजा घेत मिटक्या मारत त्या प्रसंगाचे वर्णन वाचत आहेत........ असे काहीतरी चित्र आपल्या वरच्या एकूणच पोस्टने उभे होतेय.

रस्त्यावर एखादा रोडरोमिओ मुलीच्या मागे लागला असताना त्याला हटकणे वेगळे झाले. पण कथेत असे काही घडताना कथालेखकाला झोडपणे हे मला जरा अजीब वाटते.

त्यातला नायक(?) मुलीला त्रास देत आहे. आणि वाचक विकृतपणे मजा घेत मिटक्या मारत त्या प्रसंगाचे वर्णन वाचत आहेत.......>>>>>

माझया मते exactly हेच होतेय.

मुलीने नको mhantanahi तिला भेट घ्यायचा आग्रह करणे, रोज तू छान दिसतेस हे मेसेज करणे हा त्रास देणे नसेल तर त्रासाची व्याख्या नेमकी कधी सुरू होते? आणि काय केले म्हणजे त्रास दिला हे समजले जाते? आणि त्रास होतोय की नाही हे ज्याला होतोय तो ठरवणार की जो देतोय तो ठरवणार?

असो. इथल्या सुजाण वाचकांना हे प्रश्न पडत नाहीयेत. डोळ्यावर कातडे ओढून बसलेत. बसा.

अजयजी तुम्ही लिहित रहा..
एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते,
निगेटीव प्रतिसाद आले तरी कुठ ल्याही लेखकाने नाउमेद होऊ नये...निगेटीव प्रतिसाद देण्यामागे कोणाला दुखवण्याचा उद्देश नसतो... उलट अशा प्रतिसादंमधून बरेच काही शिकता येतं... अशी भुमिका ठेवा...

चिप्स ,राहुल +१११११११११११

Pages