बारा - वसंत समुद्री मेनू गटग

Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2017 - 10:22
ठिकाण/पत्ता: 
देसाई-सदन

जमा होत आहे. मिळेल तशी इथे टाकण्यात येइल. सध्या मिळालेल्या माहितीनुसार
१) समुद्री भाजी मेनू आयटाम कन्फर्म
२) लोकांचा उत्साह (सध्यातरी) कनफर्म्ड आहे

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 6, 2017 - 10:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मे ६/७ चालेल मला पण.

म.म. लोकांचं गटग आहे, वीड नाही पण विडी - हवं तर काडी सुद्धा- मिळेल Wink

>>>नुसतं वीड आहे. चालवून घ्या
वीड असेल तर काय पण द्या खायला काय फरक पडणारे? Proud
आता विडी हा मराठी शब्द इंग्रजीत जाईल का? Happy

क्रेक्ट!
अजून एक
कटाचा (फक्त) बोभाटा अन लोणकड्या (तुपाच्या) थापटीची पुरणपोळी.
Proud

आणि नदीतील मासे चालतील का?

- म्हणजे कोणी आणले तर ते मेनू मधलाच पदार्थ धरला जाईल ना अशा अर्थाने. मासे शब्दशः चाललील का असे विचारत नाहीये.

१४ मे ठरले तर..
विनंती:
१. जेवणाच्या पदार्थांची सगळी जबाबदारी आमची.. कुणीही काहीही आणायचे नाही.
२. Lenox अगर तत्सम भेटवस्तू आणू नयेत. Vietnam War Vets ला देऊन टाकाव्या लागतात.
३. तेव्हा सगळ्यानी मस्त हात हालवत यावे, आणि मासे/शाकाहारी हवे ते खाऊन तृप्त व्हावे.
४. अगदीच जमत नसेल तर वाईन्/वोडका वगैरे आणण्याची परवानगी आहे.

१. जेवणाच्या पदार्थांची सगळी जबाबदारी आमची.. कुणीही काहीही आणायचे नाही.>>>>> अक्षरशः मै! डोळ्यात पाणी आलं अगदी.

Lol

थँक्यू थँक्यू! Happy
(पण का ते? आय मीन... वंदनाबेन बरा करते स्वयंपाक तसा... :P)

मलाही वाटलं की सिंडी निदान रावण पिठल्याच्या जवळ जाणारा कुठलातरी पदार्थ घेऊन येईन. Proud

पण गोगांनी सिक्सरच लावला आहे. एप्रिल मला जमले असते, मे मध्ये अवघड आहे.

केदार, प्रत्येक एवेएठिला तू नेमका तोच वीकेन्ड इथे नसतोस हे स्टॅटिस्टिकलीसुद्धा अशक्य आहे. आम्ही तुला गोड खाताना पकडू याची तुला भीती वाटते हे खरं कारण सांग. Proud

सांका म्हणून कोणाची शेपटी पकडायची आहे ते ठरवा. Proud
(आता गोगांनी मेनूबिनू ठरवण्यातली हवाच काढून टाकल्यामुळे ठरवायचं तरी काय मेलं!) Proud

Pages