तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"
हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?
आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,
- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,
- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?
- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो
मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.
अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.
नोटबंदीला दिड महिना उलटून
नोटबंदीला दिड महिना उलटून गेला. जर ही नोट बंदी सफल झाली असती तर आज मोदी संसदेत प्रत्येक दिवशी वेगवेगळे भाषण देत असते.
तर प्रश्न असा विचारला गेला
तर प्रश्न असा विचारला गेला होता की हे इतक्या प्रमाणावर आधी का नाही झाले?
<<
मनमोहनसिंग यांच्या काळात अॅम्नेस्टी/व्हीडीआयएस स्कीम आली होती, त्यात जास्त पैसे डिक्लेअर केले गेले होते.
डीटेल्स शोधून नंतर देतो.
एखाद्या त्रयस्थ सम्स्थेने, या
एखाद्या त्रयस्थ सम्स्थेने, या निर्णयाचा लेखजोखा अभ्यासून अहवाल प्रसिद्ध केला पाहिजे. सरकार तर्फे खारी आकडेवारी जाहीर होईल का, याबाबत मी साशंक आहे.
म्हणजे सिलेक्टीव्ह आकडेवारी जाहीर होईलही पण खुपशी माहिती लपवण्यातही येईल.
लोकसत्ता मधली बातमी... केंद्र
लोकसत्ता मधली बातमी...
केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर दोन टोकाचे परिणाम दिसत आहे. काही लोकांना चलनतुटवड्याचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे काही लोकांवर या निर्णयाचा काहीच परिणाम दिसत नाही असे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवले आहे. काही लोकांकडे लाखो रुपयांच्या नवीन नोटांचे बंडल कसे आढळत आहे असा सवालच सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारला.
नोटाबंदीप्रकरणी गुरुवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने नोटाबंदीच्या याचिकेवर आपला निकाल राखून ठेवला आहे. पण सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले आहे. लोकांना अजूनही प्रत्येक आठवड्याला २४ हजार रुपये काढता येत नाही. मग काही लोकांकडे लाखो रुपयांच्या नोटा कशा आढळतात असा सवालच सरन्यायाधीश टी एस ठाकूर यांनी केंद्र सरकारला विचारला. यावर अॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी म्हणाले, काही बँकांमधील मॅनेजर बेकायदेशीरकृत्यांमध्ये सहभागी आहेत आणि सरकार अशा मंडळींवर कारवाई करत असल्याचे अॅटर्नी जनरल यांनी कोर्टासमोर स्पष्ट केले. देशभरात आयकर विभागाची कारवाई सुरु असून यादरम्यान कोट्यावधी रुपयांच्या नवीन नोटांचे बंडल जप्त केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने सरकारला हा प्रश्न विचारला आहे.
दरम्यान, ९ डिसेंबररोजी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने नऊ प्रश्न उपस्थित केले होते. नोटाबंदीच्या निर्णयामागचा उद्देश आणि फायदा काय, हा निर्णय घेताना गोपनियता बाळगण्यात आली होती का असे प्रश्न कोर्टाने उपस्थित केले होते. तर केंद्र सरकारने नोटाबंदीच्या समस्येवर १० ते १५ दिवसांत तोडगा निघेल अशी माहिती सुप्रीम कोर्टात दिली होती. आम्ही नोटाबंदीच्या समस्येवर शांत बसलेलो नाही असे सरकारने कोर्टात सांगितले होते.
मला आकडेवारीपेक्षा असल्या
मला आकडेवारीपेक्षा असल्या काळे धंदेवाल्यांना बसलेली जरब जास्त महत्वाची वाटते
इतके दिवस आपल्यावर अशी काही वेळ येउ शकते असा विचारही केला नसेल त्यांनी
त्यातूनही जे निर्ढावलेले असतील त्यांना नव्या वाटा पळवाटा सापडेपर्यंत तरी हा सगळा काळा बाजार जरा स्लो डाउन होईल
आधीच्या सरकारने हे का केले नाही याचे उघड उत्तर म्हणजे मतांची लाचारी
असे निर्णय घ्यायला जी राजकीय इच्छाशक्ती लागते ती नव्हती त्यांच्याकडे
>>>>नोटबंदीला दिड महिना उलटून
>>>>नोटबंदीला दिड महिना उलटून गेला. जर ही नोट बंदी सफल झाली असती तर आज मोदी संसदेत प्रत्येक दिवशी वेगवेगळे भाषण देत असते.<<<<
मोदींनी संसदेत भाषण द्यायला यायला हवे होते ह्याच्याशी सहमत! सफल, असफल ह्याच्याशी त्याचा संबंध असू नये.
कुठे दिसतेय काळा
कुठे दिसतेय काळा पैसावाल्यांना बसलेली जरब?
की रांगांत मेलेले लोक काळा पैसावाले होते, असं केंद्रीय मंत्र्यांप्रमाणेच तुम्हालाही वाटतंय?
आपण इतरत्र दिलेल्या
आपण इतरत्र दिलेल्या प्रतिसादाची नेमकी लिंक देता येईल का ? पुन्हापुन्हा तेच तेच होतंय सगळीकडे.
मानसी वैद्य. काळा पैसा म्हणजे
मानसी वैद्य.
काळा पैसा म्हणजे काय कृपया स्पष्ट कराल का?
मला आकडेवारीपेक्षा असल्या
मला आकडेवारीपेक्षा असल्या काळे धंदेवाल्यांना बसलेली जरब जास्त महत्वाची वाटते
<<
कोणत्या काळ्या धंदेवाल्याला कसली जरब बसली त्याबद्दल काही विदा/उदाहरण आहे का?
की उगंच आपलं म्हणत रहायचं?
नोटबंदी झाल्या झाल्या शरद
नोटबंदी झाल्या झाल्या शरद पवार माझे गुरु आहेत असे उद्गार काढले गेले.
नंतर लगेच गुरूंनी कानपिचक्या दिल्या.
आज आपण टी व्ही वर ऍक्सिस बँकेची रेड बघतोय. जर आता तिथे भ्रष्टाचार आहे म्हणून मोदींनी अक्सिक्स बँकेला पैसे द्यायचे बंद केले तर?
कित्येक "भाबडे" लोक आमचं तिथे अकाउंट आहे आम्हाला का शिक्षा म्हणून ओरडू लागतील.
पण कॉपरेटिव्ह बँका सरळ बंद ठेवताना तिथल्या खातेदारांची जरा सुद्धा कणव कुणाला आली नाही.
पण कॉपरेटिव्ह बँका सरळ बंद
पण कॉपरेटिव्ह बँका सरळ बंद ठेवताना तिथल्या खातेदारांची जरा सुद्धा कणव कुणाला आली नाही.>>
एक्झॅक्टली!
को ऑपरेटिव्ह बँका बुडत
को ऑपरेटिव्ह बँका बुडत असताना, ठेवी बुडत असताना कुणाला दया आलेली ? त्या बँका का बुडल्या ?
१०% दिले की या बँकांतून मेंबर नसलेल्याही मेंबर करून घेऊन कर्जे दिली जातात. नियम डावलून. जाऊ द्या. वेड घेऊन पेडगावला जायचेच म्हटल्यावर काय..
>> काळा पैसा म्हणजे काय कृपया
>> काळा पैसा म्हणजे काय कृपया स्पष्ट कराल का? <<
घ्या म्हणजे इथुन सुरुवात आहे का तुमची?
सोप्या शब्दात सांगायचे तर जो नदीत फेकला गेला, कचऱ्यात सापडला, जाळला गेला, रेड्समध्ये पकडला गेला/जातोय तो सगळा काळा पैसा
unaccounted money
आणि हे सगळं न झालेला सगळा
आणि हे सगळं न झालेला सगळा गोरा नै!
मस्तच आहे डेफिनिशन!
(देजा वू! हे सगळं पहिल्याच पानांत होऊन गेलंय नै!)
>> कोणत्या काळ्या
>> कोणत्या काळ्या धंदेवाल्याला कसली जरब बसली त्याबद्दल काही विदा/उदाहरण आहे का? हाहा
सध्यातरी नाहीत
तो माझा कयास आहे
ज्या लोकांचे होत्याचे नव्हते झाले असेल, ज्यांच्यावर कारवाई होईल त्यांना बसेलच ना जरब?
हा आता कुणावरही कसलीही कारवाई झालीच नाही किंवा होणारच नाही असा जर तुमचा विश्वास असेल तर असो बापडा
मग तुम्ही सांगा तुमची
मग तुम्ही सांगा तुमची डेफीनेशन
मी आपली मला जी वाटली ती सांगितली
आठ नोव्हेंबरला झालेला
आठ नोव्हेंबरला झालेला संवाद!
लोक अमेरिकेत बस्।न ३-४ दिवसांत सगळे सुरळित होईल म्हणत होती.
अय्यो, मला हा निर्णय डिक्लेर झाल्याच्या चार तासांत जे कळालं होतं ते कळायला अमेरिकनांना आणि मोदी /जेटलींच्या स्मार्ट माणसांना इतका वेळ का लागला बरे?
<<साती | 8 November, 2016 - 23:28
बाकी मोदींवर तर मी फिदा बुवा!
मोठ्या बिजनेसमनांना हातही लागणार नाही.
नोकरदार नसणार्या किंवा खाजगी नोकरीत असणार्या मध्यमवर्गीय आणि उ.म. वर्गीयांचं कंबरडं मोडेल आणि ज्यांचं बँकेत खातं नाही अशा गरीबांचं पण.
परवा मार्केट चालेल इतक्या १०० रू च्या नोटा आहेत का मार्केटात.
संपादन
वैद्यबुवा | 8 November, 2016 - 23:32
फारच ड्रमाटिक बोल्ता तुम्ही साती. सारखं आपलं विरोधी पक्ष नेते असल्यासार्खं कुर्कुर करत राहायची. हाहा
साती | 8 November, 2016 - 23:35
तुम्ही लांब रहाता हो वैद्यबुवा.
इथे आम्ही काय हाल होतायत लोकांचे ते पहातोय.
(म्हंजे सध्या माझेच झालेत, मी सध्या परगावी आहे आणि एटीएम च्या बाहेर रांगा लागल्यात आणि माझ्याकडे शंभराच्या फार कमी नोटा उरल्यात.)
डोळा मारा
संपादन
साती | 8 November, 2016 - 23:35
आणि 'विरोधी पक्षात असल्यासारखं' काय?
विरोधी पक्षातच आहे मी.
कोई शक?
संपादन
अंजली | 8 November, 2016 - 23:38
पण ही परीस्थिती काही दिवसांसाठीच असेल ना? अजून ३-४ दिवसात सुरळीत होईल की. हेच काँग्रेस किंवा आप ने केलं असतं तर तुझी हीच रीअॅक्शन असती का? एकदम प्रामाणिक उत्तर पाहिजे हां स्मित>>
प्रत्येकानेच आपण आठ नोवेंबरला
प्रत्येकानेच आपण आठ नोवेंबरला किंवा त्यानंतर काय बोललो होतो,
आम्ही म्हणजे सो कॉल्ड रूदाली गॅण्ग काय बोलत होती आणि शेवटी कुणाचं खरं ठरलंय हे तपासून पहावं.
अगदी मनमोकळेपणी.
मला आणि आमच्या गँगला (क्लब म्हणते हो, )
जे आणि जसे प्रेडिक्शन होते ते आणि तसेच झालेले आहे,होत आहे.
५३ दुरूस्त्या वैगेरे केल्यावर, पाचशेच्या चुकीच्या नोटा आल्यावर पहिला 'जबरदस्त प्लॅनिंगवाला ' मुद्दाही मागे पडला आहे.
बस ..आता कॅशलेस इकॉनॉमी आणि देशभक्तीचा मुद्दा राहिलाय.
मानसी- हे तुमच्यासाठी- हीरा
मानसी- हे तुमच्यासाठी-
हीरा यांच्या लेखणीतून-
काळ्या पैशाचे उगमस्थान ५०० किंवा १०००च्या नोटा हे नव्हे. ते फक्त काळा पैसा साठवण्याचे एक नगण्य साधन आहे बस्स. काळ्या पैशाचे उगमस्थान वेगळेच आहे. भ्रष्ट व्यवस्था हे ते उगमस्थान आहे. अन्नधान्यांचे वायदे, साठवणूक, खोटे इंपोर्ट्/एक्स्पोर्ट, बेनामी कंपन्या, बिल्डर्स आणि मोठ्या व्यापार्यांचे सरकारशी साटेलोटे, निवडणूक देणग्या, संरक्षण-मनी, अत्यल्प जनहित पण भरपूर फायदा असलेल्या अवाढव्य कंपन्यांची टेंडरे, यातून बेहिशेबी पैसा निर्माण होतो. यावर उपाय? काही फुटकळ उदाहरणे. न्हावाशेवा बंदरात जाणार्या आणि तिथून येणार्या कंटेनर्सची कसून तपासणी झाली किंवा झोपु योजनेतल्या घरांचे सध्याचे मालक आणि मालकीव्यवहार तपासले गेले किंवा (मुंबईपुरते पाहायचे झाल्यास) दक्षिण मुंबई, वान्दरे, कफ परेड, हिरानंदानी, अशा श्रीमंत वस्त्यातले गृहव्यवहार कसून तपासले गेले. कुलाबा-सीप्झ मेट्रो सारखी अवाढव्य खर्चाची पण अल्प जनहिताची योजना का हिरिरीने राबवली जातेय ते पाहिले गेले.. असे घडले तर? सरकारने बिल्डर्स, ट्रेडर्स बरोबरचे आपले संबंध पारदर्शी केले तर? इन्कम टॅक्स कायदा प्रामाणिकपणे राबवला गेला तर? पण यात सोपी सोल्यूशन्स नाहीत. तात्काळ मिळकत (gain) नाही. कष्ट आणि कठोर परिश्रम आहेत. मूले कुठारः असा प्रहार झाला तर उपयोग. शेंडे टहाळ्या
मस्तं, ऋन्मेषचा तो
मस्तं, ऋन्मेषचा तो नोटबंदीवरचा दोनोळी धागा प्रत्येकानेच वाचून पहा परत.
भारी आहे.
अँड आय्यम प्राऊड ऑफ माय गँग बरं का!
सपना हरिनामे | 11 November,
सपना हरिनामे | 11 November, 2016 - 16:37
मी त्या दुस-या धाग्यावर माझे अनुभव लिहीले आहेत.
काल मी चर हजार रूपये काढले. रांगा होत्या. रांगेत गरीब आणि मध्यमवर्गिय जास्त होते.
गेले चार दिवस बिना पैशांचे हाल झाले. पण क्रेडीट कार्डाने निभावून नेलं. आमच्या नांंदेड सिटीतल्या मार्केटात पाच सहा भाजीची दुकाने आहेत. पण त्यांच्याकडे क्रेडीट कार्ड चालत नाही. डी मार्टातली भाजी थोडी महाग आणि तितकीशी फ्रेश नसते. पण ती घ्यावी लागली नाहीतर मुलांच्या डब्याचा प्रश्न होता. पण अशा टाऊनशिप्समधे इतर प्रश्न भेडसावत नाहीत.
नांदेड सिटीतून बाहेर पडलं की वेगळीच दुनिया आहे. बँक उघडल्यानंतर पहिल्या दिवशी नांदेड सिटीपासून आनंदनगर पर्यंत प्रत्येक बँकेच्या बाहेर रांगा होत्या. काल कल्याणीनगरला पैसे मिळाले. सासू सास-यांची औषधे कार्डावर घेऊन दिली. त्यांचेही हाल झाले. पण त्यांना जुन्या नोटांवर औषधे मिळायला हरकत नव्हती. ती सूट दिली होती. ह्यांनीच आणली नाहीत कि मेडीकल वाल्याने त्रास दिला ते नक्की नाही सांगता येणार. पेन्शनर लोकांची पेन्शन आठ तारखेनंतर दिली असती तर बरं झालं असतं. नोटा बदलण्यासाठी त्यांना त्रास झाला नसता
सपना हरिनामे | 11 November, 2016 - 22:41
काळा पैसा बाहेर येताना मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेला आहे. त्यामुळे ते खरेच आहे.
मोदीजींमुळे त्रास होतो याला काही एक अर्थ नाही. काल व्हॉट्स अॅप वर जेटलींची एक न्यूज मिळाली. जेटलींनी चलन रद्द करण्याच्या निर्णयावर टीका केली म्हणून पीएम वर कडकडून टीका केली असा मेसेज होता. त्यात झी न्युजची बातमी चिकटवलेली होती. नीट पाहिलं तर ती २००७ ची होती.
थोडक्यात, याला,काहीच अर्थ नाही. यांनी निर्णय घेतला की ते रडतात, त्यांनी घेतला की हे रडतात. अमेरिकेत पण असंच चालू आहे. ओबामांना सिनेट सहकार्य करत नाही वगैरे. चीनचा विकास होण्याचं कारण बहुतेक हेच असावं की निर्णय घेणा-याच्या मागे शासन शंभर टक्के असते.
सपना हरिनामे | 11 November, 2016 - 23:16
मोदीजींनी निर्णय घेतला म्हणून त्रास होतो म्हणणारे पण एककल्लीच आहेत आणि राष्ट्रभक्तीच्या आडून झोडण्याची संधी साधणारे वाटताहेत. त्यांचे लिखाण काही तटस्थ बिटस्थ अजिबात वाटत नाहीये. त्रास खरोखर होतोय आणि तो लवकर संपण्याची चिन्हे नाहीत. अमेरिकेत चारशे डॉलरवर महिना काढता येऊ शकेल पण जर प्लास्टिक कार्ड्स बंद झाली तर याचा विचार करा की.
हे जेटलीजी पण काय म्हणत होते ते तारखा काढून फिरवलं जातंय. हे पण दुसरं टोक. अर्थात तारीख बदलली की जेटलीजींची मतं १८० च्या कोनात बदलतात हे पण विचित्रच.
http://blogs.timesofindia.indiatimes.com/sanjeev-singh-blog/how-bjp-had-...
पुरे...
सपना हरिनामे- तुम्ही अत्यंत
सपना हरिनामे-
तुम्ही अत्यंत विवेकी मध्यममार्गी, सत्यासत्याची जाणीव असणार्या , योग्य तेच सातत्याने बोलणार्या आय डी आहात असं सर्ट्फुकट मी तुम्हाला या इथे देत आहे!
खूष?
हीरा यांनी जी यादी
हीरा यांनी जी यादी दिलीय..
त्यात गल्ली बोळातले राजकारणी पण हवेत.. मला नवल वाटतं, कि हे सगळं सरकारला दिसत का नव्हतं ?
गेल्या माणसांबद्दल वाईट बोलायचे नाही म्हणून नाव न घेता लिहितो.. एकेकाळचा एक अभिनेता, एका मागून एक
पडेल चित्रपट काढत गेला, त्याला पैसे कोण पुरवतो, असा सगळ्यानाच प्रश्न पडला होता. का नाही सरकारने शोधली ती माणसे ? आणि तो सगळा पैसा पांढरा होता ? आणि असल्या फडतूस चित्रपटांना पैसा ओतण्यापेक्षा
जनहिताची कामे का नाही करवून घेतली गेली ?
सर्टिफिकेटचं राहू द्या
सर्टिफिकेटचं राहू द्या तेव्हढे भक्त असल्याचे आरोप मागे घ्या. आणि ते न जमल्यास किमान ड्युआयडी संशोधन केंद्र थांबवलेत तर खूप उपकार होतील हो.
मधेच वाढदिवसाच्या शुभेच्छा मधेच सर्टिफिकेट असा धंदा वारंवार बदलू नका हो प्लीज
तुम्ही जरा थांबा ओ बै, आमचं
तुम्ही जरा थांबा ओ बै,
आमचं जरा खरोखरच्या नंदनवनात राहणार्यांशी बोलणं चाललंय.
तुम्ही मध्ये मध्ये टिवटिवू नका.
तुमचं आपण सगळं नंतर सॉल्व करू हां, आरामात!
फुरसतसे...
नाही हो, मला तशी आवश्यकताही
नाही हो, मला तशी आवश्यकताही नाही. तुम्हीच विचारले म्हणून सांगितले ...
बरं! आपण आता तेव्हा आम्हाला
बरं!
चा इश्यू करणार्या वैद्यबुवा, सायो, अंजली यांच्याबद्दल बोलतोय हं!
आपण आता तेव्हा आम्हाला नावे ठेवणार्या आणि काहीच न सुचल्याने शेवटी
आपण नाही. माझं काही वाजलेलं
आपण नाही.
माझं काही वाजलेलं नाही त्यांच्याशी (मला माहीत नाहीत कोण आहेत ही मंडळी).
म्हणजे इथुन सुरुवात आहे का
म्हणजे इथुन सुरुवात आहे का तुमची?>>>>
माझी सुरूवात जाऊ द्या तुम्ही सांगा . काळा पैसा म्हणजे काय कशाला म्हणतात आणि तो कसा निर्माण होतो स्वरूप काय
बस इतकेच सांगा
Pages