' आपल्या देशाचे बघा , जगाचे जाउ द्या तेल लावत ' या धोरणाला मिळालेल्या पाठिम्ब्यानुसार व त्या नवीन राजकीय सूत्रानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या आश्वासनास कौल देऊन अमेरिकन नागरिकांनी त्यांना सत्ताधिष्टीत केले. प्रचारातही ट्रम्प काकांचे पत्ते उघड होते आणि त्याला जनमताचा कौल मिळाल्याने त्याचे पालन त्याना करायला काहीच अडचण नव्हती. त्यानुसार त्यानी हळूहळू नखे बाहेर काढायला सुरुवात केलेली आहेच.
त्यातले ' अमेरिका फर्स्ट ' या धोरणानुसार उपर्याना हळू हळू बाहेरचा रस्ता दाखवायचा, येणार्यांवर अधिक बंधने आणण्याचा अजेन्डा सुरूही झाला आहे. याचा नेमका तपशील काय आहे हे इथे तरी कळेनासे झाले आहे. भारतातले अनेक जण अमेरिकेत व्यवसाय, नोकर्या, उच्च शिक्षण या निमित्ताने आहेत, काही जातीलही. या सर्वांबाबत ट्रम्प महाराजांचे धोरण नक्की काय आहे. याबाबत तिथल्या लोकांकडून फर्स्ट हॅन्ड माहिती मिळवण्याच्या दृष्टीने हा धागा काढला आहे. कारण बरीच मुले पदव्युत्तर शिक्षणाचे तसेच जमलेच तर तिथेच करीअर करण्याचे प्लॅनिन्ग करीत आहेत ( हा आरक्षणाचा परिणाम आहे की नाही हा चर्चेचा विषय नाही ) . त्यांच्या मनात संभ्रम झाला आहे नक्की. विशेष्तः सॉफ्ट्वेअर /आय टी क्षेत्राचे भवितव्य याबाबत संभ्रम आहे. त्यात विप्रो , इन्फोसिस या कंपन्यानी ले ऑफ द्यायला सुरुवात केल्याच्या बातम्या इथे प्रसिद्ध होत आहेत
सबब, ट्रम्प धोरणाचे ह काय गौड बण्गाल आहे, ऑन् साईट जॉब आणि अमेरिकन जॉब यासाठी वेगळे धोरण आहे का ? अगदी स्पष्टच विचारायचे म्हणजे तिकडच्या मंडळीना जॉब गेले म्हणून परत यावे लागणार आहे काय , याची कृपया जाणकार लोकांनी माहिती द्यावी ही विनन्ती.....
आणि त्याच मुली ( हो मुलीच..
Manaskanya, "कुठल्याही
Manaskanya, "कुठल्याही जॉब्सला apply करतात आणि चांगल्या लोकांच्या जागा अडवतात. खोटे interviews देतात . कंपनीचा वेळ आणि पैसा वाया जातो ह्यात. भारताची तर प्रचंड इमेज खराब होतेय" - ह्याचा व्हिसा स्टॅटस शी संबंध नाही. ही प्रवृत्ती आहे. H4-EAD वर व्यवस्थित नोकर्या करणारे सुद्धा खूप spouses आहेत.
EAD आणि H१ मध्ये बेसिक फरक
EAD आणि H१ मध्ये बेसिक फरक आहे. H४ एड कोणालाही (H४ व्हिसा असेल तर ) मिळतो आणि त्यांना कुठलाही काम करता येत. H१ मध्ये स्किलस लागतात आणि रिलेवंट field मधेच तेही स्पॉन्सर कडेच जॉब करता येतो. तो व्हिसा बराच restrictive आहे EAD पेक्षा. अर्थात गैरफायदा घेणारे तिथेही आहेतच.
दोन चार गैरफायदा घेणार्या
दोन चार गैरफायदा घेणार्या लोकांमुळे तुम्ही हजारो ऊच्च आणि अतिऊच्च शिक्षित, ईतर देशात कैक वर्षांच्या कामाचा अनुभव असलेल्या पण एच-४ सारख्या विसा जाचक नियमांमुळे मुळे मनात नसतांनाही आपल्या करियरची आहुती देत तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणार्या टेलेंटेड प्रोफेशनल्स ला एकदम रद्दीतच काढलंत की ओ.
पुन्हा H4 EAD कायदा संमत करून घेण्यात ईथल्या लोकांनी केलेल्या कायदेशीर चळवळीचा विजय हा ही ईमिग्रेशन च्या ईतिहासात एक माईल स्टोनच म्हणायला हवा.
ट्रंप आणि USCIS मात्र ह्या काय्द्याचा निकाल लावणार आहेत अस ऐकून आहे, त्यामुळे तुमचे ईप्सित सत्यात ऊतरूही शकते. तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा .
एच-४ सारख्या विसा जाचक
एच-४ सारख्या विसा जाचक नियमांमुळे मुळे मनात नसतांनाही आपल्या करियरची आहुती देत तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणार्या>>>please! H4 ना स्लेव्ह शिप्स मध्ये घालून आणलेलं असतं का? It's a choice THEY made.
>>>>please! H4 ना स्लेव्ह
>>>>please! H4 ना स्लेव्ह शिप्स मध्ये घालून आणलेलं असतं का? It's a choice THEY made.<<<
++++११११
इथे त्यांच उच्च शिक्षण वापरून निर्णय घेत नाहीत एच४ वाले?
नेहमीचे “च” गळवे ... एच४ जाचक रुल्स. तोंड दाबून बुक्याचा मार वाचून हास्यास्पद वाटटले.
वर एच१ आणि एच ४ तुलना? एच १ वाल्यांना ज्यास्त मेटल प्रूव करून विसा मिळतो. ह्या देशात यायचं त्यांनी एच १ एप्लाय आणि यावं. शिडी न वापरता..
फसवणूकीचे धंदे कोणीही केले तरी आयते येवून मिठाई खाण्यासारखे आहे एच४ वाले.
please! H4 ना स्लेव्ह शिप्स
please! H4 ना स्लेव्ह शिप्स मध्ये घालून आणलेलं असतं का? It's a choice THEY made. >> बरोबर. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे.
त्यांनी आणि त्यांच्या हितचितकांनी जाचक विजा नियमांविरूद्धं लढा ऊभारला आणि जिंकला सुद्धा... पुढे कायदे बदलले तर सांगता येत नाही पण आज त्यांनी त्यांचे भविष्य स्वतः बदलले असे वाटते.
I am proud of them and feel happy for them because they earned a fair chance to act on their dreams.
But someone looks very scared and sad about it.
दोन चार गैरफायदा घेणार्या
दोन चार गैरफायदा घेणार्या लोकांमुळे तुम्ही हजारो ऊच्च आणि अतिऊच्च शिक्षित, >> माझ्या पहाण्यात उच्च आणि अतिउच्च शिक्षित मायनॉरिटी मधे होते. अन त्यातल्या केपेबल लोकांनी स्वतःच एच वन करुन घेतलेला आहे. ( हा ई ए डी रूल व्हायच्या आधी )
गैरफायदा घेणारेच जास्त आढळले.
खोटे रेझुमे, नसलेले स्किल्स दाखवण्याची धडपड, आणि पुन्हा शिकण्याची, सिरियसली काम करण्याची पात्रता नाही, पगाराच्या अपेक्षा मात्र अति-अवास्तव अशाच केसेस जास्त पाहिल्यात.
मेधा,
मेधा,
तुमचा सँपल डेटा सेट फक्त आयटी मधला आहे की ईतर प्रोफेशन्समधला सुद्धा?
H1B =IT असा एक कॉमन गैरसमज आहे. अनुभव व शिक्षण नसतांना, क्रॅश कोर्सेसची मदत आणि सॉफ्ट्वेअर कंपन्यात मुबलक संधी ऊपलब्ध असतांना नोकरी मिळवण्यासाठी (थँक्स टू गराज कन्सल्टिंग कंपनीज) आयटी सोपे म्हणून हा गैरव्यवहार तुम्हाला तिथेच जास्त दिसणार.
सगळ्या H1 वाल्यांचे स्पाऊस आयटी मध्ये नसतात ना. आयटी सोडून फायनान्स, मेडिकल, रिसर्च, प्रॉडक्शन, रिटेल, स्टार्टअप्स, हॉस्पिटेलिटी, टुरिझम, स्पोर्ट्स असे एक ना अनेक १७६० प्रोफेशन्स आहेत.
आणि आयटीएतर कंपन्या आयटी कंपन्यांसारखे खोर्याने एच वन करीत नाहीत.. त्यां कंपन्यासांठी आणि त्या सेक्टर मधल्या प्रोफेशनल्ससाठी साठी हे स्वातंत्र्याचे नवे दार नव्हे का?
जेव्हा ह्या सगळ्यां H1 वाल्यांना जीसी मिळत जाईल किंवा आजवर ज्या लाखो H1 वाल्यांना जीसी मिळाले त्यांच्या सो कॉल्ड ' स्किल्ड वा नॉन स्क्लिल्ड' स्पाऊसेसनी काय केले? त्याही असतील ना तुमच्या पहाण्यात?
एच ४ इएडी बद्दल इतका राग का?
एच ४ इएडी बद्दल इतका राग का?
चांगल्या नियमाचा गैरवापर करणारे अनेक असतात परंतु त्याचा सदुपयोग करणारे त्याहुन ही जास्त असतात, हे लक्षात का येत नाही?
विशेषतः भारतीय मुलींना त्याचा खूप चांगला उपयोग आहे आणि भारतीयच त्याला विरोध करतायत इथे?
इतर देशातून आलेले लोक सर्रास कायदे मोडून बेकायदेशीर रित्या रोजी रोटी कमावताना आपण इथे अमेरिकेत पाहत नाही का आजू बाजूला?
मग कायदेशीररित्या आम्हाला काम करू दे म्हणून मागणी करून तसा नियम आल्यावर काम करायला मिळत असेल, तर त्याला एवढा विरोध? का ?
माझ्या पाहण्यात एक जण शाळेत शिकवते, एक जण मायक्रोबायॉलॉजि मध्ये फार्मास्युटिकल कंपनी मध्ये काम करते, अजून एक लोकल बँकेत लागली आहे नोकरीला . काय वाईट आहे यात?
अन त्यातल्या केपेबल लोकांनी
अन त्यातल्या केपेबल लोकांनी स्वतःच एच वन करुन घेतलेला आहे. >> २००९ पासून एच वन करणे प्रचंड अवघड झाले आहे. आयटी-एतर कंपन्यांमध्ये तर अशक्यच जणू. ह्य कंप्न्यांकडे जॉब्स असतात पण एच वन वगैरे करण्याच्या भानगडीत ते पडत नाहीत.
ईथे मास्टर्स केलेल्या मुलामुलींना सुद्धा दोन दोन वर्षे लॉटरीत नंबर न लागल्याने जॉब असूनही देश सोडावा लागला आहे. माझ्या पहाण्यात लीडींग बिझनेस स्कूल मधले दोन -तीन.. पेट्रोलिअम आणि मेकॅनिकल ईंडस्त्रीतला एकेक असे मुले मुली आहेत. युनि.त प्रेम जमले.. लग्न केले... एकाचा विजा झाला एकाचा नाही अश्या तर चिकार केसेस सपडतील. फार कीव येते अश्या जीवांची मग.
तुमचा विश्वास बसणार नाही पण सांगतो.. एक मिडिया आणि दुसरी स्पोर्ट्स अॅनालिसिस सारख्या नीश प्रोफेशनमध्ये एच ४ इएडी मिळाल्याने कामाची संधी मिळून आयटीत दहा वर्षे घासलेल्या आपल्या नवर्यापेक्षा जास्त पगार कमावणार्या धडाडीच्या भारतीय मुली मी पाहिल्या आहेत.
एच ४ इअॅडी वाल्यांचे एच १
एच ४ इअॅडी वाल्यांचे एच १ स्पाउस आयटीत आणि एझ ४ कँडिडेट बॅंक, टीचिंग, आर्किटेक्चर, फार्मसी असे शिक्षण आणि थोडा फार अनुभव असलेले पाहिलेत. सगळ्यात वाइट अनुभव एच ४ इ ए डी असल्यावर आयटी क्षेत्रात नोकरी शोधणार्यांचा आहे
असुफ +११.
असुफ +११.
थोडक्यात आय्टीवाल्यांनी सगळी
थोडक्यात आय्टीवाल्यांनी सगळी घाण करुन ठेवलेली आहे आणि आता त्या पापाची फळं सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना भोगावी लागत आहेत; हा मुद्दा कोणितरी पार्किंग लॉटमध्ये घालुन ठेवा. इंटरेस्टिंग आहे...
हाब, असुफ +१
हाब, असुफ +१
मूर्ख लोक असतात म्हणून EAD ला काम करु द्यायचं नाही? तेच लोक जीसी झाले (कदचित अॅडव्हान्स परोल का काही स्टेप असते तेव्हाच) की काय करणार? तेव्हाही ते लोक भारतीय ओरिजिनचेच असणार आहेत आणि वयाप्रमाने मूर्खपणा बळावलाच असेल.
त्यांना जगू देताय, स्टेटस मेंटेन करुन राहू देताय, काही वर्षांनी कामही करु देणारात.
अनएम्प्लॉयमेंट आहे, पगार कमी होतो अशी मागणी पुरवठा कारण देउन कोणी म्हणालं तरी मी समजुन घेउ शकतो. पण EAD वाले मूर्ख असतात म्हणून नियम बदला हे काही झेपलं नाही.
>>पण EAD वाले मूर्ख असतात
>>पण EAD वाले मूर्ख असतात म्हणून नियम बदला हे काही झेपलं नाही.<<
तसं नाहि आहे ते. आधीच सॅच्युरेट झालेल्या जॉब मार्केटम्ध्ये इएडी वाल्यांची भर पडल्याने, सप्लाय वाढला (बिलिव मी देअर आर हंड्रेड थाउझंड+ ऑफ देम) आणि त्याचा इफेक्ट बाकिच्या जॉब सिकर्स्वर पडल्याने बोंब उठली. शिवाय, इएडी एच४ प्रायमरी ब्रेडविनर नसल्याने पगार आणि इतर बाबतीत तडजोडिस तयार. हा मुद्दा सुद्धा कांपिटिशनला मारक ठरल्याने तक्रारी वाढल्या...
<<< "लूपहोल्स बिझेनेस
<<< "लूपहोल्स बिझेनेस अपॉर्चुनिटीज मध्ये कन्वर्ट करणे ">>>
माफ करा, पण एकदा माणसाने लिहीलेल्या कायद्याप्रमाणे काम करायचे ठरल्यावर कायदा मोडत नाही तोपर्यंत सर्व संधींचा फायदा घेतला तर बिघडले कुठे? नितीमत्ता, चांगले वाईट हे ठरवणार कोण? काही मुसलमान लोकांत व्या़ज घेणे निषिद्ध आहे म्हणे. मग बँका बंद करायच्या का?
अहो ही लूपहोल्स अमेरिकन बिझनेस वाल्यांनी सिनेटर रेप्रेझेन्टेटिव्ह्स यांना भरपूर लाच चारून निर्माण केलेली असतात . स्वस्तातले लोक घेण्यासाठी अमेरिकनांनीच ही लूपहोल्स केली, भरपूर लाच देऊन. आता भारतीयांपेक्षा जास्त हुषार कुणि चिनी, अफ्रिकन असते तर त्यांनी पण हा फायदा घेतला असता. नि अमेरिकनांनी त्यांना घेतलेहि असते. मग मायबोलीवर धागा निघाला असता चिन्यांनी असे करावे का?
भारतीय लोक हुषार कामसू आहेत म्हणून त्यांना जास्त मागणी. ( शिवाय हे पाप फेडायला ते गणेशोत्सवासाठी मोठी वर्गणी, देवळांना वर्गणी देतातच, झाले - अमेरिका खूष आपला देव खूष.)
एकदा एक ठरवा - सचोटीने धंदा करायचा की पैसे मिळवायचे? सचोटीने पैसा मिळवायला फार त्रास होतो नि त्या मानाने आरोआय फार कमी -असा कसा धंदा चालेल? मग नोकरी करावी, खूप काम करावे, पैसे नाही मिळाले तरी म्हणावे मला काम करण्यातच आनंद आहे!!
एच ४ इएडी बद्दल इतका राग का?
एच ४ इएडी बद्दल इतका राग का?
चांगल्या नियमाचा गैरवापर करणारे अनेक असतात परंतु त्याचा सदुपयोग करणारे त्याहुन ही जास्त असतात, हे लक्षात का येत नाही?
विशेषतः भारतीय मुलींना त्याचा खूप चांगला उपयोग आहे आणि भारतीयच त्याला विरोध करतायत इथे?>>>विरोध बिरोध कोणी करत नाहीये हो इथे! फक्त राजीखुशीने आणि अक्कलहुशारीने, एच ४ नियमांची पूर्ण माहिती असताना, नफ्या-तोट्याचे गणित मांडून इथे आल्यावर 'जाचक' अटींविरूद्ध गळे काढू नये. तुम्हाला जे 'जाचक' नियम वाटतात ते बनवणारांनी काही लेजिट कारणांपायीच ते बनवले होते. कुठल्याही देशात स्वस्त लेबरची किती आवक होऊ द्यायची हे ठरवण्याचा हक्क त्या देशवासीयांना आहेच. नाहीतर त्या देशाचेही वेज आणि लिविंग स्टँडर्ड तिसर्या जगताप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही.
बाकी मूर्ख लोकांना काम करू देण्याबाबत काही प्रॉब्लेम नाही. अमेरिका कायमच मूर्खांना धार्जिणी राहिली आहे. म्हणून तर आपण सगळे इथे खुर्च्या उबवत चर्चा करतोय आणि हुशार लोक भारतात घासतायत!
<<<बाकी मूर्ख लोकांना काम करू
<<<बाकी मूर्ख लोकांना काम करू देण्याबाबत काही प्रॉब्लेम नाही. अमेरिका कायमच मूर्खांना धार्जिणी राहिली आहे. म्हणून तर आपण सगळे इथे खुर्च्या उबवत चर्चा करतोय आणि हुशार लोक भारतात घासतायत! >>>
संपूर्ण अनुमोदन! तसे इथले काही भारतीय त्यांच्या विषयात खूप हुषार आहेत नि अमेरिकेत आल्याने त्यांना बराच वाव मिळाला. पण एक खरी गोष्ट सांगतो.
माझा मित्र १९९० च्या दशकात इथून भारतात गेला. तिथे एका मित्राला भेटला. मुलाबाळांची चौकशी केली. मित्राने सांगितले मोठा ठीक आहे, अभ्यास करतो, इंजिनियर, डॉक्टर वगैरे होईल, पण धाकटा जाम उनाड, अभ्यासच करत नाही, नुसता उनाडक्या. त्याला अमेरिकेलाच पाठवले तर जमेल, इथे काही त्याच जमणार नाही. नि खरेच तो मुलगा अमेरिकेला आला नि धंदा करून बरेच पैसे कमावले.
भारतात त्याची सर्टीफिकीटे पहात बसले असते, नाहीतरी लाच द्यावी लागली असती, मिनिस्टरचा वशिला वगैरे लागले असते. इथे बरे आहे. सोपे आहे.वाटले तर अभ्यास करावा किंवा करू नये, पैसे मिळतातच. वशिला, लाच भानगडी नाहीत.
माझे तर स्पष्ट मत आहे - अमेरिका विसरा, इतर अनेक चांगले देश आहेत. पूर्वी शस्त्रांच्या जोरावर इंग्लंडने जग काबीज केले. आता भारतीयांना अक्कलेच्या जोरावर जग काबीज करता येईल.
अमेरिकेत नुसते काही दिवस चैन करायला यावे, काही दिवसांनी इथे पण यायची सोय रहाणार नाही, ना पैसा ना सुरक्षितता! जर एखादा भारतीय इथला प्रेसिडेंट झाला तरच अमेरिका वाचेल. गोर्या लोकांचे काही खरे नाही!!
एच ४ इएडी बद्दल इतका राग का?
एच ४ इएडी बद्दल इतका राग का? >> एच ४ ई एडी बद्दल राग नाहीये. त्याचा गैरवापर करणार्या अनेक केसेस पाहिल्या आहेत. त्याबद्दल चिडचिड एवढेच. जितक्या एच ४ इएडी मुलींचे इंटरव्यु घेतलेत त्यातले ९०% तरी अपात्र निघालेत. रेझुमे चकाचक, पण प्रत्य्क्षात कम्युनिकेशन स्किल्स नाहीत, टेक्निकल प्रश्न विचारले की घोटाळा, जो अनुभव दाखवलाय त्याबद्दल जुजबी प्रश्नांची सुद्धा नीट उत्तरं देता येत नाहीत असा प्रकार.
म्हणून झूम interview घ्यायचा.
म्हणून झूम interview घ्यायचा.
तसं नाहि आहे ते. आधीच
तसं नाहि आहे ते. आधीच सॅच्युरेट झालेल्या जॉब मार्केटम्ध्ये इएडी वाल्यांची भर पडल्याने, सप्लाय वाढला (बिलिव मी देअर आर हंड्रेड थाउझंड+ ऑफ देम) आणि त्याचा इफेक्ट बाकिच्या जॉब सिकर्स्वर पडल्याने बोंब उठली. शिवाय, इएडी एच४ प्रायमरी ब्रेडविनर नसल्याने पगार आणि इतर बाबतीत तडजोडिस तयार. हा मुद्दा सुद्धा कांपिटिशनला मारक ठरल्याने तक्रारी वाढल्या... >>>
This is an interesting take on the whole situation and probably one of many reasons why some people are not happy and feel threatened as mentioned earlier by हायझेनबर्ग
एच ४ ई एडी बद्दल राग नाहीये.
एच ४ ई एडी बद्दल राग नाहीये. त्याचा गैरवापर करणार्या अनेक केसेस पाहिल्या आहेत. त्याबद्दल चिडचिड एवढेच. जितक्या एच ४ इएडी मुलींचे इंटरव्यु घेतलेत त्यातले ९०% तरी अपात्र निघालेत. रेझुमे चकाचक, पण प्रत्य्क्षात कम्युनिकेशन स्किल्स नाहीत, टेक्निकल प्रश्न विचारले की घोटाळा, जो अनुभव दाखवलाय त्याबद्दल जुजबी प्रश्नांची सुद्धा नीट उत्तरं देता येत नाहीत असा प्रकार. >>>>
Understood.
फक्त राजीखुशीने आणि
फक्त राजीखुशीने आणि अक्कलहुशारीने, एच ४ नियमांची पूर्ण माहिती असताना, नफ्या-तोट्याचे गणित मांडून इथे आल्यावर 'जाचक' अटींविरूद्ध गळे काढू नये. तुम्हाला जे 'जाचक' नियम वाटतात ते बनवणारांनी काही लेजिट कारणांपायीच ते बनवले होते. >> अहो पण तेच 'जाचक' नियम काही अंशी रद्दं केले ना आता. मग तुम्ही 'का रद्दं केले?' म्हणून गळे काढताय का?
ते नियम तुम्हाला 'जाचक' वाटत नसतील तर नको वाटू देत. ज्यांच्यासाठी 'ते' होते आणि 'ते' बदलणे ज्यांच्या हातात होते, त्यांचे ते जाचक आहेत ह्यावर एकमत झाले संपले.. आता हे रुदन कशापायी बुवा? तुमचे नेमके कोणते शिंगरू मेले ते कळाले तर काही तरी समजू शकेल.
तुमच्या न्यायाने पूर्वी प्लांटेशनवर करणार्या स्लेव्जना तुम्ही म्हणणार.... तुम्ही जन्मले तेव्हाच आपण स्लेव आहोत हे तुमच्या आईबापूस माहित होते... मग आपली बायका आणि मुलेही स्लेव्जच असणार आणि राहणार हेही तुम्हाला माहित होते मग गुलामगिरी संपवा म्हणून ह्या अमेरिकेत गळे आणि मोर्चे कसले काढताय लेकांनों. कुठल्याही देशात स्वस्त लेबरची किती आवक होऊ द्यायची हे ठरवण्याचा हक्क त्या देशवासीयांना आहेच हे तुम्हाला माहित नाही का गुलामांनो.
कुठल्याही देशात स्वस्त लेबरची किती आवक होऊ द्यायची हे ठरवण्याचा हक्क त्या देशवासीयांना आहेच. नाहीतर त्या देशाचेही वेज आणि लिविंग स्टँडर्ड तिसर्या जगताप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही. >> ११ मिलिअन लोकांना तुमच्या भाषेत लेबरला लीगलाईझ करण्याबद्दल आपल्याशी एकदा खाजगीत चर्चा करायची आहे.
जो अनुभव दाखवलाय त्याबद्दल
जो अनुभव दाखवलाय त्याबद्दल जुजबी प्रश्नांची सुद्धा नीट उत्तरं देता येत नाहीत असा प्रकार>>>>>
अगदी बरोबर. खरे स्किल्स असणार्यांना जॉब्स साठी H१ पर्याय आहे . डॉक्टर्स असतील तर USMLE देउन आणि रेसिडेन्सी वगैरे सगळे पूर्ण करून प्रॅक्टिस किंवा जॉब करता येतो. माझ्या फॅमिलीत ५-६ जणी आहेत. H४ होत्या MD करून, अगदी Horwrad मध्ये फेलोशिप करून प्रॅक्टिस करतायत गेली कित्येक वर्ष. उच्चशिक्षित आणि स्किल्स असतील तर जॉब मिळणारच काही engineer किंवा science , commerce वाल्या मैत्रिणीपण अश्याच H४ वर आल्या, काही इथे शिकल्या , काही नाही पण प्रॉपर वेळीच नोकरीला लागल्या. आता मात्र H४ मध्ये कुणीही कुठेही घुसतात. Prove yourself नाहीतर UP चे भैया लोकांनी मुंबईची केली तशी अवस्था होईल अमेरिकन जॉब्सची
तुमच्या न्यायाने पूर्वी
तुमच्या न्यायाने पूर्वी प्लांटेशनवर करणार्या स्लेव्जना तुम्ही म्हणणार.... तुम्ही जन्मले तेव्हाच आपण स्लेव आहोत हे तुमच्या आईबापूस माहित होते... मग आपली बायका आणि मुलेही स्लेव्जच असणार आणि राहणार हेही तुम्हाला माहित होते मग गुलामगिरी संपवा म्हणून ह्या अमेरिकेत गळे आणि मोर्चे कसले काढताय लेकांनों. कुठल्याही देशात स्वस्त लेबरची किती आवक होऊ द्यायची हे ठरवण्याचा हक्क त्या देशवासीयांना आहेच हे तुम्हाला माहित नाही का गुलामांनो.>>>
हसून हसून फुप्फुसं दुखली!! थॅंक्यु थॅंक्यु

<< H1B =IT असा एक कॉमन गैरसमज
<< H1B =IT असा एक कॉमन गैरसमज आहे.>> +१ पण जुना गैरसमज आहे.
मानसकन्या तुम्ही मी आणि
मानसकन्या तुम्ही मी आणि अमितने आधी विचारलेल्या प्रश्नाचे ऊत्तर देण्याची तसदी घ्याल का?
जुजबी प्रश्नांची सुद्धा नीट उत्तरं देता येऊन शकणार्या H4-EAD जेव्हा ग्रीनकार्ड किंवा त्या अंतर्गत मिळणारा EAD घेऊन ईंटर्व्यूला येतील किंवा वर्षानुवर्षे येतच आहेत तेव्हा त्यांना त्या जुजबी प्रश्नांची ऊत्तरं फक्त त्यांच्याकडे ग्रीनकार्ड आहे म्हणून येतील का?
आणि नाही आली तर तुम्ही ग्रीनकार्ड फक्त प्रायमरी H1 होल्डर ला द्या त्यांच्या स्पाऊसला नको.... असे म्हणणार का?
तसेही म्हणा.. ना नाही... पण मग तसे म्हणण्यात कन्सिस्टन्सी असू द्या.
H4-EAD ह्या ब्लँकेट टॅग खाली तुम्ही ' ह्यांना जुजबी प्रश्नांची सुद्धा नीट उत्तरं देता नाहीत' 'आता मात्र H४ मध्ये कुणीही कुठेही घुसतात' हा जो अपप्रचार करत आहात तो तद्दन खोटा आणि शेकडो जेन्यूईन कँडिडेट्स साठी अन्यायकारक आहे. अब्यूज करणारे सगळीकडे असतात. आयुष्यभर भारतात राहून फॅमिली कोट्यातून ग्रीनकार्ड मिळवून खोटा ईंटर्वू देणारेही चिकार असतात. त्यावर ईटर्व्यूच्या पद्ध्ती सुधारणे, ईन-पर्सन बोलावून कोडिंग करायला लावणे वगैरे ऊपाय आहेत.
थेट H4-EAD कॅन्सल करा म्हणणे म्हण्जे शेपटीवर पाय पडल्याचे खरे कारण झाकून नुसता कांगावा करण्यासारखे आहे.
Prove yourself नाहीतर UP चे भैया लोकांनी मुंबईची केली तशी अवस्था होईल अमेरिकन जॉब्सची >>
We all rode the same train once, remember ?...
हसून हसून फुप्फुसं दुखली!! >> बरंय बरंय.. आकसातून येणार्या त्राग्याच्या दुख्ण्यावर हसणं चांगलं औषध आहे.
<<<< थोडक्यात आय्टीवाल्यांनी
<<<< थोडक्यात आय्टीवाल्यांनी सगळी घाण करुन ठेवलेली आहे आणि आता त्या पापाची फळं सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना भोगावी लागत आहेत; हा मुद्दा कोणितरी पार्किंग लॉटमध्ये घालुन ठेवा. इंटरेस्टिंग आहे... >>>
सध्याच्या युगात, आयटीमध्ये असे काय खास जॉब्स आहेत जे रिमोटली करता येतच नाहीत आणि त्यामुळे एच-१ वाल्यांना बोलवावेच लागते? हे जाणून घ्यायला आवडेल. इतर क्षेत्रातल्या लोकांना पण याचा त्रास होतो, याच्याशी थोडा सहमत आहे (माझ्या मर्यादित माहितीनुसार आणि ज्ञानानुसार).
बोका, चांगला प्रश्न आहे.
बोका, चांगला प्रश्न आहे. रिमोटली म्हणजे भारतात सोडा, बे एरिआच्या बाहेर अमेरिकेतच जिकडे तेच काम कदाचित निम्म्या किमत्तीत होईल तिकडेही इथले जॉब जात नाहीत. कदाचित अभियंत्याना हलायचं नाहीये हे प्रबळ कारण असावं. चांगले अभियंते मिळत नाहीत, टाईम झोन मॅच आणि सरकारी कर सवलती/ नियम (असे काही आहेत असं वाटतं) याशिवाय काही कारण दिसत नाही.
Pages