सुट्टा ना मिला .. (सुट्टा = सिगारेट)

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 December, 2021 - 11:46

सुट्टा ना मिला .. (सुट्टा = सिगारेट)

आज शाहरूखच्या धाग्यावर सुट्टाचा विषय निघाला. सुट्टा म्हणजे सिगारेट. कित्येक लोकांना हे ठाऊक नसते म्हणून शीर्षकातच सांगितले. मी राहायला द. मुंबईत आणि शिक्षणाला ईंजिनीअरींग. त्यामुळे सुट्टा या शब्दाशी माझा परीचय लहानपणीच झाला होता. तसेच अतिपरीचयात अवज्ञा म्हणत कॉलेजला याचा अनुभवही घेऊन झाला. ईतर सर्व कच्च्या लिंबांप्रमाणे मी देखील सुरुवात केली ती गुडंगगरम या गोडसर चवीच्या सिगारेटने. पण माझ्या दुर्दैवाने मी सिस्टमॅटीक पद्धतीने सिगारेट ओढणे शिकलोच नाही. सिगारेटचा धूर आत कसा घ्यावा आणि बाहेर कसा सोडावा याचे गणित सारखे चुकायचे आणि यात चुकीला माफी नाही. दरवेळी खोकल्याने, ठसक्याने जीव अर्धमेला व्हायचा. माझ्या सुदैवाने कुठलीही गोष्ट लगेच जमली नाही तर मी ती शिकायचा फार आळस करतो. त्यामुळे काही प्रयत्नाअंती सिगारेटचा नाद सोडला ते सोडलाच.

पण मला सिगारेट का ओढावीशी वाटली?

मी क्लास बंक करायचो, लेक्चरला बसलो तरी लास्ट बेंचवरच बसायचो, परीक्षेचा अभ्यासही लास्ट नाईटलाच करायचो. लायब्ररीत कमी तर जिमखाना आणि कॅंटीनमध्ये जास्त आढळायचो, मित्रांमध्ये असलो की अस्सखलित शिव्या द्यायचो, मी नॉनवेज जोक्स बनवून क्रॅक करायचो. मी टपोरी भाषेत पोरांची खेचायचो, गरजेनुसार भाईगिरी सुद्धा करायचो, ईतरांपेक्षा काहीतरी हटके किडे करण्यात तर माझा हातखंडा होता. थोडक्यात कॉलेजच्या चार पोरांमध्ये माझी एक ईज्जत होती. नव्हते ते एकच क्वालिफिकेशन म्हणजे मला कुठले व्यसन नव्हते.

दारू कुठलीही असो, मला पहिल्या घोटात जमली नव्हती. पण चहाचा मी बेक्कार चहाता होतो. त्यामुळे रोज कट्ट्यावर चहा-सिगारेटचे शौक बाळगणार्‍या मित्रांसोबत पडीक असायचो. त्यांच्यापासूनच प्रेरणा घेत ट्राय केली. पण टाय टाय फुस्स..

पण हे एवढेच एक कारण नव्हते. त्या काळात एक गाणे आमच्यात फार हिट झालेले ज्याने सुट्टाला प्रचंड ग्लॅमर मिळवून दिले होते. आज जेव्हा सुट्टा शब्द ऐकला तेव्हा सर्वप्रथम तेच आठवले.

### सुट्टा ss... सुट्टा ना मिला
(### - ईथे एक शिवी आहे. ऐकायची ईच्छा असेल तर खालील लिंकवर गाणे ऐकू शकता)
BC Sutta - The Zeest Band - https://www.youtube.com/watch?v=-cK2gE0ZsYs

आज पुन्हा सुट्टा ऐकताच, हे गाणे आठवताच, यूट्यूब शोधून ईतक्या वर्षांनी पुन्हा ऐकले. आज त्यात कदाचित तितकी मजा आली नाही. पण तेव्हा एक वेगळीच क्रेज होती या गाण्याची. साधारण साल २००५-०६ वगैरे असावे. आम्हा कॉलेजच्या प्रत्येक पोराकडे मोबाईल नसायचा. ज्यांच्याकडे असायचे त्यांच्या मोबाईलची साठवण क्षमता पाहता मोजकीच गाणी असायची. पण त्यात हे एक गाणे हमखास असायचेच. नाहीतर तो अपराध समजला जायचा. मूड आला, माहौल बनला की हे गाणे ऐकलेही जायचे. हा मूड, हा माहौल जवळपास रोजच संध्याकाळी कॉलेज कँटीनला जमून यायचा. मला आठवतेय अ‍ॅन्युअल फंक्शनलाही जेव्हा सारे अधिकृत कार्यक्रम संपले तेव्हा पोरांनी स्टेजचा ताबा घेतला आणि या गाण्याचा जोरदार कार्यक्रम झाला. मग का नाही कोणाला सुट्टा ओढावासा वाटणार...

तेव्हा हे गाणे ऐकताना सुट्टा ओढणार्‍या वा ओढायची आस असणार्‍या प्रत्येक पोराला असे वाटायचे जणू त्यातील शब्द त्यांच्यासाठीच लिहिले आहेत. मी जे काही थोडेफार गुडंगगरमचे प्रयोग केले त्यामुळे मी स्वतःलाही सुट्टा क्लबचा सदस्य समजून हे गाणे ऐकायचो. पण आज हे गाणे ऐकताना मला त्यातील शब्द तद्दन फालतू वाटले. हे गाणे नक्की कोणाचे होते म्हणून सर्च करू लागलो तर अजून एक रत्न हाती लागले.

उपरोधाने रत्न नाही म्हटलेय तर ते खरोखरच रत्न आहे.

वरचेच गाणे उचलून शब्द बदललेत आणि सिगारेट शरीराला कशी घातक आहे हे सांगितले आहे.

ते गाणे इथे बघू शकता. यातही शिव्या आहेतच. पण तरी ऐकाच. आणि शेअरही करा.
Bh*nch*d Sutta Cancer Ho Gaya - https://www.youtube.com/watch?v=YVvXdTCWrjw

हवे असल्यास असे समजा की हे गाणे शेअर करायलाच हा लेखनप्रपंच. कारण दारूसारखेच पान बिडी सिगारेट तंबाखू गुटखा अश्या व्यसनांनी मित्र गमावलेत काही... कोणाचे मतपरीवर्तन कश्याने होईल सांगता येत नाही. प्रयत्न करणे आपल्या हाती.

धन्यवाद,
......................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेंचो सुट्टा फेमस होतेच आणि आणखी एक गाणे फेमस होते xlri चे... bodhitree
आया था वो xL में, सपनों का एक बादल
IR की लड़की टोट बहुत थी, मन में मची थी हलचल
साथ जिएँगे, साथ पढ़ेंगे, साथ चलेंगे पैदल
पता चला पर बाईक वाला कोई ले गया उस को था कल

xx पे पड़ गई लात
जो टूटा सपनों का महल

ऋन्मेष सर, गेले काही दिवस टीपी छान झाला त्याबद्दल आभार.
पण सिगारेट, तंबाखूचं प्रमोशन होईल असं आपल्या हातून घडायला नको हे पथ्य पाळावं असं नम्र आवाहन आहे. सिगारेट अ त्यंत घातक व्यसन आहे. माझ्या मोठ्या मामेभावाला शाळेत असताना मित्रांच्या संगतीने व्यसन लागले. नंतर सुटलेच नाही. ऐन तारूण्यात गेला. मामेभाऊ असला तरी माझा आवडता होता. त्याचा संसार उघड्यावर पडला. मुलं बापाविना लहानाची मोठी झाली. सगळ्या कुटुंबाची ससेहोलपट झाली.
कृपया असे विषय नकोत प्लीज.

@ शांत माणूस, कदाचित आपण माझा धागा नीट वाचला नसावा, किंवा मी दिलेली दुसर्‍या गाण्याची लिंक पाहिली नसावी अन्यथा अशी पोस्ट लिहिली नसती.
धाग्यात मी सिगारेटला विरोधच केला आहे. त्यात मुले कसे अडकतात हे अनुभवाचे बोल सांगितले आहेत, आणि सिगारेटचे दुष्परीणाम काय होतात हे सांगणारा विडिओ शेअर केला आहे.

याबाबत आपली मते सेमच आहे. माझ्याही जवळचे बरेच जण व्यसनांच्या नादी लागून गेलेत. त्यामुळे मी या दारू सिगारेटला नेहमीच विरोध करत आलोय. लोकांनी सोडावे म्हणून विनंती करत आलोय. बरेचदा या नादात कित्येक जण माझ्याशी बोलायचे बंद होतात, वा माझ्यावर चिडू लागतात. पण मी मात्र माझे तत्व बदलत नाही.

असो,
तुम्ही म्हणता तसे दारूचे प्रमोशन करणारा मायबोलीवर एक धागा आहे,
तुम्ही दारू कशी पिता?
https://www.maayboli.com/node/66421

मी ईथल्या दारूच्या प्रमोशनाला, उदात्तीकरणाला वेळोवेळी विरोध केलाय. मला साथ तशी कमीच मिळालीय. पण आता तुमची साथ मिळाली तर आवडेल मला.

तुम्ही म्हणता तसे दारूचे प्रमोशन करणारा >>> ????

धागा चालवणे महत्वाचे असेल तर माझे आवाहन इग्नोर केले तरी चालेल. पण कृपा करून मी जे म्हणालो नाही ते मी म्हणालो आहे असे नेहमीप्रमाणे जाणूनबुजून कोट करून त्यावर भलतीच लिंक देऊन हे चालते तर मग हे का नाही एव्हढा द्राविडी प्राणायम नको. कुणाच्या भावना समजून घ्याव्यात अशी सक्ती कधीच कुणी करू शकत नाही. त्यामुळे मी असे कधी म्हणालो हे विचारण्याची इच्छा नाही. चालू दे.

शांत माणूस, अपेक्षित. हा धागा सिगारेटचे प्रमोशन करणारा आहे, पण तो धागा दारूचे प्रमोशन करणारा नाही Happy
आणि चिंता नसावी, हा धागा चालणार नाही. कारण यात सिगारेटला वाईट म्हटलेय Happy

ऋन्म्या
'बाजरे दा सुट्टा' म्हणजे काय असते
बाजरीची सिगरेट असते का? याबद्दलही लिहायला हवे होते.

बाजरे दा सुट्टा? हे मी पहिल्यांदाच ऐकतोय? ईंग्लिशमध्ये काय बोलतात? गूगल सर्च तरी करता येईल

Bajre Da Sitta
https://www.youtube.com/watch?v=EJwhVYx9VCc

याबद्दल बोलत आहात का हर्पेन? हे सिट्टा आहे, सुट्टा नाही
र्हस्व दिर्घ, आकार उकार, मात्रा वेलांट्टी बघा ओ.. उद्या प्रेशर कूकर का सुट्टा म्हणजे काय असतो म्हणाल

र्हस्व दिर्घ, आकार उकार, मात्रा वेलांट्टी बघा ओ.. उद्या प्रेशर कूकर का सुट्टा म्हणजे काय असतो म्हणाल >>>

होय अभ्यास कमी पडतोय

श्या हर्पेन... निदान तुमच्याकडुन तरी ही अपेक्षा नव्हती....

त्यामुळे वरचा प्रतिसाद बाद. >>> हे असं कसं चालेल.... फक्त प्रतिसाद थोडा चुकला किंवा असंबद्ध असला म्हणुन... ईतके क्षुल्लक कारण... ते सुद्धा प्रतिसांदाच्या १०००- १२०० च्या माळा लावण्यासाठी काढलेल्या धाग्यांवर...

हर्पेनभाउ तुम्हारा चुक्याच....

जुनी आठवण काढली तुम्ही तर.. ! Happy
<< सिगारेटचा धूर आत कसा घ्यावा आणि बाहेर कसा सोडावा याचे गणित सारखे चुकायचे आणि यात चुकीला माफी नाही>>>

आम्हास जेंव्हा हे शिकण्याची तीव्र निकड भासू लागली त्याच काळात आमचे वर्गबंधू कम् गुरू औरंगाबादकर आमच्या आयुष्यात प्रकट झाले. त्यांनी आम्हास साग्रसंगीत डेमो दिला की सिगरेटचा एक कश घ्यायचा आणि सायमल्टेनिअसली दातांवर दात दाबून छातीभर हवा आत घ्यायची, त्याचवेळी तोंडाने "स्स्सsss" असा ध्वनी निर्माण केल्यास ते पूरक ठरेल..! आम्ही तसे करून पाहिले असता एक प्रकारची फुफ्फुसकोंडी एका झटक्यात होऊन एक दणका बसल्याचा अनुभव आला.. आम्ही चकीत झाल्याचे पाहून औरंगाबादकरांनी खुश होऊन अभिप्राय दिला की, "जाss आता तुझं आयुष्यात काही अडणार नाही..तुजप्रत कल्याण असो ss ! "
काही काळानंतर त्या लोकांच्या मोबाईलमध्ये आमचे अस्तित्व 'छोटा गोल्डफ्लेक' ह्या नावाने कायमस्वरूपी सेव्ह झाल्याचे दिसून आले.
होस्टेलवर असाच एकदा लोकांनी सिगरेट सोडण्याचा निश्चय वगैरे केला होता.. आसपास कुणीच सिगरेट ठेवायची नाही वगैरे.. परंतु त्याच रात्री उशिरा पोर्चमध्ये बाल्कनीमध्ये आम्हीच फेकलेल्या अर्धवट सिग्रेटी शोधण्याची वेळ आली होती हे एक आठवले. Happy

या निमित्ताने आयन रॅंडचे Atlas shrugged कादंबरीमधले सिगरेटबद्दलचे विचार:

“I like to think of fire held in a man's hand. Fire, a dangerous force, tamed at his fingertips. I often wonder about the hours when a man sits alone, watching the smoke of a cigarette, thinking. I wonder what great things have come from such hours. When a man thinks, there is a spot of fire alive in his mind--and it is proper that he should have the burning point of a cigarette as his one expression.”

― Ayn Rand
(संदर्भ : https://www.goodreads.com/quotes/203139-i-like-to-think-of-fire-held-in-... )

काही काळानंतर त्या लोकांच्या मोबाईलमध्ये आमचे अस्तित्व 'छोटा गोल्डफ्लेक' ह्या नावाने कायमस्वरूपी सेव्ह झाल्याचे दिसून आले.
>>>>>
Happy
माझेही नाव गुरू, महागुरू म्हणून सेव्ह व्हायचे Happy
हा एक छान विषय आहे, नवीन धाग्याचा... नोंद करतो!

पण अजूनपर्यंत असेल हे व्यसन तर सोडा साहेब सिगारेट. दारूपेक्षा भयानक व्यसन आहे हे.

ईतक्यात वाचलेला एक झणझणीत विनोद -

My friend bought a packet of bidi from a shop ..there is a warning on packet like " धूम्रपान से नपुंसकता हो सकती है"

Suddenly he go back to shopkeeper n said : अबे मरवायेगा क्या, नपुंसकतावाला क्यू दे रहा है.. वो कॅन्सरवाला दे Wink

अगदी मोलाचा धागा काढलात सर तुम्ही. धागा शंभर पार गेला तर आयटीसीचे शेअर घेईन म्हणतो.
अपने "बोल" वापस ले ली वीरु...वापस ले ले.
अशा शंभरचा बार ठेवाल तर पुर्ण आय्टीसी विकत घ्यावी लागेल