ट्रम्प प्रशासन आणि भारतीयांच्या नोकर्‍या व त्यांचे भवितव्य

Submitted by अजय अभय अहमदनगरकर on 15 May, 2017 - 04:01

' आपल्या देशाचे बघा , जगाचे जाउ द्या तेल लावत ' या धोरणाला मिळालेल्या पाठिम्ब्यानुसार व त्या नवीन राजकीय सूत्रानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या आश्वासनास कौल देऊन अमेरिकन नागरिकांनी त्यांना सत्ताधिष्टीत केले. प्रचारातही ट्रम्प काकांचे पत्ते उघड होते आणि त्याला जनमताचा कौल मिळाल्याने त्याचे पालन त्याना करायला काहीच अडचण नव्हती. त्यानुसार त्यानी हळूहळू नखे बाहेर काढायला सुरुवात केलेली आहेच.

त्यातले ' अमेरिका फर्स्ट ' या धोरणानुसार उपर्‍याना हळू हळू बाहेरचा रस्ता दाखवायचा, येणार्‍यांवर अधिक बंधने आणण्याचा अजेन्डा सुरूही झाला आहे. याचा नेमका तपशील काय आहे हे इथे तरी कळेनासे झाले आहे. भारतातले अनेक जण अमेरिकेत व्यवसाय, नोकर्‍या, उच्च शिक्षण या निमित्ताने आहेत, काही जातीलही. या सर्वांबाबत ट्रम्प महाराजांचे धोरण नक्की काय आहे. याबाबत तिथल्या लोकांकडून फर्स्ट हॅन्ड माहिती मिळवण्याच्या दृष्टीने हा धागा काढला आहे. कारण बरीच मुले पदव्युत्तर शिक्षणाचे तसेच जमलेच तर तिथेच करीअर करण्याचे प्लॅनिन्ग करीत आहेत ( हा आरक्षणाचा परिणाम आहे की नाही हा चर्चेचा विषय नाही Happy ) . त्यांच्या मनात संभ्रम झाला आहे नक्की. विशेष्तः सॉफ्ट्वेअर /आय टी क्षेत्राचे भवितव्य याबाबत संभ्रम आहे. त्यात विप्रो , इन्फोसिस या कंपन्यानी ले ऑफ द्यायला सुरुवात केल्याच्या बातम्या इथे प्रसिद्ध होत आहेत
सबब, ट्रम्प धोरणाचे ह काय गौड बण्गाल आहे, ऑन् साईट जॉब आणि अमेरिकन जॉब यासाठी वेगळे धोरण आहे का ? अगदी स्पष्टच विचारायचे म्हणजे तिकडच्या मंडळीना जॉब गेले म्हणून परत यावे लागणार आहे काय , याची कृपया जाणकार लोकांनी माहिती द्यावी ही विनन्ती.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mi ranget varshanuvarshe rahoon, sagle niyam palatach alo ahe. >>>>>
This is exactly what people are trying to change, don’t you agree?
So that countless others who have come here or are still coming here will not have to languish for years waiting to gain what is rightfully theirs And what they already have been promised after multiple levels of vetting their applications (assuming they are trying to immigrate through proper channels) just because they are from a specific country.

No offense to you personally sir. >>>>
No worries.

अच्छा तुम्ही 'ठेविले अमेरिके तैसेचि..' टाईप्स जे खाटल्यावर मिळाले तेवढेच नशीब मानणारे आहात तर. मी ऊगीचच तुम्हाला कोणीतरी मोठे Rofl जाऊदे ...
अन्नच्छत्र वगैरे फारच 'लो सेल्फ एस्टीम' झाले अश्यांशी काय बोलणार.. पुन्हा जाऊच दे. Lol

अन्नछत्र???
गुलामाची मानसिकतापेक्षा दुसरा शब्द नाही. असो.

एक अवांतर पण समांतर प्रश्न.

इतकीच, आहे त्या देशाच्या नियम/परिस्थितीला जैसे थे ठेवण्याची इच्छा आहे, तर मुळात भारतातून निघून जाणाऱ्या लायनीत उभे का राहिलात आपण?

जगण्याचे नियम बदलायची इच्छा होती की नव्हती?

वर लिहिलेली स्टॅच्यु ऑफ लिबर्टी वरची कविता नक्की वाचा. अमेरिका इमिग्रंटचा देश म्हणजे सगळीकडचं क्रीम घेउन बनलेल्या लोकांचा देश नाहीये. अमेरिकेचे कायदे आणि त्यातील फायदे इथल्या बेकायदेशीर लोकांनाही (बहुतांश भारतीय तर कायदेशीरच आहेत) लागू होतात (आता 'व्ह्यायचे' म्हणायची वेळ न येवो) फ्री वर्ल्डची राजधानी म्हणतात ते उगाच नाही. महासत्ता बनण्यात डायवर्सिटत्चं सगळ्यात मोठं योगदान आहे.

इतकीच, आहे त्या देशाच्या नियम/परिस्थितीला जैसे थे ठेवण्याची इच्छा आहे, तर मुळात भारतातून निघून जाणाऱ्या लायनीत उभे का राहिलात आपण? >> या प्रश्नाच्या पूर्वार्धाचा आणि उत्तरार्धाचा काही संबंध आहे का?
#वॉटअबाउटरी

. तुमच्या अन्नछ्त्राच्या भाषेत तुमची परिस्थिती सांगतो...

फक्त तुम्हालाच तुमच्या कुटुंबासाठी हातात वाडगा घेऊन रांगेत ऊभे रहाण्याची परवानगी दिलेली आहे आणि ईतर कुटुंबातल्या दोघांना रांगेत ऊभे रहाण्याची परवानगी आहे.
तुम्ही माझ्याबाबतीत हा दुजाभाव का? हे विचारायची हिम्मत दाखवावायची सोडून जे विचारत आहेत त्यांनाच मागे ओढत आहात...
जणू त्यांनी दोन वाडग्याची परवानगी मिळावल्यावरही तुम्ही एकच वाडगे घेऊन ऊभारणार आहात. Lol कळाले का काही?

मला समजले ते असे.
सगळेच रांगेत उभे होते आणि आतापण आहेत, तर "आमचीच रांग आता खूप हळूहळू सरकतेय" किंवा "आता १ extra वाडगा घ्यायला परवानगी द्या" असे का म्हणायचे? रांगेत वेळ लागत असेल तर रांग सोडून दुसरीकडे जा. (बावीस सप्तमांश, चु.भू.दे.घे.)

Asuf,
We have a right to petition and fight (legally) for what we perceive as unfair quotas. And this beautiful country gives us that privilege. Some other places will kick our asses back to india if we so much as try to celebrate our traditions. Unfortunately workers have no ownership of this country (notwithstanding the taxes we are paying) there is a difference between privilege and right. We have been given a privilege to work here. Not a right. The people who have a real stake in this land, have the absolute right to admit as many people as they want and ask us to leave if they want, as long as they are not bringing us by force. Thats how it works in every goddamn country on the face of Earth. Including India.

बरोबर आहे, हक्क नाही इथे येऊन आम्हाला राहायला द्या, काम करायला अधिकार द्या हे सांगण्याचा
ते इतर लोक करतात.

आपण नियम पाळूनच ह्या मागण्या करतोय आणि उद्या अमान्य झालं तर किमान काही मोठ्या प्रमाणात तरी भारतीय लोक शिस्तीत काम करणे बंद करतील किंवा परत ही जातील. पुन्हा नियम मोडणारे त्यातून ही पळवाटा काढतीलच, तो भाग वेगळा.माझ्या पाहण्यात अशी उदाहरणे आहेत की व्हिसा नाही मिळाला म्हणून भारतात परत गेले इमाने इतबारे.

पण म्हणून इथे राहून कायदेशीर मार्गाने आपल्या मागण्या मांडणे आणि त्या संमत करून घेण्यासाठी प्रयत्न करणे आणि त्या मान्य झाल्या काही प्रमाणात (एच ४ इएडी) तर त्यावर इतका आक्षेप आपल्याच इतर देशवासीयांनी घेणे की जे स्वतः या दुष्टचक्रातून गेलेत, याचं काही कारण नसावे असे वाटते.

<<पण म्हणून इथे राहून कायदेशीर मार्गाने आपल्या मागण्या मांडणे आणि त्या संमत करून घेण्यासाठी प्रयत्न करणे >>
मागण्या खूप करा, हक्क नाहीत ते. नि सध्याची परिस्थिती त्याला अनुकूल नाही.

<<<इतका आक्षेप आपल्याच इतर देशवासीयांनी घेणे की जे स्वतः या दुष्टचक्रातून गेलेत, याचं काही कारण नसावे असे वाटते.>>>
बरोबर आहे, पण जेव्हढे तुमचे मागण्या मानणे योग्य, तेव्हढेच त्यांची मते मांडणे त्यांना योग्य. सध्या उपयोग कसलाच नाही.

सगळेच भारतीय अश्या दुष्टचक्रातून गेलेले नाहीयेत, बरेच जण फार पूर्वी पासून इथे आलेले आहेत, त्यांना काही दुष्टचक्र वगैरे माहित नाही. त्यांना तुमचे त्रास बघून वाईट वाटते. नि असे वाटते की आता तर भारतात भरपूर पैसे, नि भरपूर स्वातंत्र्य आहे नि मुख्य म्हणजे आय टी मधल्या हुषार लोकांना आय टी धंद्यात नवीन सिस्टीम्स बनवणे, धंदा करणे भारतातच शक्य आहे, कशाला अमेरिकेत येऊन डोकेफोड करायची?
ज्ञान, पैसा सगळे भारतातच आहे, संधि आहे, आधिकार आहेत, अगदी पन्नास वर्षांपूर्वी अमेरिकेत होते तशी परिस्थिती आहे. भरपूर पैसे कमावाल.

अमेरिकेत आता यायचे तर फक्त चैन करायला. जरूर या. तशी मज्जा असते इथे, चांगले वर्षभर राहून बघा, आरामात! झंझटीत कशाला पडता?

@बाबा कामदेव
अमेरिकेच्या व्हिसाची इतकी चिंता तुम्ही का करता? व्यक्तीश: तुमच्या व्हिसावर फरक पडणार आहे का?

उपाशी बोका, कामदेव बाबांची मुलंबाळं इथे असू शकतील किंवा येण्याच्या लायनीत असू शकतील. दोन्ही नसेल तर मग अमेरिकेत काय चालू आहे याची उत्सुकता.

अमेरिकेत आता यायचे तर फक्त चैन करायला. जरूर या. तशी मज्जा असते इथे, चांगले वर्षभर राहून बघा, आरामात! झंझटीत कशाला पडता?>> हे नक्की कोणता व्हिसा घेऊन करता येईल ते सांगा.
भारतात भरपूर पैसा देणारी नोकरी/ व्यवसाय असेलही, पण अमेरिकेत राहून मज्जा करायची आहे म्हणून १ वर्ष सुट्टी कुठल्या नोकरी किंवा व्यवसायात मिळेल?
आता कामा निमित्त मला १-२ वर्ष अमेरिकेत रहायला मिळू शकत होतं. पण त्यासाठी लागणारा व्हिसा कसा मिळवा? तो व्हिसा मिळवताना येणार्‍या अडचणींची चर्चा करायलाच हा धागा काढलाय ना?

अमेरिकेच्या व्हिसाची इतकी चिंता तुम्ही का करता? व्यक्तीश: तुमच्या व्हिसावर फरक पडणार आहे का?
>> याचे उत्तर हो असेल तर तुमचे काय म्हणणे आहे?

सोहा, ते झक्की आहेत . १९६० मध्ये अमेरिकेत गेले आहेत. तिथे बसून भारतियांवर दुगाण्या झाडणे हे त्यांचा मुख्य टाइम पास आहे. त्यांच्या लेखी भार्तातले यच्च्यावत लोक मूर्ख आहेत. चवीसाठी ते अधून मधून अमेरिकन लोकाना ही नावे ठेवतात . ते स्वतः अमेरिकन नागरिक असूनही. पोतराज नाही का स्वतःच्या अंगावर आसूड मारून घेत तसे .... हटकेश्वर हे त्यांचे कुलदैवत आहे. त्यांच्या साठी एक शब्द चपखल आहे तो म्हणजे .... भैत्ताड ! Happy Happy Happy

<<< याचे उत्तर हो असेल तर तुमचे काय म्हणणे आहे? >>>
चिंता करू नका. अमेरिका नियम बदलायचे तर बदलणारच आणि ठेवायचे तर ठेवणारच.

student visa(MS) holders ना h1 मिलण्याचे प्रमाण काय आए?हे?
official numbers कुठे मिळतील?

RTFG

student visa(MS) holders ना h1 मिलण्याचे प्रमाण काय आए?हे?
official numbers कुठे मिळतील?
>>>
जेव्हढे इतरांना आहेत तितपतच. 20000 चा कोटा असतो 65000 पैकी पण तो फारच लगेच भरतो. फार तर दोनदा लॉटरीत चान्स मिळतो असे म्हणा.

@बाबा कामदेव
तुम्हाला या विषयात रुची आहे, म्हणून नुकतीच वाचण्यात आलेली १ बातमी देत आहे.

<<<सोहा, ते झक्की आहेत . १९६० मध्ये अमेरिकेत गेले आहेत. ............त्यांच्या साठी एक शब्द चपखल आहे तो म्हणजे .... भैत्ताड ! >>>
बरोबर. फक्त दोन सुधारणा - १९६० नाही १९७०. आमचे कुलदैवत अंबेजोगाई.
बाकी सर्व बरोबर.

<<<भारताबाहेर गेलेल्या भयताडांना इथल्या प्रकरणांत अ‍ॅक्टीवली नाक खुपसायचे असते. त्यांना कोणी हटकायला पाहिजे.>>>
भयताड नाही हो. भैत्ताड! आणि जास्त राग आला तर भैत्त्त्त्त्त्ताड असे म्हणायचे.

अहो पण लोक तिथून तरी कशाला इकडचे कायदे बदलण्याचा, इथे काय हक्क असावेत याचा उहापोह करता? मग आम्हालाहि आमची मते मांडायला नको का?
मत आहेत. काही कळकळीने, मनापासून दिलेले सल्ले आहेत. ते ऐकलेच पाहिजे, पटलेच पाहिजे असा आग्रह नाही!
पुष्कळदा दुसर्‍याचे न ऐकणे हेच योग्य असते. सत्या नडेला ने माझे ऐकले असते तर तो आज एव्हड्या मोठ्या पदावर पोचलाच नसता. आता सर्वांनाच आपण सत्या नडेला आहोत असे वाटत असेल तर या इथे. नाहीतर खरे म्हणजे भारतातच राहून अंबानी होणे भारताच्या दृष्टीने बरे.
मला तर अशी आशा आहे की भारतातच गूगल, फेसबूक, इ. पेक्षा जास्त मोठे प्रकल्प निघतील नि अमेरिकेला मागे टाकतील!
आमच्या वेळेला अलेल्या सर्व भारतीयांचे मत आहे की आता अमेरिकेचे खरे नाही. फक्त निर्वासित लोकच, ज्यांना दुसरा उपाय नाही तेच या बुडणार्‍या बोटीत येतात.

<< हे नक्की कोणता व्हिसा घेऊन करता येईल ते सांगा.>>
व्हिजिटर व्हिसा सहा महिन्यापर्यंतचा मिळू शकतो. टूर कंपनी तर्फे येणे शक्य आहे व सोयीचे आहे. एकदा इथे येऊन बघून जा नि मग वाटल्यास व्हिजिटर व्हिसा घेऊन परत या.

<<<आता कामा निमित्त मला १-२ वर्ष अमेरिकेत रहायला मिळू शकत होतं. पण त्यासाठी लागणारा व्हिसा कसा मिळवा? >>>
कामानिमित्त मिळू शकत होते म्हणजे ? असे कसे शक्य होते व्हिसा शिवाय? कसले काम?

Pages