बारा - वसंत समुद्री मेनू गटग

Submitted by वैद्यबुवा on 13 March, 2017 - 10:22
ठिकाण/पत्ता: 
देसाई-सदन

जमा होत आहे. मिळेल तशी इथे टाकण्यात येइल. सध्या मिळालेल्या माहितीनुसार
१) समुद्री भाजी मेनू आयटाम कन्फर्म
२) लोकांचा उत्साह (सध्यातरी) कनफर्म्ड आहे

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 6, 2017 - 10:00 to 18:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ईबा आणि बुवा Lol

समुद्रभाजी मध्ये समुद्रमेथी पण येणार का? Proud

>>>समुद्रभाजी मध्ये समुद्रमेथी पण येणार का? <<< येईल की .... भाजी म्हटल्यावर पालक / मेथी सगळेच आले आणि लसूण.. Proud
लसूण म्हणजे चांगली सात्विक असणार Proud

हो भाजीत भाजी मेथीची असे अनेक मंगल कार्यालयात ऐकले आहे. नंतर आणखी काय काय म्हणतात. मग लांबच्या पंगतीतील लोक "ऐकू आले नाही" चा गजर करतात जिलब्या, गुलाबजाम खायचे एक मिनीट थांबवून. मग पुन्हा भाजीत भाजी सुरू होते.

गटगला असे काही होईल असे सुचवत नाहीये. नाहीतर सदस्यसंख्या रोडावायची. संख्या. सदस्य नव्हे.

सोग्यात सोगा बुवांचा
सोग्यात सोगा बुवांचा
बारात दिलदार मान्सायचा वाडा म्हंजे एकच! देसायांचा!!

अंब्याचा झाडा शेवग्याच्या शेंगा
अंब्याचा झाडा शेवग्याच्या शेंगा
बारात सर्वात हॅन्डसम कोन? तर देसाई इन चट्टेरीपट्टेरी लेंगा!

मोरूच्या मावशी नंतर बुवांचाच नंबर. आता मिनी नऊवार नेसा नी पिंगा घाला गटग ला म्हणजे विजय चव्हाणांनंतर तुमचाच नंबर Wink

हो बदलू नका. पुढेमागे (म्हणजे गटगच्या आधीच Wink ) चर्चा झालीच दुसर्‍या तारखेची तर मी "बगतांय हां" मोड मधे आहेच, त्यामुळे एण्ट्री टाकेनच Happy

एप्रिलच्या डेट्स मला जमल्या असत्या. पण मे च्या जमणार नाहीत.

( मे मध्ये मी गोड खायला सुरू करणार आहे, त्यामुळे येता येणार नाही. स्वाती नोंद घे. Proud )

बुवा Lol

अरे स्वाती म्हणते की मी चोरून गोड खातो त्यामुळे गटगला कधी कधी येत नाही.

सा मे एके सा मे ठेवा. बदलू नका आता. फारेन्ड, दोस्ती कि खातिर तुझी ट्रॅवल डेट बदल बरं.

बशीचं काय ते ठरवा की. किती शिटं भरणार? कुठनं भरणार?

बस माझ्या घरनंच निघणार ना सालाबादप्रमाणे? मी सोडून अजूनही चारच तश्रीफा बसतात. तेव्हा आपपल्या बुक करा.

मी आणि एकलव्य नक्की येणार - खाष्ट हाफ तिकिटाचं नक्की नाही.

कॅल्क्युलेशन चुकलं - हाफ आणि फुल दोन्ही तिकिटं आली तरी मी आणि सिंडी धरून चार शिटा भरतील बसमध्ये.
बुवांना ट्रन्कमध्ये टाकावं लागेल. Proud

केदार Proud

बाई मी किन्नर, त्या मुळे हरहुन्नर! आर्धी बावडी गाडीच्या बाहेर पन चालती. आगे बढो !!! कूच करो!!

बाई शिंडरेलाला तुम्ही डबल शिट म्हणू नका तीला राग यील. ती लगेच स्पीक फॉर युअरसेल्फ असं म्हणेल.
Proud

बुवा Lol
तुम्हाला माबो चा कांती शाह म्हणावं का? Lol

Pages