आमच्या घराची परंपरा आहे. मुलाचे लग्न लावायच्या आधी त्याला पायावर उभे करायचे, तसेच त्याला स्वत:च्या हिंमतीवर आपला संसार थाटण्यासाठी जीवनावश्यक गोष्टींनी सजवलेले घरही बनवायला लावायचे. बनवायचे म्हणजे अगदी गवंडी काम करत बनवायचे नाही तर खरेदी करायचे. आणि मगच लग्न करायचे. या प्रक्रियेतील पहिले पाऊल म्हणून फ्रिजपासून सुरुवात करायचे ठरवले. तर फ्रिजच का? उत्तर सोपे आहे. मनुष्याच्या मूलभूत गरजा तीन - अन्न, वस्त्र आणि निवारा. तर अन्नाला निवारा देणारा फ्रिजच पहिले घेऊया म्हटले. जेव्हा मी हे गर्लफ्रेंडला सांगितले तेव्हा ती मला म्हणाली, ऋन्मेष तू एक माठ आहेस. ठिक आहे, तरी घेऊया फ्रिज.
मी तिला सात दिवस दिले. फ्रिज कोणत्या रंगाचा असावा हे ठरवण्यासाठी. बाकी टेक्निकल स्पेसिफिकेशन वगैरे तसेही आपल्याला समजत नसल्याने आणि या बाबतीत दुकानदारावरच विश्वास ठेवायचा असल्याने त्यात जास्त डोके खपवायचे नाही असे दोघांनीही ठरवले. तरी तिने पंधरा दिवस घेतले. घराच्या हॉल, बेडरूमच्या भिंतींना आणि बाथरूमच्या टाईल्सना कोणते रंग असतील, मग किचनच्या वाट्याला कोणता रंग येईल, त्यानुसार कोणत्या रंगाचा फ्रिज तिथे सूट होईल असा एकंदरीत हिशोब लावायला. तिच्या या हिशोबी गुणाला अनुसरून तिने मलाही असे बरेच हिशोब करत पसंद केले असणार म्हणून स्वत:चेच कौतुकही वाटले.
आणखी सात दिवस मी घेतले कारण मायबोली, फेसबूक, व्हॉटसप या दोनचार ठिकाणी लोकांकडून सल्ले मागण्याच्या बहाण्याखाली आपण नवीन फ्रिज घेतोय हे मिरवल्याशिवाय तो घेण्यात काही मजा नसते. या नादात महिना संपायला सात दिवस शिल्लक राहिले. तसा पुरेसा बॅंक बॅलन्स जमा झाला आहे माझ्या खात्यात, मात्र महिन्याअखेरीस कसलीही मोठी खरेदी करू नये तर पगाराची वाट बघावी, या मध्यमवर्गीय विचारसरणीत लहानाचा मोठा झालेलो मी, अजून चार दिवस थांबूया म्हटले. आणि अश्यातच ३० जून उजाडला !
सकाळीच ट्रेनमध्ये सवयीने फेसबूक चाळत असताना एक खतरनाक चर्चा वाचनात आली. ईलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानात ऑफर दिल्या जात असल्याने झुंबड उडाली आहे. मोठमोठे डिलर आपला स्टॉक क्लीअर करायच्या मागे लागले होते कारण GST करप्रणाली काहीतरी गोंधळ घालणार होती. नेमके काय ते मला सकाळी सकाळीच कोणी सांगणार नव्हते किंवा सांगूनही एवढ्या कमी वेळात त्यामागचे अर्थशास्त्र समजून घ्यायचा प्रयत्न अर्थहीन ठरला असता. जर ऑफर आजच मिळणार असेल तर बारा वाजायला फक्त पंधरा तास शिल्लक राहिले होते. आणि शहरातील शेवटचे दुकान बंद व्हायला त्याहूनही कमी. गर्लफ्रेंडला फोन लावला. तिने तो उचलला. आणि पुढच्या सर्व घडामोडी वेगात घडल्या. ‘घेऊया की मग आजच’ म्हणत तिने पहिल्याच मिनिटाला, विषय आणि फोन दोन्ही संपवला.
दुपारी ऑफिसमध्ये काही कलीग्जसमोर खडा टाकून पाहिला, काय रे भाई, हे जीएसटी म्हणजे काय असते माहीत आहे का? धडाधड एका पाठोपाठ एक व्हॉटसपवरचे जीएसटीचे सिरपैर नसलेले फुलफॉर्म कानावर आदळू लागले. "गणपतीला सुट्टी टाका" ते "गांगुली, सेहवाग, तेंडुलकर". आणि शी, काही तर सांगूही शकत नाही असे. म्हटलं माझीच चुकी झाली. कुठे या ईंजिनीअर लोकांना विचारले ज्यांना सीटीसी पासून ईन हॅण्ड सॅलरी कशी तयार होते यापलीकडे अर्थशास्त्र समजत नाही. तर आता फारसा फेरविचार न करता घेऊन टाकूया म्हटलं.
संध्याकाळी ऑफिसमधून अंमळ लवकरच निघालो. मात्र पाऊसाने आपले काम चोख बजावले. सकाळी लेट पोहोचल्यास ऑफिसमध्ये बॉसच्या शिव्या, आणि संध्याकाळी उशीर झाल्यास गर्लफ्रेंडच्या ओव्या, हे एवढे सोडले तर पावसाळा मला आवडतो. पण आज फ्रिज घ्यायच्या मूडमध्ये बाईसाहेब खुश असल्याने आरती ओवाळली गेली नाही. कुठे कुठे फिरायचे याचा प्लान तिच्याकडे रेडी होता. मात्र पावसाचा वाढता जोर आणि दुकानांमधील अफाट गर्दी पाहता लिस्टमध्ये नसलेल्या समोरच्या रिलायन्स डिजिटलमध्येच पटकन घुसलो. जेवढी गर्दी बाहेरून दिसत होती त्याच्या सातपट आतून होती. ईतरवेळी अश्या जागांमध्ये एसी चालू असल्याने गारेगार वाटते, आज मात्र मासळी बाजारात शिरल्यासारखे वाटत होते. सोबत आमचा तानाजी नसता तर तिथूनच मागे फिरलो असतो.
तर एसी, टीव्ही, वॉशिंगमशीन अश्या बिनकामाच्या वस्तूंना टाळत आम्ही दुसर्या टोकाला असलेल्या फ्रिजपर्यंत कसे बसे पोहोचलो. जो पहिला हाताला लागला त्याचे वरचे दार उघडून काही गारवा अंगावर येतोय का बघायचा वायफळ प्रयत्न केला आणि नेहमीसारखी गर्लफ्रेंडची एक चमत्कारीक नजर झेलली. डबल डोअरच घ्यायचा होता, मात्र मानवी स्वभावाला अनुसरून मला नेमके सिंगल डोअरचे रंग आवडू लागले. पण माझ्या आवडीला तसेही विचारतेय कोण. जिच्या आवडीला किंमत होती ती तिच्या दुप्पट ऊंचीचे फ्रिज मान उंचावून ऊंचावून बघत होती. अग्ग ए, आपल्याला संसार थाटायचाय हॉटेल नाही असे म्हणून, (अर्थातच मनातल्या मनात म्हणून) तिला तिथून तिला मागे खेचले. तरीही फार मागे खेचू शकलो नाही. माझ्यामते फ्रिजची गरज एखाद दुसरी पाण्याची बाटली, आणि दोनचार अंडी ठेवण्यापुरतीच होती. ती मात्र ज्या प्रकारे प्रत्येक कप्याचे मोजमाप घेत होती ते पाहता तिला बहुतेक त्यात कच्यापक्या अन्नाचे गोदाम उघडायचे होते.
शेवटी रंग आणि आकार या निकषावर गर्लफ्रेंडच्या आवडीनुसारच मिडीयम लाईट ब्राऊन विथ ए पिंच ऑफ क्रीमी शेड असा काहीतरी निवडला. लीटर वगैरे मला कळत नाही पण एवढा उंच होता की उद्या माझ्या पोरांना फ्रिजर कप्पा उघडायचा झाल्यास दहीहंडी करावी लागेल. फ्रिज एलजीचा होता हे नंतर पाहिले. एमआरपी, ऑफर प्राईस, त्यावर डिस्काऊण्ट, वगैरे भावताव करून एक किंमत फिक्स केली. त्यावर आता "जीएसटी स्पेशल कन्सेशन" किती मिळणार म्हणून मी हळूच विचारले. तसे त्याने माझ्याकडे बारमध्ये जाऊन दूध मागितल्यासारखे पाहिले. मी गोंधळून गेलो. पावती फाडणार तोच मी म्हणालो, थांबा...!! माझी आई येऊ दे, तिने पसंती दिली तर लगेच घेऊन टाकू. माझी गर्लफ्रेंडही म्हणाली, हो सासूबाईंची पसंती महत्वाची. त्या सेल्समनला अगदी गहिवरून वगैरे आले. अशीच आमची बायको असती टाईप्स लूक देऊ लागला. त्याला त्याच अवस्थेत सोडून आम्ही तिथून निघालो.
निघताना मॉडेल नंबर टिपला होता. जवळच एलजीचे शोरूम होते. मग काय, तिथे शिरलो. पुन्हा हजारोंचा जनसमुदाय तुडवत फ्रिजेस मांडून ठेवलेल्या जागी पोहोचत नेमका तोच मॉडेल निवडला. मगाशी भावताव करत जी किंमत फायनल केलेली त्यापेक्षा अंमळ जास्तच किंमतीचा प्राईज टॅग लटकत होता. पण त्यातून अजून डिस्काऊंट आणि जीसटी स्पेशल कन्सेशन वगळायचे होते. पण ती फुल्ल अॅण्ड फायनल किंमत सांगणारा सेल्समन कोणी तावडीत येत नव्हता. एकेकाला मी कुठून कुठून पकडून आणत होतो. पण आमच्या फ्रिजजवळ पोहोचेपर्यंत त्याला मधूनच कोणीतरी उचलत होते. एक क्षण वाटले की फ्रिजच त्याच्याजवळ घेऊन जावे. मात्र एवढ्या गर्दीत ते देखील शक्य नव्हते. तब्बल अर्ध्या तासाच्या मेहनतीनंतर प्रयत्नांना यश आले. पण व्यर्थ गेले, कारण ईथे माझ्या गर्लफ्रेंडने त्याआधीच कोणालातरी पकडून डिल फायनल केले होते. मला डायरेक्ट आकडाच समजला जो आधीपेक्षा अडीच हजारांनी कमी होता. हे अडीच हजार जीएसटी लफड्यामुळे कमी झाले आहे का या कुतुहलापोटी मी त्याच्या सेल्समनच्या कानात कुजबुजलो, "ते जीएसटी कन्सेशन यात धरले आहे ना?" .. तसे तो गूढ हसला. आणि मी समजून गेलो की हे जीएसटी प्रकरण माझ्यासाठी कायम गूढच राहणार आहे ..!
डिलीव्हरी चारपाच दिवसांनी मिळणार होती, त्यामुळे आम्ही मस्त पावती फडफडवत समोरच्या आईसक्रीम पार्लरच्या दिशेने वळलो. तिथून पुढचा सारा वेळ ती नुसते त्या फ्रिजबद्दलच बोलत होती. काय तर म्हणे, काय मस्त मॉडेल आहे, अगदी माझ्या मनासारखे. मी सोबत असताना तिने असे दुसर्या कोणाला मस्त मॉडेल म्हटलेले मला जराही आवडले नाही. पण तिच्या सुखसमाधानातच आपल्या आयुष्यातील शांती हे आताशा समजल्याने निमूटपणे आईसक्रीम चाटू लागलो. सरकारने लावलेल्या जीएसटीबाबत अजूनही मनात सतरा गोंधळ आहेत, मात्र जीएसटीचा खरा अर्थ आणि त्यातून मिळणारा निर्मळ आनंद दिवसाखेरीस मला गवसला होता. आणि या जीएसटीचा फुलफॉर्म होता, गर्लफ्रेंडला सुखी ठेवा
- ऋन्मेष
हुप्पाहुय्या यांना अनुमोदन. >
हुप्पाहुय्या यांना अनुमोदन. >>>> +१
हुप्पाहुय्या ताई, आपली
हुप्पाहुय्या ताई, आपली मायबोलीविषयी कळकळ बघून अगदी गहिवरून आले. डोळे पाण्याने भरलेच एकदम.
एव्हढा यशस्वी, चमकदार व्यवसाय सोडून आपण केवळ मायबोलीच्या प्रेमापोटी ऋन्मेषच्या मागे जे हात धुवून लागला आहात त्याबद्दल आपले कौतुक करावे तेव्हढे थोडे आहे.
हे ऋण मायबोली कसे फेडणार ह्याचीच चिंता लागून राहीली आहे.
ऋन्मेष सारखी माणसे वेडी असतात. आभासी जगात वावरण्याचे कायदे वेगळे असतात हे त्यांना कळत नाही. ऋन्मेषवर थापा मारण्याचे आरोप करणार्यांनी मान्य करावे की ते स्वतः सत्यवचनी रामाचे वंशज आहेत. आयुष्यात कधीही त्यांनी थाप मारली नाही.
ऋन्मेषचा गुन्हा इतकाच आहे की ज्या गोष्टी मित्रांजवळ शेअर करायच्या त्या त्याने सोशल साईटवर उघडपणे लिहील्या. पण त्यातला सच्चेपणा तुम्हाला जाणवला नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
ऋन्मेष स्वतःच मान्य करतो की तो प्रसंगी क्लृप्त्या योजतो. पण त्यामागेसुद्धा एक निखळता आहे. त्याच्या तथाकथित खोटेपणामुळे कुणाचेही नुकसान होत नाही.
तो खरोखर प्रामाणिक आणि सदासुखी जीव आहे.
बाकी एखादा मवाळ आयडी घ्यायचा आणि त्याच्याविरूद्ध रान उठवायचे हे हुप्पाहुय्या ताईंना नविन नाही.
व्यासंगिक तलवारी उपसत राहाणे हा त्यांचा आवडीचा खेळ आहे.
आजकाल साड्या बदलाव्यात तश्या त्या आयडी बदलतात.
कॉस्च्युम बदलण्याची सवय असावी.
हुप्पाहुय्या च्या सगळ्या
हुप्पाहुय्या च्या सगळ्या पोस्ट

पोस्ट लिहिणारी आणि त्याला अनुमोदन देणारी कलेक्टीव विसडम वाली माणसं आहेत ना? ज्यांना आंतरजालावर कुठे काय सिरीयसली घ्यायचं आणि कुठे दुर्लक्ष करु शकतो हे चांगलच कळत असेल असं मला तरी वाटतं.
पब्लिक कायच्या काय डिमांड देतय ऋन्म्याला.
हुप्पाहुय्या यांना अनुमोदन.
हुप्पाहुय्या यांना अनुमोदन.
@मार्मिक तुम्हि ज्याला सच्चेपणा म्हणता तो धुर्तपणा आहे हे ऋन्मेष् च्याच प्रतिसादामधुन् कळत
एका प्रतिसादाबदाला उत्तर् देताना ऋन्मेष ने मि धागा काढतो व नंतऱ मजा बघायला येतो असे लिहिले होते
ऋन्मेष, लिहीत राहा. या
ऋन्मेष, लिहीत राहा. या धाग्यात थोडी जास्तच चिखलफेक झालीय तुमच्यावर. पण तुम्ही डोके थंड ठेवून ज्या निर्विषतेने हल्ल्यातली हवा काढून टाकली त्याला तोड नाही. इथे कुणालाही आयडेंटिटी उघड करण्याची सक्ती नाही. तशी जरूरच नाही. आमच्यासारखे अनेक लोक तुमचे लेख नेहमीच वाचत असतात. प्रतिसादही अफलातून असतात. धाग्यातून अथवा प्रतिसादातून अगदीच काही, निदान मनोरंजन तरी मिळाले नाही असे फारच क्वचित घडलेय. बादवे, तुमचा डु.आय्डीचा नाजुक पलटवार भारी होता.
शुभेच्छा.
ता. क. आता मलाही वाटू लागलंय की 'तो' तुमचाच डु. आय्डी असावा!(हसून घेणे)
इथे कुणालाही आयडेंटिटी उघड
इथे कुणालाही आयडेंटिटी उघड करण्याची सक्ती नाही. तशी जरूरच नाही. >>>> +१
तरी काही कलेक्टीव विसडम वाली माणसं स्वतः अनाकलनीय आयडीनाम घेउन दुसर्याला फोटो टाका, घरं किती? गफ्रे किती? तिचा फोटो टाका, घरात फ्रीज किती टीव्ही किती असे प्रश्न विचारतात.
छान क्रिस्पी रेसिपी फ्रिज
छान क्रिस्पी रेसिपी फ्रिज घेण्याची .
धाग्याच्या मटेरिअलबाबत वाद
धाग्याच्या मटेरिअलबाबत वाद घालण्यापेक्षा शीर्षकातील चूक पाहा की. काय तर म्हणे आमची GST फ्रिज खरेदी. जीएसटी भरलाच नाही तर जीएसटी खरेदी कशी? जीएसटीपूर्व फ्रीज खरेदी असे शीर्षक हवे.
ता. क. आता मलाही वाटू लागलंय
ता. क. आता मलाही वाटू लागलंय की 'तो' तुमचाच डु. आय्डी असावा!(हसून घेणे)
>>>>
आणि असे वाटण्यात काही गैरही नाही. कारण आज पुन्हा त्या मायबोलीकर मैत्रीणीचा मेसेज आला, तिने आणखी एक मुद्दा जोडला. स्वताच एक आयडी काढून अविश्वास दाखवल्याचे नाटक करत पुरावा म्हणून फोटो मागायचा आणि मग लगेच शायनिंग मारत नवीन फ्रिज घेतल्याचा फोटो टाकायचा.
जसं ते शाहरूखकन्ये प्रकरणात नाही का लोकं म्हणताहेत की त्यानेच मिडीयामधे सेटींग लावली होती तिचे फोटो काढून तिला त्रास द्यायला.. बस्स तसेच आरोप माझ्यावरही होत आहेत. या आरोपातून हुप्पाहुय्याच मला वाचवू शकतात. पण ते मुद्दाम हा संशय कायम राहावा या साठी प्रयत्न करत आहेत.
आता मी दोन्ही कडून फसलोय.
काल माठाच्या झाकणाचा फ्रिज सोबत फोटो काढला आहे. पण तो ईथे टाकावा तर माझी मायबोलीकर मैत्रीण मला चिडवणार. न टाकावा तर हुप्पाहुय्या मला खोटे पाडायला बघणार.
. काय तर म्हणे आमची GST फ्रिज
. काय तर म्हणे आमची GST फ्रिज खरेदी. जीएसटी भरलाच नाही तर जीएसटी खरेदी कशी? जीएसटीपूर्व फ्रीज खरेदी असे शीर्षक हवे.
>>>>>>
याचा अर्थ आपण पुर्ण लेख शेवटपर्यंत वाचला नाही
हुप्पाहुय्या हा आयडी ऋन्मेष
हुप्पाहुय्या हा आयडी ऋन्मेष चा असणं तसंही तर्कात बसत नाही.
हा आयडी ऋन्मेषच्या आधीपासून आहे. त्यांच्या पहील्याच पोस्ट वर या महाशयांनी धुडगूस घालण्याचा प्रयत्न केलेला..ऋ. चा इतिहास बघता त्या आयडीतून हा इतक्या दिवस गप्प बसणं शक्य वाटत नाही..
मागे सरकार नावाचा कुठलासा एक आयडी मात्र ऋ चा ड्यू वाटलेला..
खरंखोटं देव जाणो
ऋन्मेष, कोण आहे ती मैत्रीण?
ऋन्मेष, कोण आहे ती मैत्रीण? नैतर तिच हुप्पाहुय्या असायची. आणि तुला मुद्दाम चिडवत असेल.
(No subject)
(No subject)
तरी काही कलेक्टीव विसडम वाली
तरी काही कलेक्टीव विसडम वाली माणसं स्वतः अनाकलनीय आयडीनाम घेउन दुसर्याला फोटो टाका, घरं किती? गफ्रे किती? तिचा फोटो टाका, घरात फ्रीज किती टीव्ही किती असे प्रश्न विचारतात. Lol
सस्मित याना अनुमोदन...
रूनमेश मी एक आयडिया देतो... तुझ्या प्रत्येक लेखाखाली तू ताल टीप देत जा... पात्र व प्रसंग काल्पनिक असू शकतात...
मुळात मला हे कळत नाहीय की मुंबई मध्ये एकाढ्याची गफ असू शकते यावर लोक विश्वास का ठेवत नाहींयत... आणि एकत्र फ्रिज घेतलाय फक्त... सहज शक्य आहे...
चूक ही केलीत तुमि रुंम्सभौ की फ्रिज चा पीक टाकला... इग्नोर मारत जा त्यांना... त्यांना वाटतंय माबो म्हणजे ज्ञानपिठ लेवल साहित्य साठी आहे... सोशल आहे site, प्रत्येकाला लेख लिहण्याचा आणि कंमेंट करण्याचं अधिकार दिलेला आहेच की...
काय झालंय या धाग्यावर, तर ऋला
काय झालंय या धाग्यावर, तर ऋला जी कलाटणी द्यायची होती चर्चेला ती बाजूलाच राहीली.. आणि खरंखोटं करण्यावरच धागा चाललाय...
आता बघा ऋचा धुर्तपणा
Submitted by ऋन्मेऽऽष on 6 July, 2017 - 19:10
सस्मित 284 लीटर आहे
आम्ही जास्तीत जास्त चार मुलेआणि दोघांपैकी एकाचे आईबाबा सोबत या फॅमिली प्लॅनिंगनुसार घेतला आहे.
सस्मित
सस्मित
तुमच्या या जोकने भारी आयड्या दिली. आता मीच त्या मैत्रीणीला चिडवतो की तो तुझाच तर आयडी नाही...
तसदीबद्दल क्षमस्व हुप्पाहुय्या, आमचा पर्सनल प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करू..
बाकी मला गर्लफ्रेंड आहे यावर विश्वास न ठेवणार्यांनी एखादी माबोकर मैत्रीण व्हॉटसपवर माझ्या कॉंटेक्टमध्ये आहे यावर विश्वास नाही ठेवला तरी चालेल हं
\बाय द वे, बोले तो र च्या क ने ... आता मी फ्रिजचा माठासोबत फोटो टाकायला मोकळा झालो... त्यानंतर मात्र सर्वांच्या शंका मिटतील आणि धागा थांबेल हे तेवढे वाईट होईल
मागे सरकार नावाचा कुठलासा एक
मागे सरकार नावाचा कुठलासा एक आयडी मात्र ऋ चा ड्यू वाटलेला..
>>>>
अर्चना सरकार का? मागे श्री हे त्यांच्या प्रत्येक धाग्यावर माझे नाव त्या हेतूने लिहायचे. मला पर्सनली फार वाईट वाटायचे, किंबहुना गिल्ट फील यायचे की एखादा आयडी खरा असेल, किंवा ओळख लपवून असेल, त्यातही महिलेचा असेल तर त्यावर असे माझ्या आयडीचा शिक्का बसणे.. पण दुर्दैवाने मी त्याबाबत काही करू शकायचो नाही, काही म्हटले तर तसे काही नसताना उगाच लोकांचा संशय वाढला असे व्हायचे.. पण आता विषय निघालाच तर रिक्वेस्ट करतो, मला कोणाचाही ड्यू आयडी बोला, या आधीही बरीच नावे माझ्यासोबत जोडून झाली आहेत.. मात्र एखाद्या आयडीला माझा बोलू नका.. हुप्पाहुय्या तुम्हालाही सॉरी, तुमच्याबद्दलही तशी शंका घ्यायला सुरुवात झालेली म्हणून ईथेच दूध का धुला पाणी का धुला करायला काय ते खरे खोटे केले !
आता मी फ्रिजचा माठासोबत फोटो
आता मी फ्रिजचा माठासोबत फोटो टाकायला मोकळा झालो... त्यानंतर मात्र सर्वांच्या शंका >>>>> आयला सेल्फी टाकणार का?! भारी. कोण ऋनमेष आहे तरी ह्याची पोस्टी ह्याची डोळा बघता येइल.

बुवा मी माठ असल्याचा जोक
बुवा मी माठ असल्याचा जोक लेखात मारून झालाय.....
तुम्ही लोकं असं करता यार.. माझा लेख वाचत नाही थेट प्रतिसादात घुसता..
बाकी मला माझी ग'फ्रेंड नुसते माठ नाही तर माठाचेही ढक्कन बोलते... आणि हा त्याचा फ्रिज सोबत फोटो
फ्रिज आणि माठ एकत्र आल्यावर
फ्रिज आणि माठ एकत्र आल्यावर ईथले तापलेले वातावरण थंड व्हायलाच हवे.
बाकी आज एक गोष्ट तुम्हा सर्वांना समजली असेलच, जेव्हा मला स्वत:ला सिद्ध करायची वेळ येते तेव्हा मी कुठल्याही थराला जाऊ शकतो. आणि आज तर मी फ्रिजवर माठाचा थर रचला.
नो पार्कींचा बोर्ड किचनमधे?
नो पार्कींचा बोर्ड किचनमधे?
नो पार्कींचा बोर्ड किचनमधे?
नो पार्कींचा बोर्ड किचनमधे?
नवीन Submitted by अभि_नव on 7 July, 2017 - 21:49
>> hahaha
असेल ऋ चे घर नो पार्किंग झोन
असेल ऋ चे घर नो पार्किंग झोन जवळ आता कृपया यावरून छळू नका बिचाऱ्याला.
ऋ भाऊ विसरलोच. तसेही या
ऋ भाऊ विसरलोच. तसेही या सप्ताहांताला तुम्ही घरांचा धागा काढणार आहात त्यातच सांगून टाका नो पार्कींगचे.
त्यातच सांगून टाका नो
त्यातच सांगून टाका नो पार्कींगचे.
>>
वाढवलेत ना त्यांच्या "कल्पनाशक्तीचे" काम? चला तेवढेच अजुन मनोरंजन.
नो पार्कींगचे काय
(थाप)एक्सप्लनेशन येईल यावर येक पोल घेता येईल आपल्याला तोपर्यंत...पहिला आणि हा नवा दोन वेगळ्या
पहिला आणि हा नवा दोन वेगळ्या फ्रिजचे फोटो आहेत.
जुन्या फोटोमध्ये एलजी चिन्हाच्या बाजूला LG अक्षरे नसतांना नव्या फोटो मध्ये ती कशी आली?
जुन्या फोटोमध्ये फ्रिजच्या ऊजव्या कोपर्यात चौकोनी पांढरे स्टीकर नव्या फोटो मध्ये नाही.
अभिनव आपल्याला काय दुसरे काम
अभिनव आपल्याला काय दुसरे काम आहे, ऋ भाऊंना पिल्लू सोडायचे ते घेतात मनावर.
पण तो नो पार्कींगचा बोर्ड 90 डिग्री फिरलेला आहे. फ्रिज आडवा ठेवून फोटो काढलाय का ते स्पष्ट करावे ही नवीन धाग्याची तजवीज सुचवली तर माबोकर मला माफ करतील का?
जुन्या फोटोमध्ये एलजी
जुन्या फोटोमध्ये एलजी चिन्हाच्या बाजूला LG अक्षरे नसतांना नव्या फोटो मध्ये ती कशी आली?
जुन्या फोटोमध्ये फ्रिजच्या ऊजव्या कोपर्यात चौकोनी पांढरे स्टीकर नव्या फोटो मध्ये नाही.
टु गुड हुप्पाहुय्या.
माबोनेशन वॉन्ट्स टू नो रुन्मेषभाय...
अभिनव आपल्याला काय दुसरे काम
अभिनव आपल्याला काय दुसरे काम आहे, ऋ भाऊंना पिल्लू सोडायचे ते घेतात मनावर.
>>
सहमत.
पण तो नो पार्कींगचा बोर्ड 90 डिग्री फिरलेला आहे. फ्रिज आडवा ठेवून फोटो काढलाय का ते स्पष्ट करावे ही नवीन धाग्याची तजवीज सुचवली तर माबोकर मला माफ करतील का?
>>
ते नव्या धाग्याच्या मनोरंजन मुल्यावर ठरेल
Pages