आमची GST फ्रिज खरेदी - पार्टी टाईम :-)

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 July, 2017 - 16:42

आमच्या घराची परंपरा आहे. मुलाचे लग्न लावायच्या आधी त्याला पायावर उभे करायचे, तसेच त्याला स्वत:च्या हिंमतीवर आपला संसार थाटण्यासाठी जीवनावश्यक गोष्टींनी सजवलेले घरही बनवायला लावायचे. बनवायचे म्हणजे अगदी गवंडी काम करत बनवायचे नाही तर खरेदी करायचे. आणि मगच लग्न करायचे. या प्रक्रियेतील पहिले पाऊल म्हणून फ्रिजपासून सुरुवात करायचे ठरवले. तर फ्रिजच का? उत्तर सोपे आहे. मनुष्याच्या मूलभूत गरजा तीन - अन्न, वस्त्र आणि निवारा. तर अन्नाला निवारा देणारा फ्रिजच पहिले घेऊया म्हटले. जेव्हा मी हे गर्लफ्रेंडला सांगितले तेव्हा ती मला म्हणाली, ऋन्मेष तू एक माठ आहेस. ठिक आहे, तरी घेऊया फ्रिज.

मी तिला सात दिवस दिले. फ्रिज कोणत्या रंगाचा असावा हे ठरवण्यासाठी. बाकी टेक्निकल स्पेसिफिकेशन वगैरे तसेही आपल्याला समजत नसल्याने आणि या बाबतीत दुकानदारावरच विश्वास ठेवायचा असल्याने त्यात जास्त डोके खपवायचे नाही असे दोघांनीही ठरवले. तरी तिने पंधरा दिवस घेतले. घराच्या हॉल, बेडरूमच्या भिंतींना आणि बाथरूमच्या टाईल्सना कोणते रंग असतील, मग किचनच्या वाट्याला कोणता रंग येईल, त्यानुसार कोणत्या रंगाचा फ्रिज तिथे सूट होईल असा एकंदरीत हिशोब लावायला. तिच्या या हिशोबी गुणाला अनुसरून तिने मलाही असे बरेच हिशोब करत पसंद केले असणार म्हणून स्वत:चेच कौतुकही वाटले.

आणखी सात दिवस मी घेतले कारण मायबोली, फेसबूक, व्हॉटसप या दोनचार ठिकाणी लोकांकडून सल्ले मागण्याच्या बहाण्याखाली आपण नवीन फ्रिज घेतोय हे मिरवल्याशिवाय तो घेण्यात काही मजा नसते. या नादात महिना संपायला सात दिवस शिल्लक राहिले. तसा पुरेसा बॅंक बॅलन्स जमा झाला आहे माझ्या खात्यात, मात्र महिन्याअखेरीस कसलीही मोठी खरेदी करू नये तर पगाराची वाट बघावी, या मध्यमवर्गीय विचारसरणीत लहानाचा मोठा झालेलो मी, अजून चार दिवस थांबूया म्हटले. आणि अश्यातच ३० जून उजाडला !

सकाळीच ट्रेनमध्ये सवयीने फेसबूक चाळत असताना एक खतरनाक चर्चा वाचनात आली. ईलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानात ऑफर दिल्या जात असल्याने झुंबड उडाली आहे. मोठमोठे डिलर आपला स्टॉक क्लीअर करायच्या मागे लागले होते कारण GST करप्रणाली काहीतरी गोंधळ घालणार होती. नेमके काय ते मला सकाळी सकाळीच कोणी सांगणार नव्हते किंवा सांगूनही एवढ्या कमी वेळात त्यामागचे अर्थशास्त्र समजून घ्यायचा प्रयत्न अर्थहीन ठरला असता. जर ऑफर आजच मिळणार असेल तर बारा वाजायला फक्त पंधरा तास शिल्लक राहिले होते. आणि शहरातील शेवटचे दुकान बंद व्हायला त्याहूनही कमी. गर्लफ्रेंडला फोन लावला. तिने तो उचलला. आणि पुढच्या सर्व घडामोडी वेगात घडल्या. ‘घेऊया की मग आजच’ म्हणत तिने पहिल्याच मिनिटाला, विषय आणि फोन दोन्ही संपवला.

दुपारी ऑफिसमध्ये काही कलीग्जसमोर खडा टाकून पाहिला, काय रे भाई, हे जीएसटी म्हणजे काय असते माहीत आहे का? धडाधड एका पाठोपाठ एक व्हॉटसपवरचे जीएसटीचे सिरपैर नसलेले फुलफॉर्म कानावर आदळू लागले. "गणपतीला सुट्टी टाका" ते "गांगुली, सेहवाग, तेंडुलकर". आणि शी, काही तर सांगूही शकत नाही असे. म्हटलं माझीच चुकी झाली. कुठे या ईंजिनीअर लोकांना विचारले ज्यांना सीटीसी पासून ईन हॅण्ड सॅलरी कशी तयार होते यापलीकडे अर्थशास्त्र समजत नाही. तर आता फारसा फेरविचार न करता घेऊन टाकूया म्हटलं.

संध्याकाळी ऑफिसमधून अंमळ लवकरच निघालो. मात्र पाऊसाने आपले काम चोख बजावले. सकाळी लेट पोहोचल्यास ऑफिसमध्ये बॉसच्या शिव्या, आणि संध्याकाळी उशीर झाल्यास गर्लफ्रेंडच्या ओव्या, हे एवढे सोडले तर पावसाळा मला आवडतो. पण आज फ्रिज घ्यायच्या मूडमध्ये बाईसाहेब खुश असल्याने आरती ओवाळली गेली नाही. कुठे कुठे फिरायचे याचा प्लान तिच्याकडे रेडी होता. मात्र पावसाचा वाढता जोर आणि दुकानांमधील अफाट गर्दी पाहता लिस्टमध्ये नसलेल्या समोरच्या रिलायन्स डिजिटलमध्येच पटकन घुसलो. जेवढी गर्दी बाहेरून दिसत होती त्याच्या सातपट आतून होती. ईतरवेळी अश्या जागांमध्ये एसी चालू असल्याने गारेगार वाटते, आज मात्र मासळी बाजारात शिरल्यासारखे वाटत होते. सोबत आमचा तानाजी नसता तर तिथूनच मागे फिरलो असतो.

तर एसी, टीव्ही, वॉशिंगमशीन अश्या बिनकामाच्या वस्तूंना टाळत आम्ही दुसर्‍या टोकाला असलेल्या फ्रिजपर्यंत कसे बसे पोहोचलो. जो पहिला हाताला लागला त्याचे वरचे दार उघडून काही गारवा अंगावर येतोय का बघायचा वायफळ प्रयत्न केला आणि नेहमीसारखी गर्लफ्रेंडची एक चमत्कारीक नजर झेलली. डबल डोअरच घ्यायचा होता, मात्र मानवी स्वभावाला अनुसरून मला नेमके सिंगल डोअरचे रंग आवडू लागले. पण माझ्या आवडीला तसेही विचारतेय कोण. जिच्या आवडीला किंमत होती ती तिच्या दुप्पट ऊंचीचे फ्रिज मान उंचावून ऊंचावून बघत होती. अग्ग ए, आपल्याला संसार थाटायचाय हॉटेल नाही असे म्हणून, (अर्थातच मनातल्या मनात म्हणून) तिला तिथून तिला मागे खेचले. तरीही फार मागे खेचू शकलो नाही. माझ्यामते फ्रिजची गरज एखाद दुसरी पाण्याची बाटली, आणि दोनचार अंडी ठेवण्यापुरतीच होती. ती मात्र ज्या प्रकारे प्रत्येक कप्याचे मोजमाप घेत होती ते पाहता तिला बहुतेक त्यात कच्यापक्या अन्नाचे गोदाम उघडायचे होते.

शेवटी रंग आणि आकार या निकषावर गर्लफ्रेंडच्या आवडीनुसारच मिडीयम लाईट ब्राऊन विथ ए पिंच ऑफ क्रीमी शेड असा काहीतरी निवडला. लीटर वगैरे मला कळत नाही पण एवढा उंच होता की उद्या माझ्या पोरांना फ्रिजर कप्पा उघडायचा झाल्यास दहीहंडी करावी लागेल. फ्रिज एलजीचा होता हे नंतर पाहिले. एमआरपी, ऑफर प्राईस, त्यावर डिस्काऊण्ट, वगैरे भावताव करून एक किंमत फिक्स केली. त्यावर आता "जीएसटी स्पेशल कन्सेशन" किती मिळणार म्हणून मी हळूच विचारले. तसे त्याने माझ्याकडे बारमध्ये जाऊन दूध मागितल्यासारखे पाहिले. मी गोंधळून गेलो. पावती फाडणार तोच मी म्हणालो, थांबा...!! माझी आई येऊ दे, तिने पसंती दिली तर लगेच घेऊन टाकू. माझी गर्लफ्रेंडही म्हणाली, हो सासूबाईंची पसंती महत्वाची. त्या सेल्समनला अगदी गहिवरून वगैरे आले. अशीच आमची बायको असती टाईप्स लूक देऊ लागला. त्याला त्याच अवस्थेत सोडून आम्ही तिथून निघालो.

निघताना मॉडेल नंबर टिपला होता. जवळच एलजीचे शोरूम होते. मग काय, तिथे शिरलो. पुन्हा हजारोंचा जनसमुदाय तुडवत फ्रिजेस मांडून ठेवलेल्या जागी पोहोचत नेमका तोच मॉडेल निवडला. मगाशी भावताव करत जी किंमत फायनल केलेली त्यापेक्षा अंमळ जास्तच किंमतीचा प्राईज टॅग लटकत होता. पण त्यातून अजून डिस्काऊंट आणि जीसटी स्पेशल कन्सेशन वगळायचे होते. पण ती फुल्ल अ‍ॅण्ड फायनल किंमत सांगणारा सेल्समन कोणी तावडीत येत नव्हता. एकेकाला मी कुठून कुठून पकडून आणत होतो. पण आमच्या फ्रिजजवळ पोहोचेपर्यंत त्याला मधूनच कोणीतरी उचलत होते. एक क्षण वाटले की फ्रिजच त्याच्याजवळ घेऊन जावे. मात्र एवढ्या गर्दीत ते देखील शक्य नव्हते. तब्बल अर्ध्या तासाच्या मेहनतीनंतर प्रयत्नांना यश आले. पण व्यर्थ गेले, कारण ईथे माझ्या गर्लफ्रेंडने त्याआधीच कोणालातरी पकडून डिल फायनल केले होते. मला डायरेक्ट आकडाच समजला जो आधीपेक्षा अडीच हजारांनी कमी होता. हे अडीच हजार जीएसटी लफड्यामुळे कमी झाले आहे का या कुतुहलापोटी मी त्याच्या सेल्समनच्या कानात कुजबुजलो, "ते जीएसटी कन्सेशन यात धरले आहे ना?" .. तसे तो गूढ हसला. आणि मी समजून गेलो की हे जीएसटी प्रकरण माझ्यासाठी कायम गूढच राहणार आहे ..!

डिलीव्हरी चारपाच दिवसांनी मिळणार होती, त्यामुळे आम्ही मस्त पावती फडफडवत समोरच्या आईसक्रीम पार्लरच्या दिशेने वळलो. तिथून पुढचा सारा वेळ ती नुसते त्या फ्रिजबद्दलच बोलत होती. काय तर म्हणे, काय मस्त मॉडेल आहे, अगदी माझ्या मनासारखे. मी सोबत असताना तिने असे दुसर्‍या कोणाला मस्त मॉडेल म्हटलेले मला जराही आवडले नाही. पण तिच्या सुखसमाधानातच आपल्या आयुष्यातील शांती हे आताशा समजल्याने निमूटपणे आईसक्रीम चाटू लागलो. सरकारने लावलेल्या जीएसटीबाबत अजूनही मनात सतरा गोंधळ आहेत, मात्र जीएसटीचा खरा अर्थ आणि त्यातून मिळणारा निर्मळ आनंद दिवसाखेरीस मला गवसला होता. आणि या जीएसटीचा फुलफॉर्म होता, गर्लफ्रेंडला सुखी ठेवा Happy

- ऋन्मेष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे फ्रिजचे अंतरंग ..
साफ सुधरे आणि स्वच्छ ..
अर्थात.. फ्रिज कोणाचा आहे Happy

3.jpg

आणि हा अंतिम फोटो..
हा पहा सूर्य आणि हा पहा जयद्रथ..
हा पाहा फ्रिज आणि हा पाहा माठ...
अविश्वास दाखवणारयांची लागली ना वाट Happy

4.jpg

अभिनंदन.... एल जी कंपनीचे. त्यांचा फ्रिज एका सुपरस्टारने (की या तथाकथित सुपरस्टार्सना सुपर्रस्टार असे संबोधत त्यांची लोकप्रियता कमी करण्याची सुपारी घेतलेल्या सुपारीस्टारने) खरेदी केल्याबद्दल.

हा पहा सूर्य आणि हा पहा जयद्रथ..
हा पाहा फ्रिज आणि हा पाहा माठ...
अविश्वास दाखवणारयांची लागली ना वाट
In addition....

आपण साजरा करु LG चा थाट

धन्यवाद राहुल, धन्यवाद बिपीनजी..
प्रामाणिकपणा ही माझी फार मोठी ताकद आहे. आज मी जे काही आहे ते माझ्यातील खरेपणा मुळेच आहे. आमचा पिंट्या म्हणतो, मजबूरी का नाम गांधीजी आणि सच्चाई का नाम ऋन्मेष.. माझी गर्लफ्रेंड माझ्या रुपावर किंवा माझ्या मुण्बईतल्या तीन घरांवर नाही तर माझ्यातील या सच्चेपणावरच भाळली आहे. एका मुलीला आणखी काय हवे असते आपल्या जोडीदाराकडून.. तरी ईथेही माझ्यावर विश्वास दाखवलेल्या सर्वांचे आभार.. एवढे बोलून मी माझी चार वाक्ये संपवतो.. बाकी फ्रिज मध्ये काही नवीन टेक्नॉलॉजी आढळली आहे जी आमच्या आधीच्या एकाही फ्रिजमध्ये नव्हती. तर त्याबाबत शंका निरसन करायला आणि अधिक माहीती जाणून घ्यायला नवीन धागा काढण्याऐवजी कधीतरी हाच वापरेन Happy

रुन्मेषराव नाचून झालं असेल तर मी काही शब्द बोलेन म्हणतो.
फक्त तुम्ही नवा फ्रिज आणला याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही धाग्यात आपली कल्पनाशक्ती वापरून टाकलेल्या सर्व पिंका खऱ्या आहेत.
किंवा असंही असू शकतं की चला नवा फ्रिज घ्याचाय तर मस्तपैकी आपली काल्पनिक गफ्रे असलेली स्टोरी बनवून टाकू तिच्याबरोबर!
प्लिज उपचार घ्या. तुम्ही फार शेवटच्या स्टेपला पोहोचले आहात. तुम्हाला फ्रिज घेणं ही वस्तुस्थिती आणि गफ्रे फ्रिज घ्याला बरोबर होती ही कल्पनाशक्ती याची सरमिसळ झालीय याचं भान नाही का?
असो किव येतेय. काळजी घ्या!!!

आरे व्वा!
ऋ, आपल्या कल्पकतेला खरंच दाद द्यायला हवी... शंभरीची सोय सुद्धा केलीत तर... फोटो टाकला तरी प्रतिसाद संपायला नकोत. आवडलं.

मेन किचनमध्ये फ्रिज, ओवन, वॉटर प्युरीफायर वगैरे किचनशी संबंधित गोष्टी आहेत,
तर दुसर्‍यामध्ये वॉशिंगमशीन, गोदरेजचे मोठे कपाट, एक छोटे कपाट, बाथटब, ईत्यादी गोष्टी आहेत, जेणेकरून बेडरूम / बाथरूमवरचा लोड कमी होईल. >> किचनमधे बाथटब हा फोटो बघण्यासारखा असेल Lol

आयर्नजी, जोपर्यंत आपण प्रत्यक्ष बघत नाही तोपर्यंत कसं काही ठरवू शकतो? आपण तर रून्मेश ला उपचार घ्या म्हणण्यापर्यंत आलात. वास्तव एकदम निराळही असू शकेल! काय सांगता?
आणि हे गफ्रे प्रकरण ह्या आयडीच्या निर्मिती पासून सुरू आहे. फ्रिज घेण्यासाठीची निर्मिती नाही.

ह्या फोटोतून काहीही सिद्धं होत नाहीये, तुमचा काही तरी गैरसमज झाला आहे. हे फक्तं एका फ्रिजचे फोटो आहेत जे कुठलेही, कुणाच्याही घरातले असू शकतात.
पुन्हा घरात ऑलरेडी एक फ्रिज असतांना दुसरा कुठे ठेवला ह्याचे ऊत्तरही तुम्ही अजून दिलेले नाही. तुमच्या काल्पनिक दुसर्‍या किचनमधे तुम्ही फ्रिज ठेवणार नाही हे आधीच म्हणून बसलेला आहात हे ध्यानात ठेवा. नाही तर आधी आपण घरात दोन किचन असल्याची थाप मायबोलीवर मारली होती हे दुसर्‍यांनी आठवण करून देण्याची वेळ आली तसे पुन्हा व्हायला नको.
आता तुम्ही माठ फ्रिजमध्ये रचून दाखवला तर तुम्हाला माठाला आणि फ्रिज ला अ‍ॅक्सेस आहे ईतपत विश्वास वाटू शकतो.

ऋन्मेष, तुझे खरोखर कौतुक वाटते. ज्या शांतपणाने तू निगेटीव्ह प्रतिसाद हॅन्डल करतोस ते भल्याभल्यांना जमत नाही.
मस्त लिहीतोस तू. आणि खरे आहे, प्रामाणिकपणा ही एकच गोष्ट तुला ह्या प्रतिसादकर्त्यांपेक्षा वेगळे बनवते.
तुला कल्पनाविश्वात राहाणारा म्हणणारे लोक स्वतः कुठल्या पराभूत जगात राहाताहेत हे एकदा त्यांनीच तपासून पाहाण्याची गरज आहे.
इतकेच लक्षात असू दे, की तुझे लिखाण आवडणारे पण खूप जण आहेत पण तुझ्या विरोधी बोलले की आपण कूल असे मानणार्‍यांची आरडाओरडा करण्याची ताकद त्यांच्यापेक्षा जास्त आहे.
पण नो वरीज, तू एकटाच त्यांना पुरून उरतोस. तुला कुणाचीही गरज नाही.
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे, तू त्यांच्या पातळीला कधीही उतरत नाहीस.

आयरनमॅन, तुम्ही लोकांनी मी घेतलेल्या फ्रिजवर अविश्वास दाखवलात म्हणून मी फ्रिजचा फोटो टाकला. आता तुम्ही खुद्द गर्लफेंडवरच अविश्वास दाखवला तर मी तिचा फोटो नाही टाकणार. मी काही टोपीवाल्या गोष्टीतील माकड नाही Happy
बाकी फ्रिज घेणे ही गर्लफ्रेंड बनवण्यापेक्षा जास्त कठीण गोष्ट आहे. मी ते केलेय तर हे देखील केले असेलच यावर विश्वास बसायला हरकत नाही Happy

आता तुम्ही माठ फ्रिजमध्ये रचून दाखवला तर तुम्हाला माठाला आणि फ्रिज ला अ‍ॅक्सेस आहे ईतपत विश्वास वाटू शकतो +१

किचनमधे बाथटब हा फोटो बघण्यासारखा असेल ..
>>>
अरे ओ असामी... मी किचनमध्येच वापरत नाही तो.. मूड आला की घेऊन जातो बाथरूममध्ये.. आणि आता प्लीज त्या बाथटबमधील आंघोळीचा फोटो कोणी मागू नका Lol

तरी ईच्छा असल्यास लक्सच्या जाहीरातीत शाहरूखला बघून घ्या Happy

आता तुम्ही माठ फ्रिजमध्ये रचून दाखवला तर तुम्हाला माठाला आणि फ्रिज ला अ‍ॅक्सेस आहे ईतपत विश्वास वाटू शकतो
>>>

फ्रिज खराब नाही का होणार..?
आई मारेल मला

पुन्हा घरात ऑलरेडी एक फ्रिज असतांना दुसरा कुठे ठेवला ह्याचे ऊत्तरही तुम्ही अजून दिलेले नाही
>>>
हुप्पाहुय्या, तुम्ही पुन्हा विसरत आहात. आमची तीन घरे आहेत. थोडा धीर धरा मी घरांवर लेख लिहितो या विकेंडला..

हुप्पाहुय्या,
जरासे अवांतर आहे, पण एक फेवर कराल का?
काल मायबोलीवरच्या एकाने मला व्हॉटसपवर मेसेज टाकला, "काय रे रुनम्या, हुप्पाहुय्या तुझाच आयडी आहे ना? ड्यू आयडी काढून प्रतिसाद वाढवतोस का... लगे रहो..."

तर तुम्ही प्लीज ईथे सिद्ध कराल का की तुम्ही मी नाही आहात Happy
मला हा स्वताच्या धाग्यावर प्रतिसाद वाढवायचा आरोप नकोय Sad

हुप्पाहुय्या, तुम्ही पुन्हा विसरत आहात. आमची तीन घरे आहेत. थोडा धीर धरा मी घरांवर लेख लिहितो या विकेंडला..
>>>
ऋन्मेष, अरे तू कुणाच्या नादी लागतो आहेस? तू कितीही लॉजिकल उत्तर दिलस तरी त्यांना ते पटणार नाही. कारण त्या उत्तरासाठी प्रश्न विचारातच नाहीत. असंतुष्ट आत्म्यांचे कशानेही समाधान होत नाही. अनुल्लेख कर.

आता येतील "थयथयाट" करत. त्यांचाच शब्द आहे हा. Lol

टीकाकारांना उत्तर देण्याबाबतीत माननीय शरद पवार साहेबांनंतर तूच त्यांनाही जमलंय आणि तुलाही जमतंय बाकी लेखन सुंदर आहे .

नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 6 July, 2017 - 03:20
हुप्पाहुय्या,
जरासे अवांतर आहे, पण एक फेवर कराल का?
काल मायबोलीवरच्या एकाने मला व्हॉटसपवर मेसेज टाकला, "काय रे रुनम्या, हुप्पाहुय्या तुझाच आयडी आहे ना? ड्यू आयडी काढून प्रतिसाद वाढवतोस का... लगे रहो..."
तर तुम्ही प्लीज ईथे सिद्ध कराल का की तुम्ही मी नाही आहात
मला हा स्वताच्या धाग्यावर प्रतिसाद वाढवायचा आरोप नको
>>>
Lol कमाल आहे.

ते ट्रे सगळे बाहेर काढून अलगद माठ आत ठेवू शकता. तुकडे करून ठेवण्याचा ही एक ऑप्शन आहे पण त्याने माठ कामातून जाईल. माठच ठेवा म्हणते आहे हत्ती नाही, माठ काय स्वतःहून फ्रिज खराब करत नाही

हुप्पाहुय्या, तुम्ही पुन्हा विसरत आहात. आमची तीन घरे आहेत. > तुम्ही आत्ता ज्या घरात रहात आहात, आईही आहे म्हणता, आत्ताच जेवला ही आहात तिथेच फ्रिज आहे ना? मग कुठे ठेवला ते सांगणे एवढे का अवघड असावे.

थोडा धीर धरा मी घरांवर लेख लिहितो या विकेंडला.. > हो हो आरामात येवू देत. बर्‍याच थापा गोळा कराव्या लागतील त्यासाठी. मागचे बाफ बघून घ्या एकदा पुन्हा कारण ब र्‍याच लोकांना तुम्ही आधी काय लिहिले आहे ते लक्षात असते.

काल मायबोलीवरच्या एकाने मला व्हॉटसपवर मेसेज टाकला >> सतत खोटे बोलल्याने, शब्दं फिरवल्याने, थापा मारल्याने असे होते, आपल्या जवळचे सुद्धा विस्श्वास ठेवत नाहीत. असा कोणीतरी मॅसेज टाकला आहे ते आधी सिद्धं करा, मायबोलीकराच्या नावा सहित.
हा सुद्धा चीप पब्लिसिटी स्टंट आहे हे एव्हाना कळलेच असेल वाचणार्‍यांना.

ड्यू आयडी काढून प्रतिसाद वाढवतोस का... लगे रहो..." >> हो मलाही तुमच्या राहुल आयडी बद्दल संशय नाही तर खात्रीच आहे. आपल्याच स्ट्रॅटेजीचे वेगळ्या धाग्यातून मायबोलीकरांसमोर ऊदो ऊदो करून घेण्याचा प्रयत्न फसला. मग आता प्रत्येक पोष्टीतली सौंदर्यस्थळं ऊलगडून दाखवण्याचे काम ह्या आय्डीने हाती घेतले. म्हणजे प्रतिसाद संख्या डबल. मस्तं स्ट्रॅटेजी आहे

@हुप्पाहूय्या, मला वाटतं आपण या धाग्यावरील आपण लिहीलेल्या प्रतिसादांची संख्या मोजावी..मी माझ्या कालच्या धाग्यावर रून्मेश ला प्रसिद्धी so called cheap publicity आपणच मिळवून दिलीय म्हटलं होतं. खवचटपणानं बोलून त्याला बोलण्यास प्रयुक्त करून आपण काय करता आहात?
हा घ्या आपला या धाग्यावरील पहीला प्रतिसाद↓
काहीही थापा मारल्या आहेत, घराचा अजून पत्ता नसतांना म्हणे फ्रिज घेतला. आणि मुंबईतल्या घरामध्ये ठेवला कुठे म्हणे दुसरा डबलडोर फ्रिज

@हुप्पाहूय्या, मला वाटतं आपण या धाग्यावरील आपण लिहीलेल्या प्रतिसादांची संख्या मोजावी. > जरा हाताशी वेळ कमी आहे तुम्हीच सांगा की मोजून ऋन्मेषभाऊ. नाही तरी मोजदाद करणे सरासरी काढण्याचे ऊठाठेव काम आपण सहजच करता.

ह्या चिप पब्लिसिटी च्या आरोपांचा समाचार घेणार्या लेखाचा धागा मी (तो आरोप स्विकारून) काढणारच आहे. Happy

Pages