बेत काय करावा- ३

Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39

प्रश्न जुनेच, धागा नवीन Happy

आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602

२. http://www.maayboli.com/node/50024

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोडा मध्ये चांगले करून देणारं कोणी असेल तर उकडीचे मोदक ऑर्डर करता येतील.
डायबेटिस वाल्यांना वगैरे ही प्रॉब्लेम येणार नाही पोळी, भाजी दही वडे वगैरे असेलच.

दुपारी समजलं की जावेला सर्दी खोकला आहे. मग दही वडे कॅन्सल केले आणि बासुंदी करायला ठेवली. मेथांबा करून झाला (साबा फेव्हरीट) पुलाव, टोमॅटो सुप, पोळी, मुगाची उसळ, पचडी फायनल केलंय.
अजून एक भाजी व तळण करावं की चटपटा कॉर्न करावा विचार करतेय.

फायनली बासुंदी, पोळ्या, मुगाची उसळ, पचडी, मेथांबा आणि फ्रीज धुंडाळताना गेल्याच आठवड्यात केलेला सायो फेम मसाले भाताचा मसाला (हा अगदी हुकमी एक्का झालाय) सापडला. मग पुलाव टोमॅटो सार कट करून मसालेभात केला. डीमार्टमधून आणलेले रंगीत साबुदाणा पापड भाजले. दुसरी भाजी व तळण केलेच नाही.
सोसायटीतून प्रसादाची खिचडी व थंडाई, नणंदेने आणलेले दुलीरामचे पेढे व अय्यंगार केक वगैरे करत आमची महाशिवरात्र दुप्पट खाशी झाली.

पुढच्या वेळेस काय करू विचारावे लागणार नाही इतक्या सजेशन दिल्याबद्दल आभार.

मंजूताई मेथांब्याची रेसिपी >> १००++

मसालेभात बेस्ट असतो बड्डे गणपती कोणत्याही फंक्शनला. बासुंदी पुरली का. म्हणजे अंदाज बरोबर होता का?
पेढे आलेच ,नाहीतर मी तुम्ही दहिवडा बरोबर दुधाचे पदार्थ नको म्हणून माबो फेमस बदामाचे पेढेच सुचवणार होते. शेवटी मेन्यू सर्वाना आवडला हे महत्त्वाचं.

बासुंदी पुरली का >> हो. एकदम व्यवस्थित प्रमाण झाले. मी ७ माणसांच्या अंदाजाने २ लिटर फूल क्रीम दूध घेतले होते.

बडोद्याचे पेढे आहाहा. दुलिराम म्हटल्यावर लक्षात येत नाही माझ्या, बडोद्याचे पेढे म्हणते मी.

अरे ते पेढे इथे सर्रास मिळतात. गुज्जू लोक जितकं गुणगान लावताय तितके काही खास वाटले नाही. इथे साखर भुरभुरवलेले खाल्ले आहेत.
कदाचित पेढे चांगले असतील पण सांगणारे गुज्जू डोक्यात जाणारे असतील. Lol

Lol

मूळ बडोद्याला मिळणारे छान असतात, इथे त्याजवळ जाणारे चौलला मिळतात किंवा डोंबिवलीत सहज धारवाडचे मिळतात पण ते खूप गोड असतात. बडोद्यासारखे सेम चवीचे इथे मिळत नाहीत.

एनिवे तिकडे सेम मिळत असतील तर इथल्या इथे देशात जवळ आम्हाला का नाही मिळत वाटलं. तुम्हाला चव आवडली नसेल हे होऊ शकतं. आजोळ असल्याने बालपणी खूप खाल्ल्याने ते आवडत असतील.

माझ्याकडे एप्रिल महिन्यात भिशी पार्टी आहे. ३० ते ६० वयोगटातल्या एकूण २० जणी असणार आहेत. त्यातील निम्म्यातरी शाकाहारी आहेत त्यामुळे शाकाहारी 4 course menu सुचवा. मेनू आधी करुन ठेवता येईल आणि थंड झाला तरी चांगला लागेल किंवा मावेमध्ये गरम करुन वाढता येईल असा हवा. कारण गेम पण खेळायचे आहेत.
एरवी जेव्हा कधी आमच्याकडे पार्ट्या होतात त्या शक्यतो खाण्या-पिण्याच्या असतात त्यामुळे नेहमी मांसाहार बनते. तसेच झणझणित वैगरे प्रकार असतो परंतू आता येणारा महिलावर्ग बेताचे तिखट खाणार्या आहेत त्यामुळे काय बनवावे सुचत नाहीये.

कैरीची डाळ/ गाजराची किंवा कोबीची पचडी,
अळू/कोथिंबीर वडी,
दहीवडे/दही बुत्ती
मेथीचे ठेपले व लिंबाचे गोड लोणचे/मेथांबा,
पन्हे किंवा कलिंगडाचे सरबत वेलकम ड्रिंक म्हणून

मटार पनीर, जीरा राईस, पुऱ्या/पोळ्या
रायता - बुंदी किंवा अननस
सुरुवातीला ढोकळा, फाफडा, बॉम्बे कचोरी
जीरा लेमन - सोडा आणून तो थोडा थोडा त्या ग्लास मध्ये टाकता येईल.
गोड म्हणून गुलाबजाम, रसमलाई, गुजिया

उन्हाळी भिशी पार्टी चा मेनू:-
वेलकम ड्रिंक :- पन्हं
स्टार्टर :- ढोकळा चटणी - गेम खेळताना खायला सोप्पं
कलिंगड तुकडे करून चाट मसाला टाकून टूथपिक खोचून ठेवून द्या. खेळात खेळात खायला होईल.
मेन कोर्स मध्ये -
रगडा पॅटिस - पॅटिस आधीच तयार करून रगडा चटण्या बनवून ठेवायच्या . आपापलं वाढून घेता येईल.
दहीबुत्ती
गोडामध्ये - ब्राउनी आणि वॅनिला icecream with chocolate sauce

वेलकम ड्रिंक - आईस्ड टी पण खूप छान वाटते.
स्टार्टर - कोथिंबीर वडी, पांढरा ढोकळा,
रगडा पॅटिस ऐवजी रगडा समोसा पण छान लागते. शिवाय करायला सोप्पे. समोसे विकत आणायचे.
साठ वर्षाच्या स्त्रियांना थोडा सिंपल मेनू पण ठेवावा लागेल यासोबत.
जसे की व्हेज मिक्स पराठे, दही बुंदी, पुलाव, ताजे कैरीचे लोणचे इ इ

मी पण रगडा पॅटिस सुचवणार होते, कालच केला होता. रगडा समोसा पण छान लागतो आणि फक्त रगडा आयत्यावेळेस गरम केला की वाढायला सोपे.
ड्रिंक आल्या आल्या देणार असाल तर कोकम सरबत किंवा रोज सरबत सब्जा घालून देऊ शकता.
थंडाई पण चांगला ऑप्शन आहे "गुरुजी" वगैरेची रेडिमेड बॉटल आणून बनवू शकता. गुजिया पण गोडात सर्वाना आवडतात त्याही विकत आणून सोप्पं पडेल बाकी मेनू बनवायला.
रगडा पॅटिस ऐवजी दुसरं काही केलं तर कटलेट किंवा बटाटे वडे ही चालू शकतील .

धन्यवाद !
सगळेच सजेशन भारी आहेत. सगळंच बनवावेसे वाटत आहे पण मला जमण्यासारखं काय काय आहे ते बघायला पाहिजे. Lol
वेलकम ड्रिंक :- पन्हं
स्टार्टर :- दहीवडे
गोडामध्ये - गुलाबजाम. (बासुंदी बनवणार होते पण दहिवड्यांसोबत जाणार नाही. आमच्याकडे बासुंदी घट्ट असते. माबोवर बासुंदी चर्चेत समजले की बर्याच जणांना घट्ट बासुंदी आवडत नाही. त्यामुळे कॅन्सल.)
हे तिन्ही पदार्थ चांगले जमतात त्यामुळे हे कन्फर्म करते.
पार्टी शक्यतो संध्याकाळी असेल. रात्रीचे जेवण करुन सगळे जाणार त्यामुळे पोळी/भाताचा एखादा आयटम लागेल.
कलिंगडची आयडीया आवडली आहे.

मी पण येतो खायला Lol

मेनू सुचवणे सोपे आहे तो तयार करणे अवघड आहे त्यामुळे तयार करणाऱ्यांना _/\_

आमच्याकडे बासुंदी घट्ट असते. माबोवर बासुंदी चर्चेत समजले की बर्याच जणांना घट्ट बासुंदी आवडत नाही>>> मला आवडते घट्ट बासुन्दी, वाइट कशि लागेल? रबडीसारखी भारिच लागत असणार...येते मी, बनव बिनधास्त! smiley36_0.gif

मला आवडते घट्ट बासुन्दी, वाइट कशि लागेल? रबडीसारखी भारिच लागत असणार...येते मी, बनव बिनधास्त! >> प्राजक्ता, वेलकम Happy

हो. बासुंदी खावी तर घट्टच या मताची मी. नाहीतर सरळ मसालेदुध प्या Lol ती लच्छेदार बासुंदी खाताना जी ब्रम्हानंदी टाळी लागते ना आहाहा!! सुख सुख म्हणजे अजून काय? (आता बनवून खाल्याशिवाय चैन नाही पडणार)
हा जुना फोटो, आधी टाकला आहे इथे.
IMG-20160409-WA0005-1-1.jpg

Pages