ट्रम्प प्रशासन आणि भारतीयांच्या नोकर्‍या व त्यांचे भवितव्य

Submitted by अजय अभय अहमदनगरकर on 15 May, 2017 - 04:01

' आपल्या देशाचे बघा , जगाचे जाउ द्या तेल लावत ' या धोरणाला मिळालेल्या पाठिम्ब्यानुसार व त्या नवीन राजकीय सूत्रानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या आश्वासनास कौल देऊन अमेरिकन नागरिकांनी त्यांना सत्ताधिष्टीत केले. प्रचारातही ट्रम्प काकांचे पत्ते उघड होते आणि त्याला जनमताचा कौल मिळाल्याने त्याचे पालन त्याना करायला काहीच अडचण नव्हती. त्यानुसार त्यानी हळूहळू नखे बाहेर काढायला सुरुवात केलेली आहेच.

त्यातले ' अमेरिका फर्स्ट ' या धोरणानुसार उपर्‍याना हळू हळू बाहेरचा रस्ता दाखवायचा, येणार्‍यांवर अधिक बंधने आणण्याचा अजेन्डा सुरूही झाला आहे. याचा नेमका तपशील काय आहे हे इथे तरी कळेनासे झाले आहे. भारतातले अनेक जण अमेरिकेत व्यवसाय, नोकर्‍या, उच्च शिक्षण या निमित्ताने आहेत, काही जातीलही. या सर्वांबाबत ट्रम्प महाराजांचे धोरण नक्की काय आहे. याबाबत तिथल्या लोकांकडून फर्स्ट हॅन्ड माहिती मिळवण्याच्या दृष्टीने हा धागा काढला आहे. कारण बरीच मुले पदव्युत्तर शिक्षणाचे तसेच जमलेच तर तिथेच करीअर करण्याचे प्लॅनिन्ग करीत आहेत ( हा आरक्षणाचा परिणाम आहे की नाही हा चर्चेचा विषय नाही Happy ) . त्यांच्या मनात संभ्रम झाला आहे नक्की. विशेष्तः सॉफ्ट्वेअर /आय टी क्षेत्राचे भवितव्य याबाबत संभ्रम आहे. त्यात विप्रो , इन्फोसिस या कंपन्यानी ले ऑफ द्यायला सुरुवात केल्याच्या बातम्या इथे प्रसिद्ध होत आहेत
सबब, ट्रम्प धोरणाचे ह काय गौड बण्गाल आहे, ऑन् साईट जॉब आणि अमेरिकन जॉब यासाठी वेगळे धोरण आहे का ? अगदी स्पष्टच विचारायचे म्हणजे तिकडच्या मंडळीना जॉब गेले म्हणून परत यावे लागणार आहे काय , याची कृपया जाणकार लोकांनी माहिती द्यावी ही विनन्ती.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोडिंग टेस्टिंग ला इतका तुच्छ कटाक्ष का?
भारतात नवी प्रॉडक्ट डिझाईन होत नाहीत याचे मुख्य कारण रिसर्च साठी जो खर्च, वेळ, रिसोर्सेस(फळ मिळेल किंवा न मिळेल याची तयारी ठेवून) द्यावा लागतो ते पैसे आपण खर्च करत नाही.
एखाद्या कर्तृत्ववान पण बिझी गृहिणीने स्वत:ला चांगली येईल याची खात्री असली तरी जोवर अगदीच कसोटीची वेळ येत नाही तोवर पुरणपोळी किंवा खाज्याच्या करंज्या विकत आणणं किंवा सासू करत असताना खोबरं खवणं किंवा ओटा आवरणं अशी कामं करण्यासारखं ते आहे.त्याने गृहिणी लहान ठरते का? (उदाहरण गैरलागू असेल पण कोडिंग टेस्टिंग ला केवळ प्रॉडक्ट राईट फ्रॉम स्क्रॅच बनवलं नाही म्हणून इतक्या उपहासाने उल्लेखण्याची गरज आहे का?कोड जनरेटर रोबोज येतील.ठिक आहे.काही जणांच्या नोकर्‍या धोक्यात येतील.पण हुशार लोक भारतातले असो वा परदेशी, या रोबोज चे प्रोग्रामिंग शिकून दुकान चालू ठेवतीलच.)

mi_anu अगदी खरयं ! भारतीय लोकं नवीन प्रॉडक्ट डिझाईन मधे मागे पडतात. तसचं स्वतःच मार्केटिंग करण्यातपण कमी पडतात. असं मला वाटतं.
अमेरिकन लोकांना हे उत्तम जमतं. लहान वयापासून, शाळेत आणि कॉलेजात ह्याचे धडे गिरवायची संधी मिळते. आणि मी जे काही करतोय ते महानच आहे असा confidence लहान वयातचं येतो.
भारतात, मुख्यतः मराठी लोकांमधे लहानपणा पासून विद्या विनयेन शोभते अशीच शिकवण असल्याने, स्वतःच मार्केटिंग करणं चटकन जमत नाही.

नवीन सिस्टीम डिझाईन, बिझनेस अ‍ॅनालिसिस इ. क्षेत्रात काम करायला इथल्याच निरनिराळ्या व्यवसायातील क्षेत्रात अनुभव, ओळखी लागतात, बर्‍यापैकी वशिला पण लागतो. इथे या अवस्थेला पोचायला आठ दहा वर्षे लाग तात. भारतातून इथे आलेल्यांना ते जरा कठीणच.

आय टी क्षेत्रात भारतातहि हे सर्व करणारे लोक असणारच, त्याशिवाय का भारतात इतक्या मोठ्या प्रमाणात संगणकीकरण झाले? अर्थात याच्या पाचपट होण्याला वाव आहे. त्याला भांडवल कमी पण आपले म्हणणे पैसे देणार्‍या लोकांना पटवून देण्याची कला पाहिजे.

इथे पैसे देणारे लोक आधीच तयार असतात, त्यांना फक्त आपण सांगायचे.
गिर्‍हाईकाला इथे देव मानतात कारण पुरवठा कमी, मागणारे जास्त, स्पर्धक जास्त. भारतात याच्या उलट. अनेक वर्षांपूर्वी तर भारतात आयुर्विम्याला पर्याय नाही, सरकारखेरीज इतर कुणि टेलेफोन देऊ शकत नाही, बँका सरकारी - काय पडली आहे गिर्‍हाईकांच्या गैरसोयीची? जातील कुठे? लालूप्रसाद यादवने तर जाहीरच केले - भारताला काँप्युटरची गरजच नाही, आमची लोकसंख्या भरपूर आहे
करायचे काय काँप्युटर घेऊन.
मग मागे पडणारच.

<<<<<<मी जे काही करतोय ते महानच आहे असा confidence लहान वयातचं येतो. >>>>>

मागे एकदा जगातील प्रगत अश्या वीस राष्ट्रांतील ११ वी १२ वी मधल्या मुलांची जागतिक परीक्षा झाली. त्यात गणितामधे अमेरिकन मुलांचा १८ वा व शास्त्रांमधे १६ वा नंबर आला. पण आत्मविश्वास, ठामपणे बोलणे, वादविवाद या विषयांत पहिला.
तेंव्हा इथे लोक म्हणाले, आम्हाला काही माहित नाही, पण चुकीचे असले तरी ते आत्मविश्वासाने, ठामपणे बोलून, लोकांना पटवून देऊ!!
त्याचा प्रत्यय इराक युद्धापूर्वी जगाला आला - इराकमधे mass destruction ची शस्त्रे आहेतच, तिथे आम्ही लोकशाही आणू!!

साहजिकच आहे, भारतीय लोकांवर परिणाम करणारी घटना असल्याने कवरेज मिळणारच. आणि असलेही पाहिजे कारण त्याने धोक्याची कल्पना येते...

दत्तू बातमी खरी आहे, बातमीचा मथळा चुकीचा म्हणा किंवा खोडसाळ आहे. अजून असा निर्णय झालेला नाही मात्र विचाराधीन नक्की आहे. हा निर्णय पास करणे सगळ्यात सोपे आहे कारण मुळचा ओबामाचा नियम ऑर्डनन्स काढून राबवला आहे. तेव्हा अध्यक्षाच्या एका ऑर्डनन्सने तो रद्दही आरामात होईल.

म्हणजे मनमोहनसिंह यांच्या मैत्रीमुळे भारतीयांना फायदेशीर ठरणारा ओबामाने काढलेला आॅर्डीनन्स ट्रंम्प मोदीबरोबरच्या अतिघनिष्ठकडकडूनमिठीयुक्त मैत्रीमुळे रद्द करायचा विचार चालू आहे...

म्हणजे मनमोहनसिंह यांच्या मैत्रीमुळे भारतीयांना फायदेशीर ठरणारा ओबामाने काढलेला आॅर्डीनन्स ट्रंम्प मोदीबरोबरच्या अतिघनिष्ठकडकडूनमिठीयुक्त मैत्रीमुळे रद्द करायचा विचार चालू आहे...
>>>
Proud Biggrin

हो हो

हम्म एकूणच म्हणजे माझ्यासारख्यांच्या नोकरीवर गदा येणार तर Sad

मग दुसर्‍या देशात जा नाहीतर भारतातच जा. तिथे भरपूर स्कोप आहे नवीन सिस्टिम्स करायला.
<<
ट्रेन च्या डब्याआतले अन बाहेरचे, असा एक सिद्धान्त आहे.
असो.

या ट्रेनमधे येऊ नका - आता ही ट्रेन भरली. आणि इतर अनेक ट्रेन्स आता उपलब्ध आहेत. जास्त चांगल्या, जास्त सोयिस्कर आहेत. या ट्रेनमधे आता चांगल्या लोकां पेक्षा वाईटच जास्त भरले आहेत. त्यातून अगदी याच ट्रेन मधे यायचे असेल तर पूर्वी इतके सोपे राहिले नाहीये म्हणून सांगणे आहे.
त्यातून मी कोण अडवणारा? खुश्शाल वेळ नि मेहेनत वाया घालवत बसा.
भारतच किती सुधारला आहे. पैसे आहेत, संधि उपलब्ध आहेत. पूर्वी तसे नव्हते म्हणून इकडे आले लोक, आता तसे काही नाही. त्यापेक्षा नोकरी इतर ठिकाणी नि इथे फक्त चैन करायला या. इतकी स्वस्ताई इथे की तुमचे भारतातले (काळे नि गोरे) पैसे संपणार कसे अशी काळजी असते भारतातून येणार्‍यांना.

पण आतले आणि बाहेरचे सिद्धांत बरोबर आहे आणि ते माणसाचं बेसिक इन्स्टिनकट आहे. त्यात सुधारा काय आलंय?
मलाही मी घर घेई पर्यंत किमती कमी असाव्या, घेतल्यावर वाढाव्या. किंवा कम्युनिटी / अफॉरडेबल हाऊसिंग अवश्य करावं पण माझं घर असलेल्या कम्युनिटी मध्ये नको असच वाटतं. हे फेअर नाही आणि भंपक आहे का? असेल, पण मी महाग किंमतीत घर घेतलं आता वरील पैकी काही झालं तर घराच्या किमती कमी होणार. मी स्वार्थ सोडावा असं अजिबात वाटत नाही. आहे हे असं आहे.

जोपर्यंत गोष्ट मिळत नाही, तोपर्यंत कौतुक. ज्याला जे मिळते त्याला ते सामान्यच वाटते. त्यामुळे लोकांना तो म्हणतो काही खास नहो, नको ट्राय करू मिळवण्याचा.
ह्यूमन नेचर आहे.

अमितव, फक्त तुमच्यासाठी.

बाहेरच्यांना आत येऊ "ना" देणे, याला ती ट्रेन मेंटॅलिटी म्हणतात. त्यात सुधरा काय ते सांगतो. समजलं तर पहा.

ही जी ट्रेन आहे, ती ऑश्विझला "न" जाणारी शेवटची ट्रेन आहे. आमच्या डब्यात जागा फुल आहे म्हणून बाहेरुन आत येणार्‍यांना घुसू देणार नाही, असे सांगत दारं थांबवणारी केडर आहे, अती लोक झाले तर ट्रेनच हलणार नाही, इंजिन कपॅसिटि वगैरे काही असते कि नै वगैरे बुद्धी भेदही आहे.

आता,

"सबका साथ, सब का विकास"

मित्रा,

माझ्या सोबतच्या सगळ्याच मानवांचा विकास होवो की न होवो?

माझी मोनोपली चालावी की नाही?

हा विचार कम्युनिस्ट्/नक्शलवादी/समाजवादी/आल्ट लेफ्ट / राईट/ मध्यम.....

असो.

the idea of "left" is you are "left" with YOUR own mind. use it. think.

Idea of RIGHT is to te it's followers what is right, andvfor them to rightly follow it Wink

मला बरोबर समजत असेल तर आरारान पेक्षा मी राइटला आहे असं ते म्हणतायत. आणि त्यांच्या पेक्षा राईटचे सगळे चूक आणि सगळं जग लेफ्ट झालं पाहिजे असं त्यांना वाटतं इतपत मला समजलं. त्याबद्दल बोलण्यासारखं काही नाही.
अतीराइट च्या लोकांना पलीकडच्या आणि अती लेफ्टच्या लोकांना विरुद्ध साईड बद्दल अजिबात एमपथी नाही.

भारतात ऑश्विझसारखी परिस्थिती असेल तर लोकं एच वनच्या लॉटरीत वाट बघतील का रेफ्युजी apply करतील? इथले सल्ले स्किल बेस्ड इमिग्रेशन वर आहेत, त्यात रेफ्युजी तुलना कुठून शिरली?

मी माझ्या परीने, माझ्या अनुभवावरून, काय वाटते ते पटवून देण्याचा प्रयत्न करतो आहे. आता माझे मतच तुम्हाला भंपक वाटत असेल तर असो. तुम्ही नका मानू. नसेल तुम्हाला पटत तर तुम्ही जे पटेल तसे करा.

केवळ वैयक्तिक पातळीवर माझी टिंगल, टीका करायची असेल तर करा - मला ढिम्म फरक पडत नाही. रस्त्यावर भुंकणार्‍या कुत्र्यांइतकेच मी त्याला महत्व देतो.
पण चालू विषयावर माझे मत हवे असेल तर परत सांगतो.
कुणि सांगितले तुम्हाला की अमेरिकेत येऊन विकास होतो? कुठल्या बाबतीत विकास होतो? कुणि सांगितले अमेरिकेतली माणसे जास्त विकास पावलेली आहेत? अहो, जंगली वृत्तीचे लोक आहेत हे लोक! सभ्यतेचा अंशहि नाही बहुजनांच्या विचारसरणीत. सगळे स्वार्थी! फक्त गन घेऊन मारून टाकायचे, जगभरात युद्धे करून अशांतता करायची!! सगळेजण कर्जबाजारी!
अहो सध्या परिस्थिती अशी आहे इथे की इथले सर्व ज्ञान बाहेरून आलेले आहे, येत आहे. ते आता भारता तहि उपलब्ध आहे. खरे तर भारतातच संधी खूप आहेत, सुधारायला वाव आहे. तुम्ही जशी भारतीय राजकारण्यांच्या नावाने, समाजाच्या नावाने बोंब मारता की त्यामुळे आमच्या कल्पनांचा विकास होऊ शकत नाही, तीच अवस्था इथेहि आहे मग विचार करा - भारतातच आपल्या लोकांत आपल्याला ज्याची जास्त माहिती आहे अश्या परिस्थितीत राहून जास्त विकास होईल की पैसे खर्च करून, अनोळख्या जगात येऊन, जिथे मित्र, आप्तस्वकीयांचा पाठिंबा नाही तिथे येऊन धडपड करायची?
आता इतके वर्षांनंतर भारतात आय आय टी, आय आय एम इ. संस्थात जगातील उत्तम ज्ञान मिळण्याची सोय आहे,
पैसे आहेत.
आता अमेरिकेला "खड्ड्यात जा" म्हणण्याइतकी भारताची स्वयंपूर्णता आहे. मग कशाला बाऊ करता इथल्या लोकांच्या मूर्खासारख्या घेतलेल्या निर्णयांचा? उद्या भारतीयांनी इथे यायचे नाही असे ठरवले तर अमेरिकेची परिस्थिती खरेच वाईट होईल!

<<माझी मोनोपली चालावी की नाही?>>
कसली डोंबलाची मोनोपली? कुणिहि इथे यावे नि कष्ट करून स्वतःचे स्थान बसवावे. विशेषतः भारतातून कुणि आलेच तर आम्ही मदतच करू! पूर्वी केली, अजूनहि करतोच. कारण काही ना काही मदत लागतेच. आम्हाला बाहेरून येणार्‍यांची काहीहि भीति वाटत नाही. सगळ्यांनी स्वकष्टाने स्वतःचे स्थान बसवले आहे, इतर त्याला कुणि काडीचा धक्का लावू शकत नाही.

तेंव्हा यायचे असेल तर खुशाल या! इथल्या असल्या कायद्यांमध्ये रहाणे जमायचे नाही, असंतुष्ट रहाल. म्हणून सांगतो.
फक्त अति पैसे झाले म्हणून उधळायला नि चैन करायला या - चांगले सहा महिने रहा, हिंडा, फिरा, पैसे खर्च करा

Pages