आमच्या घराची परंपरा आहे. मुलाचे लग्न लावायच्या आधी त्याला पायावर उभे करायचे, तसेच त्याला स्वत:च्या हिंमतीवर आपला संसार थाटण्यासाठी जीवनावश्यक गोष्टींनी सजवलेले घरही बनवायला लावायचे. बनवायचे म्हणजे अगदी गवंडी काम करत बनवायचे नाही तर खरेदी करायचे. आणि मगच लग्न करायचे. या प्रक्रियेतील पहिले पाऊल म्हणून फ्रिजपासून सुरुवात करायचे ठरवले. तर फ्रिजच का? उत्तर सोपे आहे. मनुष्याच्या मूलभूत गरजा तीन - अन्न, वस्त्र आणि निवारा. तर अन्नाला निवारा देणारा फ्रिजच पहिले घेऊया म्हटले. जेव्हा मी हे गर्लफ्रेंडला सांगितले तेव्हा ती मला म्हणाली, ऋन्मेष तू एक माठ आहेस. ठिक आहे, तरी घेऊया फ्रिज.
मी तिला सात दिवस दिले. फ्रिज कोणत्या रंगाचा असावा हे ठरवण्यासाठी. बाकी टेक्निकल स्पेसिफिकेशन वगैरे तसेही आपल्याला समजत नसल्याने आणि या बाबतीत दुकानदारावरच विश्वास ठेवायचा असल्याने त्यात जास्त डोके खपवायचे नाही असे दोघांनीही ठरवले. तरी तिने पंधरा दिवस घेतले. घराच्या हॉल, बेडरूमच्या भिंतींना आणि बाथरूमच्या टाईल्सना कोणते रंग असतील, मग किचनच्या वाट्याला कोणता रंग येईल, त्यानुसार कोणत्या रंगाचा फ्रिज तिथे सूट होईल असा एकंदरीत हिशोब लावायला. तिच्या या हिशोबी गुणाला अनुसरून तिने मलाही असे बरेच हिशोब करत पसंद केले असणार म्हणून स्वत:चेच कौतुकही वाटले.
आणखी सात दिवस मी घेतले कारण मायबोली, फेसबूक, व्हॉटसप या दोनचार ठिकाणी लोकांकडून सल्ले मागण्याच्या बहाण्याखाली आपण नवीन फ्रिज घेतोय हे मिरवल्याशिवाय तो घेण्यात काही मजा नसते. या नादात महिना संपायला सात दिवस शिल्लक राहिले. तसा पुरेसा बॅंक बॅलन्स जमा झाला आहे माझ्या खात्यात, मात्र महिन्याअखेरीस कसलीही मोठी खरेदी करू नये तर पगाराची वाट बघावी, या मध्यमवर्गीय विचारसरणीत लहानाचा मोठा झालेलो मी, अजून चार दिवस थांबूया म्हटले. आणि अश्यातच ३० जून उजाडला !
सकाळीच ट्रेनमध्ये सवयीने फेसबूक चाळत असताना एक खतरनाक चर्चा वाचनात आली. ईलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानात ऑफर दिल्या जात असल्याने झुंबड उडाली आहे. मोठमोठे डिलर आपला स्टॉक क्लीअर करायच्या मागे लागले होते कारण GST करप्रणाली काहीतरी गोंधळ घालणार होती. नेमके काय ते मला सकाळी सकाळीच कोणी सांगणार नव्हते किंवा सांगूनही एवढ्या कमी वेळात त्यामागचे अर्थशास्त्र समजून घ्यायचा प्रयत्न अर्थहीन ठरला असता. जर ऑफर आजच मिळणार असेल तर बारा वाजायला फक्त पंधरा तास शिल्लक राहिले होते. आणि शहरातील शेवटचे दुकान बंद व्हायला त्याहूनही कमी. गर्लफ्रेंडला फोन लावला. तिने तो उचलला. आणि पुढच्या सर्व घडामोडी वेगात घडल्या. ‘घेऊया की मग आजच’ म्हणत तिने पहिल्याच मिनिटाला, विषय आणि फोन दोन्ही संपवला.
दुपारी ऑफिसमध्ये काही कलीग्जसमोर खडा टाकून पाहिला, काय रे भाई, हे जीएसटी म्हणजे काय असते माहीत आहे का? धडाधड एका पाठोपाठ एक व्हॉटसपवरचे जीएसटीचे सिरपैर नसलेले फुलफॉर्म कानावर आदळू लागले. "गणपतीला सुट्टी टाका" ते "गांगुली, सेहवाग, तेंडुलकर". आणि शी, काही तर सांगूही शकत नाही असे. म्हटलं माझीच चुकी झाली. कुठे या ईंजिनीअर लोकांना विचारले ज्यांना सीटीसी पासून ईन हॅण्ड सॅलरी कशी तयार होते यापलीकडे अर्थशास्त्र समजत नाही. तर आता फारसा फेरविचार न करता घेऊन टाकूया म्हटलं.
संध्याकाळी ऑफिसमधून अंमळ लवकरच निघालो. मात्र पाऊसाने आपले काम चोख बजावले. सकाळी लेट पोहोचल्यास ऑफिसमध्ये बॉसच्या शिव्या, आणि संध्याकाळी उशीर झाल्यास गर्लफ्रेंडच्या ओव्या, हे एवढे सोडले तर पावसाळा मला आवडतो. पण आज फ्रिज घ्यायच्या मूडमध्ये बाईसाहेब खुश असल्याने आरती ओवाळली गेली नाही. कुठे कुठे फिरायचे याचा प्लान तिच्याकडे रेडी होता. मात्र पावसाचा वाढता जोर आणि दुकानांमधील अफाट गर्दी पाहता लिस्टमध्ये नसलेल्या समोरच्या रिलायन्स डिजिटलमध्येच पटकन घुसलो. जेवढी गर्दी बाहेरून दिसत होती त्याच्या सातपट आतून होती. ईतरवेळी अश्या जागांमध्ये एसी चालू असल्याने गारेगार वाटते, आज मात्र मासळी बाजारात शिरल्यासारखे वाटत होते. सोबत आमचा तानाजी नसता तर तिथूनच मागे फिरलो असतो.
तर एसी, टीव्ही, वॉशिंगमशीन अश्या बिनकामाच्या वस्तूंना टाळत आम्ही दुसर्या टोकाला असलेल्या फ्रिजपर्यंत कसे बसे पोहोचलो. जो पहिला हाताला लागला त्याचे वरचे दार उघडून काही गारवा अंगावर येतोय का बघायचा वायफळ प्रयत्न केला आणि नेहमीसारखी गर्लफ्रेंडची एक चमत्कारीक नजर झेलली. डबल डोअरच घ्यायचा होता, मात्र मानवी स्वभावाला अनुसरून मला नेमके सिंगल डोअरचे रंग आवडू लागले. पण माझ्या आवडीला तसेही विचारतेय कोण. जिच्या आवडीला किंमत होती ती तिच्या दुप्पट ऊंचीचे फ्रिज मान उंचावून ऊंचावून बघत होती. अग्ग ए, आपल्याला संसार थाटायचाय हॉटेल नाही असे म्हणून, (अर्थातच मनातल्या मनात म्हणून) तिला तिथून तिला मागे खेचले. तरीही फार मागे खेचू शकलो नाही. माझ्यामते फ्रिजची गरज एखाद दुसरी पाण्याची बाटली, आणि दोनचार अंडी ठेवण्यापुरतीच होती. ती मात्र ज्या प्रकारे प्रत्येक कप्याचे मोजमाप घेत होती ते पाहता तिला बहुतेक त्यात कच्यापक्या अन्नाचे गोदाम उघडायचे होते.
शेवटी रंग आणि आकार या निकषावर गर्लफ्रेंडच्या आवडीनुसारच मिडीयम लाईट ब्राऊन विथ ए पिंच ऑफ क्रीमी शेड असा काहीतरी निवडला. लीटर वगैरे मला कळत नाही पण एवढा उंच होता की उद्या माझ्या पोरांना फ्रिजर कप्पा उघडायचा झाल्यास दहीहंडी करावी लागेल. फ्रिज एलजीचा होता हे नंतर पाहिले. एमआरपी, ऑफर प्राईस, त्यावर डिस्काऊण्ट, वगैरे भावताव करून एक किंमत फिक्स केली. त्यावर आता "जीएसटी स्पेशल कन्सेशन" किती मिळणार म्हणून मी हळूच विचारले. तसे त्याने माझ्याकडे बारमध्ये जाऊन दूध मागितल्यासारखे पाहिले. मी गोंधळून गेलो. पावती फाडणार तोच मी म्हणालो, थांबा...!! माझी आई येऊ दे, तिने पसंती दिली तर लगेच घेऊन टाकू. माझी गर्लफ्रेंडही म्हणाली, हो सासूबाईंची पसंती महत्वाची. त्या सेल्समनला अगदी गहिवरून वगैरे आले. अशीच आमची बायको असती टाईप्स लूक देऊ लागला. त्याला त्याच अवस्थेत सोडून आम्ही तिथून निघालो.
निघताना मॉडेल नंबर टिपला होता. जवळच एलजीचे शोरूम होते. मग काय, तिथे शिरलो. पुन्हा हजारोंचा जनसमुदाय तुडवत फ्रिजेस मांडून ठेवलेल्या जागी पोहोचत नेमका तोच मॉडेल निवडला. मगाशी भावताव करत जी किंमत फायनल केलेली त्यापेक्षा अंमळ जास्तच किंमतीचा प्राईज टॅग लटकत होता. पण त्यातून अजून डिस्काऊंट आणि जीसटी स्पेशल कन्सेशन वगळायचे होते. पण ती फुल्ल अॅण्ड फायनल किंमत सांगणारा सेल्समन कोणी तावडीत येत नव्हता. एकेकाला मी कुठून कुठून पकडून आणत होतो. पण आमच्या फ्रिजजवळ पोहोचेपर्यंत त्याला मधूनच कोणीतरी उचलत होते. एक क्षण वाटले की फ्रिजच त्याच्याजवळ घेऊन जावे. मात्र एवढ्या गर्दीत ते देखील शक्य नव्हते. तब्बल अर्ध्या तासाच्या मेहनतीनंतर प्रयत्नांना यश आले. पण व्यर्थ गेले, कारण ईथे माझ्या गर्लफ्रेंडने त्याआधीच कोणालातरी पकडून डिल फायनल केले होते. मला डायरेक्ट आकडाच समजला जो आधीपेक्षा अडीच हजारांनी कमी होता. हे अडीच हजार जीएसटी लफड्यामुळे कमी झाले आहे का या कुतुहलापोटी मी त्याच्या सेल्समनच्या कानात कुजबुजलो, "ते जीएसटी कन्सेशन यात धरले आहे ना?" .. तसे तो गूढ हसला. आणि मी समजून गेलो की हे जीएसटी प्रकरण माझ्यासाठी कायम गूढच राहणार आहे ..!
डिलीव्हरी चारपाच दिवसांनी मिळणार होती, त्यामुळे आम्ही मस्त पावती फडफडवत समोरच्या आईसक्रीम पार्लरच्या दिशेने वळलो. तिथून पुढचा सारा वेळ ती नुसते त्या फ्रिजबद्दलच बोलत होती. काय तर म्हणे, काय मस्त मॉडेल आहे, अगदी माझ्या मनासारखे. मी सोबत असताना तिने असे दुसर्या कोणाला मस्त मॉडेल म्हटलेले मला जराही आवडले नाही. पण तिच्या सुखसमाधानातच आपल्या आयुष्यातील शांती हे आताशा समजल्याने निमूटपणे आईसक्रीम चाटू लागलो. सरकारने लावलेल्या जीएसटीबाबत अजूनही मनात सतरा गोंधळ आहेत, मात्र जीएसटीचा खरा अर्थ आणि त्यातून मिळणारा निर्मळ आनंद दिवसाखेरीस मला गवसला होता. आणि या जीएसटीचा फुलफॉर्म होता, गर्लफ्रेंडला सुखी ठेवा 
- ऋन्मेष
जरा हाताशी वेळ कमी आहे
जरा हाताशी वेळ कमी आहे तुम्हीच सांगा की मोजून ऋन्मेषभाऊ. >>>
आपल्याला खरंच एवढी खात्री आहे
ऋन्मेष, अरे तू कुणाच्या नादी
ऋन्मेष, अरे तू कुणाच्या नादी लागतो आहेस? तू कितीही लॉजिकल उत्तर दिलस तरी त्यांना ते पटणार नाही. कारण त्या उत्तरासाठी प्रश्न विचारातच नाहीत. असंतुष्ट आत्म्यांचे कशानेही समाधान होत नाही. अनुल्लेख कर. >>> अॅट द एंड कर्मा कॅचेस यू ... अश्या अर्थाचे काही तरी म्हणतात ना.
बहुतांश मायबोलीकरांची ऋन्मेष त्यांच्या धाग्यांवर गोंधळ घालतात तेव्हा हीच भावना असते.
अरे ईतके भांडू नका
अरे ईतके भांडू नका
हुप्पाहुय्या, मी आईला विचारून सांगतो. फ्रिज माझा असला तरी माठ तिचा आहे. जर तिला माठ खराब होण्याची भिती वाटली तर..
मला तर आता खरेच शंका यायला
मला तर आता खरेच शंका यायला लागलीय, मायबोलीवरील मुंबई असा गावाचा नामोल्लेख असलेले पण टोपननाव धारण केलेले बरेच आयडी बोगस असतील याची...
बरं बरं वाट बघते हो.
बरं बरं वाट बघते हो.
नसेल जमत तर काही हरकत नाही त्यापेक्षा आजवर मायबोलीवर लिहिलेले सगळ्या थापा होत्या हे मान्य करणे सोपे वाटत असल्यास तसेही करू शकता. जे खरे असते ते मान्य करणे फार सोपे असते हो, मनात ठरवल्यास तुम्ही काहीही करू शकता. वाटल्यास तुमच्या स्टाईलने नवीन बाफ ऊघडून लिहा.
रिअॅलिटी मान्य करून मायबोलीकरांना वेठीस धरणे थांबवल्याबद्दल तुमचे अभिनंदन करायला मीच येईन पहिल्याने, बघा तर करू प्रयत्न करून.
आर कूट नेवून ठेवलाय धागा
आर कूट नेवून ठेवलाय धागा रूनमेश चा...
अहो ती त्याची वागदत्त वधू असेल जिला तो गर्ल्फ़्रेंड म्हणतो...
एकत्र घेतला यात अशक्य के आहे.. दीपिका पदुकोण बरोबर फ्रिज घेतला म्हणाला असता तर अतिशयोक्ती झाली असती...
ग फ बराबर फ्रिज खरेदी सामान्य गोष्ट आहे... शक्य आहे
जर एखादा पब्लिसिटी साठी थापा
जर एखादा पब्लिसिटी साठी थापा मारत आहे तर त्याला पब्लिसिटी मिळेल म्हणून भीती वगैरे वाटते का..??
काही पन करून याचा खोटेपणा सिद्ध च करायचा अस काही आहे का ?
जाऊद्या ना इग्नोर करा..
माठाशेजारचा फोटो टाकला आता माठ फ्रिजमध्ये ठेऊन काढायला सांगताय.. मला वाटतं माबोवरच्या एवढ्या फेवरेट लेखकाने असा फोटो टाक तसा फोटो टाक याकडे इगनोर केलेले बरे...
ऋ ग्रेट।
ऋ ग्रेट।
तुझं फ्रेंडसर्कल वाढत आहे. काही विरोधकही फ्रिज पाहाण्याच्या निमित्ताने आत येऊन थंडगार पडले आहेत.
बाहुबली, ते पुढच्या भागात.
बाहुबली, ते पुढच्या भागात.
पाथफाईण्डर, पिझ्झाही तिथेच भेटणार आपल्याला..
Submitted by ऋन्मेऽऽष on 4 July, 2017 -08:39
》》
हुप्पाहुय्या, तुम्ही पुन्हा विसरत आहात. आमची तीन घरे आहेत. थोडा धीर धरा मी घरांवर लेख लिहितो या विकेंडला..
Submitted by ऋन्मेऽऽष on 5 July, 2017 - 23:43
ऋ गफ्रेला घरी पिझ्झा खाऊ घातला असा उल्लेख करू नका. एक धागा कमी होईल.
हा 100
हा 100. एक निरीक्षण आहे. धाग्यावर वादविवाद करताना माबोकर स्वत:हून नवीन धाग्याचे विषय सुचवतात. मग त्या नवीन धाग्यावर नव्याने वादविवाद सुरू.
माझे मत मान्य नसल्यास अगोदरच जाहीर माफी.
हाय ऋन्मेष, तुमचे लिखाण आवडते
हाय ऋन्मेष, तुमचे लिखाण आवडते. बस ते कधी कधी अतिरंजित होते म्हणून लोकांना विश्वास ठेवायला किंवा पचायला जड जाते. बाकी तुम्ही फ्रिज खरेदी करणे किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणे हेही किती मनोरंजक आणि लोकांना आपले अवजड विचार मांडायला उद्युक्त करू शकते याच्यासाठी हॅट्स ऑफ. पण मला नाही वाटत यासाठी खरेच फोटो वैगरे डकवणे आवश्यक होते. शेवटी ज्यांना जे बोलायचे आहे किंवा आरोप करायचे आहेत ते कसेही करू शकतात. फोटो फक्त निमित्त. एनीवे जर त्या माठाला कोणी हात लावले तर तुमच्या आईची प्रतिक्रिया मी चित्रित केले आहे. राग नका मानू.


आयरनमॅन, तुम्ही लोकांनी मी
आयरनमॅन, तुम्ही लोकांनी मी घेतलेल्या फ्रिजवर अविश्वास दाखवलात म्हणून मी फ्रिजचा फोटो टाकला. आता तुम्ही खुद्द गर्लफेंडवरच अविश्वास दाखवला तर मी तिचा फोटो नाही टाकणार. मी काही टोपीवाल्या गोष्टीतील माकड नाही Happy>>>>
रून्म्या हेच मी मागच्या प्रतिसादात लिहीलं नजरेआड झाला की केला? तुझ्या प्रामाणिकपणा वर विश्वास आहे
ऋ... मस्त लिहिलंयस. फ्रिज पण
ऋ... मस्त लिहिलंयस. फ्रिज पण मस्तय हं. अभिनंदन.
नवीन फॅसिलिटीज कोणत्या आहेत ते लिही की जरा. मला पण नव्या घरासाठी नवा डबलडोअर फ्रिज घ्यायचाय.
काही आयडी ऋ. च्या एवढे हात धुऊनच नाही तर आंघोळ करुन का मागे लागलेयत. बिचारा ऋ. दुर्लक्ष कर की.
तुझ्या प्रामाणिकपणा वर विश्वास आहे . >> मंजूताई +1234567..
मस्त फ्रीज ऋन्मेष. माझ्या
मस्त फ्रीज ऋन्मेष. माझ्या फीजवरची डीजाईन वेगळी आहे आणि रंग थोडा डार्क आहे. आणि तुझा फ्रीज मोठाही दिसतोय. २९० L आहे का?
आणि हुप्पाहुय्या ताई बाई आहेत?
मी आयडीवरुन दादा माणुस समजत होते.
वर कुणी तरी थयथयाट शब्द आणि हुप्पाहुय्यांचा संबंध जोडलाय. त्यांना थयथयाट शब्दाचा वितिहास माहित आहे का?
अरे लोकहो मला ते प्रतिसाद
अरे लोकहो मला ते प्रतिसाद दुर्लक्ष करायला सांगू नका.. माझा मस्त टाईमपास होतो.. मला काहीतरी चटपटीत उत्तरे द्यायला मजा येते. आणि आशा करतो की मला प्रश्न विचारणारयांनाही मजाच येत असेल
अपर्णा... चित्र भारी आहे
त्यावरून आठवले, काल रात्री झोपताना आईचे पाय चेपून दिले आणि तिच्याकडून माठाचे झाकण फ्रिजच्या डोक्यावर ठेवून फोटो काढायची परवानगी मिळवली.. आज रात्री घरून तसा फोटो टाकण्यात येईल. त्यानंतरही जे विश्वास नाही ठेवणार त्यांची नावे आईसक्रीम पार्टीमधून कट
सस्मित 284 लीटर आहे
सस्मित 284 लीटर आहे
आम्ही जास्तीत जास्त चार मुले आणि दोघांपैकी एकाचे आईबाबा सोबत या फॅमिली प्लॅनिंगनुसार घेतला आहे.
नवीन फॅसिलिटीज कोणत्या आहेत
नवीन फॅसिलिटीज कोणत्या आहेत ते लिही की जरा. मला पण नव्या घरासाठी नवा डबलडोअर ...
>>>>>>
बघाव्या लागतील परत. काहीबाही बोलत होता. मला तर एकच जाहीरातीत पाहिल्याने पटकन लक्षात राहिले ते वरच्या डीप फ्रिजर चे नॉर्मल फ्रिज करता येते.
बाकी दरवाजा उघडा राहिल्यास ओवनसारखी वॉर्निण्ग बेल वाजते. यात काही विशेष नाही पण आमच्या जुन्या फ्रिजमध्ये नव्हते ईतकेच. बाकी बूकलेट वाचायला हवे त्यांचे..
फायदा झालेला दिसतोय.
फायदा झालेला दिसतोय.
http://www.loksatta.com/desh-videsh-news/washing-machine-tv-ac-fridge-pr...
अरे व्वा आला का फ्रिज घरी..
अरे व्वा आला का फ्रिज घरी...छान......
पण माठातल्या पाण्याची सर फ्रिजच्या पाण्याला नाही येतं...
अरे व्वा आला का फ्रिज घरी..
अरे व्वा आला का फ्रिज घरी...छान...... Happy
पण माठातल्या पाण्याची सर फ्रिजच्या पाण्याला नाही येतं.>>>>>>.+1
दादा माणूस च वाटतायत... फेक
दादा माणूस च वाटतायत... फेक आययडी वाटतोय...
हो. मी सुद्धा फ्रिजचे नाही
हो. मी सुद्धा फ्रिजचे नाही माठातलेच पाणी पितो. चुलीवरचे जेवण आणि गॅसच्या शेगडीवरचे जेवण यात फरक असतो तसे आहे हे.
केशर फालूदा बनवायच्या आधी केशर घातलेले दूध तासभर माठात ठेवायचे. एकदा करून बघा. फरक तुमचा तुम्हालाच समजेल.
फक्त त्या आधी माठातले पाणी काढून घ्यायला विसरू नका. नाहीतर म्हणाल या रुनम्यासारखाच पांचट लागतो..
घरात एक फ्रिज असतांना दुसरा
घरात एक फ्रिज असतांना दुसरा फ्रिज कुठे ठेवला आहे ते कधी सांगणार आहात आता ईतक्यांदा विचारून झालं.
मायबोलीकराच्या नावासहित वॉट्सअॅप मॅसेजचे प्रूफ द्या म्हंटले तर तिथे ही काढता पाय घेतला म्हणजे तीही थापंच होती.
लोक भाबडेपणाने म्हणत आहेत 'तुमच्या प्रामाणिकपणावर विश्वास आहे' त्याची तुम्हाला जबाबदारी न वाटता त्यानंतरही अजून थापा मारणे/
खोटे बोलणे, शब्दं फिरवणे चालूच आहे तुमचे. टाईमपास, चटपटीत ऊत्तरे ह्याचेच दुसरे नाव मुद्दाम विवादास्पद लिहिणे, खोटे बोलणे, शब्दं फिरवणे आणि थापा मारणे, चर्चा भटकवणे असे आहे, जे तुम्ही ईतरांच्या पोटतिडकीने ऊघडलेल्या धाग्यांवर मुद्दाम आणि वारंवार करत आला आहात.
त्यावेळी त्या धागा मालकाची अवस्था बघून ईथे कळवळणारा कोणीही आयडी 'ॠन्मेष तुम्ही चर्चेला मुद्दाम प्रक्षोभक लिहून, थापा मारून, शब्दं फिरवून वेठीस धरू नका' म्हणायला येत नाही. मी प्रत्येक धागा वाचते, पण कुठल्याही चर्चेत भाग घेत नाही, लेखनात काही वावगे वाटल्यास प्रतिसाद ही अपवादानेच लिहिते, ऊत्तराचा पठपुरावा करते, प्रतिसाद दिला तरी तो फक्तं धागा ऊघडणार्यासाठी असतो, ईतरांशी वाद घालत नाही. अनेकांची टोकाची राजकीय मते माहित आहेत, गैरसमज होतांना पाहिले आहेत, अक्षम्य भाषाही पाहिली आहे, चांगले लिहू लागलेले आणि चांगले लिहिणारे आयडी लिहायचे थांबलेलेही बघितले आहे, त्यामागची सगळ्यांची भुमिकाही समजून घ्यायचा प्रयत्न केला आहे.
पण एवढ्यात ऋन्मेष ह्या आयडीकडून वारंवार मुद्दाम प्रक्षोभक धागे ऊघडणे, मुद्दाम ठरवून चर्चा भरकटवणे, कायम शब्दं फिरवणे, धादांत खोटे बोलणे, थापा मारणे हे होत असल्याचे असंख्य वेळा पाहिले आहे, जे मला माझ्या आयुष्यात माझ्यासाठी महत्वाच्या असणार्या मायबोलीच्या ईटेग्रिटी बद्दल प्रश्नचिन्हं वाटते. (त्याची चिंता अॅडमिनला असावी मी का ऊठाठेव करते आहे? मला मायबोलीकडून आजवर जे मिळत आले आहे ते यापुढेही मिळत रहावे हा स्वार्थी विचार आहे, मायबोलीबद्दल एक आपलेपणाची भावना आहे, प्रेम आहे)
त्यांना धागे ऊघडून चटपटीत, टाईमपास, थापा, खोटे लिहायचे आहे लिहू देत बापडे मला काही घेणेदेणे नाही (त्यांच्या ह्या धाग्यावर लिहिले कारण ईतर कुणाच्या धाग्यावर ऋन्मेष ह्यांच्या ह्या ऊद्योगाचा पाठपुरावा करणे चूक झाले असते) पण जेव्हा ईतरांच्या धाग्यांवर ते हा चीप ऊद्योग चालू करतात तेव्हा पोटतिडकीतून गुंतवलेल्या भावना, वेळ आणि श्रमांचा चुराडा बघत बसण्यापलिकडे हतबल मायबोलीकर काही करू शकत नाही. त्यांचाही विचार व्हावा असे वाटंत नाही का?
हे सगळे कळत असूनही ईतर धाग्यांवर तत्वनिष्ठपणे लिहिणारे काही मायबोलीकर ऋन्मेष ह्यांच्या ह्या ऊद्योगाला पाठिंबा देतात, त्यांच्या असे करण्याची भलामण करतात तेव्हां फार वाईट वाटते. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा असे म्हणणार्यांना कदाचित त्यांच्या ह्या ऊद्योगामुळे माझ्या सारख्या अनेकांचा झालेला 'अनरिअलाईझ्ड लॉस' दिसत नाही.
मला काही ह्या विवादात जिंकायचे नाही की हरल्याचे शल्य वाटेल अशी भितीही नाही. माझा ईगो सुखावण्याचा प्र्यतन नाही कारण माझा तितका कुणाशी संवाद नाही.
आयडी फेक आहे की नाही, ताई/माई की दादा आहेत ह्या प्रश्नांनी काही फरक पडत नाही. माझ्यापुरत्या माझ्या मायबोलीबद्दलच्या भावना प्रामाणिक आहेत, टाईमपास नाहीत. मी ईतर मायबोलीकरांच्या मतांचा आणि त्यांना मायबोलीने दिलेल्या अधिकारांचा आदर करते, ईतरांनीही तो करावा अशी अपेक्षा बाळगते आणि कोणी सातत्याने गैरफायदा घेत आहे असे वाटल्यास माझ्या दृष्टीने/पद्धतीने होईल तसे त्याच्याशी संवाद करते.
केवळ चांगल्या कथा/ललितं/माहिती/लेख्/चर्चा रोजच वाचायला मिळाव्यात आणि एक शब्दंही लिहायला लागू नये हीच अपेक्षा असते. पोलिसिंग वगैरे करण्याचा काही प्रयत्न नाही, असलाच तर हा वरती लिहिला तो स्वार्थच आहे.
हुपपाहुईया... वाय सो सिरीयस?
हुपपाहुईया... वाय सो सिरीयस? रुंम्या च्या घाग्यावर तिमेपासस करायला येत पब्लिक... इग्नोर करून सोडून द्या राव...
तुमचं एखादा धागा हायजेक केला होता का रूनमेश ने... की इतका त्रस होतंय तुमाला
च्रप्सजी,
च्रप्सजी,
त्यांचा प्रॉब्लेम रून्मेश इतरांच्या धाग्यावर गोंधळ घालतो हा आहे. हा होतं असं इतरांच्या धाग्याबाबतीत हे खरंय.. रून्मेशनं पण हे इतर धाग्यांच्या बाबतीत सिरीयस घ्यायला हवं..
हुप्पाहुय्या मी तुमच्या
हुप्पाहुय्या मी तुमच्या भावनांशी सहमत आहे. मराठीशी नाळ जोडून ठेवण्याचा मोठा दुवा माबो पार पाडते. रोजच्या दिवसभरातल्या व्यस्ततेतुन काळ विरंगुळा माबोवर मिळतो. पण बाजारात जे विकते त्याचाच पुरवठा केला जातो हेच सत्य आहे.
हुप्पाहुय्या मी तुमच्या
हुप्पाहुय्या मी तुमच्या भावनांशी सहमत आहे. >>>
+१११ मीही सहमत..
विकतं तेच पिकवलं जातं हेही तितकंच खरंय..
त्यावेळी त्या धागा मालकाची
त्यावेळी त्या धागा मालकाची अवस्था बघून ईथे कळवळणारा कोणीही आयडी 'ॠन्मेष तुम्ही चर्चेला मुद्दाम प्रक्षोभक लिहून, थापा मारून, शब्दं फिरवून वेठीस धरू नका' म्हणायला येत नाही
>>
हेच.
मलाही असाच अनुभव आलेला आहे या आयडीचा २-३ धाग्यांवर.
तेव्हा इथे बोलणारे आले नव्हते माझ्याबाजुने बोलायला.
पण जेव्हा ईतरांच्या धाग्यांवर ते हा चीप ऊद्योग चालू करतात तेव्हा पोटतिडकीतून गुंतवलेल्या भावना, वेळ आणि श्रमांचा चुराडा बघत बसण्यापलिकडे हतबल मायबोलीकर काही करू शकत नाही. त्यांचाही विचार व्हावा असे वाटंत नाही का?
हे सगळे कळत असूनही ईतर धाग्यांवर तत्वनिष्ठपणे लिहिणारे काही मायबोलीकर ऋन्मेष ह्यांच्या ह्या ऊद्योगाला पाठिंबा देतात, त्यांच्या असे करण्याची भलामण करतात तेव्हां फार वाईट वाटते. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा असे म्हणणार्यांना कदाचित त्यांच्या ह्या ऊद्योगामुळे माझ्या सारख्या अनेकांचा झालेला 'अनरिअलाईझ्ड लॉस' दिसत नाही.
>>
+१
@ अभिनव, हो त्या दिवशी एका
@ अभिनव, हो त्या दिवशी एका धाग्यावर प्रतिसादात वाचलेलं आठवतं, कुणितरी लिहीलतं, 'जाऊदेना धाग्याची वाट लावेल तो.' एकंदर, रून्मेश धाग्यावर आल्यानंतर धागा भरकटेल ही दहशत वाटते.. असे असेल तर त्याच ठिकाणी त्याला तशी जाणिव करून द्यायला हवी आणि सांगायला हवं 'तू येथून जारे बाबा' असं आणि तो काही एवढा वाईट वाटत नाही..ऐकत जाईल..
@ अभिनव, हो त्या दिवशी एका
डबल...
Pages