ट्रम्प प्रशासन आणि भारतीयांच्या नोकर्‍या व त्यांचे भवितव्य

Submitted by अजय अभय अहमदनगरकर on 15 May, 2017 - 04:01

' आपल्या देशाचे बघा , जगाचे जाउ द्या तेल लावत ' या धोरणाला मिळालेल्या पाठिम्ब्यानुसार व त्या नवीन राजकीय सूत्रानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या आश्वासनास कौल देऊन अमेरिकन नागरिकांनी त्यांना सत्ताधिष्टीत केले. प्रचारातही ट्रम्प काकांचे पत्ते उघड होते आणि त्याला जनमताचा कौल मिळाल्याने त्याचे पालन त्याना करायला काहीच अडचण नव्हती. त्यानुसार त्यानी हळूहळू नखे बाहेर काढायला सुरुवात केलेली आहेच.

त्यातले ' अमेरिका फर्स्ट ' या धोरणानुसार उपर्‍याना हळू हळू बाहेरचा रस्ता दाखवायचा, येणार्‍यांवर अधिक बंधने आणण्याचा अजेन्डा सुरूही झाला आहे. याचा नेमका तपशील काय आहे हे इथे तरी कळेनासे झाले आहे. भारतातले अनेक जण अमेरिकेत व्यवसाय, नोकर्‍या, उच्च शिक्षण या निमित्ताने आहेत, काही जातीलही. या सर्वांबाबत ट्रम्प महाराजांचे धोरण नक्की काय आहे. याबाबत तिथल्या लोकांकडून फर्स्ट हॅन्ड माहिती मिळवण्याच्या दृष्टीने हा धागा काढला आहे. कारण बरीच मुले पदव्युत्तर शिक्षणाचे तसेच जमलेच तर तिथेच करीअर करण्याचे प्लॅनिन्ग करीत आहेत ( हा आरक्षणाचा परिणाम आहे की नाही हा चर्चेचा विषय नाही Happy ) . त्यांच्या मनात संभ्रम झाला आहे नक्की. विशेष्तः सॉफ्ट्वेअर /आय टी क्षेत्राचे भवितव्य याबाबत संभ्रम आहे. त्यात विप्रो , इन्फोसिस या कंपन्यानी ले ऑफ द्यायला सुरुवात केल्याच्या बातम्या इथे प्रसिद्ध होत आहेत
सबब, ट्रम्प धोरणाचे ह काय गौड बण्गाल आहे, ऑन् साईट जॉब आणि अमेरिकन जॉब यासाठी वेगळे धोरण आहे का ? अगदी स्पष्टच विचारायचे म्हणजे तिकडच्या मंडळीना जॉब गेले म्हणून परत यावे लागणार आहे काय , याची कृपया जाणकार लोकांनी माहिती द्यावी ही विनन्ती.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून जनरल इण्डस्ट्री मधल्या अनेक कंपन्यांमधे रिमोट वर्क पॉलिसी नाही. दुसरे म्हणजे कस्टमर कडून इथे सकाळी आलेल्या प्रश्नाला बंगलोर मधून दुसर्‍या दिवशी आलेले उत्तर म्हणजे खूप उशीरा असते. कस्टमर सपोर्ट मधले लोक जसे शिफ्ट्स करतात तसे इंजिनियरिंग वाले करत नाहीत. त्यामुळे अनेकदा इथेच लोक हवेत ही मागणी असते.

"टाइम अ‍ॅण्ड मनी" वर करण्यासारखे प्रोजेक्ट्स आखले, तर ते सहजपणे भारतातून करून घेता येतात. पण सगळी कामे तशी आखता येत नाहीत.

बे एरिया मधे जे व्हिसावर नोकरी करतात ते बहुसंख्य "प्रॉडक्ट" कंपन्यांमधे करतात. तेथे खूप काम बंगलोर ला गेले असले तरी बरेच काम इथेच राह्ते.

बंगलोर हे ढोबळ ऑफ शोअर सारखे धरा. प्रत्यक्षात देश/शहर कोणताही असेल.

sensitive data handling वाले projects offshore वरून करता येत नाही बरेचदा कंपनी policies मूळे. मी उदाहरणे लिहू शकत नाही काहि विशिष्ट कारणास्तव पण अगदी अमेरिकन बॉर्न citizen असला तरी त्यावर काम करू शकालच ह्याची निश्चिंती नसते.

असामी, विषयांतर नको म्हणून सिक्युरिटी क्लिअरन्स नसलेला माणूस काय काय करु शकतो, कुठे कुठे जाऊ शकतो हे सांगायचा मोह आवरतोय. Proud

शेपटीवर पाय पडल्याचे खरे कारण झाकून नुसता कांगावा करण्यासारखे आहे.
Rofl

Time zone match न झाल्याने अडचण येईल असे सॉफ्टवेअर? आमच्यात एक एन्डोस्कोपी हार्डवेअर आहे. त्यात स्कोप केमेराने पाहणे अन स्क्रीन वर दिसणे यात अर्ध्या सेकंदाच्या लॅगमुळे जीव जाऊ शकतो. पण..

Aso. Me ithe jast nako bolayla.

विषयांतर नको म्हणून सिक्युरिटी क्लिअरन्स नसलेला माणूस काय काय करु शकतो, कुठे कुठे जाऊ शकतो हे सांगायचा मोह आवरतोय >>> Lol

आयटीतला जॉब आहे म्हणजे तो रिमोट ली करता येतोच हा आणखी एक गैरसमज आहे. विचार करा, अमेरिकेत दर सोमवारी हजारो आयटे उठून विमानं पकडतात ते क्लायंटला ऑन-साईट हवे असतात म्हणून. खुद्द अमेरिकेतही ऑन-शोअर डेव्हलोपमेंट सेंटर ही कन्सेप्ट फारशी यशस्वी झाली नाहीये. हेडफोन,माईक आणि कॅमेरा असला की कुठूनही कोणाशीही कोलॅबॉरेट करता येतं ही थिओरेटिकल कल्पना प्रत्यक्षात उतरायला अडचणी आहेत. काही मिनीटांत होऊ शकणाऱ्या कामाचा turnaround time तेच ऑफशोर कडे दिल्यावर काही दिवसांत जातो. ऑफशोरींग यशस्वी व्हायला एकतर काम फार पेडिस्ट्रियन असावं लागतं किंवा क्लायंट टीम आणि ऑफशोअर टीम ची लिंक (बराच जुना आणि 'जून' प्रोजेक्ट असेल तर हे जमतं) जुळली असायला लागते.

शेपटीवर पाय पडल्याचे खरे कारण झाकून नुसता कांगावा करण्यासारखे आहे.>>.personally बोलताय Avoid इट. उगाच तुम्हाला म्हटल्यासारखे थयथयाट करू नका. मी स्वतः असे बघितले आहे . प्रोजेक्ट वरून हकालपट्टी करून दुसरा कोणी आणणे वेळखाऊ असत , आपल्या सगळ्यांना आहे. अश्या लोकांमुळे प्रोजेक्ट manage करण अवघड होऊन बसत.

तुम्ही ग्रीनकार्ड फक्त प्रायमरी H1 होल्डर ला द्या त्यांच्या स्पाऊसला नको.... असे म्हणणार का?- मुळीच नाही, Familes should stay together.
मानसकन्या तुम्ही मी आणि अमितने आधी विचारलेल्या प्रश्नाचे ऊत्तर देण्याची तसदी घ्याल का?>>>उत्तर द्यावास वाटत नाही. ;तुम्हाला हवं ते समजा
माझा शेवटचा प्रतिसाद आहे ह्या पोस्ट वर , पर्सनल कंमेंट्स ला रिस्पॉन्स देण्याची इच्छा नाही

"तुम्ही ग्रीनकार्ड फक्त प्रायमरी H1 होल्डर ला द्या त्यांच्या स्पाऊसला नको.... असे म्हणणार का?" >>> या प्रश्नात ग्रीन कार्ड वर पण स्पाउस चे डिपेन्डन्ट स्टेटस राहून काम करता न येणे असा सिनारिओ तुम्ही सजेस्ट कराल का असे विचारले आहे असे वाटतेय. जी१ जी ४ स्टेटस Happy
Familes should stay together. >>> हा पूर्णपणे वेगळा मुद्दा होईल. एकत्र राहू शकणे हे अत्ताही आहेच एच १ आणि एच ४ स्टेटस असले तरी.

विषयांतर नको म्हणून सिक्युरिटी क्लिअरन्स नसलेला माणूस काय काय करु शकतो, कुठे कुठे जाऊ शकतो हे सांगायचा मोह आवरतोय >> नाही नाही मला माहित आहे एक तरी नक्की Lol

बरं बरं आमचा तो थयथयाट तुमचा 'H4-EAD च कँसल करा' चा नारा काय आहे म्हणे.. अरंगेत्रम का? Lol .. चालू देत मग.

मी स्वतः असे बघितले. प्रोजेक्ट वरून हकालपट्टी करून आणणे वेळखाऊ असत आपल्या सगळ्यांना आहे. अश्या लोकांमुळे प्रोजेक्ट manage करण अवघड होऊन बसत. >> पण असे फेक लोक तुमच्या प्रोजेक्टवर रुजू होतात हे तुमचं आणि तुमच्या ईंटर्व्यू प्रोसेसचं शॉर्टकमिंग आहे. त्याचं खापर हजारो जेन्यूईन H4-EAD च्या डोक्यावर का फोडावे?
तुमच्या फ्लॉड रिझनिंगपायी तुम्ही सगळ्या H4-EAD कम्युनिटीला धारेवर धरत त्यांच्या नावाने थयथयाट का करीत आहात? हा मूळ प्रश्न आहे.

तुम्ही ग्रीनकार्ड फक्त प्रायमरी H1 होल्डर ला द्या त्यांच्या स्पाऊसला नको.... असे म्हणणार का?- मुळीच नाही, Familes should stay together. >> मग H1 वाल्यांच्या फॅमिली, फॅमिली नसतात का? ईंग्लिशच्या 'जुजबी' स्पेलिंग मिस्टेक होत आहेत Proud
मैत्रेयी ने लिहिले तेच विचारायचे होते.

उत्तर द्यावास वाटत नाही. ;तुम्हाला हवं ते समजा> ठीक आहे राहिलं... आत्मपरिक्षणाला ऊद्यूक्त करणारे त्रासदायक प्रश्न विचारले की बहुतेकांचे हेच स्टँडर्ड ऊत्तर असते. मला जे समजले तेच लिहिले आहे वरती.

पण असे फेक लोक तुमच्या प्रोजेक्टवर रुजू होतात हे तुमचं आणि तुमच्या ईंटर्व्यू प्रोसेसचं शॉर्टकमिंग आहे. >> +१ तुम्हाला आवडतील अशा स्टेटस असलेल्या लोकांचे भयंकर इंप्रेसिव्ह रेझ्युमे आणि साध्या साध्या प्रश्नांची उत्तरे ऐकल्यावर "तुच ना तो"मोमेंट जर अनेकदा येत असेल तर स्क्रिनिंग करायला क्वॉलिफाईड माणूस हवा हे कनक्लुजन काढतो मी. असे रेझ्युमे वीड आउट करणे हे एक महत्त्वाचे काम/ स्किल आहे.

<<< आयटीतला जॉब आहे म्हणजे तो रिमोट ली करता येतोच हा आणखी एक गैरसमज आहे. >>>
अगदी १००% नसेल, पण बर्‍याच प्रमाणात शक्य आहे, असे मला वाटते. आयटीतला जॉब म्हणजेच फार काही भारी, हा पण एक गैरसमज आहे असे म्हणता येईल का नाही?

@हायझेनबर्ग आणि @मानसकन्या
एच-४ ई.ए.डी. चा नियम रद्द झाला काय आणि चालू राहिला काय, काय फरक पडतो. एच-४ ई.ए.डी.वाले बघून घेतील. आणि इथे तावातावाने बोलल्याने काय फायदा आहे? अमेरिका नियम बदलायचे तर बदलणारच आणि ठेवायचे तर ठेवणारच.

असे रेझ्युमे वीड आउट करणे हे एक महत्त्वाचे काम/ स्किल आहे. >>> इतका वेळ कुणाला नसतो किंवा मुद्दाम असे कष्ट कुणी घेत नाही. ओस्मानिया युनिव्हर्सिटीचे नाव खराब झाले (केवळ उदाहरण म्हणून) की तिथल्या कँडिडेटसाठी कुणी वेळ वाया घालवेल का? अर्ज सरळ बाजूला ठेऊन दुसरा पर्याय बघितला जातो.

अरे वा! मग बरंच आहे की! सुंवाखोगे!
वीड आउटला वेळ नसला तर अख्ख्या टीमचा वेळ जातो इंटर्व्ह्यु घेण्यात. कोणाचा वेळ जास्त महत्त्वाचा हे कंपनीला कळत असावं असा समज होता माझा.

आयटीतला जॉब म्हणजेच फार काही भारी, हा पण एक गैरसमज आहे असे म्हणता येईल का नाही? >> हे कुठल्याही कामाला म्हणता येईल हो.

अमिताव - विड आऊट कठीण आहे. नुसत्या resume वरून नाही समजू शकत फेक कँडीडेट. प्रोफेशनली कॉपी करतात resume.

नुसता रेझ्युमे नाही, एक दोन कॉल, शेअर्ड कोडिंग एक्झारसाईझ याने बऱ्यापैकी चाळणी लागू शकते. संपूर्ण अर्थातच नाही.

एच-४ ई.ए.डी. चा नियम रद्द झाला काय आणि चालू राहिला काय, काय फरक पडतो. एच-४ ई.ए.डी.वाले बघून घेतील. आणि इथे तावातावाने बोलल्याने काय फायदा आहे? अमेरिका नियम बदलायचे तर बदलणारच आणि ठेवायचे तर ठेवणारच. >> अहो मग माबो वर स्टुअर्ट, नोआ, कोलबेर, ऑलिवर कसे ऊदयाला येणार? ह्यांनी काहीही आणि कितीही बडबड केली तरी ट्रंप काही करायचे थांबतो का? आणि तो थांबत नाही म्हणून हे बोलायचे थांबतात का ? हो आता त्यांना मल्टिमिलिअन डॉलरचे कॉन्ट्रॅक्ट मिळतात आणि आपण ईथे नुसत्याच फुटक्या पिपाण्या फुंकतो ती गोष्ट वेगळी पण कुठून तरी सुरूवात करायलाच हवी ना. Proud

विनोदाचा भाग सोडा, पण ईथे समजा मानसकन्या आणि ईतरांना फेक प्रोफाईल वर नोकरी पदरात पाडून घेण्याचे खरे कारण H4-EAD नियम नसून ईतर अनेक आहेत. आणि त्यांनी बाहेर H4-EAD विरुद्ध प्रचार करणे थांबवले तर H4-EAD बाबतीत ईतर अनेकांचे कलुषित विचार बदलू शकतात किंवा कलुषित होण्यापासून वाचू शकतात.
आधीच होरपळलेल्या H4-EAD कम्युनिटी समोर गैरसमजातून अजून अडचणी का ऊभ्या करा?

नुसता रेझ्युमे नाही, एक दोन कॉल, शेअर्ड कोडिंग एक्झारसाईझ याने बऱ्यापैकी चाळणी लागू शकते. संपूर्ण अर्थातच नाही. >> रेप्युटेड हेड हंटर्स, बॉडी शॉपर्स, रिसोर्स वेंडर्स आहेत ना.
चार वेगवेगळ्या कंपन्यांकडून प्रत्येकी एक किंवा दोन बेस्ट रिझ्युमे मागितले आणि फेक कँडिडेट निघाल्यास आपल्या रेप्युटेशनचे किती नुकसान होणार हे त्यांना एकदा कळाले की काम सोपे होईल. काँपिटिशन असल्याने स्क्रीनिंग करून अश्या कंपन्या बेस्ट कँडिडेटच पाठवतील.
ह्या कंपन्याही कंपनीतल्या मॅनेजरशी हात मिळवणी करून स्वस्तातले कँडिडेट सिलेक्ट करवून आणू शकतातच... पण त्या केस मध्ये हे ईंटर्नल करप्शन प्रकारात मोडते आणि ईतर टीम मेंबर सिलेक्ट करणार्‍या मॅनेजर विरूद्धं तक्रार करू शकतात. किंवा मॅनेजर्सचा पॅनल असेल तर मग ते ही अवॉईड करता येईल.

<< <<< आयटीतला जॉब आहे म्हणजे तो रिमोट ली करता येतोच हा आणखी एक गैरसमज आहे. >>>
अगदी १००% नसेल, पण बर्‍याच प्रमाणात शक्य आहे, असे मला वाटते. आयटीतला जॉब म्हणजेच फार काही भारी, हा पण एक गैरसमज आहे असे म्हणता येईल का नाही? >>

आयटी कुठल्या इंडस्ट्री ला सर्व करतेय यावरही अवलंबून आहे. काही क्षेत्रात तुम्ही म्हणता तसे शक्य नक्कीच आहे. काही क्षेत्रांत नाही. आणि तसे म्हटले तर कुठलाच जॉब भारी नाही. आयटी ला सपोर्ट रोल असेल ( थोडक्यात बिजनेस चालू ठेवणे ) तर नक्कीच नाही.

आधीच होरपळलेल्या H4-EAD कम्युनिटी समोर गैरसमजातून अजून अडचणी का ऊभ्या करा?>>>>>>>>>>>> हायझेनबर्ग +१११११

हे खरं आहे.
आत्ता मी स्वतः गेले २ वर्ष एच४-ईएडी वर आहे पण त्याआधी नुसतं एच४ वर असल्याने येणारा वैताग अनुभवला आहे.
एच१ वाला सोबत असल्याशिवाय ना तुम्हाला स्वतःला बँक अकाऊंट उघडता येतं, ना सोशल सिक्युरीटि नं मिळतो, ना लायसन्स .. सगळीकडे नवर्‍याला मिरवावं लागलं. मान्य आहे डिपेंडट आहे, कमवत नाही पण एच४ म्हणजे ज्यांना काही येत नाही असे लोकं इकडे आले आहे हा समज आहे बहुतेक जणांमधे.

माझं एका गुलटी शेजारणीबरोबर भांडण झालं होतं या विषयावरून एकदा. तिला मी म्हणत होते आता ईएडी आलं की मी पण अप्लाय करेन, भारतातल्या नोकरीचा अनुभव आहे, बघु नशीब आजमावून. तिचं म्हणणं की कशाला येतोय हा असा रुल? आता किचन मधून बायका थेट जॉब मागायला/ करायला लागतील. म्हटलं तुम्ही एच १ वाल्या किचन मधे पाउलच ठेवत नाही का मग? हे असलं विचित्र जनरलाईज्ड स्टेटमेंट मुळीच करू नकोस. ज्यांना भारतातल्या कामाचा अनुभव आहे, किंवा इकडे येऊन शिकले आणि लिगली जॉब करू पाहतायत त्यांना चांगले च आहे ना हे? एच१ आणि आयटी यापलिकडेही वेगळे जग, निराळी क्षेत्र आहेत हे घोड्यासारखी झापडं लावलेल्यांना काय कळणार?

जे झोलझाल करतात, फेक रेझुमे बनवतात, खोटा एक्स्पिरिअन्स दाखवतात त्यांच्याबद्दल न बोललेलेच बरे. पण माझ्यासारखे लो-प्रोफाईल जरी असले तरी भारतातल्या अनुभवावर , स्वतःकडे जे खरे स्किल्स आहेत त्यावर मिळाली नोकरी तर वाईट काय?

>>सध्याच्या युगात, आयटीमध्ये असे काय खास जॉब्स आहेत जे रिमोटली करता येतच नाहीत आणि त्यामुळे एच-१ वाल्यांना बोलवावेच लागते?<<

थिअरिटकली, हो. सगळे आय्टी जॉब्स रिमोटली करता येण्यासारखे आहेत. पण ऑन्साइटला माणसं (एच१) का आणतात याचं कारण डिलिवरी मॉडेलशी जास्त निगडित आहे. कस्टमर काँट्रॅक्ट कुठलंहि (मॅनेज्ड सर्विसेस, टाइम अँड मटिरियल, फिक्स्ड बिड) अस्लं तरी स्पर्धेत टिकुन रहाण्यासाठी आणि प्रॉफिटेबलिटी मेंटेन करण्याकरता डिलिवरी मॉडेल मध्ये ऑफ्शोर कांपोनंट असणं हे अनिवार्य आहे; हा मुद्दा पहिला.

दुसरा मुद्दा - कंपनीने सीएमेम लेवल ५+ सर्टिफिकेशन केलेलं असलं, त्यांच्याकडे स्टेट-ऑफ-दि-आर्ट कम्युनिकेशन्सची साधनं उपलब्ध असली तरीहि लँग्वेज बॅरियर, टाइम झोन बॅरियर, प्रोजेक्ट कोऑर्डिनेशन इ. वर मात करण्याकरता ऑन्साइट (प्रोजेक्ट संबंधित) माणसं ठेवावीच लागतात.

तिसरा मुद्दा - टेक्नॉलजीत झपाट्याने बदल होत असल्याने, लेटेस्ट (किंवा निश) टेक्नॉलजीवर काम केलेली माणसं नेहेमी पदरी बाळगणं इंप्रॅक्टिकल आहे. ती गॅप भरुन काढ्ण्याकरता मग कंसल्टंटकडे धाव घ्यावीच लागते आणि मग वरचा पहिला मुद्दा लागु होतो आणि हे (विशस) सर्कल फिरत रहातं...

पण आता परिस्थिती बदलत असल्याने इंडियन कंपन्यांना त्यांचं डिलिवरी मॉडेल (ऑन्साइट-ऑफ्साइट रेशो) बदलावंच लागणार आहे. ते हा बदल कसा आत्मसात, आणि किती जलद करतात यावर त्यांचं भवितव्य अवलंबुन रहाणार आहे...

तटि: बड्या कंपन्यांनी लोकल रिक्रुटमेंट (नो एच्१/एल१) रॅम्पअप केल्याचं चित्र ऑल्रेडि दिसायला लागलेलं आहे...

ज्यांना भारतातल्या कामाचा अनुभव आहे, किंवा इकडे येऊन शिकले आणि लिगली जॉब करू पाहतायत त्यांना चांगले च आहे ना हे? >> Happy हो चांगलंच आहे जोवर जोडीदाराचा एच-१ शाबूत आहे. एच-४ ईएडी धारक हे एच-१ धारकांशी स्पर्धा करू शकत नाहीत ह्या गृहितकावर आधारित तुमचे विधान आहे. आपल्या एच-१ वाल्याची नोकरी एखाद्या एच-४ ईएडी ला गेली की 'चांगले' - 'वाईट'च्या व्याख्या बदलतात. एच-४ ईएडी धारक गटात थोडेफार शिक्षण/स्टार्ट-अप इ साठी "ब्रेक" घेतलेल्या व्यक्तीही आहेत. ह्या व्यक्ती एच-१ धारक व्यक्तींशी स्पर्धा करू शकतात. कंपन्याही व्हिसा नूतनीकरणासाठी साठी पैसे लागत नाही म्हणून एच-१ नोकरदारांना डावलून एच-४ ईएडी धारकांना प्राधान्य देतात (निदान काही क्षेत्रात). त्यामुळे एच-४ ईएडीला विरोध करणारी गुलटी महिला अगदीच विचित्र बोलली नाही.
मूळात एच-४ व्यक्तीस नोकरी करू द्यावी असे धोरण हवे.

सध्याच्या युगात, आयटीमध्ये असे काय खास जॉब्स आहेत जे रिमोटली करता येतच नाहीत आणि त्यामुळे एच-१ वाल्यांना बोलवावेच लागते?
>>> बऱ्याच वेळा डेटा confidential असतो जो देशाच्या बाहेर ऍक्सेस करून देणे रिस्की असते हे मुख्य कारण आहे की लोक onsite हवी असतात.

>>बऱ्याच वेळा डेटा confidential असतो जो देशाच्या बाहेर ऍक्सेस करून देणे रिस्की असते हे मुख्य कारण आहे की लोक onsite हवी असतात.<<

नोप. वीसेक वर्षांपुर्वि हि शक्यता होती, आणि ती सुद्धा टेस्ट डेटा संदर्भात. (तुमचा कंसल्टंट, डेवलप्मेंट्/टेस्ट प्रोजेक्ट करता प्रॉडक्शन डेटा अ‍ॅक्सेस मागत असेल तर तो बदला) आजकालचे डेटा अ‍ॅक्विझिशन टुल्स मध्ये टेस्ट्बेड क्रिएट करायला मास्किंग ऑप्शन असतात. सेंसिटिव डेटा देशाबाहेर सोडा, बिल्डिंगच्या बाहेर जाउ शकत नाहि...

>>>कंपन्याही व्हिसा नूतनीकरणासाठी साठी पैसे लागत नाही म्हणून एच-१ नोकरदारांना डावलून एच-४ ईएडी धारकांना प्राधान्य देतात (निदान काही क्षेत्रात). त्यामुळे एच-४ ईएडीला विरोध करणारी गुलटी महिला अगदीच विचित्र बोलली नाही.>>> पहिलं म्हणजे 'गुल्ट' आणि 'विचित्र नाही' हे विधान 'फेक न्यूज' पेक्षा फेक आहे. Wink Lol Light 1 :पंखा: सगळं घ्या.
दुसरं, एच-४ ईएडी जर एच १ पेक्षा स्वस्तात असेल (कंपनीने सिलेक्ट केला आहे, म्हणजे उत्तम माणूस आहे हे अध्याह्रुत आहे. त्यावर आता वाद नको) तर कॅपिटलाईझ मार्केट मध्ये त्याचा उदोउदो झाला पहिजे. कशाला आणायचा आणि एक H1 ??? किंवा ज्या फील्डला गरज आहे तिकडे आणि एक H1 घेउन टोटल जीडीपी अर्थव्यवस्था वाढेल. एक्दम विन विन झालं की हे!

>>एच-१ नोकरदारांना डावलून एच-४ ईएडी धारकांना प्राधान्य देतात<<
गुड पॉइंट. इएडी म्हणजे झिरो कॉस्ट (लेस हॅसल्स) टु प्रॉस्पेक्टिव एंप्लॉयर्स.

>>कशाला आणायचा आणि एक H1 ??? <<
प्रश्न एच४-इएडि चा असल्याने प्रक्षोभ झालेला आहे. एच१-इएडिज आर अकाउंटेड फॉर ऑलरेडि; एच४-इएडीज पाप्ड इंटु जॉब मार्केट सडन्ली अँड थ्रु अनएंप्लॉय्ड अंडर दि बस. दॅट इज दि पर्सेप्शन, अ‍ॅट्लिस्ट...

एच-४ ईएडी जर एच १ पेक्षा स्वस्तात असेल तर >> मूळात एच-४ ईएडी विरूद्ध खटला झाला तो एच-४ ईएडी धारक कंपनीसाठी अमेरिकन नागरिकां इतकाच स्वस्त आहे म्हणूनच ना. त्यामुळे एच १ पेक्षा स्वस्त "असेल तर " म्हणण्यात काय अर्थ? आहे हे मान्य नाही का?

पहिलं म्हणजे 'गुल्ट' आणि 'विचित्र नाही' हे विधान 'फेक न्यूज' पेक्षा फेक आहे. Wink Lol Light 1 :पंखा: सगळं घ्या. >> इथे कशाला थेट सत्या नाडेलालाच द्या ना! Wink Happy

तो 'तर' कॅपिटलिस्ट मार्केटला होता. स्वस्त आहे यात दुमत नाहीच. हाय रिस्कही आहे. कारण तो डिपेंडंट आहे.
>>> पाप्ड इंटु जॉब मार्केट सडन्ली अँड थ्रु अनएंप्लॉय्ड अंडर दि बस. दॅट इज दि पर्सेप्शन >>> बेकारी निर्देशांक ऐतिहासिक नीचांकी पातळीवर असताना हे पॉप व्हावं यात प्रोटेक्शनिस्ट अजेंडा वाटतो राज. मंदी मध्ये झालं असतं तर समजू शकलो असतो.

बाकी गुल्टी बॅशिंग मजेत होतं. जवळचे तेलगू लोकं अत्यंत सालस/ प्रेमळ/ कार्यत्तत्पर/ हुषार ही बघितले आहेतच.

नोप. वीसेक वर्षांपुर्वि हि शक्यता होती, आणि ती सुद्धा टेस्ट डेटा संदर्भात. >> नाही अजूनही सगळ्या डेटाला बाहेर access दिला जात नाही हे स्वानुभवावरून सांगतो. नि हा अपवाद नसून बर्‍यापैकी बघितलेला प्रकार आहे. ह्यात डेटा मास्किंग चा काहीही संबंध नाही. टेस्ट डेटा तर खूप पुढची गोष्ट आहे.

Pages