सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३१ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
थंडीच्या दिवसांचे आगमन होत आहे. वातावरण अगदी गार गार होत जाणार आहे. दवबिंदूंचे मोती गवता पानांवर अलंकार सजवणार आहेत. आता शेकोटी आणि त्या भोवतालच्या गप्पा रंगणार. भाजीचे मळे हिरवेगार होऊन पिकाला येऊ लागले आहेत. सकाळच्या थंड हवेत पशु पक्षांची कुडकुडती किलबिल चालू होणार. सकाळची सूर्यकिरणे हवीहवीशी वाटू लागणार. चला तर स्वागत करूया येणार्या हिवाळी ऋतूचे.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
टीना खुप सुंदर फोटो आणि
टीना खुप सुंदर फोटो आणि तितकेच सुंदर लिखाण. तुला आता निसर्गाची ओढ अधीक वाढली आहे असे जाणवतेय. खुप छान. अगदी मनातून भरभरून लिहीतेयस.
मी सकाळी जेवण करत असताना हा नर्तक रोज माझ्या किचनच्या खिडकी समोरच्या चिकूच्या झाडावर त्याचे खाद्य शोधायला येतो.
टीना खुप सुंदर फोटो आणि
टीना खुप सुंदर फोटो आणि तितकेच सुंदर लिखाण. तुला आता निसर्गाची ओढ अधीक वाढली आहे असे जाणवतेय. खुप छान. अगदी मनातून भरभरून लिहीतेयस.
मी सकाळी जेवण करत असताना हा नर्तक रोज माझ्या किचनच्या खिडकी समोरच्या चिकूच्या झाडावर त्याचे खाद्य शोधायला येतो.
वा टीना, बहारदार फोटो... डोळे
वा टीना, बहारदार फोटो... डोळे सुखावलेत....:)
सुंदर फोटो जागू..
सुंदर फोटो जागू..
पहिले निसर्गात फक्त रमणं चालायचे.. या ग्रुपमुळे त्याचा अभ्यास सुरु झाला...त्याच्या नाना कळा कळू लागल्या त्यामुळे उत्सुकता वाढली..
तुम्हा सर्वांना खुप खुप धन्यवाद _/\_
जागु तु स्वर्गात राहातेस का ग
जागु तु स्वर्गात राहातेस का ग! कीत्ती सरेख पक्षी तुझ्या अवती भोवती असतात...:)
जागु तु स्वर्गात राहातेस का ग
जागु तु स्वर्गात राहातेस का ग! कीत्ती सरेख पक्षी तुझ्या अवती भोवती असतात...:)>> +१
नाही ग मी जमीनीवरच आहे. पण
नाही ग मी जमीनीवरच आहे. पण ह्या पक्षांनी माझ्या कॅमेर्यात स्वर्ग निर्माण केला आहे. आजकाल माझ लक्ष ह्यांच्याच किलबिलाटाकडे असत. हल्ली तांबट खुप आवाज करतात त्यांना कॅमेर्यात घ्यायचय.
जागू, तांबट कुठे तरी घरटे करत
जागू, तांबट कुठे तरी घरटे करत असणार, लक्ष ठेव.. मस्त फोटो.
वाह.. अतिशय सुंदर फोटोज आणी
वाह.. अतिशय सुंदर फोटोज आणी साजेशे लिखाण..टिनिमिनि.. जिओ!!!
जागुली चा प्रतिसाद आवडला..
जागू.टीना मस्त photo
जागू.टीना मस्त फोटो .
गिरीपुष्प
गिरीपुष्प
घरचा gulab
घरचा गुलाब
कण्हेर
कण्हेर
आम्र मोहोर
आम्र मोहोर
के एस बी चौकात फुललेला चेरी
के एस बी चौकात फुललेला चेरी ब्लॉसम...

संक्रांत वेल
संक्रांत वेल
(No subject)
विनिता, सुंदर फोटो.. पण ते
विनिता, सुंदर फोटो.. पण ते गिरिपुष आहे. चेरी ब्लॉसम नाही.
सरिवा...छानच फोटो.
निर्मल, इथे पिवळ्या
निर्मल, इथे पिवळ्या टॅबेबुयाचे काही फोटू आहेत. http://www.maayboli.com/node/1688
विनिता, सुंदर फोटो.. पण ते
विनिता, सुंदर फोटो.. पण ते गिरिपुष आहे. चेरी ब्लॉसम नाही.>> +१
सरिवा, सुरेख प्रचि! आम्र मोहोर मायक्रो फोटोग्राफी आहे आहे का?
सगळे फोटो आणि माहिती मस्त .
सगळे फोटो आणि माहिती मस्त .
का कोण जाणे पण हा धागा बहरला की छान वाटत मनाला .
टिना मस्त फोटो आणि लिखाण
टिना मस्त फोटो आणि लिखाण

मानसीताई, विनिता सुंदर फोटोज
पांढरा गुंज
पांढरा गुंज
N = निसर्ग
N = निसर्ग
काटा रूते कुणाला
काटा रूते कुणाला
सगळेच फोटो मस्त सरिवा..
सगळेच फोटो मस्त सरिवा..
तुझेपन फोटो..मेरा मतलब है तू टाकलेले फोटोसुद्धा छान जिप्सी...
पण तुम्ही दोघेही प्रतिसादगणीक एक फोटो का टाकत आहात?
काटेसावरीला फुलं आली का निरु?
काटेसावरीला फुलं आली का निरु?
मी एम्प्रेस गार्डन मधे बाळ काटेसावर पाहिली.. किती ते काटे... तुम्ही कशी लावली ती?
गुंजेच्या बियांचं नेमकं काय
गुंजेच्या बियांचं नेमकं काय करता तुम्ही?
मी पांढरी गुंज नाही पाहिली कधीच..... बायदवे खुप वर्षांपुर्वी एक कथा वाचलेली ज्यात एक मित्र मरतो , दुसरा मित्र त्याला ओळखतो कारण त्याच्या खिशात गुंजेची पानं असतात... 'गुंज ' म्हणलं की तेच आठवतं मला
नक्की गुंजच आहे ना ? लाल
नक्की गुंजच आहे ना ? लाल गुंजीच्या बियांवर जसा डोळा ( काळा स्पॉट) असतो तसाच पांढर्या गुंजांवर पण असतो. पण या फोटोत तसे काही दिसत नाही.
नमस्कार!!! बरेच दिवसांनी
नमस्कार!!! बरेच दिवसांनी लिहायला आले. सगळेच फोटो आणि माहीती नेहमी प्रमाणे छान. अगदी वसंत फुललेला आहे.
माझ्या घरातल्या कुंडीतल्या लिंबाच्या झाडावर फुलपाखरू अंडी घालून गेले. एकूण दहा अळ्या दिसल्या होत्या. रितसर वाढल्या, झाडाची सगळी पाने खाल्ली. मोठ्या झाल्या. २८..०१.२०१७ पासून प्रगती पहात होते पण गेले दोन दिचस काहीच दिसत नाही. झाडावर पाने शिल्लक नाहीत, काटेच आहेत. कोष कुठे लागले कि नाही माहीत नाही. मन फार खट्टू झाले आहे.
एक दिड इंचाची अळी चिमण्यांनी खाल्ली असेल का? कि दयाळाने डल्ला मारला असेल? पण सगळ्या कशा खाईल?
दिवसभर घरी कुणी नसते. त्यामुळे चिमणी दयाळाचा तर्क आहे.
उद्या पुन्हा पाहीन, काही दिसले तर सांगेनच.
Pages