शेतकर्‍यांचा संप

Submitted by मार्मिक गोडसे on 1 June, 2017 - 08:55

आजपासून (१ जून) राज्यातले शेतकरी संपावर जात आहेत.कदाचित राज्यातील शेतकरी संपावर जाण्याची ही पहिलीच वेळ असावी

काय आहेत संपावर जाणार्‍या शेतकर्‍यांच्या प्रमुख मागण्या ?

१) शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी करुन सातबारा कोरा करावा.

२) स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावनी करावी.

३) शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा.

४) शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करावा.

५) शेतकर्‍यांना वयाच्या साठ वर्षानंतर पेन्शन योजना लागू करावी.

६) दुधाला प्रतिलिटर ५० रु. भाव मिळावा.

७) शेतीसाठी अखंडित व मोफत वीजपुरवठी करावा.

८) ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान मिळावे.

का केल्या शेतकर्‍यांनी ह्या मागण्या?

शेतकरी सरकारकडे ह्या मागण्या अनेक वर्षांपासून करीत आहे. राज्यातील पूर्वीच्या सरकारने एखादवेळी कृषीकर्ज , कृषीवीजबील माफ करून वेळ मारून नेली होती. परंतू शेतकर्‍यांच्या शेतीमाल संबंधीत समस्या न सोडवल्यामुळे शेतकर्‍याची आर्थिक बाजू कायम कमकुवत राहीली.

मग आताच का उचल खाल्ली ह्या मागण्यांनी?

राज्याच्या सत्तारुढ महायुतीतील सर्व घटक पक्षांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. विद्यमान पंतप्रधानांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या भाषणात शेतकर्‍यांना त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या ५०% अधिक भाव देण्याचे आश्वासान दिले होते. शेतकर्‍यांनी त्यावर विश्वास ठेवून सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात दिल्या. सत्तेत येउन बराच काळ लोटला परंतू ना केन्द्र सरकारने ना राज्य सरकारने निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावनी केली. शेवटी हताश झालेल्या शेतकर्‍यांना सरकारला आठवण करुन देण्यासाठी संपाचे हत्यार उगारावे लागले.

सरकार शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे गंभीरतेने बघत आहे का?

दररोज शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत असताना राज्यसरकार ढिम्म आहे. राज्यातील शेतकरी संपावर जाणार हे माहीत असतानाही मुख्यमंत्रांनी शेतकर्‍यांशी बोलणी केली नाही. 'ह्या संपाचा काहीही परिणाम होणार नाही, आम्ही माल बाहेरुन मागवू', अशी बेताल वक्तव्य सत्ताधारी पक्षातील काही जण करू लागले आहेत. त्यातच खरिबाचा हंगाम सुरू झाला तरी शेतकर्‍यांना पिककर्ज मिळालेले नाही. सगळीकडून शेतकर्‍यांन्ची कोंडी केली आहे.

शेतकर्‍यांच्या सगळ्या मागण्या मान्य करणे सरकारला शक्य आहे का?

अल्पदरात पिककर्ज, शेतीमालाला हमीभाव, शेतीसाठी अखंडीत वीजपुरवठा आणि ठिबक व तुषार सिंचनासाठी १००% अनुदान , ह्या मागण्या मान्य करणे सरकारला शक्य आहे.

संप यशस्वी होईल की नाही ह्यापेक्षा शेतकर्‍याने एकजूट दाखवून आपली ताकद दाखवली आहे हे महत्वाचे. हा संप यशस्वी होण्यासाठी आपल्यासारख्या शहरवासीयांनीही ह्या संपाला पाठींबा द्यायला हवा. सरकारने शेतमाल बाहेरुन आणल्यास त्यावर बहिष्कार टाका. जमल्यास सोशल मिडियातून अधिकाधीक लोकांपर्यंत शेतकर्‍याची समस्या पोहचवा व ह्या संपाला पाठींबा देण्याचे आवाहन करा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Manalee बरोबर की चूक हा मुद्दाच नाहीये.
असं घडतं की नाही याबद्दल चर्चा होत होती ना?

चूक कि बरोबर हा चर्चेचा मुद्दा असू शकत नाही असं का ?

सध्या घडत आहेच हे ,काही पोस्ट्स चा सूर असा आहे कि हे असं घडण्यात काही चूक नाही आणि ह्या गोष्टीला माझा आक्षेप आहे

मनाली, तो त्यांनी निषेध दाखवण्याचा मार्ग आहे,
जो कायदेशीर दृष्ट्या चूक नाहीये,
त्यांनी तोड फोड केली नाहीये किंवा कोणाचे खून केले नाहीयेत,

नैतिक दृष्ट्या ऑब्जेक्शन घेणारे आपण कोण?
आणि तुमच्या दृष्टीने नैतिकदृष्ट्या चुकीचा मार्ग चोखळला म्हणून मूळ प्रश्न कडे दुर्लक्ष करू शकत नाहीना?

मनाली, तो त्यांनी निषेध दाखवण्याचा मार्ग आहे,
जो कायदेशीर दृष्ट्या चूक नाहीये,
त्यांनी तोड फोड केली नाहीये किंवा कोणाचे खून केले नाहीयेत,
नैतिक दृष्ट्या ऑब्जेक्शन घेणारे आपण कोण?
मी ह्या देशाची नागरिक एका शेतकऱ्याची मुलगी

आणि हे फक्त माझ्या नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे का ? म्हणजे इतरांच्या दृष्टीने ह्यात काही चूक नाहीये का ?
त्यांचा निषेध दाखवण्याचा मार्ग तुमच्या मते योग्य आहे का ?

मनाली, संपाच्या कारणांचा फोकस पूर्णपणे सरकारच्या आश्वासन फिरवण्याच्या सवयीवर आहे. पण तो फोकस हटवून नासाडीवर केंद्रित करून संपाचे गांभीर्य घालवण्याचा एकजूट प्रयत्न माध्यमांत दिसून आला आहे. अशा नासाडीवरच फोकस करणाऱ्या सर्व लोकांच्या प्रतिक्रिया ह्या राजकीय दृष्ट्या प्रेरित आहेत हे उघड झाले आहे. कारण कितीही वेळा त्या नासाडीचे कारण देऊनही सरकारी धोरणांवर टीका न करता परत परत धूर्तपणे केवळ नासाडीवरच मुद्दाहीन वितंडवाद घालताना अनेकांना पहिले आहे.

तस्मात तुम्हीही आता जो नासाडीवरच नैतिक आणि काय काय म्हंह फोकस ठेऊ पाहता आहात ते लक्षात आले आहे. इथून पुढे तुमचा फोकस केवळ नासाडीवरच राहणार असेल तर तुमच्या प्रतिसादाना गांभीर्याने घ्यायची आवश्यकता नाही असे माझे मत आहे.

यासाठी सरकार जवाबदार आहे
कुठलं सरकार आत्ताच की आधीच ?
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी तर २००७ सालीच लागू व्हायला हव्या होत्या

मनाली, संपाच्या कारणांचा फोकस पूर्णपणे सरकारच्या आश्वासन फिरवण्याच्या सवयीवर आहे. पण तो फोकस हटवून नासाडीवर केंद्रित करून संपाचे गांभीर्य घालवण्याचा एकजूट प्रयत्न माध्यमांत दिसून आला आहे. अशा नासाडीवरच फोकस करणाऱ्या सर्व लोकांच्या प्रतिक्रिया ह्या राजकीय दृष्ट्या प्रेरित आहेत हे उघड झाले आहे. कारण कितीही वेळा त्या नासाडीचे कारण देऊनही सरकारी धोरणांवर टीका न करता परत परत धूर्तपणे केवळ नासाडीवरच मुद्दाहीन वितंडवाद घालताना अनेकांना पहिले आहे.
तस्मात तुम्हीही आता जो नासाडीवरच नैतिक आणि काय काय म्हंह फोकस ठेऊ पाहता आहात ते लक्षात आले आहे. इथून पुढे तुमचा फोकस केवळ नासाडीवरच राहणार असेल तर तुमच्या प्रतिसादाना गांभीर्याने घ्यायची आवश्यकता नाही असे माझे मत आहे.
जशी तुमची मर्जी i really don't care

आताचे कारण तो लागू करू हे आश्वासन त्यांनी देउन मत मिळवली
नासाडी बद्दल तर ज्याचा माल तो करतोय नासाडी तुम्ही मी का त्यावर बोलून उपयोग नाही का

आताचे कारण तो लागू करू हे आश्वासन त्यांनी देउन मत मिळवली
पण जर आधीच्या सरकारने त्याच वेळी ह्या शिफारशी लागू केल्या असत्या तर आता ही वेळच आली नसती त्यामुळे माझं असं स्पष्ट मत आहे कि आज जी परिस्थिती उद्भवली आहे त्याला आजपर्यंतची सगळीच सरकारं जबाबदार आहेत

तुम्ही जितकं लिहीत जाल, तितकं ते राजकीय हेतूनेच प्रेरित कसं आहे हे दिसत जाईल.

भाजप ने शिफारशी लागू करू याचं वचन दिलं, ते त्यांनी सत्तेवर येऊन पाळलं नाही याचं खापर मागच्या सरकारवर फोडायचे?

अहो 'ह्यांना' मतदान करून 'त्यांना' घरी बसवले हे पुरेसे नाही का आपले मत कळवायला?

काहीतरी काड्या सारून चांगल्या चर्चेचा इस्कोट जाणीवपूर्वक करत आहात. तुमचा उद्देश स्पष्ट झाला आहे.

आधीच्या सरकारने शिफारशी लागू केल्या असत्या तर तुमचे आवडते नेते मुख्यमंत्री झालेले या जन्मात बघायला नसते मिळाले. बोलतांना थोडा तरी विचार असू द्यावा.

कुछ भी मतलब? आवडत्या पक्षावर आक्षेप येऊ नये म्हणून आटापिटा करताना तो तर्क मात्र खुंटीला टांगलेला राहून गेलाय बरं का?

फक्त आताचेच
आधीच्या सरकारांनी कर्जमाफी दिली आहे शेतकर्यांवर संप करायची वेळ आणली नाही. ती या नाकर्त्या सरकारने आणली

नासाडी बद्दल तर ज्याचा माल तो करतोय नासाडी तुम्ही मी का त्यावर बोलून उपयोग नाही का
तोच तर मुद्दा आहे ना कि ज्याचा माल आहे त्याने विक्रीसाठी बाजारपेठेकडे पाठवलेला असताना भलतेच लोक वाटेत गाड्या वाटेत अडवून त्याची नासधूस करताहेत म्हणजे ज्या शेतकऱ्याची संपात सहभागी होण्याची इच्छा नाही त्यालाही काही लोकांकडून सहभागी होण्यासाठी भाग पाडलं जातंय
खऱ्या शेतकऱ्याचं नुकसानच होतंय ह्या सगळ्यातून
असो

भलती लोक नाही ते काही गौराक्षसांसारखे गुंड नाही कुणालाही पकडून मारायला ते शेतकरीच आहेत

तुम्ही जितकं लिहीत जाल, तितकं ते राजकीय हेतूनेच प्रेरित कसं आहे हे दिसत जाईल.


काहीतरी काड्या सारून चांगल्या चर्चेचा इस्कोट जाणीवपूर्वक करत आहात. तुमचा उद्देश स्पष्ट झाला आहे.

कुछ भी मतलब? आवडत्या पक्षावर आक्षेप येऊ नये म्हणून आटापिटा करताना तो तर्क मात्र खुंटीला टांगलेला राहून गेलाय बरं का?

same to you

खऱ्या शेतकऱ्याचं नुकसानच होतंय ह्या सगळ्यातून...
नाही
नुकसान सरकारचे.... त्यांचा उद्देश शेतकर्याना स्पष्ट कळला

भाजप ने शिफारशी लागू करू याचं वचन दिलं, ते त्यांनी सत्तेवर येऊन पाळलं नाही याचं खापर मागच्या सरकारवर फोडायचे?

मग कुणावर फोडायचं स्वामिनाथन आयोग त्यांच्याच काळातला ना
मागच्या सरकारवर खापर अशासाठी कि त्यांच्या कार्यकाळात त्यांनी ह्या शिफारशी का लागू केल्या नाहीत ?
असो तुम्हीही आधीच्या सरकारवर आक्षेप येऊ नये म्हणून बराच आटापिटा करताय कदाचित ते तुमचं आवडत सरकार असेल

चालू द्या... देवकी नंदन गोपाला.

सर्व व्हाट्सप फिरून आले सजले घ्या ह्या धाग्यावरती,
तोरण लागले कुतर्काचे आहे, फोकस आहे बस नासाडी

वाचवायचा हो पक्ष आम्हाला, शेतकरीच नव्हे ते भाडोत्री
माझा राजा सजून दिसतो, घोर लागला तुम्हा दिवासरात्री

रामराज्य हे आले आहे, सुखासीन लोळते, प्रजा सारी
सर्व समस्या लुप्त झाल्या, त्रास सम्पला सन 14 साली

माझ्या राजाचे हे रूप साहवेना, माजले ते विरोधी
जनता बिचारी आम्हासोबती, खोटीच ही रडारडी

विकत घेतले चॅनेल सारे, माध्यमे सोशल हो व्यापली
कुठून सूर तो गैरसोयीचा, आला त्याला मार टपली

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल!

@ manalee
तुम्ही शेतकरी कुटुंबातल्या असल्यामुळे तुम्हाला सर्वसामान्य शेतकर्‍याच्या समस्यांची जाणीव नक्कीच माझ्यापेक्षा जास्त असणार. हा धागा तुम्ही नीट वाचला असेल असे मी गृहीत धरतो. ह्या शेतकर्‍यांच्या संपाला तुमचा पाठींबा आहे का? नसेल तर का नाही?

परिस्थिती उद्भवली आहे त्याला आजपर्यंतची सगळीच सरकारं जबाबदार आहेत>>>>>>
या मुद्द्याला कोणीच " नाही" म्हणत नाहीये, हे तुम्ही वरची चर्चा वाचली असेल तर तुमच्या लक्षात येईल,
या आधी आलेलं प्रत्येक सरकार आपल्या आधीच्या सरकारचे ओझे डोक्यवर घेऊनच आलेले आहे, आणि सगळ्यात पाहिल्यादि आलेले सरकार डोक्यावर 150 वर्षाच्या गुलांगितीचे ओझे घेऊन आलेले होते याची जाणीव असुद्या,
त्यामुळे आधीच्या सरकारने अमुक गोष्ट केली नाही (हरित क्रांती, श्वेत क्रांती हि त्यांचीच देणगी आहे btw) म्हणून आज आलेल्या सरकारच्या विरुद्ध तुम्ही आंदोलन करू शकत नाही,आणि अमुक तमुक मार्ग मला अनैतिक वाटतो, म्हणून तो वापरलात तर मी तुमच्या समस्यांचा विचार करणार नाही, हि थॉत प्रोसेस चुकीची आहे,

तुमच्या कडे काही पुरावा आहे का कि राजकीय पक्षाचे गुंड भाज्या दूध फेकणे हि कामे करीत आहेत? आणि शेतकरी असहाय पने त्याला बाली पडत आहेत?

माझे प्रतिसाद नीट पहिल्यापासून वाचणाराना माझे फेवरीट कोण शोधायची गरज नाही, मागचे सरकार ऐकत नव्हते म्हणून त्यांना पाडून ह्यांना आणले आम्हीच.

जे सत्तेवर बसतील त्यांनाच विचारणार, काम नाही केले तर खुर्ची काढून घेणार, हिसका दाखवला हो पंधरा वर्षे माजलेल्या टग्याना, ह्यांना तर इनमिन तीनच झालेत, घरी बसवायला वेळ नाही लागायचा, कामं करायला निवडून दिले शिव्या खायला नाही.

जाब फक्त सरकार ला विचारला जातो पक्षांना नाही, हे एवढे भान असले तरी पुरे आहे.

असो ही चर्चा आता मुद्द्यांवरून गुद्द्यांवर यायला लागलीये सो मी आत्ता तरी थांबतेय
राहता राहिला मुद्दा अन्नाच्या नासाडीचा तर या गोष्टीचा मला खरचं फार त्रास होतो मी ह्या विषयावर आधीही लिहिलं आहे ,ही मी अन्नाच्या नासाडी संदर्भात २०१३ साली एका इंग्रजी संस्थळावर लिहिलेली पोस्ट
http://www.india-forums.com/forum_posts.asp?TID=3721043&PID=91163777&#p9...

पुढची चर्चा उद्या
तोपर्यंत चर्चेत सहभागी सर्व बंधूंना शुभ रात्री

असो ही चर्चा आता मुद्द्यांवरून गुद्द्यांवर यायला लागलीये सो मी आत्ता तरी थांबतेय

अहो मी प्रामाणिकपणे तुमचे ह्या संपाविषयी मत विचारतोय.

@ manalee
तुम्ही शेतकरी कुटुंबातल्या असल्यामुळे तुम्हाला सर्वसामान्य शेतकर्‍याच्या समस्यांची जाणीव नक्कीच माझ्यापेक्षा जास्त असणार. हा धागा तुम्ही नीट वाचला असेल असे मी गृहीत धरतो. ह्या शेतकर्‍यांच्या संपाला तुमचा पाठींबा आहे का? नसेल तर का नाही?
@ मार्मिक गोडसे
ह्या संपला माझा संपूर्ण पाठिंबा किंवा विरोध दोन्हीही नाही त्याची कारणमीमांसा उद्या करेन
आत्ता बराच उशीर झालाय उद्या विस्तृत प्रतिक्रिया देईन

१०० नवीन पोस्टी म्हंटल्यावर गाडी भलतीकडेच गेली असावी अशी शंका आली होती. पण कर्जत ऐवजी कसारा लाइन धरली असली तरी निदान बरीचशी चर्चा मुद्द्यांवर होती

पण नानाकळा, सिम्बा वगैरे म्हणत आहेत तसे मूळ प्रश्नावर आणखी चर्चा झाली तर आवडेल. नासधूस वगैरे या चर्चेचा मुख्य मुद्दा नव्हे. मनाली - तुम्ही छान लिहीत आहात. नासधुशीबद्दल तुम्हाला काय म्हणायचे ते बहुधा लिहून झालेले आहे. पण मुळात संपामागच्या प्रश्नांबद्दल तुम्हाला काय वाटते ते वाचायला आवडेल.

तसेच शेतकरी काय प्रयोग करू शकतात यावरच्या सूचना सिन्सियर असल्या तरी ते जरा लाँग टर्म आहे. पुढच्या काही वर्षात कदाचित ते करावे लागेल पण आत्ता आधी डोक्यावरचे कर्ज, हमीभाव, वीज पुरवठा वगैरे प्रॉब्लेम्स आहेत. त्याबद्दल काय करता येइल वगैरे जास्त महत्त्वाचे आहे. सरकारने अल्पभूधारक शेतकर्‍यांची कर्जे माफ करणार सांगितले आहे. मग त्यात किती शेतकरी येतात, त्याचा फायदा न मिळू शकणारे किती आहेत, ही कर्जे म्हणजे नक्की कोणत्या प्रकारची (म्हणजे खाजगी कर्जांच्या बाबतीत सरकार मदत करणार काय) वगैरे डीटेल्स.

महेंद्र ढवणेंना अनुमोदन.
आमची पण बागायत आहे, नदीवरून पाइप योजना करून पाणी आणलेले आहे, बारमाही पाणी. माझ्या ३० वर्षाच्या आठवणीत नदी आटलेली पाहिलेली नाही. ३०-४० किमीच्या त्रिज्येत ८-९ साखर कारखाने आहेत. गाळाची जमीन आहे, दर पावसाळ्यात नदीचा गाळ भर घालतो.
जर कुणी एकराला एक लाखाची जरी हमी असेल (निव्वळ नफा) तर मी उचलून जमीन द्यायला तयार आहे. आज रोख पैसे ठेवा, वर्षभर/पंधरा महिने जमीन कसा. आम्हाला काय जमलेले नाही अजून शेतीचे अर्थकारण!

@गजोधर, शेतमाल जर इतका सोप्पा असता निर्यात करायला तर लोकांनी ब्लॅकने निर्यात केला असता. अमेरिकेत माल पाठवणे जवळपास अशक्य आहे. युरोपिअन युनिअनचे नियम कडक आहेत. तुम्ही करवून दाखवा मी तुम्हाला देतो उत्पन्न.

हा संप काय आणि मागचे काय, राजकारणी आपल्या तुंबड्या भरणारच. मागे राजु शेट्टींचा दूध संप जवळपास यशस्वी झाला होता, मुंबईची कोंडी झाली होती तेव्हा उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांनी काशी घातली. यावेळी अजून कुणीतरी घालतील.

खरेतर जसे भाजपा मुस्लिम मत 'इर्रिलेवंट' करत आहे तसे ग्रामीण शेतीवर अवलंबून असलेली मतपेटी इर्रिलेवंट करणेदेखील नजीकच्या काळात होईल. मग फक्त नागरी/निम्ननागरी 'मताच्या' जोरावर राजकारण करता येईल.

-- शेतीच्या विविध प्रयोगात बापाचे पैसे घालून शहाणपण शिकलेला एक शेतकरी.

IMG-20170513-WA0006.jpg
१३मे रोजी काढलेले छायाचित्र. यापेक्षा हिरवे शेत उन्हाळ्यात दाखवून द्यावे.

युरोपिअन युनिअनचे नियम कडक आहेत. तुम्ही करवून दाखवा मी तुम्हाला देतो उत्पन्न.>>>>>>
या बद्दल चा सई केसकर यांनी लिहिलेला एक छान लेख आठवतोय.
शेतमालाला काय काय तपासणीतून जावे लागते वगैरे लिहिले होते.

माझ्यामते,
विमान हायजॅक करुन दिडशे दोनशे प्रवाशांना "ओलिस" ठेवणारे/वेठीस धरणारे (जो राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिमिनल गुन्हा आहे),
काश्मिरमध्ये, दहशतवाद्यांना पकडण्यास/मारण्यास गेलेल्या देशाचे सैन्यदल/पोलिसांवर तथाकथित संतापाच्या नावाखाली दगडफेक करणारे,
व शहरांमधिल लाखोंच्या लोकसंख्येस जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा होऊ न देणारे, तशी भाषा/कृति करणारे,
हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अजुन अजुन बाकी आहे, तो ही दाखवु अशा धमक्या देणारे,
यांच्यात काडीचाही फरक नाही.
असेलच, तर विमान हायजॅक करणारे फार फार तर काही शे लोकांना ओलिस धरतात, इथे, "शेतकर्‍यांच्या संपाच्या(?) नावाखाली" शहरांचा जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा गुंडागर्दी करीत रोखणारे काहि लाख लोकसंख्येला ओलिस धरत आहेत. तशा उघड उघड धमक्या देत आहेत, कृति करीत आहेत.
याव्यतिरिक्त, वर्गसमाप्तिची/जातिभेद निर्मुलनाची भाषा करणारेच, या कृतिद्वारे "शहरी आणि ग्रामिण" असा नवा वर्गभेद निर्माण करीत आहेत.
येनकेनप्रकारेण "अराजक " माजवुन सध्याचे सत्ताधारी व "खास करुन फडणवीस" हटविण्याकरता "वाट्टेल त्या थरास" जाणार्‍यांना शेवटी "शहरी व ग्रामिण जनताच " योग्य ती जागा दाखवेल.

बाकी आमच्या कोकणांतली लोकं नाही असल्या फंदात पडत... ! त्यांच्याकडे तर एकर सोडा, गुंठ्यापेक्षाही कमी आकाराची खाचरे असतात. Happy दोनचार झाडे असली तर.... कोकणातल्या इतका अल्पभूधारक शेतकरी कुठेही नाही....
पण तरीही ते असली (आधीच्या पोस्ट मधे उल्लेखिलेली) "थेरं" करीत नाहीत, असे माझे मत.

Pages