निसर्गाच्या गप्पा (भाग ३१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 November, 2016 - 02:23

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३१ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

थंडीच्या दिवसांचे आगमन होत आहे. वातावरण अगदी गार गार होत जाणार आहे. दवबिंदूंचे मोती गवता पानांवर अलंकार सजवणार आहेत. आता शेकोटी आणि त्या भोवतालच्या गप्पा रंगणार. भाजीचे मळे हिरवेगार होऊन पिकाला येऊ लागले आहेत. सकाळच्या थंड हवेत पशु पक्षांची कुडकुडती किलबिल चालू होणार. सकाळची सूर्यकिरणे हवीहवीशी वाटू लागणार. चला तर स्वागत करूया येणार्‍या हिवाळी ऋतूचे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार मंडळी! खूप दिवसांनी लॉगीन केले... वाचत आणि फोटो बघत होते. मस्त गप्पा चालू आहेत. गिरिपुष्पची माहिती छान आहे. सध्या वसंतात कोवळी पालवी धारण करणाऱ्या झाडांची अगदीच रया झालीय. आमचा पिंपळ मातकट पाने लेऊन कसाबसा उभा आहे. कधी गुलाबी आणि मग हिरवी पोपटी पाने येतील त्याची वाट बघतेय. आमच्या इथल्या काटेसावरला अजून फुले यायची आहेत. आज सकाळी वेगळा कचकचाट येत होता. शोधल्यावर दोन हळदिनी (female golden oriole) दिसल्या. भांडतात का म्हणून बघत बसले, तर वाटले कदाचित आई बाळाला उडायला शिकवत होती. बाळ male की female ते कळले नाही. पण थोड्या वेळाने एक (बहुतेक आई) जरा लांबच्या झाडावर जाऊन बसली. मला वाटले, बाळ जाईल तिच्यामागे... पण दुसरी गेलीच नाही. मग थोड्या वेळाने दुसरी विरुद्ध दिशेच्या झाडावर गेली. काही कळले नाही बुवा... :-o
टीना तू असा विचार करशील असे मला वाटले नाही कधी... कधी तुझे काही शब्दप्रयोग मला खूप वेगळे वाटतात पण ती तुझी स्टाईल आहे त्यामुळे तुला दुरुस्त करण्याचा विचार कध्धीच मनात आला नाही... Happy

आला वसंत ऋतू आला, वसुंधरेला हसवायाला,
सजवीत नटवित लावण्याला, आला, आला वसंत ऋतू आला

रसरंगांची करीत उधळण, मधुगंधाची करीत शिंपण
चैतन्याच्या गुंफित माला रसिकराज पातला
आला वसंत ऋतू आला

वृक्षलतांचे देह बहरले,
फुलाफुलांतुन अमृत भरले
वनावनांतून गाऊ लागल्या पंचमात कोकिला
आला, आला वसंत ऋतू आला

विक्रोळी ते घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर असेल तर तो १००% टॅबेबुयाच आहे. भरपुर झाडे आहेत या मार्गावर. >> जिप्सी, टॅबेबुयाचा फटू दे ना...
अब निर्मल हि बता सकता है कि उसने क्या देखा Lol - > मी वाचले सगळे प्रतिसद. पण ही झाडे लांबून बघितलि जातात. त्यामुळे मला नाही सांगता येत की नक्की कुठलं आहे ते. छोटी फुलं पडलेली दिसतात मात्र रस्त्यावर.

नो नो टीना, तुझी भाषा, स्टाईल आवडते मला. इथे नि ग वर पण आवडत असणारंच.

इथे आपण निसर्गप्रेमी म्हणून एकत्र येतो टीना. तू माहीर आहेस त्यात, चांगली माहीती लिहीतेस. फोटो टाकतेस. तू गेलीस तर आमचं नुकसान होईल सो नो एक्झिट, प्लीज.>>>>>>> अगदी अगदी.
इथलेच नाही तर इतर बर्‍याच ठिकाणच्या तुझ्या लेखनाची मी पंखा आहे.

काल इथे मँगोस्टीन मिळाले.. त्याच्या टोकाशी असे कोरलेले फूल दिसले... हे आधी बघितल्याचे आठवत नाही ( तसेही
हे आवडते फळ असले तरी नेहमी मिळते असे नाही, त्यामूळे कमीच खाल्ले जाते.. )

Mangosteen.JPG

मस्त फोटो दिदा..
आय वंडर ते टेस्टला कसं लागत असेल?
मला ओलं पराटीचं बोंड वाटत आहे .. ओलं म्हणजे न पकलेलं..

टीना, कुठल्याही देशात कुठलेही नवे फळ दिसले कि मी ते खातोच. अजून एकदाही निराशा झालेली नाही !!
हे वरचे फळ. रसाळ आणि गोड लागते, पण आकाराच्या मानाने, खाण्याजोगा भाग फार कमी. उरलेल्या भागाचा, म्हणजेच सालीचा औषध म्हणून उपयोग होतो.

मराठी : काटेसावर
संस्कृत : शाल्मली
हिंदी : सेमल
इंग्रजी कॉमन नाव : कॉटन ट्री, रेड कॉटन ट्री
शास्त्रीय नाव : Bombax ceiba

अश्विनी११,
तुम्हाला एवढी सारी फुलं इतक्या छान अवस्थेत मिळाली? अरे व्वा.. छानच..
मी आणि जागू ने पान नं ९ वर प्रतिसादात्याचे काही फोटो टाकले आहेत.. आणि माहिती सुद्धा दिलेली आहे..

आहा मस्तच फोटो...
काल आळंदी - दिघी रोडवर बाईक चालविताना डोळ्यासमोरुन निळाई गेली.. डोक्यात एकदम झकॅरांदा आला.. परतताना दिसलाच नाही म्हणुन जरा खट्टू झाली.. आज घराजवळील एका गराज मधे गाडी सर्विसिंग ला टाकली अन पैदल परत येताना खाली एक फुल पडलेलं दिसलं..सायंकाळ सरुन चाललेली सो पटापट तेथील दोन तीन फुलं उचलले अन घरी येऊन शहानिशा केली तर तो खरचं झकॅरांदा होता.. दिवस सार्थकी लागला म्हणायचा आजचा..

तसं तर Jacaranda या जिनस खाली जवळपास ४९ ५० स्पेसिज येतात पैकी भारतात सद्य मओसमात आपल्याला जी दिसते ती मला वाटतं Jacaranda mimosifolia आहे... जाणकार प्रकाश टाकतीलच म्हणा..
याची पानं बर्‍याच अंशी गुलमोहरासारखी असतात.. याला फळं येतात..
विचार करतेय मिळाली तर त्यातल्या बिया रुजवून रोप तयार करता येईल का... बघुया..

तटी : चुकीची माहिती टायपल्याने पोस्ट एडीटली आहे.. खालची कमेन्ट वाचली नाही तर उगा चुकीची माहिती पसरेल म्हणुन..धन्यवाद _/\_

टीना, झकरांदा ला शेंगा नाहीत चपटी गोलसर फळे येतात. बिया रुजत असाव्यात. पण खरं सांगायचं तर तो आपल्याकडे तितका फुलत नाही.
माझे केनयातले आणि शापित गंधर्वचे चे दक्षिण आफ्रिकेतले फोटो आहेत मायबोलीवर.

तसं बघायला गेलं तर निळ्या रंगाची फुले येणारी मोठी झाडे फार कमी आहेत. करंज्यातही निळसर जांभळी फुले येणारी एक जात आहे
( करंजा नसेल कदाचित पण अवतार तोच ) गायत्री आणि वांगीवृक्ष हे आणखी दोन प्रकार. या दोघांची खासियत म्हणजे दोघांची फुले
रंग बदलतात. उमलताना गर्द निळी, मग आकाशी आणि शेवटी पांढरी होतात. एकाचवेळी या तिन्ही रंगाची फुले झाडावर असतात.

हो हो...शेंगा नाही फळे...
दा तुमचे लेख पाहिले मी.. इतकी जोमाणे इकडे नाहीच फुलत हि झाडं..
जिप्सी, तुने तो चार चांद लगा दिये..वाह... रच्याकने कुठला फोटो आहे ?

सगळ्या भाषेतील नावाबद्दल धन्यवाद टीना . मी आधीची पाने वाचली नव्हती . तू आणि जागुने छान माहिती दिली आहे.
रविवारी भीमाशंकर ला गेलो होतो. तेव्हा खूप अशी फुललेली झाडे दिसली. झाडाखाली फुलांचा खच पडला होता. रंग इतका छान आहे कि एक फुल उचलून मन भरले नाही. रस्त्यावरच असल्याने एवढी घेता आली. कारण whole वावर was आवर

ओके आश्विनी...खुप मोहकं अन् उठावदार फुल असतात याची.. आणि खोडं..हा हा...शायद मागच्या काही पानावर जिप्सी ने खोडाचा फोटो दिलायं..

आज पुणे कॅम्प येथील एम्प्रेस गार्डनला भेट देउन आली...
राहते तेथे काहीतरी हिरवाई हवी म्हणुन रोपं घेउन येऊया असं बोलुन निघालो..
गेल्यावर काय बघु काय नको असं झालं.. तिथली इतर प्रजा बघुन मला त्यांना डिस्टर्ब करायचा जाम मोह होत होता पण मी तो आवरला..

मोठ्ठाली वृक्ष आहेत तेथे मस्त..पण मी जवळपास सारा वेळ नर्सरीमधेच घालवला.
तिथला माळी मात्र मस्त.. जेवणाची सुट्टी असल्यामुळे तो जरा वेळानंच आला तोवर आम्ही सारी नर्सरी पालथी घालुन आलो. तो आल्यावर मग त्याला याचं नाव, त्याचं नाव, याची लागवड कशी करतात, त्याच्या बिया रुजतात का नाही, कुणाला कसं जपावं असे बरेच प्रश्न विचारुन सोडले. गंमत म्हणजे त्यांना सगळ्या तिथल्या झाडांची शास्त्रीय नावे सुद्धा माहिती होती..

पुण्यातील कॅम्प एरीयाच खरतर प्रेक्षणीय आहे.. मला आजपावेतो सर्वात जास्त वडाची झाडं इथंच दिसलीत..
परतताना पूर्ण पाणगळ झालेला गोरखचिंचेचा वृक्ष दिसला.. जोडीला भली मोठ्ठी काटेसावर अन त्यावर एक मस्त राजबिंडा गरुड बसलेला दिसला... गार्डन मधेही दयाळ, कोतवाल, बगळे, सनबर्ड, कावळे, कोकिळ असले पक्षी दिसले..
माळ्याच्या मते तिथे जवळपास ५० प्रकारचे पक्षी आढळातात..असेलही...
एखाददिवशी कॅमेरा घेउन ट्रिप काढावी लागेलं असं वाटायला लागलयं..

गार्डनमधे प्रवेश केल्या केल्या चिंच, आंबा सोबत फायकस जातीतले वृक्ष, चंदन, मंकी ट्री, स्पॅथोडीया/पिचकारी, बांबु, टेंबुर, कैलासपती, जॅकरांदा, वड, पिंपळ, महोगनी, पिवळा टॅबेबुया, काटेसावर, उंदिरमारी, बॉटलब्रश, भेरली माड, रॉयल पाम, जंगली बदाम ते ही दोन वेवेगळ्या प्रकारचे, शिरीष वृक्ष असे बरेच वृक्ष दिसले.. तरी मी खरतर गार्डन फिरलीच नाही...असो..वेळ काढून परत एकदा जावं म्हणते...

काही फोटो देते इथे.. जवळ साधा डीजी कॅमेरा असल्याने कमीच फोटो काढले..

समोर अशी पिटुनिया, कोंबडा, झेंडू, शेवंती अशी बरीच फुलारलेली रोपं मांडली होती.

हि काही ऑर्किड्स... फुलारलेली नाही पण कशी ठेवलीए त्याकरता फोटो काढलाय..

संगमेश्वरला हिला पाहिल्यापाहिल्या हिच्या प्रेमात पडली मी..
कालपरवा इंडीयन फ्लोरा ग्रुपवर नाव कळलं ते पॅट्रिया वोल्युबिलिस उर्फ निळावंती (सायलीच्या मते).
हिचं वशिष्ट्य म्हणजे हि रानटी वेल आहे.. काटक एकदम..हिची पानं जरा जाडं असतात अन स्पर्श सागासारखा खरबरीत आणि न चिमणारं फुलं...अगदी गळून पडलं तरी त्याचा जिवंतपणा तसाच राहतो.. मी याचं रोपटं घेउन आलीए..

पुढील फोटो दुसर्‍या पोस्टमधे पोस्टते..

पेट्रीया चा एक भला थोरला वेल माझ्या कॉलेज मधे होता. तळमजल्यावरच्या वर्गातल्या मागच्या खिडकीतून उडी मारुन मागे जाता येत असे. तिथे भिंतीत बाक होता मस्त. मोठा कदंब , पेट्रीया, बोगन वेल, बदाम, आणि खाली भरपूर तेरडा, मेडन हेअर फर्न आणि साधा नेचा. कँटीन पेक्षा जास्त मजा त्या बाकावर केलीय कॉलेजच्या दिवसात. काय सुरेख आठवणी जाग्या झाल्या पेट्रीयाची फुले पाहून !

हे झुडुप नविन होत माझ्यासाठी..


.
उंदिरमारीचं फुलं
.

.
.
कैलासपती..
.

.
.

.
.

.
.
हे एक सरप्राईज होत माझ्याकरता...नाव नाही मा।इती...पण कसलं सुंदर होतं बघा...
.

.
.
मी घेतलेला गोल्डन ऑरेलिया...सावलीत ठेवल्यावर हिरवा दिसतो अन उन्हात ठेवल्यास असा पिवळा..
.

.
आणि हा पिवळा टॅबेबुया.. हे सुद्धा खुप सुखावणारं होतं...मला पिवळा टॅबेबुया पाहायचा आहे असं आत्त्ताच इथे पोस्टलेलं मी आणि हा असा अचानक समोर उभा असलेला बघुन अत्यानंदाने फक्त उड्या मारायच्याच शिल्लक ठेवलेल्या मी...
.
.

.
.
या महोगनिच्या बिया... तिथला माळी म्हणाळा, 'निसर्गाची किमया ती कशी बघा कि एवढ्या प्रचंड वृक्षाच्या त्या फळातून बाहेर आलेल्या बिया खाली पडताना इजा व्हायला नको म्हणुन त्याची रचना अशी आहे कि भिरभिर भिरभिरत या भिंगर्‍यासारख्या अलगद खाली उतरतात... त्यांच ते जोराने हवा आल्यावर एकसाथ खाली पडणं बघायला खुप मस्त वाटतं ..'
.

तूझं ते सरप्राईझ अजून फुलतं बरं का, आठवडाभराने केवळ त्याच्यासाठी जा. आणि मग त्याच वेळी त्या झाडाची कोवळी पालवी पण बघ.. ( तोपर्यंत तू नाव शोधलेले असशीलच !! )

दिदा...थँक्स टू साधना...
त्याचं नाव ब्राऊनिया...लाल झुंबर अस आहे..
नक्की जायचा प्रयत्न करेल मी..

Pages