आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -२

Submitted by मानव पृथ्वीकर on 10 January, 2017 - 03:59

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोडे क्र ६४८
उत्तर
ऐसे न मुझे तुम देखो सिने से लगा लुंगा

ये अजनबी तु भी कभी आवाज दे कहीसे,
में यहाँ टुकडो मे जी रहा हू,
में यहाँ टुकडो मे जी रहा हू,
तु कही टुकडो में जी रहीं है........

य ला अ,ट ला त Happy

कोडे क्र.: ६५०(हिन्दी)(२०१०नंतर)
ज क अ प द र द क ब,
स न य द अ ह र स,
म द त भ ह ए त ल ,
ह न क अ प द क न उ,
ह त य ह...

हे गाण ह ने ओळखलं जातं,सुरुवात ज ने आहे...
खुप सोप्प आणि छान देखील...

य ला अ,ट ला त >> चुकीची अक्षरे असून देखिल!!>>> तुम्ही चक्क माझा अपमान करुन राहिले.. Sad Happy
ते २०१० पाहून पळून जायचं नाही..

कोडे क्र.: ६५१( मराठी)
व प त क म,
व प त क म,
व झ र ए ब....

साल माहीत नाही, कशातलं आहे हेही माहीत नाही...बस आवड्तं...

एकही नाही ओळखलं ना तु म्ही लोकांनी.. एवढी सोप्पी दिलेय तरी.. Angry मला वाटलेलं ३-४ कोडी झाली असतील तर.. अजून हिचं..
नेहमी माझ्याचं कोड्यांना अस करतात...
मी जुनं असो वा नविन दोन्हींसाठी प्रयत्न करते... तुम्हा सर्वांचा निशेध.. Sad

६५० हिंदीमध्ये पंजाबी शब्द वगैरे आहेत का?>>>> नाही
६५१ मराठी बद्दल -- जे माहीत आहे त्यापैकी एक क्ल्यू सांगा>>>> देवाचं आहे..

६५१ मरठी उत्तर
वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी
वाजवितो पावा तो कृष्ण मुरारी
वेडी झाली राधा ऐकून बासरी

मला एक रिमिक्स गाणे मिळाले.... आवाज ऐकून प्रल्हाद शिन्दे family पैकी कोणी असावे असे वाटतेय

Youtube वर हे मिळाले
Song Credits:
Album: Vedi Jhali Radha
Singer: Jagdish Gorse, Shakuntla Jadhav, Suryakant SHinde, Vaishali Samant
Language: Marathi
Label : Wings Entertainment Ltd

व्वा! ताई... Happy
तुम्हाला माझ्याकडून चॉकलेट...(म्हणजे आता तुम्ही घ्या...आणि मी दिली असे समजा.. Happy )
किती सोप्प होतं...उगाच कालपासून पडलेलं...

आता ते पहिलं वालं पण सोडवा बरं...

२ हवीत
१ उत्तराचे + १ गाण्याच्या माहितीचे
किती सोप्प होतं...उगाच कालपासून पडलेलं...>> देणार्‍याला नेहमीच सोपे असते. कधी ऐकलेच नसेल तर अक्षरांचा अंदाज काय लावणार?

६५० ला एक क्ल्यू लागेल.
७-१७ गाणी अजिबात क्लिक होत नाहीत

२ हवीत
१ उत्तराचे + १ गाण्याच्या माहितीचे>>> Done! ठरलं तर मग.... Happy

६५० साठी ऑलरेडी ३ क्ल्यु देलेले आहेत...ते पुरेसे आहेत..
पुन्हा एकदा ते एकाखाली एक लिहून देते...

६५० साठी क्ल्यु:
१)२०१० नन्तर
२)हे गाण ह ने ओळखलं जातं,सुरुवात ज ने आहे...
३)एकाच व्यक्तीने २ भुमिका केलेल्या आहेत...

आणि हे कोडे जो कोणी सोडवेलं ना त्या व्यक्तीला देखील चॉकलेट मिळेल... Happy

क्ल्यू १ आणि २ वाचले होते.
अडाण्यांसाठी का-ही-ही कामाचे नाहीत.
३ र्‍या वरून बघते काही मिळते का.

अजुन २ क्ल्यु घ्या... तुम्ही प्रयत्न करताय ना म्हणून... Happy
४)नायकानेच हे गाणे गायलेलं आहे..
५)२०१२-२०१४

२रा वाला क्ल्यु नीट पहा ना...ह ने ओळखलं जातं हे गानं..

650
जाने कब होठों पे
दिल ने रख दी दिल की बातें
समझा नहीं ये दिल
इसको हम तो रहे समझाते
......
हैंगओवर तेरी यादों का
हैंगओवर तेरी बातों का

पुढचं कोड कोणितरी द्या...

कोडे क्र.:५५२(हिन्दी)(२०१०- २०१७)
अ प त ह प ख ह ह ,
अ ट त अ प अ भ ह,
प त स स य म द द थ ,
क अ ह ग न ज क ह ,
स ह र क ह द ड ,
ब ब अ क क ह ह द ड.....

हो कावेरि, झिलमिल आहेतच टू गूड....
कोणालाच आले नाही असे गाणे झिलमिल / रेणु / स्निग्धा सोडवणारच...

पण तुला २ चॉकलेटची पेनल्टी... झिलमिल + मी -- दोघींसाठी
हैंगओवर तेरी यादों का == असताना == ह त य ह .... अक्षरे दिल्याबद्दल

652
क्ल्यू ह्या गाण्याच्या शेवटच्या दोन ओळीवरून ओळखता येईल

अरे...धन्यवाद झिलमिल....
तुम्ही माझ्यासाठी क्ल्यू देऊन ठेवलाय खास, मी आता पाहिले.
पण मला नवीन गाण्यांचे शब्द अजिबात लक्षात रहात नाहीत.

Pages