बारा - वसंत समुद्री मेनू गटग

Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2017 - 10:22
ठिकाण/पत्ता: 
देसाई-सदन

जमा होत आहे. मिळेल तशी इथे टाकण्यात येइल. सध्या मिळालेल्या माहितीनुसार
१) समुद्री भाजी मेनू आयटाम कन्फर्म
२) लोकांचा उत्साह (सध्यातरी) कनफर्म्ड आहे

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 6, 2017 - 10:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप दिवसांनी टाकाटाकी करायचा मोह आवरला नाही म्हणून इथे आलो होतो. मी प्रतिक्रिया दिल्यावर हे पान थंड पडेल हे माहीती असते तर गप्प बसलो असतो !
बाकी तुमचं चालू द्या. Happy

कैच्याकैच वेमा.
मुद्द्याचं बोला. गटगला येताय का? बरीच वर्षं झाली तुम्ही आल्याला.

मी प्रतिक्रिया दिल्यावर हे पान थंड पडेल हे माहीती असते तर गप्प बसलो असतो ! >> अर्रर काय हे अजय? तुम्हाला इग्नोअर करत आहेत म्हणता?

( बिटरगावकर फारच बिटर कंपू आहे. हे " पुराव्याने सिद्ध" झाले. ) Proud

खूप दिवसांनी टाकाटाकी करायचा मोह आवरला नाही म्हणून इथे आलो होतो. मी प्रतिक्रिया दिल्यावर हे पान थंड पडेल हे माहीती असते तर गप्प बसलो असतो !
>>>
अरेरे.. हे पान म्हणजे वेमांचे कोतबोच झाले!

वा वा! मग इथेच बसायला हवं खुर्ची टाकून!! त्यांची विपू इतकी खमंग तर त्यांचा कोतबो किती मसालेदार असेल!! Happy

वेमा , या जीटीजीला !
नुकतच कळल कि वेमा आमचे नातेवाइक लागतात , बर्यापैकी जवळचे :).

>>वेमा , या जीटीजीला !
नुकतच कळल कि वेमा आमचे नातेवाइक लागतात , बर्यापैकी जवळचे :).>> म्हणजे तुम्हां दोघींवर बरं वागायचं प्रेशरच आलं की. Wink Proud

मै चे नातेवाइक नाहीत , माझे , देशपांडेंकडून :).
पण आधी मी दंगेखोर निघाले मग नातं कळलं त्यामुळे आता शहाणेपणाचं सोंग घेता येणार नाही Proud

नुकतच कळल कि वेमा आमचे नातेवाइक लागतात >> आधीच मै ला घाबरुन रहावं लागतं ( तेच ते निष्ठूर हृदयशून्य वगैरे म्हणून). आता डीज्जेलापण वचकून रहावे लागणार ( दोन हात दूर म्हणणार होते, पण मला मेंदी काढून हवीय ) Proud

खूप दिवसांनी टाकाटाकी करायचा मोह आवरला नाही म्हणून इथे आलो होतो. मी प्रतिक्रिया दिल्यावर हे पान थंड पडेल हे माहीती असते तर गप्प बसलो असतो !
बाकी तुमचं चालू द्या. >>>Wema, id hack zala ka? Happy

निमंत्रणाबद्दल धन्यवाद. विचार करतोय. एक आठवडा अगोदर सांगितले तर चालेल का? का तो पर्यंत खूप उशीर झाला असेल?

एक आठवडा अगोदर सांगितले तर चालेल का? का तो पर्यंत खूप उशीर झाला असेल?>>>>>> आवो तुमी काय आमच्या सारख्या खाल्ल्या पिल्ल्याला ब्वाडी आहात का? एक मुठ धान्य अन एक टु बाय टु चा कोपरा पुरुन उरेल तुम्हाला. काय हो देसायनू? खरंक नाय??

मित्रानो.. थोडा Problem झालाय. मला स्वतःला मे १३/१४ ला वेळ नाहीय. (बृममची जोरदार तयारी चालू आहे).
तेव्हा मे ६ चालेल का? (डिजे ची क्षमा मागून).
तेव्हा पानकर्ते, ६ मे सकाळी ११ वाजता असा बदल करा..
१. घासफुस वाल्यांची पूर्ण सोय असेल.
२. मासे / कवचमासे (Shellfish) दोन्ही असतील.
३. अजून कुणाच्या काही आवडी असतील (खाण्याच्या) तर त्याचाही विचार करण्यात येईल..
...
आता नावे नोंदवायला हरकत नाही. (वरती तशी सोय दिसली नाही)..
यादीत,
विनय,
सिक्स कॅप बुवा,
स्वाती,
सायो,
मेधा,
मै,
सिंडी,
विकू,
व्हीताई
दिसले.. इतरानी नक्की करा म्हणजे मेन्यू आणि Quantity ठरवायला सोप्पे जाईल मला...

मेधा एकटी माझी समै. तरी बरं मी झाडून स-ग-ळ्या सामिष पाकृंच्या धाग्यांवर #ब्याडवर्ड घातला तर चालेल का विचारत असते पण सायोच्या लक्षात असेल तर शपथ!

मलाही ६मे चालायला हरकत नाही.
ती वेळ बदलून जरा अलीकडची करा की. २पीएम काय?!

>>> वेगळे मिनि गटग करू पुन्हा
मिनी? हा ड्रेसकोड आहे की गेष्टांची संख्या? (कोणाला आमंत्रण नाहीये म्हणजे? Proud )

अरे मिनी वगैरे ठेवू नका. सगळ्यांना सारखे नियम असलेच पाहिजेत! त्यामुळं तुम्ही मिनी घालणार तर आम्ही बाप्यांनी काय मिनी घालायचं?

ते वेळेचं गंडलय काहीतरी. मी १०:०० -६:०० असं पिक केलेलं आहे.

Pages