तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"
हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?
आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,
- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,
- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?
- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो
मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.
अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.
एक महिन्यातही स्थिती
एक महिन्यातही स्थिती सुधारलेली नाही हे दयनीय आहे. मोदी संसदेत का येत नाही आहेत ? देशाला खुलासा देण्याची जबाबदारी नाही का त्यांची ?
हा निर्णय अपरिहार्य होता, असा जो देखावा केला गेला होता, त्यामागची कारणमीमांसा आणि तो कितपय यशस्वी झाला, त्याचा अहवाल, संसदेत सादर व्हायलाच हवा.
मूळात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात चूक झाली, असे कबूल केल्यास भारतीय जनता ( क्षमाशील आहेच ती ) अजूनही मोठ्या मनाने क्षमा करेल. नाहीतर पुढच्या निवडणूकीत काय ते दाखवून देईल.. पण आता सक्षम पर्यायही नाही डोळ्यासमोर !
इकॉनॉमी डाउन आहेच. हे
इकॉनॉमी डाउन आहेच. हे नाकारता येणार नाही. प्रत्येक सेक्टर वर प्रभाव पडलेला आहे. काहींना बेनिफिट ही मिळाले आहे. उदा अपोलो टायर्स. ह्यांचे स्पर्धक जे अनऑर्गनैज्ड सेक्टर मध्ये होते व जे चायना मधून इंपोर्ट करत असत. त्यांचा धंदा बसला आहे. कॅश बेस्ड डीलिन्ग असत.
आज एक महिना झाला. ( हातातून पैशे जाउन)
सक्षम पर्याय नाहीच्च हा
सक्षम पर्याय नाहीच्च हा प्रचार गळी उतरवण्यात भाजप्ये यशस्वी झालेत म्हणून तर आपण तुघलकाबादला पोहोचलो आहोत!
बाकी दिनेशदा, वेल्कम टु देशद्रोही क्लब.
१०० च्या कमीत कमी ४० नोटा
१०० च्या कमीत कमी ४० नोटा आणि जास्तीत जास्त ७० नोटा कुठे मिळतील - ३ दिवसांत संपवायच्या आहेत
माझ्याकडे!
माझ्याकडे!
आता असे आले आहे कि हा एक
आता असे आले आहे कि हा एक करप्शन काळा पैसा व आतंकवादाविरुद्ध यज्ञ आहे. किती आहुती गेल्यात आत्ता परेन्त. सिरीअसली !
नवे ५०० कुठे आलेत म्हणे नेमके
नवे ५०० कुठे आलेत म्हणे नेमके
I got new 500
I got new 500
सक्षम पर्याय नाहीच्च हा
सक्षम पर्याय नाहीच्च हा प्रचार गळी उतरवण्यात भाजप्ये यशस्वी झालेत म्हणून तर आपण तुघलकाबादला पोहोचलो आहोत!
>>तुम्ही सांगा कोण आहे आणि तो मोदींचा पराभव कसा करु शकतो.
>>तुम्ही सांगा कोण आहे आणि तो
>>तुम्ही सांगा कोण आहे आणि तो मोदींचा पराभव कसा करु शकतो.>>>
मुळात चेहरा दाखवूनच निवडणुका लढवाव्या आणि जिंकाव्या लागतात हे आपल्या सिस्टीमचे अपयश आहे. व्यक्तीपूजा करत जगणे हाच आपला स्थायीभाव आहे
विनोद म्हणणार्या भाजपा आयटी
विनोद म्हणणार्या भाजपा आयटी सेल वाल्यांनी स्पष्टीकरण द्यावे. नुसते विनोद म्हणून मुद्दे टाळणे हा भाजप नेत्यांचा दुर्गूण अचूक उचला आहे.
अमा म्हणतात तेच आज एका
अमा म्हणतात तेच आज एका बिझिनेस चॅनेलवर एका अॅनालिस्टनेही सांगितले.
उद्योगांत धंदा unorganised sector कडून organised sector कडे वळतोय आणि वळत राहील हे सांगितले.
भारतात रोजगाराचे प्रमाण organised sector मध्ये जास्त आहे. म्हणजेच नोटाबंदीच्या परिणामी संपत्तीचे वाटप लहान उद्योगाकडून मोठ्या उद्योगाकडे, पर्यायाने कमी उत्पन्नवाल्याकडून अधिक उत्पन्नवाल्याकडे होते आहे.
आपणही जेव्हा जिथे कार्ड पेमेंट चालते तिथूनच खरेदी करतो, तेव्हाही हेच करत असतो.
Neelkeni to help govt in
Neelkeni to help govt in cashless project
http://googleweblight.com/?lite_url=http://m.ndtv.com/india-news/pm-modi...
मूळात काळा पैसा हा भारतात
मूळात काळा पैसा हा भारतात एकमेव प्रॉब्लेम असल्याचा "भास वाटतोय" हेच दुर्दैव आहे. तोच एकमेव महत्वाचा प्रॉब्लेम आहे, ही फॅक्ट आहे. इतकी की स्व. राजीव गांधींनाही जाहीर सभेत त्याबद्दल बोलावे लागले की रुपयातील केवळ १५ पैसे कामापर्यंत पोहोचतात (कित्येकदा ते देखि ल्नाही)
म्युन्शिपालटीच्या रस्ते खात्यापासुन ते संरक्षण खात्यापर्यंत प्रशासन व त्यांच्या जोडिला नगरसेवक्/आमदार/खासदार्/मंत्रीसंत्री लडबडलेले आहेत काळ्या पैशाच्या निर्मितीत गेली साठ वर्षे.
त्याविरुद्ध, नोटा रद्द करणे हा एक उपाय केला, पण तोच एकमेव उपाय केला/करणार होते, बाकी उपाय करणारच नाहीत "हा भास" देखिल बर्याच जणांना होतोय.
आता बाकी उपाय काय ते "जाहीर करुन सांगा" वगैरे आवाहने/आव्हाने होतीलच...
पण अस आहे, एखाद्या /अनेक भ्रष्टाचार्यांच्या, खणखणीत मुस्काटात मारायची असेल वा पेकाटात लाथ घालायची असेल, तर त्यास बेसावधच ठेवावे लागते. तेव्हा "जाहीर वगैरे करुन " उपाय योजना सांगा म्हणायची अपेक्षा व्यर्थ आहे.
सरकारचे सगळे प्रयत्न थोतांड
सरकारचे सगळे प्रयत्न थोतांड ठरले आहे. नुसते बँकेत पैसे पोहचून फायदा नाही हे काल उर्जित पटेल नामक एका खुर्ची वर बसवलेल्या माणसाने सांगितले आहे. व्याजदर बदलणार नाही, पैसे काढायची लिमिट वाढणार नाही. इ. कबूली या माणसाने दिली आहे. इतकी नामुष्कीची वेळ रिझर्व बँकेच्या गव्हर्नर पदी असलेल्या माणसावर "इतिहासात" पहिल्यांदा आली.
पैसे नसल्यामुळे घाबरलेल्या माणसाने सर्वातप्रथम रडण्याची प्रथा वापरून बघितली. ती ही चालली नाही कळल्यावर काळा पैसा बाहेर येणार नविन टूम ओरडण्यास सुरु केली, परंतू सगळाच पैसा बँकेत येत आहे बघून पाया खालची जमीन सरकू लागली. इतका पैसा परत आला पण रिटर्न करायला पैसाच छापलेला नव्हता. मग आता काय ? असे प्रश्न एका घाबरलेल्या माणसाला रात्रंदिवस पडू लागले. रडण्याचे सोंग याला अपेक्षित टीआरपी मिळाली नाही. म्हणून पीआर वाल्यांनी नविन कल्पना दाखवली "कॅश लेस" जसे एटीएम कॅशलेस तसे व्यवहार कॅशलेस करा म्हणून नविन टीआरपी मालिका सुरु केली.
जसे लहान मुलांना कमी बजेट असल्यामुळे काहीतरी घेऊन दिलेले असते मग तेच कसे चांगले आहे असे दाखवण्याचा प्रयत्न पालक करतात. तसाच हा प्रकार आहे.
भारतात कॅशलेस सुविधे साठी पायभूत सुधारणा नाही, इंटरनेटचा स्पीड लोएस्ट, कंन्टीन्युटी नाही, बॅंकेचे सर्वर सतत डाऊन असतात, लोकांना इंटरनेट चे ज्ञान नाही, ती सुविधा खेड्यापाड्यांमधे नाही. तिथे अजुन साधे नेटवर्क उभा केले नाही. अशा ठिकाणी लोकांना ऑनलाईन पेमेंट करायला भाग पाडत आहे. का तर घाबरलेल्या माणसाला स्वतःची निष्क्रियता लपवायची आहे.
इंटरनेट फ्रॉड ला जिथे सुशिक्षित माणसे बळी पडतात तिथे नवशिक्यांची काय अवस्था होईल कल्पना करवत नाही. म्हणे व्हॉट्सप वापरतात तर हे ही वापरा. इथे व्हॉट्सप् वर येणारे "अमुक " वर क्लिक करा तर "तमुक" होईल अशा लिंकावर लोक क्लिक करुन स्वतःचा डाटा गमवतात हॅकर्स ना बळी पडतात. आता अशा मोबाईल मधे जर तुमची बॅंकिंग प्रणाली असेल तर तुम्हाला देवच वाचवेल. कारण सध्या मेलवेअर, इ. व्हायरस यांना भारततील मोबाईल मधे खाजगी फोटो. व्हिडीओ इ तत्सम वस्तूं शिवाय जास्त काही खजाना मिळत नाही. जेव्हा बँकिंग प्रणाली मोबाईल मधे जोडले जातील तेव्हा खरी कलाकारी हे मेलवेअर, व्हायरस दाखवतील.
जगात जिथे जास्त डेबिटकार्ड इ. इ- पेमेंट चालते त्या ठिकाणी सरकारचे स्वतःचे अॅप्लिकेशन अथवा बँकेचे अॅप्लिकेशन आहे. वर इंटरनेटचा स्पीड उत्तम असतो (किमान सरासरी १५एमबी पेक्षासरासरी) (भारतात सरासरी स्पीड १.५एमबी) तसेच इंटरनेटचे दर अत्यल्प आहे. आणि संपुर्ण प्रदेशात इंटरनेट कनेक्शनची कनेक्टिव्हिटी अखंड मिळत असते. त्यामुळे तुम्ही कधीही अॅक्सेस करू शकतात. मधे नेट बंद होत नसल्याले पाठवलेले पैसे मधेच गायब होत नाही.
उलट भारतात मधेच इंटरनेट बंद पडले तुमच्या खात्यातुन पैसे निघाले आणि तुम्हाला प्रोडक्ट वगैरे मिळाले नाही तर सगळे रामायण घडते. रेल्वेच्या आयआरसीटी मधे पेमेंट करताना मधेच नेट बंद पडले आणि तिकिट निघाले नाही आणि खात्यातून पैसे गेले तर त्यांना फोन करून सांगावे लागते. मग पासबूक ची झेरॉक्स इमेल द्वारे द्यावी लागते. तेव्हा कुठे जाऊन तुमचे पैसे पुढील ७-९ दिवसात रिटर्न होतात. तो पर्यंत आपले पैसे ब्लॉक , आता हे किती जणांना परवडणार ही गोष्ट वेगळी.
सध्या घाबरलेल्या माणसाचे पाय जमिनीवर नाही. हे सत्य आहे.
मग डॉ. मनमोहन सिंग बोलले ते
मग डॉ. मनमोहन सिंग बोलले ते खोटे नाही.. भूल द्यायच्या आधीच ऑपरेशन करुन टाकले.
थोडी कळ सोसा.. हा शब्दप्रयोगच मला मान्य नाही. काय म्हणून कळ सोसा ? असे काय सुखात लोळत होतो आपण ?
थोडीशी गैरसोय नाही
थोडीशी गैरसोय नाही राहीलेली, दर आठवड्याला कमीत कमी ३-४ तास रांगेत उभे राहून २००० / ३००० रूपये मिळतात. मी स्वतः नेटबँकींग, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड वापरतो. पण तरीही कॅश लागतेच ना!
माझ्यासहीत माझ्या बरोबर रांगेत असणारे पण थोडे थोडे का होइना चिडलेले होते. एका पेपरमध्ये वाचले कि ५० दिवस वगैरे खोट आहे, कमीत कमी ४-५ महिने तरी अशीच परिस्थिती राहील.
खरचं तसे असेल तर मग मात्र कठीण आहे.
लिंब्या ग_ड्या तुला काही कळत
लिंब्या ग_ड्या
तुला काही कळत नसताना सारखा प्रतिसाद द्यायचा सोस कशाला पाहीजे राजा गा_वा ?
तुमच्या सोयीचे नसले की पेपरवाले खोटे, न्यूज चॅनेल्सवाले खोटे . एके काळी तर म्हणत होतात कि न्यायालयाचा निर्णय ही मान्य करणार नाही म्हणून. राज्यघटना तर नाहीच मान्य तुम्हाला.
समज उद्या दाऊद इब्राहीम निवडून आला. तर तो काय करेल ?
त्याच्या भावकीतल्या सर्वांची कर्ज माफ करेल. त्ञांचे टॅक्स माफ करेल. बँका झाडून त्यांना कर्जे देईल आणि बँकांनी बोंब मारू नये म्हणून तुम्हाला बँकेत पैसे भरायला लावेल ? हो कि नाही ?
उद्य टायगर मेमनचे सर्व उत्पन्न करमुक्त झाले आणि त्याला ४०००० कोटी रुपये टॅक्स माफ झाला तर तो चार लाख कोटी पैसा शो करू शकतो. झाला कि नाही पैसा पांढरा ? एव्हढं बेसिक कळत नसताना कशाला मधे मधे करतोस ?
करायचंच असेल तर लोकांना खोटेनाटे सांगून गंडवून पोट भरायचा धंदा बंद कर. नसेल पटत तर किमान या गंडवागंडवीच्या धंद्याच्या पावत्या द्यायला सुरूवात कर. त्यावर कर भर. सर्व्हिस टॅक्स, आयकर हे सर्व प्रामाणिकपणे भर. गेल्या वर्षीचे कर प्रमाणपत्र इथे अपलोड कर आणि मग लोकांना देशद्रोही ठरव.
म्युन्शिपालटीच्या रस्ते
म्युन्शिपालटीच्या रस्ते खात्यापासुन ते संरक्षण खात्यापर्यंत प्रशासन व त्यांच्या जोडिला नगरसेवक्/आमदार/खासदार्/मंत्रीसंत्री लडबडलेले आहेत काळ्या पैशाच्या निर्मितीत गेली साठ वर्षे
यात वाजपेयीची ५ व सध्याची ३ वर्षेही आहेत का ?
पानवाला , चहावाला , इंजेक्शनवाला क्याशलेस झाले. चेक पेटीएम घ्यायला लागले. आनंद आहे.
या तुमच्या वरच्या यादीतले लोक लाच क्याशमध्येच खाणार ना ? की कार्ड स्वाइप मशिन , चेक घेणार ?
नवीन पैसे लाच घेतानाही माणसे सापडलीत ना ?
लोकांचा काळा पैसा नष्ट झाला असे भाजपाने नाचणे हे म्हणजे न पटलेल्या पोरीला देवी झाल्याने ती आता कुणाला पटणार नाही असे म्हणुन एखाद्या उनाडाने नाचणे
या साठ वर्षात इतकी प्रगती
या साठ वर्षात इतकी प्रगती केली की आजकाल स्वतःला फकिर म्हणून घेणारे सुध्दा विमानाने फिरतात आणि लाखो चा सुट घालून स्वतःची मिरवणूक काढतात आणि नंतर कोटींमधे विकून पण देतात.. अन्यथा इंग्रजांच्या शासनात जमले असते का?
मंडळी, आपण
मंडळी, आपण भरकटतोय.....
पर्सनल कॉमेंट (भले त्या पर्सनल प्रश्नाला उत्तर म्हणून दिल्या असतील) करून अडमीन ला खुले आमंत्रण देतोय...
...
...
सध्या घाबरलेल्या माणसाचे पाय
सध्या घाबरलेल्या माणसाचे पाय जमिनीवर नाही. हे सत्य आहे.
हे व्हाट्सपू का ?
पण अस आहे, एखाद्या /अनेक
पण अस आहे, एखाद्या /अनेक भ्रष्टाचार्यांच्या, खणखणीत मुस्काटात मारायची असेल वा पेकाटात लाथ घालायची असेल, तर त्यास बेसावधच ठेवावे लागते. तेव्हा "जाहीर वगैरे करुन " उपाय योजना सांगा म्हणायची अपेक्षा व्यर्थ आहे.
<<
थोड्या भ्रष्टाचार्यांच्या मुस्कटात मारण्याच्या नावाखाली अख्ख्या भारताच्या पेकाटात लाथ मारण्याचा तुघलकी पराक्रम तुमच्या देवाने करून दाखवला आहे.
देशाचं पेकाट मोडून ठेवलंय.
अन भक्तांची भजनं सुरूच आहेत. किती केविलवाणा व भीतीदायक प्रकार आहे!
आज महिना झाला, तरीही बँकांसमोरच्या रांगा संपलेल्या नाहीत.
आता म्हणे १५ तारखेपर्यंत हॉस्पिटल/मेडीकल स्टोरात जुन्या नोटा चालवा. हॉस्पिटलने त्या बँकेत भरा. नंतर इन्कमटॅक्सवाल्या चोरांना तोंड द्या, अन वरतून भरलेले पैसे भरलेलेच ठेवा. विड्रॉवल शून्य! डेली एक्स्पेन्स कुठून चालवा? दिल्लीत बसून फर्मानं काढायला काय लागतं यांना?
जेवढ्या बातम्यांत जुन्या - नव्या नोटा पकडल्याचं येतंय सगळ्यांत पकडले जाणारे व क्लीन चिट मिळवणारे भाजपशी संबंधीतच का आहेत?
***
"कार्डाने घेतलेले ईंधन स्वस्त!" असल्या हेडलाईन बडवताहेत टीव्हीवर.
स्वस्त? ०.७५% ने स्वस्त? १०० रुपयांत घसघशीत बारा आणे सूट??? अन कार्ड ट्रँजॅक्शनचे एक्स्ट्रा ३% लागणारेत ते कोण यांचे तीर्थरूप भरणारेत का?
चाराणी सटकलीये या सरकारची.
वैयक्तिक अनुभव लिहिले तरी
वैयक्तिक अनुभव लिहिले तरी लोकं सारकॅस्टिक होतायत का?
सुरुवातीला आणि मधे एकदा काढलेल्या कॅश वर अजून चालू आहे.
हा महिना जाईल निवांत असं दिसतय. सगळ्यात जास्त फायदा घर खर्च ५०% कमी आला हा आहे. विनाकारण चाललेला खर्च दिसला ही फार मोठी गोष्ट झाली आमच्या करता.
आतापर्यंत आरामात झाले व्यवहार. कामवाल्या बायकांचे- आईवडीलांचे - इतर ओळखीच्या लोकांचेही.
कदाचित म्हणूनच प्रोब्लेम आहे हे पटत नाहीयें.
(ज्यांना त्रास झाला असेल त्यांच्या त्रासाला कमी लेखाय्च नाहिये.)
पेकाटात लाथ मारणे हा वैयक्तिक
पेकाटात लाथ मारणे हा वैयक्तिक अनुभव आहे का?
आय मीन
>>
वैयक्तिक अनुभव लिहिले तरी लोकं सारकॅस्टिक होतायत का?
<<
हे वाक्य कुणाला उद्देशून म्हटलंय तुम्ही?
की आपलं उगंच चान चान चाल्लंय वाला एक प्रतिसाद लिहून टाकायचा म्हणून लिहिलाय?
भयंकर प्रतिसाद. मी नाही वाचू
भयंकर प्रतिसाद. मी नाही वाचू शकत. ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत दिसत नाहीत कुणी.
मी सोडून देतेय हा धागा.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=WWkqMGM67vU
या वर होणार का सर्जिकल स्टृआईक ?
२८ किलो सोन्याची परवानगी आहे का ?
हे वाक्य कुणाला उद्देशून
हे वाक्य कुणाला उद्देशून म्हटलंय तुम्ही?
-- तुम्हाला नाही. एकंदरित प्रतिसाद वाचून ह्या धाग्यावरचे.
मंडळी, आपण
मंडळी, आपण भरकटतोय.....
पर्सनल कॉमेंट (भले त्या पर्सनल प्रश्नाला उत्तर म्हणून दिल्या असतील) करून अडमीन ला खुले आमंत्रण देतोय.. >>>
सिम्बा ,
जिथे एखादा गझलपुरूष उकसवणारे प्रतिसाद देतो हे लक्षात यायला तब्बल सात वर्षे लागतात. आणि सात वर्षानंतर त्याच्यावर कडक कारवाई काय होते तर एक खलिता पाठवला जातो, ज्याला ड्युआयडी काढून केराची टोपली दाखवली जाते. या ड्युआयडीला ही निषेध खलिता पाठवायला तब्बल दीड वर्षे लागतं. तिथे कारवाई ची काय किंमत असणार ?
सुरूवातीला जमेल तितकं दुर्लक्ष केल्यामुळे आधी लोकांना उद्देशून चोर म्हणायचं, मग गद्दार आणि आता थेट देशद्रोही. पण यांचे स्वतःचे निवडणुकीतले काळे धंदे याबद्दल मौन बाळगायचं. अशा वैयक्तिक हल्ले करणा-यांबद्दल इथले तथाकथित संतुलित आयडीज ते तसेच बोलणार म्हणत कौतुकाने दुर्लक्ष करत राहणार. आणि यांना आपण उत्तरे दिली कि सात्विक अवतार करत तुटून पडणार हे कधी लक्षात आलेय का ? हे खूप पूर्वी लक्षात आल्याने कुणाची शाबासकी मिळवणे किंवा अॅडमिनच्या नजरेत हिरो होणे या गोष्टींपेक्षा तथ्य मांडणे हे सर्वोच्च समजले तर मग प्रायोरिटी कळते.
आपण मुद्दे मांडल्यानंतर ते भरकटवण्याचा प्रयत्न होतो त्याबद्दल इथले तथाकथित रॅशनलिस्ट कधीही आपल्या बोटांना त्रास देत नाहीत. त्यांचं पित्त तेव्हांच खवळतं जेव्हां त्यांच्या आवडत्या सरकारचं पितळ उघड पडतं.
ज्या कारणांसाठी हे लोक ट्रंपला शिव्या घालतात त्याच कारणांसाठी इथल्या लोकांना तसे करण्याचा अधिकार हे देत नाहीत. मोदीद्वेष, ब्राह्मणद्वेष असे शब्द त्यासाठी त्यांनी तयार करून ठेवलेले आहेत. पण तिकडे ट्रंपद्वेष हा शब्द वापरला तर खवळून उठतील.
डबल स्टँडर्ड्स !!
Pages