ट्रम्प प्रशासन आणि भारतीयांच्या नोकर्‍या व त्यांचे भवितव्य

Submitted by अजय अभय अहमदनगरकर on 15 May, 2017 - 04:01

' आपल्या देशाचे बघा , जगाचे जाउ द्या तेल लावत ' या धोरणाला मिळालेल्या पाठिम्ब्यानुसार व त्या नवीन राजकीय सूत्रानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या आश्वासनास कौल देऊन अमेरिकन नागरिकांनी त्यांना सत्ताधिष्टीत केले. प्रचारातही ट्रम्प काकांचे पत्ते उघड होते आणि त्याला जनमताचा कौल मिळाल्याने त्याचे पालन त्याना करायला काहीच अडचण नव्हती. त्यानुसार त्यानी हळूहळू नखे बाहेर काढायला सुरुवात केलेली आहेच.

त्यातले ' अमेरिका फर्स्ट ' या धोरणानुसार उपर्‍याना हळू हळू बाहेरचा रस्ता दाखवायचा, येणार्‍यांवर अधिक बंधने आणण्याचा अजेन्डा सुरूही झाला आहे. याचा नेमका तपशील काय आहे हे इथे तरी कळेनासे झाले आहे. भारतातले अनेक जण अमेरिकेत व्यवसाय, नोकर्‍या, उच्च शिक्षण या निमित्ताने आहेत, काही जातीलही. या सर्वांबाबत ट्रम्प महाराजांचे धोरण नक्की काय आहे. याबाबत तिथल्या लोकांकडून फर्स्ट हॅन्ड माहिती मिळवण्याच्या दृष्टीने हा धागा काढला आहे. कारण बरीच मुले पदव्युत्तर शिक्षणाचे तसेच जमलेच तर तिथेच करीअर करण्याचे प्लॅनिन्ग करीत आहेत ( हा आरक्षणाचा परिणाम आहे की नाही हा चर्चेचा विषय नाही Happy ) . त्यांच्या मनात संभ्रम झाला आहे नक्की. विशेष्तः सॉफ्ट्वेअर /आय टी क्षेत्राचे भवितव्य याबाबत संभ्रम आहे. त्यात विप्रो , इन्फोसिस या कंपन्यानी ले ऑफ द्यायला सुरुवात केल्याच्या बातम्या इथे प्रसिद्ध होत आहेत
सबब, ट्रम्प धोरणाचे ह काय गौड बण्गाल आहे, ऑन् साईट जॉब आणि अमेरिकन जॉब यासाठी वेगळे धोरण आहे का ? अगदी स्पष्टच विचारायचे म्हणजे तिकडच्या मंडळीना जॉब गेले म्हणून परत यावे लागणार आहे काय , याची कृपया जाणकार लोकांनी माहिती द्यावी ही विनन्ती.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असो! सहज आठवली म्हणून लिहिली, बाकी कुठली सवय बदलू म्हणता आम्ही?
>>>
ती दरवेळी टोकाची भुमिका घेण्याची. असो. तोदेखील तुमचा प्रश्न आहे. मी काय एक फुकट सल्ला देणार.

बाकी तुमची ती ट्रेनची कथा मस्त आहे. मी फलाटावर पण नाहिये आणि ट्रेनमध्ये पण. तेव्हा मला आज फलाटावर असलेले पण ट्रेनमध्ये चढू इच्छिणारे आणि ट्रेनच्या आत असलेल्यांच्या मानसिकतेवर बोलता येणार नाही. हां, माझ्या धंद्यावर/टार्गेट्सवर/कामाच्या पद्धतीवर या ट्रेनमध्ये बसलेल्या, ट्रेनने इच्छित स्थळी पोचलेल्या लोकांच्या व्हिसास्टेटसमुळे नक्कीच परिणाम होत आहे. तेव्हा वरच्या पोस्टस या तद्नुषंगाने आहेत.

टोकाची भूमिका माझी अंगभूत नाही/नसते टवणे सर, समोरचा टोकाला गेला की दीड टोकाला जाणे हे मात्र मी नेमाने करतो, असंच एकदा बघा आमच्या गावात एक पाहूणा आला , त्याला खायला काकडी दिली की तो म्हणे 'थुत लेकहो ही काय काकडी आहे', काकडी आमच्याकडे असते पंधरा हात लांब' मुळा, गाजर, बीट काहीही दिलं तरी सेम, शेवटी कंटाळून वढ्याला जाऊन पसाभर खेकडे धरून आणले, ते पाहून पाहुणा तुच्छतेनं म्हणाला 'हे काय खेकडं म्हणायचं का?' म्हणलं 'नाय दाजी, ही ढेकणं हैती, तुमच्याकडं तर ह्याहून सवाई अस्त्याल नव्हंका?'

अशी एकंदरीत सवय आहे बघा ती, स्वतःहून टोकाला जाणे ? नाय आज्याबात कधीच काय बी झालं तरी!

जेम्स वांड, ट्रेन ची कथा फार ओवरसीम्प्लिफिकेशन झालं. तुम्ही अप्रत्यक्षपणे सांगताय की नव्या कोकराला आत घ्यायचे की नाही याचा काहीतरी कन्ट्रोल आधी चढलेल्यांच्या हातात आहे! Happy तसे असते तर काय हो, वायटू के ला आलेल्या लोकांच्या नंतर पब्लिक ने लग्गेच दारे बंद करून घेतली असती Happy
तुम्हाला देसी कन्सल्टिंग कंपन्यांनी केलेल्या अब्यूज ची कल्पना नसावी असे एकूण वाटले. ( म्हणजे विप्रो वगैरे सारख्य मोठ्या कंपन्या नव्हेत तर अक्षरशः गल्लो गल्ली कुणीही उठून स्वतःच्या कन्सल्टिंग कंपन्या काढलेल्या होत्या त्याबद्दल बोलतेय) पकडले जात नाही तोवर चोर्‍या करणे याला तुम्ही "लूपहोल्स बिझेनेस अपॉर्चुनिटीज मध्ये कन्वर्ट करणे " असे म्हणणार असाल तर असोच मग.

जेम्स...... > तुमच्या ट्रेन्च्या कथेत लोकाकडे योग्य तिकिट नाही आहे तरी पण लोक ट्रेन मध्ये जायचा प्रयत्न करत आहेत. असे बरेच वर्ष होत असल्याने ट्रेन मध्ये ११ कोटी पेक्षा जास्त लोक विनातिकिट प्रवास करत आहेत. म्हणुन नवीन मंत्रानी ट्रेन मध्ये जाण्यासाठी नियम कडक केले आहेत.

एकेकाळी मी ह्या ट्रेन मध्ये होतो . पण सध्या मी फलाटावर पण नाहिये आणि ट्रेनमध्ये पण. आणि मला ह्या ट्रेन्मध्ये भविष्यात प्रवासही करायचा नाही आहे.

असो, बऱ्याच गोष्टी बोलता येत नाहीत, हे आमचे उणे, पण बिझनेस मध्ये कश्या मल्टी बिलियन चोऱ्या राजरोसपणे होतात त्या जवळून पाहिल्यात. पण ठीक आहे, Its rather better to be silent. आपण स्टिरीओटाईप होतोय असं जाणवतं आहे त्यामुळे थांबतो.

नथिंग पर्सनल, काही उणे अधिक बोललो असेल तर माफ कराल ही नम्र विनंती.

जेम्स वांड, बिझिनेस मधे होणार्‍या बिलियन्स च्या चोर्‍या तुम्हाला माहित आहेत आणि इथल्या भाबड्या कोकरांना इतके हाय लेवल चे राजकारण माहित नसल्यामुळे त्यांना तुमचं बोलणं कळणार नाही असे इम्प्लाय करत तर नाही आहात ना Happy तसे इम्प्लाय करत असाल तर ते मात्र स्टिरिओटाइप करणे होईल. Proud असो पण. तुमच्याबद्दल काही पूर्वग्रह नाहीत. नथिंग पर्सनल. अ‍ॅग्रीड.

टोकाची भूमिका माझी अंगभूत नाही/नसते टवणे सर, समोरचा टोकाला गेला की दीड टोकाला जाणे हे मात्र मी नेमाने करतो, >> समोरचा टोकाला गेला की नाही हा थ्रेशोल्ड कोण ठरवतो वांड साहेब? Happy
देसी कन्सल्टिंग कंपन्यांनी केलेल्या विसा रूल्स अब्युजबद्दल बोललं तर तुम्ही 'भारतीयांनी दिलेले कल्चरल शॉक' धाग्यावर आळवलेला राग पुन्हा ईथे सुरू केलात. तिथेही तुम्ही 'आता थांबतो' म्हणत पुन्हा सुरू झाला होतात. Wink
अमेरिकेचे विसा रूल्स, राजकारणातले अलिकडचे बदल, काही देसी कंपन्यांनी चालवलेला अब्यूज, लोकांची त्यांच्या कुटुंबाची ओढाताण हे सगळे तुम्हाला माहित आहे हे गृहीत धरल्यास तुम्ही घेतलेला स्टान्स ईथे ईनसेन्सिटिव वाटतो आहे.
तुमचे काही ठाम विचार/म्हणणे असल्यास आणि त्या अनुषंगाने चर्चा व्हावी वाटत असल्यास नक्की नवा धागा ऊघडा..

पुन्हा एकदा लिहितो: भारतीय वंशाच्या लोकांनी उघडलेल्या अमेरिकेतील कन्सल्टन्सी कंपन्यांनी केलेला व्हिसाच गैरवापर याचा ट्रम्प प्रशासनाच्या व्हिसा नियम कडक करण्याच्या व अमेरिकेच्या बाहेरील लोकांना अमेरिकेत नोकरी मिळवणे अत्यंत अवघड करण्याच्या पॉलिसीशी थेट संबंध फारसा नसावा.
ट्रम्प प्रशासनाची निती जागतिकीकरणाच्या विरोधात आहे त्याचा हा परिपाक आहे.

भारतीय आय.टी. क्षेत्रातल्या सेवा पुरवणार्‍या कंपन्यांना हा धोका कधी ना कधी खरा उतरणार याची कल्पना होती. त्यानुसार त्या धोक्याचे परिणाम कमीत कमी होतील या दृष्टीने कमी-अधिक व वेगवेगळ्या दिशेने प्रयत्न या कंपन्यांनी केले आहेत. मी वर म्हटले त्याप्रमाणे ट्रम्प अध्यक्षीय कारकिर्द एक इन्फ्लेक्शन पॉइंट* आहे. अश्या घटना तुलनेने कमी घडतात व उलथापालथ करतात

*इन्फ्लेक्शन पॉईण्ट ची व्याख्या व संदर्भः अँडी ग्रोव्हच्या ओन्ली पॅरानॉइड सर्व्हाइव्ह मधून साभार

जर कुणाला ट्रेनमधून २० वर्ष प्रवास करायचा असेल, तर तो त्याचा/तिचा प्रश्न आहे. मग कुणी ए.सी. रिझर्व्हेशन करून जाईल नाही तर तिकिटाशिवाय जाईल. कुणी विमानाने जाईल किंवा दुसर्‍याच ट्रेनने अजून भलत्या ठिकाणी जाईल. आधीचे लोक कसे गेले याच्याशी आपल्याला काय करायचे आहे? इतर लोक इतका विचार का करत आहेत?

अमेरिकेत शिक्षण घेऊन, शिक्षणाबरहुकूम - कायदेशीर वगैरे वगैरे - रास्त मार्गाने नोकरी करणार्या लोकांचा H-1B1, spouse EAD व्यवस्थित extend / approve झालेली पाहिली आहेत. REF येऊनही, केसेस पुढे सरकलेल्या पाहिल्या आहेत. म्हणून एक प्रश्न असा पडलाय की हा गदारोळ, भारतातून डायरेक्टली वर्क व्हिसा घेऊन येणार्या आय.टी. क्षेत्रातल्या लोकांविषयी आहे का?

>>हा गदारोळ, भारतातून डायरेक्टली वर्क व्हिसा घेऊन येणार्या आय.टी. क्षेत्रातल्या लोकांविषयी आहे का?>> बहुतांशी हो. पण त्यांच्या बरोबर आता तुम्ही आधी वर्णन केलेल्या केसेस ना सुद्धा कटकट होऊ लागली आहे. एका मित्राला (भारतीय आय टी कंपनी मधून नाही. अमेरिकेतील कंपनी आणि गेली ६ वर्षे नोकरी) नुकतच एक दोन महिने भारतात राहुन यायला लागलं.

टवणे सर - सहमत आहे पण मी देसी कन्सल्टंटस बद्धल यासाठी बोलत होतो कारण मी स्वतः interview घेतो आणि 5 मधले 4 असले फेक असतात. 1 इयर एक्सप असतो आणि resume 12 इयर्स चा.

"देसी कन्सल्टंटस बद्धल यासाठी बोलत होतो कारण मी स्वतः interview घेतो आणि 5 मधले 4 असले फेक असतात. 1 इयर एक्सप असतो आणि resume 12 इयर्स चा." - Don't even open that can of worms! तो कोळसा जितका उगाळावा तितका काळाच आहे. खूप जवळच्या लोकांना ह्यातून जाताना आणी पस्तावताना पाहिलय. इतक्या 'पुढच्यांना ठेच' लागत असताना 'मागचे शहाणे' कसे होत नाहीत हा प्रश्न पडतो.

अमेरिकेत शिक्षण घेऊन, शिक्षणाबरहुकूम - कायदेशीर वगैरे वगैरे - रास्त मार्गाने नोकरी करणार्या लोकांचा H-1B1, spouse EAD व्यवस्थित extend / approve झालेली पाहिली आहेत >> याच्यातही गेल्या ४-६ वर्षात फार कटकटी ऐकल्या आहेत. अमेरिकेतल्या शिक्षणाचा विषय आणि नोकरी याचा अगदीच बादरायण संबंध असल्याने जास्त चिकित्सा होते असं ऐकलंय. उदा हॉस्पिटॅलिटी मधे मास्टर्स आणि नोकरी सॉफ्टवेहर टेस्टिंग मधे असे प्रकार.

अगदी मॅन्युफॅक्चरिंग , इंडस्ट्रियल इंजीनीयरिंग , हार्ड कोअर डबल ई अशा फिल्ड मधे पी एच डी लोकांना देखील एच वन आणि ग्रीन कार्डाकरता फार वेळ लागतोय आणि फार डॉक्युमेंटेशन देत बसावं लागतं.

"अमेरिकेतल्या शिक्षणाचा विषय आणि नोकरी याचा अगदीच बादरायण संबंध असल्याने जास्त चिकित्सा होते असं ऐकलंय. " - 'शिक्षणाबरहुकूम' मधे माझा रोख असा बादरायण संबंध नसलेल्या नोकर्यांसदर्भात होता. उदा. मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / सप्लाय चेन (आणी अशा कित्येक ब्रँचेस) मधे शिक्षण आणी त्याच क्षेत्रात नोकरी करणार्या लोकांना - जरी वेळ लागला, क्वेरीज आल्या, तरी ते अडकून पडले नसावेत - जे पाहिले, ते पडले नाहीत.

इतरांनी लिहिल्याप्रमाणे कोअर इंडस्ट्री वाल्याना फार कायदेशीर त्रास नाही पण वेळ फार लागायला लागला आहे.
आणि जन्माने भारतीय असलेल्या उमेदवारांचा ईबी ३ ते ईबी २ अपग्रेड मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे
यामुळे अमेरिकेत शिक्षण घेऊन, शिक्षणाबरहुकूम - कायदेशीर वगैरे वगैरे - रास्त मार्गाने नोकरी करणार्या लोकांचा ग्रीन कार्ड बॅकलॉग प्रचंड वाढला आहे गेल्या काही वर्षात

ईबी ३ ते ईबी २ अपग्रेड मध्ये बेकायदेशीर काही नाही पण हा एक unintended consequence आहे या सगळ्याचा .

फेफ, गेल्या 4 महिन्यात आता सगळेच भरडले जात आहेत. अमेरिकेत शिक्षण घेऊन, त्याच क्षेत्रात नोकरी करत असणाऱ्यांना पण rfe येत आहेत. माझे एक मित्र मैत्रिण nyu मध्ये असिस्टंट प्रोफेसर आहेत. त्यांचा eb1 rfe मध्ये आहे. आउटसोर्सिंग आयटी कंपन्यांचे एक्स्टेंशन तर रिजेक्त होणारच हे पक्के आहे अशी परिस्थिती आहे.

Eb1 la rfe यायलाच पाहिजे. देसी बिग 5 ने खूप लोकांचे eb1 करून घेतले आहेत. होईल क्लियर prof आहे तर.

Eb1 la rfe यायलाच पाहिजे. देसी बिग 5 ने खूप लोकांचे eb1 करून घेतले आहेत.
>>> This, another level of rampant abuse of the system by Indian IT companies

मग या सगळ्या घडामोडिंना सामोरं जायला इंडियन आय्टी कंपन्यांचा प्लॅन बी (रादर प्लॅन ए) काय आहे? भारतात बेस असलेल्या अमेरिकन कंपन्या हात वर करु शकतात - इन ए हार्टबीट...

Everyone will come here. We have better resources Happy infrastructure needs improvement but if you have lot of money (which Americans has) no problem. For e.g. no need to get stuck in traffic to reach airport. Hail a helitaxi!

सध्या एक नवा trend जाणवतो आहे. EB5 मधून थेट green card करायला जायचे. एव्हढ्या सेमिनार्स नि immigration lawyers च्या रेडीओ प्रोग्राम्स्मधे ह्याबद्दल अ‍ॅड्स येत असतात. आजू बाजूच्या तेलुगू लोकाकडून ह्याबद्दल ऐकलेय. लोकांच्या creativity ला मानले पाहिजे.

एकंदर ज्यांना अमेरिकेत येन केन प्रकारणे यायचेच आहे नि पैसा आहे त्यांनी हा option बघायला सुरू केली आहे असे दिसते.

हो! हे होतच असावं.
कॅनडामध्ये एका स्ट्रिप मॉल मध्ये एक रेस्टॉ आहे.. तिकडे दर काही महिन्यांनी नवी एशिअन प्लेस उघडायची. चालायचं तर ठीक ठाक.. मग सारखं बंद का पडतं वरुन कोणी ज्ञानदान केलेलं की इनव्हेस्टमेंट टाईप व्हिसा घेउन येतात, त्यांना ६ का ८ माणसांना जॉब द्यावा लागतो. तो देतात आणि काम झालं की शटर डाउन. एशिअन /साउथ एशिअन लोकं बरोबर डोकं चालवतात. Biggrin

हिंजवडी चौकात बरम्युडा वाल्यांची गर्दी वाढू शकते का?
Submitted by बाबा कामदेव on 15 July, 2018 - 13:58>>>>> Rofl
इतका शिरेस विषय असून पण हे वाचून प्रचंड हसायला आलं.

बाकी एकंदरित खुपच अवघड परिस्थिती करुन ठेवली आहे. जमेल तसं लिहेन पण आत्ता स्वतः त्यातून गेलोय. सो फर्स्ट हँड माहिती आहे.

हिंजवडी चौकात बरम्युडा वाल्यांची गर्दी वाढू शकते का?
Submitted by बाबा कामदेव on 15 July, 2018 - 13:58>>>>> Rofl
इतका शिरेस विषय असून पण हे वाचून प्रचंड हसायला आलं. >>> Lol टोटली

आणि खरेच होऊ शकते. सगळीकडेच.

पण मागे झाले तसे या सर्वातून ऑफशोअरिंग आणि बी-१ व्हिसावर लोक थोड्या काळाकरता अनेकदा येथे येणे वाढेल असे दिसते.

सगळ्यात पाहिले ते H४ EAD बंद करायला पाहिजे. काही बिनडोक मुली कुठल्याही जॉब्सला apply करतात आणि चांगल्या लोकांच्या जागा अडवतात. खोटे interviews देतात . कंपनीचा वेळ आणि पैसा वाया जातो ह्यात. भारताची तर प्रचंड इमेज खराब होतेय ह्यामुळे. जर स्किलस असतीलं तर H१ apply करा सरळ.

सगळ्यात पाहिले ते H४ EAD बंद करायला पाहिजे. काही बिनडोक मुली कुठल्याही जॉब्सला apply करतात आणि चांगल्या लोकांच्या जागा अडवतात. खोटे interviews देतात . कंपनीचा वेळ आणि पैसा वाया जातो ह्यात. भारताची तर प्रचंड इमेज खराब होतेय ह्यामुळे. जर स्किलस असतीलं तर H१ apply करा सरळ. >>> मग हे तुमच्या H१ वर होत नाही असे म्हणायचे आहे का? Rofl

Pages