बेत काय करावा- ३

Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39

प्रश्न जुनेच, धागा नवीन Happy

आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602

२. http://www.maayboli.com/node/50024

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजूताई, हो हे मी पाहिले आहे रील मधे. कधी खाल्ले नाहिये..
पण फक्त काळे चणे कदाचित आमच्यकडे आवडणार नाहीत असे वाटते.. मटकी आणि चणे मिक्स करुन उसळ करुन बघेन. Happy

केळवणाचा बेत सुचवा ना. आई वडील आणि मुलगा असे तिघे येणार आहेत. खूप जास्त झंझट नको आणि ते येण्याच्या आधी करून ठेवण्यासारखं असावं म्हणजे मी जरा फ्री राहील. आणि सध्याच्या वातावरणाला अनुकूल असे पदार्थ सुचवा

- गाजराचा हलवा/शेवयाची खीर
- आदल्या दिवशी भाज्या साफ करून व चिरून ठेवू शकलात तर उंधियो नाहीतर मटारची उसळ
- खीर केली तर गाजराची पचडी
- आवळ्याचे ताजे लोणचे
- फुलके
- मसाला मूगडाळ खिचडी आणि टोमॅटो सार

किंवा नॉर्थला करतात तसे
- शिरा
- कढी पकोडे/राजमा/छोले
- जिरा राईस
- कॉर्न सलाड

- गुळपोळी/ खव्याची पोळी (आदल्या दिवशी करता येतील)
- मूग डाळ खिचडी
- टोमॅटो सार
- वांगे बटाटा भाजी
- फुलके

कुठल्या वेळी (लंच/डिनर/टी टाइम) येणार आहेत?
त्या मुलाला काय आवडतं त्याचा अंदाज घेऊन त्यानुसार ठरवा. Happy
माझेमनने सुचवलेले मेनू छान आहेत.

सकाळी आहे की संध्याकाळी?
संध्याकाळी असल्यास
पाव भाजी, गाजर हलवा, पुलाव - पापड
मेथी पराठे, लोणचे, चटणी, बुंदी रायता , बिर्याणी, गुलाब जाम
हॉट अँड सावर सूप, हाका नूडल्स, स्प्रिंग रोल्स, खीर किंवा हॉट कस्टर्ड

कोणाला जेवायला निमंत्रित कारायचे असेल तार पाहुण्यांना कुठली अ‍ॅलर्जी किंवा पथ्य किंवा आवड आहे का विचारलेले बरे असते.
आजाकाल कोणीच ढिगभर गोड, तळलेले खात नाही म्हणून.
थंडीत बराच वाव असतो जड पदार्थांना पण कोणाला आवडतीलच असे हि नाही.
एका मित्राला त्यांच्या स्नेह्यांच्या घरी फक्त बेसन, चणा, पनीर, दह्याचेच पदार्थ होते आणि त्याला दोन्हीची अ‍ॅलर्जी.

सध्या गाजर हलवा , टॉमेटो सूप , पुलाव , उन्धियो , पाव भाजीचा सीझन आहे.
माझे वैयक्तिक मत - कितीही सुचना घ्या, नवर्या मुलाला विचारून मेन्यु ठरवा . त्याला आपल्या सोयीने ऑप्शन्स द्या. संध्याकाळी लोकाना फार जड खायला आवडत नाही . आणि लग्नाची केळवण करून कधी कधी नवरा मुलगा/मुलगी कंटाळलेले असतात .
गेल्याच महिन्यात आम्ही एक केळवण केलेलं - नवर्या मुलीला पूर्ण जेवण , मिसळ पाव , पाव भाजी , चाट आयटम्स असे ३-४ ऑप्शन्स दिले .
तिने सांगितल म्हणून रगडा पॅटीस आणि शेवपुरी बेत नक्की केला . आणि गोडात तिला आजीच्या हातचा शिराच हवा होता .

बेत पूर्ण जेवणाचा नसला तरी केळवण साग्र्संगीतच केलं . रांगोळी , डेकोरेशन , पाट , चांदीच ताट , पेला , ताटाभोवती महिरप
चांदीच्या ताटात रगडा पॅटीस आणि शेवपुरी वाढली Happy .
पुढच्या महिन्यात आणखी एक केळवण करायचं आहे . मुलगी पक्की मासेखाउ आहे . तसाच काहीतरी मेन्यु ठरवू मग.

चांदीच्या ताटात रगडा पॅटीस आणि शेवपुरी वाढली Happy . >>
माझ्याकडे पण एका मैत्रिणीचा तासाभरात लेकीसह पत्रिका द्यायला येतो असा अचानक फोन आला होता. केळवणाला वेळ नाही असं बरेच दिवस घोकत होती... ५ वाजता येणार होती. तिला पाणिपुरी आवडते हे पक्कं माहिती होतं.... त्यावेळे झटपट शिरा आणि पाणिपुरी चा बेत केला.. पुदीना घरात होता त्यामुळे तिखट पाणी घरी केलं आणि बाकी पुर्‍या, रगडा, शेव वगैरे झोमॅटो ने मागवलं...
चांदिच्या ताटात महिरप वगैरे लावुन पाणीपुरीचं केळवण केलं होतं ;-).. नवरी खुश.. अजुन आठवण काढते..

केळवणाला मूगडाळ खिचडी वगैरे कोण करतं? >>
बाकी मुगाची खिचडी केळवणाला करतात बरंका..
माझ्या स्वत: च्या लग्नाच्या वेळी साग्रसंगीत केळवणं खाउन मी कंटाळले होते.. तेव्हा एका हक्काच्या मावशीला कढी, खिचडी.. सांगितली होती.. तिनं कढी, खिचडी, शिरा आणि मिक्स भजी असा मस्त मेनु केला होता.. बाकीच्या केळवणांपेक्षा मला ते केळवण अजुनही छान लक्षात आहे...

नवर्‍या मुलाला नक्की विचारुन करा पदार्थ असं सुचवेन मी पण...

अजून कोणाला काही सुचत असेल तर जरूर सांगा.>>>
गाजर हलवा/मुग डाळ हलवा +इड्ली-चटणी-सान्बार+ पुलाव/मसालेभात +कोथिबिर वड्या.
सगळ तुला आधी करुन ठेवता येइल..इडल्या पाहुणे आले की लावता येतिल.

सगळ्यांचे खूप धन्यवाद, आणि नवरा मुलगा नाही मुंज मुलगा आहे. मुंजीचे केळवण करायचे आहे. मी गजर हलवा, मसाले भात, टोमॅटो सार, मटर पनीर ची भाजी, फुलके, अळू वडी/कोथिंबीर वडी/सुरणाचे काप असा बेत करायचे ठरवते आहे.

सगळ्यांचे खूप धन्यवाद, आणि नवरा मुलगा नाही मुंज मुलगा आहे. मुंजीचे केळवण करायचे आहे. मी गजर हलवा, मसाले भात, टोमॅटो सार, मटर पनीर ची भाजी, फुलके, अळू वडी/कोथिंबीर वडी/सुरणाचे काप असा बेत करायचे ठरवते आहे.

मूगडाळ खिचडी केळवणाला केलीत तर त्याला मसालेभात, पुलाव, बेसिबेली बाथ, काराबाथ, चित्रान्न, पुलीहोरा, खिचू वगैरे केलंय सांगा. शेवटी खिचडी आणि तूप वाढलंत तरी वचने किं दरिद्रता?
केळवणाला मूगडाळ खिचडी खाल्ली हे एकदम मिडलक्लास वाटतं. Lol मला खायला प्रचंड आवडते. Lol

सान्वी मस्त बेत
स्मिता, स्वस्ती! माझ्या लग्नात पण अमेरिकेत गेल्यावर इथल्यासारख खायला मिळणार नाही म्हणून एका जवळच्या नातलगानी पाणी पुरी, दाबेली आणी तवा पुलाव असा बेत केला होता.पाणी पुरीचा रगडा आणी तिखट पाणी आम्ही नेहमी जायचो त्या पाणी पुरी वाल्याकडुन आणल होत.

पोरांच्या वाढदिवसाला बाहेर बागेत बेत अरेंज करायचा आहे (मु पो ऑस्ट्रेलिया). खाणारे सर्व भारतीय आहेत (अर्धा डझन पोरे व डझनभर बाया-बाप्ये). एखादा हेवी आयटंम (पाव भाजी किंवा बिर्याणी किंवा अजून काय - आयडीयाज हव्या आहेत) आणि फिंगर फूड (स्प्रिंग रोल्स किंवा सामोसे किंवा अजून काय - आयडियाज हव्या आहेत) असे डोक्यात आहे. बागेत गरम करायची सोय नाही किंवा पदार्थ गरम ठेवायची भांडी आमच्याकडे नाहीत. एखादा बार्बेकू बर्नर घेऊन जाऊ. चीझ प्लॅटर, क्रॅकर्स, फळे वगैरे ठेऊ शकू खायला. कृपया वरील कंसातील गोष्टी सुचवा. घरी तयारी कमीत कमी करायला लागली तर उत्तम.

पाव भाजीची भाजी तशी फॉइल वाले ट्रे असतात त्याच्या खाली बर्नर असतो तसा मिळाला तर गरम राहील. बरबेक्यू वर एखादा पॅन केक साठी असतो तसा फ्लॅट टॉप टाकला तर पाव गरम होतील.
पण द्यायला आणि खायला सोपे समोसे पडतील. ते थोडे थंड झाले तरी काही फार वाटत नाहीत. बरबेक्यू वर पनीर टिक्का सारखे काही तरी भाजता येईल. किंवा साधे स्वीट कॉर्न.
बिर्याणी ऐवजी पुलाव आणि छोले पण चालू शकतील.

सॅन्डविचेस, लोणी आणि हिरवी चटणी लावून म्हणजे थंड चालतील. बरोबर आलू चना चाट. विकतचे ढोकळे. आणि केक, चिप्स, फळे वगैरे. वाटल्यास भेळ.
करायला पण सोपे होईल.

आमच्या बारक्यांचा वाढदिवस आम्ही गेली काही वर्ष बागेतच करतो. व्याप होतो पण पोरं खुश असतात. इथल्या बागेत barbeque चे ग्रिल असतात पण आम्ही ते वापरत नाही कारण खूप काम होते आणि पोरांकडे आणि पाहुण्यांकडे लक्ष देता येत नाही . सगळं ट्रे/डब्ब्यात भरूनघेउन जातो. आमच्याकडे IKEA जिंदाबाद प्रकरण आहे. त्यामुळे सर्व्हिंग ट्रे सर्व प्रकारच्या मटेरियल मध्ये आहेत. जास्त असेल तर अल्युमिनियम चे बॉक्समध्ये. ( मला आवडत नाहीत म्हणून कमी वापरतो पण तुम्हाल सोयीच असेल तर ते वापरा. इकडे बरेच पालक तसेच करतात, पार्टी संपली की फेकून देतात, मला मात्र घरी येऊन ट्रे धुवायचं काम मागे लागते)
आजवर आम्ही खालील पदार्थ ठेवलेत

१.समोसा, चणा चाट, पालक पनीर पराठा, चटण्या, गुलाबजाम , काकडी cream cheese sandwich,शिवाय केक .

कलिंगड आणि हंगामी फळे कापून तुकडे, गजर, टोमॅटो, कांदा , सिमला मिरच्या रंगीत कापून. शिवाय बाजारातून फळांचं रस , पाणी बाटल्या .

पहिल्या वर्षी अगदी माणसं( १४ पोरं आणि त्यांचे पालक )मोजून स्वयंपाक करूनही अन्न जेवढ्यास तेवढ पडलं ( आम्ही काही खाल्ले नाही) म्हणून पुढील वर्षी पासून मेनू आणि प्रमाण वाढवल:
२.खस्ता कचोरी, कोथिंबीर वाडी, इडली, सांबार, चटणी, खोबर वड्या, मटार पुलाव, पफ पेस्ट्री बाईट्स ( विकतच बेस) फळ, भाज्या, ज्यूस, केक.
३. मागच्या वर्षी दही वडा, ढोकळा, पनीर चिली ड्राय, पालक कबाब, पिझ्झा बाईट्स ( विकतच पिझ्झा बेस आणून), yogurt खरवस, salad, फळ , केक तसेच विकतच नाचोस , सालसा, ज्यूस.

पोरं सगळं लक्ष खेळण्यात असल्यामुळे फक्त sandwich, केक , कच्च्या भाज्या, chips, pop corn आणि फळं खातात . पण मोठी माणसं ( विशेषतः भारतीय) जेवायला (च) येतात. त्यांच्यासाठी काहीतरी पोटभरीचे बनवावे लागते. मुख्य जेवणापेक्षा snacks items जास्त खपतात ( मी प्रमाणाच्या १&१/२ पट बनवते) असा अनुभव आहे. ( किंवा स्नॅक्स आणि जेवण असेल तर स्नॅक्स संपतात आणि भात बिर्याणी किंवा पराठे पोळ्या उरतात. आमच्याकडे हे घरी नेणारी मंडळी पण आहेत त्यामुळे फुकट जात नाही)
आमच्या पाहुण्यात मराठी, तमिळ, तेलुगू, उत्तर, मध्य भारतीय, पोलिश, हंगेरियन, इटालियन अशी विविधता असते . इथे केटरर्स बहुतेक तेलगू आहेत,ते (आणि इतरही) मिरच्या फुकट मिळाल्यासारखे अन्न बनवतात मग बारकी आणि परदेशी पाहुणे खात नाहीt.त्यामुळे सर्व घरीच कराव लागते ( कुणीतरी मदतीला घेऊन) . वाढदिवस उन्हाळ्याया सुरुवातीला येतो, playground cum पार्क घरच्या जवळच निवडतो . शिवाय सगळ लगेच खपत ,त्यामुळे आम्ही अन्न गरम ठेवायच्या भानगडीत पडत नाही. इथे पदार्थ गरम ठेवायच्या mats दुकानात बघितल्या आहेत पण कधी वापरल्या नाहीत. तुमच्याकडेही मिळत असतील. assemble करून वाढायचे पदार्थ कमीत कमी ठेवतो. Allergy वगैरे आधीच विचारुन ठेवायचं. फक्त डबे/ भांडी/ ट्रे उघडून ठेवायचे, शेजारी कागदी ताटल्या, वाढायच चमचे, वाट्या, पेले, चमचे काटे , पेपर नॅपकिन ठेवायचे. हे सर्व आणि टेबल मॅट किंवा चटई, कचऱ्याच्या पिशव्या आधीच पॅक करून ठेवायचे म्हणजे आयत्या वेळेस घाई होत नाही.

इथे अनुभवी सुगरणी पदार्थ सुचवतीलच पण माझा अनुभव म्हणून ( आठवलं तेवढे)लिहिले आहे. मुलांना आणि त्यांच्या मित्रांना playground मधील वाढदिवसाची party च आवडते म्हणून खटाटोप करावा लागतो .

मेघा...किती छान प्रतिसाद ! आम्हा भारतातील लोकांपेक्षा तुम्ही लोक किती हौशीने, मेहनतीने करता सगळे कार्यक्रम !
Happy

मेघा...किती छान प्रतिसाद ! आम्हा भारतातील लोकांपेक्षा तुम्ही लोक किती हौशीने, मेहनतीने करता सगळे कार्यक्रम !>>+१

स्वानंदी बरोबर एकदम सहमत..
मेघाचा प्रतिसाद खूप सविस्तर आहे आणि किती काय काय केलेय असे वाटले..

धन्यवाद .शनिवारी lunch आणि स्नॅक्स या वेळेमध्ये पार्टी असली की सकाळी स्वयंपाक व इतर तयारी करणे सोपे होते.

काल रात्री प्रतिसाद लिहिताना 'घरात कमीत कमी तयारी' वर लिहायच राहून गेल. आता वाचताना जाणवलं मी पदार्थ सुचवण्यापेक्षा महागुरू स्टाईल लिहिले आहे.

तर घरात कमीत कमी तयारी साठी खालील पुरवणी प्रतिसाद वाचा.

इथल्या बाकीच्या मुलांच्या बागेतल्या/ घरच्या अंगणातल्या पार्टीचे मेनू:
१. भारतीय पदार्थ frozen/ रेडीमेड
२. चिकन nuggets, veggie nuggets, wings, तसेच इतर स्नॅक्स फ्रोझन आयत्या वेळी बेक करून
३.Pancakes, waffles
४.Garlic bread
५.French fries ( जास्त वेळ झाला तर मऊ होतील पण पोरं तरीही खातात)
६. Lithuanian शेजारीण नेहेमी लोकल गोड / अगोड डॅनिश पेस्ट्री ,Börek किंवा sausage rolls ठेवते.
७. Pasta किंवा pizza ऑर्डर देऊन आयत्या वेळेस डिलिव्हरी
८. चटणी sandwich
९. Donuts , cup cakes
१०. Fruit bars ( खजूर, अंजीर वगैरे असलेले, साखरविरहित. बारकी पोरं -साखर न देण्याच्या वयातली - फळं आणि हे bars खाऊ शकतात)
११. Cheese bars , cheese dippers ( cheese deep + crunchy sticks) prepacked
१२. Fruit Yogurt cups

फलाफल किंवा शावर्मा - त्यासाठी
रेडीमेड पिटा पॉकेटस्,
फलाफल (फ्रोझन मिळतील. फ्राय करावे लागतील. नाहीतर २-३ दिवस आधी बनवून फ्रीझ करून ऐनवेळी फ्राय करता येतील),
शावर्मासाठी रोस्ट पनीर किंवा चिकन ( हे घरी करावं लागेल बहुतेक),
व्हिनेगरमधे मुरवलेलं गाजर-बीट (हे २-३ दिवस आधी करून ठेवलं तर उत्तम मुरेल),
कोलॅप्सिबल बॉटल्समधे शावर्मा डीप्स, हमस (तयार मिळेल बहुतेक) मांडून ठेवलं तर लोक त्यांचं त्यांचं असेम्बल करून घेतील.
मुलांनी असेंबल नाही केलं तर त्यांचे पेरेंटस् करून देतील.
हे गरम ठेवायची कटकट नाही.
पोटभरीचंही होईल.
सोबत
फ्राईज,
केक पॉप्स/मफीन्स,
आईस्क्रीम/लेमनेड (याला कुलर लागेल) ठेवता येईल.

Pages